Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)

गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)

गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग)

विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. त्यामुळे गर्भधारणा आणि प्रसूतीचे सखोल निरीक्षण करणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. ह्या सुविधांमुळे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर हवे तिथे हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. गर्भारपण, प्रसूती आणि बाळाच्या जन्मादरम्यान बाळावर लक्ष ठेवण्याची अशीच एक प्रक्रिया आहे तिला इंग्रजीमध्ये फिटल मॉनिटरिंगअसे म्हणतात.

गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग) म्हणजे नक्की काय?

प्रसूती कळा येत असताना आणि बाळाचा जन्म होताना, तुमचे डॉक्टर लहान बाळाच्या हृदयाची स्थिती तपासतील. बाळ कळांना कसा प्रतिसाद देत आहे हे तपासण्यासाठी बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवतील. गरोदरपणात नियमित तपासणीचा एक भाग म्हणून प्रसूतीपूर्वी किंवा बाळाने पाय मारण्याच्या वारंवारतेत कोणताही बदल झालेला लक्षात आल्यावर हे निरीक्षण केले जाऊ शकते. गर्भाच्या निरीक्षणाद्वारे (फिटल मॉनिटरिंग) हृदयाची असामान्य गती लक्षात येऊ शकते. त्यामुळे बाळाला असलेल्या कोणत्याही आरोग्यविषयक समस्या शोधण्यात मदत होऊ शकते. बाळाच्या हृदयाचे ठोके तपासण्याची ही एक विश्वसनीय पद्धत आहे. ह्या पद्धतीमुळे बाळाच्या आरोग्यविषयक समस्येवर उपाय करण्यास डॉक्टरांना सोपे जाऊ शकते.

प्रसूती दरम्यान हे महत्वाचे का आहे?

प्रसूतीदरम्यान गर्भाच्या हृदयाचे निरीक्षण करणे डॉक्टरांसाठी महत्त्वाचे आहे. किंबहुना संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत सुद्धा बाळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया डॉक्टरांना बाळाच्या हृदयाची गती आणि तुम्ही अनुभवत असलेल्या कळांच्या कालावधीचा मागोवा ठेवण्यास मदत करते. तुमच्या बाळाची प्रकृती चांगली आहे का किंवा बाळाला काही आरोग्यविषयक समस्या आहेत का हे जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांसाठी ही एक अत्यंत विश्वासार्ह पद्धत आहे. बाळाच्या हृदयाची गती सामान्य आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रसूतीदरम्यान गर्भाचे निरीक्षण केले जाते किंवा लक्ष ठेवले जाते. कुठलीही समस्या न आढळल्यास प्रसूती सामान्यपणे होऊ शकते ह्याची खात्री तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना होऊ शकते.

बाळाला हायपोक्सिक (पुरेशा ऑक्सिजन पातळीपासून वंचित) आहे की नाही हे जाणून घेणे हा ह्या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश आहे, जेणेकरुन गर्भाच्या आरोग्याचे इतर मूल्यांकन करता येईल. परिणाम सकारात्मक असल्यास, डॉक्टर सिझेरियन सेक्शन किंवा इंस्ट्रुमेंटल व्हजायनल बर्थचा निर्णय घेऊ शकतात.

योग्य प्रकारची उपकरणे उपलब्ध असतील तर घरच्या घरी भ्रूण निरीक्षणहा एक पर्याय आहे. जेव्हा आईला घरी राहण्यास सांगितले जाते किंवा कमीतकमी हालचाल करण्याची शिफारस केली जाते तेव्हा बहुतेक वेळेला असे केले जाते.

प्रसूती दरम्यान हे महत्वाचे का आहे?

गर्भाच्या निरीक्षणाचे प्रकार

बाळाच्या हृदयाचे ठोके निरीक्षण करण्याच्या तीन वेगवेगळ्यापद्धती आहेत आणि त्या गरजेनुसार केल्या जातात. ह्या इंट्रापार्टम फिटल मॉनिटरिंगपद्धती अंतर्गत आणि बाह्य निरीक्षण अश्या दोन पद्धतींमध्ये विभागल्या आहेत आणि त्या खालीलप्रमाणे आहेत:

