Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गर्भाशयातील बाळासाठी गोष्टी वाचणे : कारणे आणि फायदे

गर्भाशयातील बाळासाठी गोष्टी वाचणे : कारणे आणि फायदे

गर्भाशयातील बाळासाठी गोष्टी वाचणे : कारणे आणि फायदे

23 ते 27 व्या आठवड्यादरम्यान, गर्भाशयातील बाळाला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. बाळाला स्पष्टपणे ऐकू येणारा सर्वात महत्त्वाचा आवाज म्हणजे त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके. पण, जसजसे गर्भारपणाचे दिवस पुढे सरकतात तसतसे पोटातील बाळ बाहेरच्या आवाजांना सुद्धा प्रतिसाद देऊ लागतो. तेव्हाच तुम्ही त्याच्याशी संवाद साधणे सुरु करू शकता. तुम्ही त्याच्याशी बोलू सुद्धा शकता. आपल्या सर्व भावना आणि विचार त्याच्याशी शेअर करू शकता. त्याच्यासाठी गाऊ शकता किंवा त्याला एखादे पुस्तक वाचू शकता. होय, तुमचे बाळ पोटात असतानाच त्याला चांगले पुस्तक वाचून दाखवणे त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बाळाला पुस्तक वाचून दाखवल्याने बाळामध्ये भावना उत्तेजित होतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास मदत होते. असेही मानले जाते की बाळाला त्याच्या जन्मानंतर ह्याची मदत होते.

व्हिडिओ: गर्भाशयात असलेल्या बाळासाठी गोष्टी वाचण्याचे फायदे

तुमच्या पोटातील बाळासाठी वाचणे का आवश्यक आहे?

तुम्ही तुमच्या बाळासाठी वाचलेल्या कथांमुळे त्याच्या काही विशिष्ट भावना जागृत होतात. बाळासाठी अंगाई गीत गेल्यास अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच व्हॉइस मॉड्युलेशनची भावना विकसित होते. बाळ सुद्धा अगदी सावध होऊन त्याला प्रतिसाद देतो. तुम्ही तुमच्या बाळाला दररोज गोष्टी वाचून दाखवल्यास, तो खऱ्या जगात आल्यावर तुमचा आवाज ओळखेल. त्यामुळे तुमच्यामध्ये आणि बाळामध्ये एक मजबूत बंध निर्माण होण्यास मदत होईल. काही वेळा, लहान मुले देखील नवीन शब्द निवडतात आणि त्यांना त्याचे अर्थ त्यांच्या आयुष्यात खूप लवकर समजतात.

तुम्ही तुमच्या पोटातील बाळासाठी वाचन कधी सुरू करू शकता?

वाचनाला सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ लागत नाही. तथापि, जर तुम्ही तुमच्या बाळाला वाचून दाखवण्यासाठी पुस्तके निवडत असाल, तर त्यासाठी योग्य वेळ जाणून घेणे गरजेचे आहे. बाळाचे सुरुवातीचे महिने गर्भाशयात राहण्याची सवय होणे आणि सभोवतालची परिस्थिती जाणून घेणे ह्यामध्ये जातात. कालांतराने, बाळाचा विकास होत असताना, तो बाहेरचा आवाज ऐकू लागतो. त्यामुळे तुम्ही गुणगुणलेली गाणी आणि तुम्ही बोललेले शब्द ऐकणे त्याला सोपे जाते.

म्हणूनच, जेव्हा तुम्ही गर्भारपणाचे 23 आठवडे पूर्ण करता, म्हणजेच जेव्हा तुमच्या गर्भारपणाच्या दुसऱ्या तिमाहीचा शेवट येतो,  तेव्हा तुमचे बाळ तुमच्या आवाजावर आणि इतर कोणत्याही कृतींवर वारंवार प्रतिक्रिया देतील. म्हणजेच तुमच्या बाळाचा संज्ञानात्मक विकास देखील वेगाने होत आहे. तुम्ही योग्य संगीत ऐकून आणि त्याला फायदेशीर असलेल्या कथा वाचून त्याच्या विकासाचा वेग वाढवू शकता.

तुमच्या पोटातील बाळासाठी वाचनाचे फायदे

गर्भाशयात असलेल्या बाळाला वाचण्यासाठी गोष्टी शोधताना, तुमच्या क्रियाकलापांचा त्या लहान बाळाला कसा फायदा होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीचा म्हणजेच खाणे, बोलणे आणि व्यायाम करणे ह्याचा बाळावर परिणाम होत असतो. तुमच्या प्रत्येक कृतीचा, म्हणजेच अगदी खाण्यापासून ते बोलण्यापर्यंत बाळावर अनेक प्रकारे परिणाम होतो. बहुतेक बाळांना भाषा समजत नसली तरीसुद्धा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मूळ भाषेबद्दल आत्मीयता निर्माण होते.

