Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा

In this Article

तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १६ महिन्यांच्या गर्भवती आहात. तुम्ही तुमच्या गरदोरपणाच्या दुसऱ्या तिमाहीचा  पहिला महिना अधिकृतपणे पूर्ण केलेला आहे. ह्या कालावधीत बऱ्याच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आनंदी असतात. दुसरी तिमाही शरीरासाठी तितकीशी कठीण नसते आणि त्यामुळे मातांना जीवनाच्या इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करता येते आणि ते तुमच्या कुटंबात येणाऱ्या नवीन सदस्यासाठी सुद्धा महत्वाचे असू शकते. काही वैद्यकीय समस्या किंवा गुंतागुंत नाही ना हे समजण्यासाठी  ह्या कालावधीत बऱ्याच्या चाचण्या करण्यास सांगितल्या जाऊ शकतात. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात तुमच्यामध्ये आणि बाळामध्ये कुठले बदल होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील बाळांची वाढ

आपल्या गर्भाशयातील लहान बाळांचा आकार आणि वजन वाढेल. बाळाचा विकास वेगाने होतो आहे. या सर्व महिन्यांमध्ये बाळांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले जाते जेणेकरून सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांचे शरीर पुरेसे टिकाव धरू शकेल. डोळ्यांचे मुख्य कार्य सुरु होते आणि प्रकाशातील बदलांना बाळाचे डोळे संवेदनशील होतात कारण प्रकाशामुळे बाळ लगेच पापण्या मिटून घेते. तुमच्या गर्भाशयात अंधार आणि शांतता असते परंतु तुम्ही जेव्हा पोटावर टॉर्चचा प्रकाश टाकता तेव्हा बाळ त्यास प्रतिसाद देते.

आपल्या आजूबाजूचे आवाज ऐकण्यास केवळ आपले कानच मदत करत नाहीत तर मेंदूतील स्पंदने पुढे नेण्यासाठी आपली हाडे सुद्धा मदत करतात आणि ऐकण्याच्या क्रियेतील महत्वपूर्ण साधन बनतात. १६  गरोदरपणाच्या व्या आठवड्यात हाडांचा विकास आणि कुर्चेची सर्वोच्च वाढ होते त्यामुळे बाहेरील जगातील आवाज सुद्धा बाळाला अस्पष्टसे ऐकू येतात. तुमचा आवाज मात्र त्याला अगदी स्पष्ट ऐकू येईल. त्यामुळे ह्या काळात डॉक्टर तुम्हाला बाळाशी संवाद वाढविण्यास सांगतात. तुम्ही विशिष्ट गाणी ऐकण्याचे वेळापत्रक ठरवू शकता. बाळाने बाहेरच्या जगात प्रवेश केल्यानंतर बाळाला ती गाणी अगदी सहज ओळखू येतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात बाळांचा आकार

तुमच्या गर्भाशयातील बाळांचा आकार लहान असला तरी त्यांची वाढ होणे थांबले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचा विकास वेगाने सुरू आहे. एकट्या बाळांची लांबी साधारणत: १०.५ सेमी ते ११. ५ सेमी  असते आणि वजन साधारणपणे २७-३०ग्रॅम असते. संख्येचा विचार करण्याऐवजी आपली बाळे किती मोठी आहेत हे पाहणे आवश्यक आहे. बाळांच्या वाढीची फळांशी तुलना करणे हा पारंपारिक मार्ग आहे.  ह्या आठवड्यात तुमचे प्रत्येक बाळ अवोकाडो इतके मोठे होईल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात बाळांचा आकार

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात होणारे शारीरिक बदल

एकापेक्षा जास्त बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात शरीरात होणारे बदल आईच्या जीवनातील काही मौल्यवान क्षण असतात.