1. बाह्य देखरेख

  • हे काय आहे: ही पद्धत ऑस्कल्टेशनम्हणूनही ओळखले जाते. ह्या प्रक्रियेमध्ये डॉप्लर ट्रान्सड्यूसर किंवा स्पेशल स्टेथोस्कोप नावाचे लहान, हाताने पकडता येण्याजोगे उपकरण गर्भाचे हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी वापरले जाते. ह्या प्रक्रियेमध्ये, ट्रान्सड्यूसर गर्भाच्या हार्ट रेट मॉनिटरशी किंवा डॉप्लर फेटल मॉनिटरशी तारांच्या संचाद्वारे जोडला जातो. तुमचे डॉक्टर तुमच्या पोटावर बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येईपर्यंत ट्रान्सड्युसर ठेवतील आणि तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके नीट ऐकू येईपर्यंत तुमच्या पोटाच्या संपूर्ण भागात ट्रान्सड्युसर हलवतील.
  • हे केव्हा केले जाते: गर्भारपण सुरक्षित किंवा कमीजोखीम असलेले आहे का हे जाणून घेण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर ही पद्धती वापरतात. तुमच्या रुटीन चेकअपच्या वेळेला सुद्धा डॉक्टर बाळाच्या हृदयाचे ठोके तपासतील. जर डॉक्टरांना हृदयाच्या गतीमध्ये कोणतीही असामान्यता आढळली तर ठोके तपासण्याची वारंवारिता वाढवली जाईल.

जोखीम:

ऑस्कल्टेशनचे कोणतेही ज्ञात धोके नसले तरी ते केवळ प्रसूतीच्या वेळी अधूनमधून वापरले जाते, परंतु गर्भाच्या हृदयाचे निरीक्षण करण्याची पद्धत गर्भवती मातेसाठी काही समस्या निर्माण करू शकते. त्या खालीलप्रमाणे:

  • ईएफएम (इलेक्ट्रॉनिक फेटल मॉनिटरिंग) दरम्यान, तुम्हाला तुमच्या हालचाली प्रतिबंधित कराव्या लागतील कारण थोडीशी हालचाल देखील सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकते आणि मशीन चुकीचे रिडींग देऊ शकते.
  • ह्यामुळे गर्भवती स्त्रीला अस्वस्थता वाटू शकते आणि स्त्रीला नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देणे कठीण होऊ शकते. परंतु, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, तुमच्या शरीराशी वायरलेस पद्धतीने जोडल्या जाणाऱ्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

फायदे:

  • बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आईसाठी आश्वासक आहे आणि अनिश्चितता व तणाव दूर करण्यात मदत करू शकतो
  • बाळामध्ये असलेली कोणतीही विसंगती डॉक्टरांच्या लक्षात येऊ शकते आणि त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतात

मर्यादा:

  • निरीक्षणादरम्यान आईची हालचाल मर्यादित असते आणि त्यामुळे अस्वस्थता येते
  • कमी जोखीम असलेल्या गर्भधारणेमध्ये हे नियमित करण्याची गरज नाही

2. अंतर्गत देखरेख

  • हे काय आहे: ह्या पद्धतीमध्ये, गर्भाशयाच्या मुखाच्या सर्वात जवळ जिथे बाळ आहे तिथे इलेक्ट्रोड ठेवला जातो. हा भाग सामान्यतः बाळाच्या टाळूचा भाग असतो आणि तिथे बाळाच्या हृदयाच्या गतीचे निरीक्षण केले जाते. परंतु, ह्या पद्धतीमध्ये तुमच्या कळांवर लक्ष ठेवले जाणार नाही त्यामुळे त्यांची वारंवारिता समजून घेण्यासाठी डॉक्टरांना गर्भाशयात कॅथेटर घालावे लागेल.
  • केव्हा केले जाते: जेव्हा तुमच्या डॉक्टरांना बाह्य निरीक्षणाद्वारे तुमच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवश्यक डेटा मिळत नाही, तेव्हा त्यांना अंतर्गत देखरेखीची पद्धत निवडावी लागेल.

धोके:

  • इलेक्ट्रोड गर्भाला स्पर्श करते तिथे थोडा ओरखडा किंवा लहान जखम होऊ शकते
  • इलेक्ट्रोड आणि प्रेशर कॅथेटर घातल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते
  • एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा हर्पिस संसर्ग झालेल्या मातांसाठी या पद्धतीची शिफारस केली जात नाही कारण बाळाला विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते

फायदे:

  • गर्भाच्या अंतर्गत निरीक्षणामुळे, बाहेरून केल्या जाणाऱ्या निरीक्षणापेक्षा अधिक अचूक परिणाम मिळतात

मर्यादा:

  • गर्भजल पिशवी फुटल्यानंतरच (पाणी फुटल्यानंतर) अंतर्गत निरीक्षण केले जाऊ शकते आणि यामुळे बाळाच्या हृदय गतीचे निरीक्षण करण्यास विलंब होऊ शकतो.