  • गर्भारपण हा केवळ आईसाठीच नाही तर बाळासाठीही तणावपूर्ण काळ असतो. बाळाला अनेक भावनांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही वेळा बाळ भारावून जाते. काही छान वाचन केल्यास तुम्हाला शांत होण्यास मदत होऊ शकते. तुमचा शांत आवाज तुमच्या चिंताग्रस्त बाळाच्या हृदयाची गती नियंत्रित करू शकतो. त्यामळे बाळ तुमच्या गर्भाशयात आरामात राहू शकते.
  • बाळाचे त्याच्या आईशी असलेले नाते तो गर्भात असल्यापासूनच विकसित होते. त्वचेच्या संपर्काचे काही फायदे आहेत. बाळाच्या जन्मानंतर बंध अधिक मजबूत होतात. परंतु जेव्हा लहान बाळ आईच्या पोटात असते आणि आई जेव्हा विविध क्रियाकलापांमध्ये गुंतते तेव्हा खऱ्या अर्थाने बंध तयार होतो. आईचा आवाज सतत ऐकल्याने बाळाचा विश्वास वाढण्यास मदत होते, म्हणूनच बहुतेक बाळे आईचा आवाज ऐकून रडणे थांबवतात. एखादे विशिष्ट संगीत नियमितपणे वाजवले तर बाळही ते चांगले ओळखू शकते. बाळाच्या जन्मानंतर हे संगीत पुन्हा वाजवल्यास बंध मजबूत होऊ शकतो. आणि, हे फक्त आईपुरते मर्यादित नाही तर तुमच्या पतीने बाळाला एखादी गोष्ट वाचून दाखवली तर बाळ तो आवाज सुद्धा ओळखू लागेल.
  • जसजसे तुमचे बाळ गर्भाशयात वाढत जाते, तसतसे त्याच्या मेंदूचा विकास सुरू असतो आणि न्यूरल कनेक्शन वेगाने तयार होतात. आईचा आवाज किंवा कथा ऐकणे ह्या मुळे बाळाचा आईसोबतचा बंध मजबूत होण्यास मदत होते. आणि, जेव्हा तो जन्मानंतर पुन्हा ती कथा ऐकतो तेव्हा त्यालाती कथा आठवते. पुनरावृत्ती हा स्मरणशक्तीचा एक प्रकार आहे आणि बाळ गर्भाशयात असल्यापासून जर बाळाला वाचून दाखवण्यास सुरुवात केली तर बाळाशी स्मरणशक्ती विकसित होते आणि बाळाची एकाग्रता वाढते.

गर्भाशयात बाळ

गर्भाशयात असलेल्या बाळासाठी कोणत्या कथा वाचाव्यात?

जर तुम्ही उत्सुक वाचक असाल तर तुम्हाला सर्व काही वाचायला आवडेल. रोमँटिक कादंबऱ्यांपासून ते रहस्यकथा, विज्ञानकथा ह्यापैकी काहीही तुम्हाला वाचायला आवडेल. परंतु, तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी  ही पुस्तके वाचू शकत नाही. बाळाच्या जन्मानंतर सुद्धा तुम्ही ह्या कथा त्याच्यासाठी वाचू शकत नाही. तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारच्या कथा सर्वात जास्त योग्य वाटतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही धडपडत असाल, तर कोणत्याही पुस्तकांच्या दुकानातील मुलांच्या विभागात एक साधा फेरफटका मारा आणि तुमच्या बाळाला ऐकायला आवडत असलेली पुस्तके खरेदी करा. तुम्ही तुमच्या बाळाची लायब्ररी लवकरात लवकर तयार करून आणि त्याला ही पुस्तके वाचून दाखवू शकता. जेव्हा तुमचे बाळ मोठे होते आणि वाचू शकते, तेव्हा तो ही पुस्तके वाचू शकतो. थोडक्यात भविष्यातील खर्चाची काही प्रमाणात काळजी घेतली जाईल. परंतु, जर तुम्हाला पुस्तके लवकर खरेदी करायची नसतील तर तुम्ही लायब्ररीचे सदस्यत्व मिळवू शकता आणि तुम्हाला तुमच्या लहान मुलाला वाचायची असलेली सर्व पुस्तके उधार घेऊ शकता.

बेबीज डे आउट हा चित्रपट आठवतो? एखादे बाळ जगभर फिरते आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देते.  अशा पुस्तकांसारखी पुस्तके अप्रत्यक्षपणे लहान मुलामध्ये उत्साह आणि आनंदाची भावना निर्माण करण्यास मदत करू शकतात. छोट्या आणि यमक जुळवलेल्या कविता बाळाला वाचून दाखवल्यास, आवाज आणि शब्द निर्मिती ओळखण्याची त्याची प्रवृत्ती विकसित होण्यास मदत होते. त्याची कल्पनाशक्ती समृद्ध करू शकणार्‍या काल्पनिक कथा वाचा. डॉक्टर स्यूस, तसेच रॉल्ड डहलची पुस्तके लहान मुलांसाठी आहेत. परंतु पोटातील बाळासाठी ही पुस्तके वाचू नयेत असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला कथा कशा प्रकारे वाचून दाखवता हे देखील महत्त्वाचे आहे. कथा वाचताना तुमच्या आवाजात चढ-उतार करा.

तुमच्या गर्भात असलेल्या बाळासाठी काय वाचायचे हे तुम्हाला तुम्हाला आता समजले आहे त्यामुळे आता थांबू नका. संगीत ऐकणे किंवा स्वतःची काही गाणी गुणगुणणे यासह बाळासाठी वाचन करा. बाळ जे काही ऐकते त्याचा फायदा बाळाला होतो आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत होते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article