  • गॅस आणि ढेकर येण्याचा त्रास होईल. तथापि, काही वेळा तुम्हाला आंतरिकपणे आपल्या लहान बाळांच्या छोट्या  हालचाली जाणवण्यास सुरुवात होते. बहुतेक मातांना ह्या हालचाली दुसऱ्या तिमाही नंतर जाणवण्यास सुरुवात होते.  जर तुम्ही कदाचित भाग्यवंतांपैकी एक असाल तर तुम्ही ते लवकर अनुभवणे सुरू कराल. या हालचाली गॅस होणे किंवा भूक लागलेली असणे इत्यादींच्या लक्षणांपासून वेगळ्या करणे कठीण असू शकते परंतु काळानुसार त्यांची विशिष्टता आपल्यासाठी स्पष्ट होईल.
  • गर्भवती महिलांची त्वचा इतकी सुंदर आणि गुळगुळीत होण्यास सुरवात होते की एका विशिष्ट कालावधीत त्या देवीसारख्या दिसू लागतात! संप्रेरक पातळीमुळे तुमच्या त्वचेवर तेलाचा स्राव अत्यंत सहज लक्षात येण्याइतपत दिसू लागतो, ज्यामुळे तुम्ही गुलाबी आणि गोंडस दिसू लागता आणि जरी तुमचे पोट सैल कपडे घातल्याने दिसत नसले तरीसुद्धा लोक तुमच्या गरोदरपणाचा अंदाज घेऊ शकतात.
  • बाळांची वाढ योग्य मार्गावर ठेवण्यासाठी हार्मोन्स जबाबदार असल्याने, त्याचा परिणाम  दिसून येतो. कमीतकमी केस गळण्याने तुमचे केस दाट होऊ लागतात तसेच तुम्हाला नखेही पूर्वीपेक्षा वेगाने वाढत असल्याचे लक्षात येईल. हातापायांची नखे वारंवार कापण्याची आवश्यकता असते आणि काही वेळा तुमची नखे ठिसूळ सुद्धा होऊ शकतात. हे बदल जेवढे तात्पुरते असू शकतात, तेवढी त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात होणारे शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या जुळ्यांसह गरोदरपणाचा १६ वा आठवडा म्हणजे एक आनंददायक गोष्ट आहे. त्यासोबत येणारी  विविध लक्षणे सामान्यत: स्वागतार्ह असतात, तर काही थोडी त्रासदायक देखील असू शकतात.

  • स्तनांच्या वाढलेल्या आकारामुळे तुमच्या पतीला तुमच्याप्रती वेगळ्या प्रकारचे आकर्षण वाटू लागले तर आश्चर्यचकित होऊ नका. या आठवड्यात तुमच्या स्तनाना सूज येत राहते आणि तुम्ही त्यासाठी आरामदायक ब्रा खरेदी करा.
  • मोठ्या स्तनांसोबतच गर्भाशयाचा आकार सुद्धा वाढेल आणि तुमचे वजन वाढेल. त्याचा ताण तुमच्या पाठीवर येऊन सतत वेदना होऊ शकतात. साधे आणि सोपे स्ट्रेचिंग केल्यास तुम्हाला काही प्रमाणात आराम पडू शकतो.
  • गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे तुमच्या आतड्यांवर दाब पडतो आणि संप्रेरकांमुळे स्नायू शिथिल होतात. ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे शौचास साफ होत नाही आणि बद्धकोष्ठता वाढते. भरपूर प्रमाणात दर्वपदार्थांचे सेवन करून तंतुमय फळे खाणे हा त्यावर उत्कृष्ट उपाय आहे.
  • शरीरातील हे बदल फक्त शरीराच्या खालच्या भागापर्यंत मर्यादित नाहीत. तुमच्या डोळ्याच्या कॉर्नियाच्या आकारात देखील वाढ होते आणि त्यामुळे कधीकधी डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा खाज सुटू शकते. कॉन्टॅक्ट लेन्सेस घालण्याची सवय असलेल्या स्त्रियांना असा डोळ्यांचा चिडचिडेपणा अत्यधिक अनुभवायला मिळतो. डोळ्यात घालायच्या काही थेंबांमुळे अस्वस्थता लवकर कमी होते.
  • कदाचित खूप जास्त आनंद झाल्यामुळे किंवा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुम्ही नियमितपणे गोष्टी विसरण्यास सुरवात करू शकता आणि असं का होतंय ह्याचा विचार करू लागता. ह्या स्थितीला इंग्रजीमध्ये ‘प्रेग्नन्सी ब्रेन” असे म्हणतात. अशा वेळी आवश्यक माहितीचा मागोवा ठेवण्यासाठी याद्या करा, ऍप्सचा वापर करा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा – पोटाचा आकार

तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असल्यामुळे सगळ्यांना तुमचा वाढलेला पोटाचा आकार लक्षात येईल. जर ही तुमची पहिली गर्भधारणा असे तर पोट नेहमीपेक्षा थोडे जास्त बाहेर येते. गडद रेषा आणखी गडद होते आणि नाभीच्या खालचा पोटाचा भाग दोन भागात विभागला जातो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड

मागील महिन्यातील अल्ट्रासाऊंड मध्ये जे स्पष्ट दिसले नाही ते आता १६ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड मध्ये स्पष्ट दिसू लागते. तुमच्या पोटातील प्रत्येक बाळाच्या हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकू येतील.