3. कंटिन्यूअस इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग

  • हे काय आहे: हे निरीक्षण विशेष गर्भ मॉनिटर वापरून केले जाते. रुंद, स्ट्रेच बँडचा संच दोन इलेक्ट्रॉनिक डिस्क ठेवण्यासाठी वापरला जातो. ह्यांना ट्रान्सड्यूसर देखील म्हणतात. जेव्हा हे ट्रान्ड्युसर ओटीपोटावर धरले जातात तेव्हा या ट्रान्सड्यूसरची दोन भिन्न कार्ये असतात. एक ट्रान्सड्यूसर तुमच्या लहान बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा मागोवा घेतो, तर दुसरा ट्रान्सड्यूसर तुमच्या प्रसूतीकळांवर लक्ष ठेवतो. सर्व रीडिंग ट्रान्सड्यूसरमधून मॉनिटरकडे पाठवली जातात. ही रीडींग्ज डॉक्टर आवश्यक कारवाई करण्यासाठी चार्टवर रेकॉर्ड करतात आणि प्रिंट करतात. ह्या मॉनिटरमुळे बाळाच्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज देखील पालकांना ऐकू येऊ शकतो. बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी वर निरीक्षण केले जाते त्यामुळे ही पद्धत कंटिन्यूअस इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग पद्धत म्हणून ओळखली जाते.

कंटिन्यूअस इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग

  • केव्हा केले जाते: गरोदरपणाच्या उत्तरार्धात आणि प्रसूती दरम्यान ही पद्धत वापरली जाते.

जोखीम:

  • कंटिन्यूअस इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंगची निवड करणार्‍या स्त्रीची सहाय्यक प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते, कारण बाळाला होणारा धोका टाळण्यासाठी डॉक्टर आपत्कालीन सीसेक्शन सुचवू शकतात.

फायदे:

  • कंटिन्यूअस इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग पद्धतीमुळे तुम्हाला आराम मिळतो आणि तुम्ही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकता परंतु बाळाच्या जन्मानंतर फिट येण्याची शक्यता कमी होते असे मानले जाते. फिट येणे हे मेंदूच्या समस्येचे लक्षण आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ते उद्भवू शकते.

मर्यादा:

  • इलेक्‍ट्रॉनिक फेटल मॉनिटरिंगमुळे आई किंवा बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. तथापि, होणाया आईला मर्यादित हालचालींमुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू शकते.

इंटरमिटंट ओस्क्युलटेशन

जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्ही ह्या पद्धतीचा अनुभव घेतलेला असेल. इंटरमिटंट ओस्क्युलटेशन, ह्या पद्धतीमध्ये प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यात, नर्स किंवा डॉक्टर दर १५ ते ३० मिनिटांनी हृदय गती तपासतात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात दर ५ मिनिटांनी हृदयाची गती तपासतात. तुम्हाला जेव्हा कळा येतात तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला ११० ते १६० च्या दरम्यान पडतात किंवा कसे ह्यावर डॉक्टर लक्ष ठेवतात. गर्भाशय आकुंचन पावते तेव्हा बाळाच्या सहनशीलतेची जाणीव देखील डॉक्टरांना समजते.

कंटिन्यूअस मॉनिटरिंग आणि इंटरमिटंट ऑस्कल्टेशन ह्या दोन्ही पद्धतींची तुलना

दोन्ही बाह्य भ्रूण निरीक्षण प्रक्रिया असल्या तरी,निरीक्षण किती वेळा केले गेले त्या वारंवारितेमध्ये फरक आहे. इंटरमिटंट ऑस्कल्टेशन ह्या पद्धतीमध्ये बाळाच्या हृदयाची गती नोंदवण्याचा कालावधी आणि वारंवारिता आधीच ठरलेली असते. तर कंटिन्यूअस मॉनिटरिंग ह्या पद्धतीमध्ये नावाप्रमाणेच, संपूर्ण प्रसूतीच्या कालावधीत किंवा बाळाच्या जन्माच्या दरम्यान सतत निरीक्षण केले जाते.

इंटरमिटंट ऑस्क्युलेशन ह्या पद्धतीमध्ये हृदय गती मोजण्यासाठी डॉप्लर ट्रान्सड्यूसर ह्या उपकरणाचा वापर केला जातो, तर कंटिन्यूअस मॉनिटरिंग पद्धतीमध्ये ट्रान्सड्यूसर आणि मॉनिटर्सचा वापर करून डॉक्टरांकडून गर्भाच्या हृदयाचे ट्रेसिंग (हृदय गती) नियमितपणे केले जाते.

कमी जोखीम असलेल्या गर्भवती स्त्रियांसाठी इंटरमिटंट फिटल मॉनिटरिंग ही पद्धत वापरली जाते. जेव्हा डॉक्टरांना प्रसूतीशी संबंधित समस्यांचा अंदाज येतो, तेव्हा कंटिन्यूअस मॉनिटरिंग ह्या पद्धतीचा वापर केला जातो जेणेकरून योग्य वेळी उपाय करता येऊ शकतील.

फिटल हार्ट ट्रेसिंग श्रेणी २ म्हणजे काय?

सामान्य (श्रेणी I) किंवा असामान्य (श्रेणी II) श्रेणीमध्ये न येणारे, गर्भाच्या हृदय गतीचे सर्व नमुने श्रेणी २ मध्ये मोडतात. या श्रेणीचे नंतर अॅटिपिकल म्हणून वर्गीकरण केले जाते. जर तुमच्या डॉक्टरांना असा प्रकार आढळला, तर ते नाळेवरील दाब कमी करण्यासाठी आणि नाळेमधील रक्त प्रवाह वाढवण्यासाठी तुमची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकतात.

माझ्या बाळाच्या हृदयाची गती असामान्य असल्यास काय?

तुमचे डॉक्टर प्रसूतीदरम्यान तुमच्या बाळाच्या हृदयाच्या गतीचे मूल्यांकन करतील आणि समस्या दर्शविणाऱ्या लक्षणांवर लक्ष ठेवतील. बाळाच्या हृदयाची गती सामान्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर बाळाच्या बेसलाइन हृदय गतीचे निरीक्षण करतील आणि काही बदल असल्यास त्याचे मूल्यांकन करतील.

तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके असामान्य असल्‍यास, निर्णय घेण्‍यापूर्वी डॉक्टर आणखी काही तपासण्या आणि चाचण्या करण्‍याचा सल्ला देतील. लक्षात ठेवा,तुमच्या बाळाच्या हृदयाची गती असामान्य असल्यास बाळामध्ये काहीतरी चुकीचे आहे असा त्याचा अर्थ होत नाही आणि त्यानंतर होणाऱ्या चाचण्या खरी समस्या निश्चित करतील.

जर तुमचे बाळ हालचाल करत असेल, तर त्या काळात त्याच्या हृदयाची गती वाढणे सामान्य आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या हृदयाच्या गतीमध्ये वाढ होते. हृदयांच्या ठोक्यांची गती सतत वाढलेली असेल तर डॉक्टरांसाठी ती चिंतेची बाब ठरू शकते.

सुधारात्मक उपाय म्हणून, डॉक्टर तुमची स्थिती बदलण्यासाठी किंवा तुम्हाला अतिरिक्त ऑक्सिजन देण्यास सांगू शकतात. आयव्हीद्वारे आवश्यक द्रवपदार्थ दिल्यास देखील सकारात्मक परिणाम मिळू शकतात. ह्या उपायांनी अपेक्षित परिणाम न मिळाल्यास, डॉक्टर सिझेरियन पद्धतीचा वापर करू शकतात किंवा फोर्सेप अथवा व्हॅक्युम डिलिव्हरीचा निर्णय घेऊ शकतात.

जन्मापूर्वी बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी फिटल मॉनिटरिंगहा एक महत्त्वाचा पर्याय आहे. विविध प्रकारे गर्भाचे निरीक्षण नियमितपणे केले जाते. जरी डॉक्टरांनी अतिरिक्त देखरेखीची शिफारस केली असली तरी,तु ह्यामध्ये काळजीचे कोणतेही कारण नाही. तुम्हाला काळजी वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

भ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ – लांबी आणि वजन
गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article