ह्या टप्प्यावर केलेला अल्ट्रासाऊंड महत्वाचा आहे कारण त्यामुळे गर्भपाताची शक्यता आहे की नाही हे समजते. जोखमीची टक्केवारी जवळपास ५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे आणि त्यामुळे चिंताग्रस्त मातांसाठी तो एक मोठा दिलासा असू शकतो.

मुलांची नखे लवकरच वाढू लागतील तसेच केसांनी त्यांचे शरीर आच्छादले जाईल, हे सर्व बदल अल्ट्रासाऊंड दरम्यान स्क्रीनवर स्पष्ट दिसतील. तसेच, तुमच्या लक्षात येईल बाळाची नाळ पोटाच्या खालच्या बाजूस असेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण  – १६ वा आठवडा –  आहार

आपले वजन झपाट्याने वाढत जाईल म्हणून, निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. वजन कमी ठेवण्यासाठी जेवण कमी करण्याचा प्रयत्न करू नका. आधी सांगितल्याप्रमाणे, जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीसाठी आवश्यक असलेला पौष्टिक आहार घ्या. थोडे थोडे दिवसभर खात राहिल्यास तुम्हाला खूप भूक लागणार नाही तसेच जळजळ होण्याची शक्यता कमी होईल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण  - १६ वा आठवडा -  आहार

सकाळची न्याहारी भरपूर करा. त्यानंतरच्या अन्नाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. रात्रीचे जेवण सर्वात हलके घ्या. मीठ फक्त आवश्यक प्रमाणात घ्या. मीठ आणि मसालेदार पदार्थ टाळा. उकडलेले खाद्यपदार्थ आणि भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्यास ते पचनास सोपे  जातात तसेच त्यामुळे तुम्हाला कुठल्याही संक्रमणापासून संरक्षण मिळते.

गरोदरपणात काळजी घेण्याविषयक टिप्स

गरोदरपणाचा १६ वा आठवडा एक चांगला आठवडा असल्याने, स्वत: ची काळजी घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या काही टिप्स दिल्या आहेत त्यांचे पालन करा.

हे करा

  • आपली बाळे योग्य प्रकारे वाढत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या वजनाचा मागोवा घ्या.
  • व्यायामाची दिनचर्या सेट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची गरोदरपणाची प्रगती सामान्य आहे ह्याची एकदा डॉक्टरांनी याची पुष्टी केली की तुम्ही व्यायाम करू शकता. दररोज कमीतकमी ३० मिनिटे हलका आणि कमी तीव्रतेचा व्यायाम करा.
  • तुमच्या स्नॅक्समध्ये काही प्रथिने समाविष्ट करा. चीज़ हा एक भूक भागविण्यासाठी आणि वाढत्या बाळांना प्रोटीन आणि कॅल्शियम प्रदान करण्याचा एक चांगला पर्याय असेल. खारट पदार्थांची लालसा तृप्त करण्यास देखील मदत करते. लिस्टरियासारखे संक्रमण टाळण्यासाठी चीज योग्य प्रकारे शिजवलेले आणि पास्चराइझ्ड दुधापासून बनविलेले असल्याची खात्री करा.

काय टाळावे?

  • जर आपल्या नखांची वेगाने वाढ होत असेल तर ती कुरतडू नका. नेल कटर वापरा.
  • जास्त कालावधीसाठी उभे राहू नका कारण त्यामुळे पायात पेटके येऊ शकतात.

जुळ्या  किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

निद्रानाश टाळण्यासाठी आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी गरोदरपणातील उशांची खरेदी करा. पार्टी आयोजित करताना, इतरांनाही सामील करून घेण्यासाठी काही निरोगी ज्यूस तयार करण्यासाठी मॉकटेल रेसिपी बुक खरेदी करा. तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये पुन्हा भेट द्यावी लागेल आणि येत्या आठवड्यांत सैल कपडे आणि आरामदायक ब्रा खरेदी कराव्या लागतील.

गरोदरपणाचा १६ आठवडा हा गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे. ह्या आठवड्यांमध्ये स्वतःची काळजी घेतल्यास पुढे येणारी आव्हाने चांगल्या प्रकारे हाताळता येतील. ह्या सर्व क्षणांचा आनंद घ्या.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १७ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article