Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूती तुम्हाला माहिती असाव्यात अश्या प्रसूतीच्या ६ वेगवेगळ्या पद्धती

तुम्हाला माहिती असाव्यात अश्या प्रसूतीच्या ६ वेगवेगळ्या पद्धती

तुम्हाला माहिती असाव्यात अश्या प्रसूतीच्या ६ वेगवेगळ्या पद्धती

बाळाचा जन्म होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाळाच्या जन्माची प्रक्रिया सहज नसते. योनीमार्गातून होणाऱ्या बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेला सामान्य प्रसूती असे संबोधले जाते. नवीन तंत्रांमुळे गर्भवती स्त्रीच्या वेदना कमी केल्या जातात तसेच प्रसूतीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यास देखील मदत केली जाते. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे प्रसूतीच्या विविध पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे गुंतागुंत किंवा जोखीम असताना सुद्धा प्रसूती यशस्वी होऊ शकते.

प्रसूतीचे सर्वात सामान्य प्रकार

गर्भवती स्त्रिया प्रसूतीसाठी पुढील पद्धतींचा विचार करू शकतात

. सामान्य प्रसूती

जेव्हा बाळाचा जन्म, जन्मकालव्याद्वारे होतो, तेव्हा प्रसूतीला सामान्य प्रसूती असे म्हणतात. एपिड्युरल किंवा वेदना कमी करणारी औषधे वापरून, गर्भवती स्त्रीला सामान्य प्रसूती होण्यासाठी मदत केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत जन्माची अचूक वेळ सांगता येत नाही, परंतु बहुतेक वेळा सामान्य प्रसूती गर्भधारणेचे ४० आठवडे पूर्ण झाल्यानंतरच होते.

बहुसंख्य डॉक्टर शक्य असल्यास सामान्य प्रसूतीची शिफारस करतात आणि सिझेरिअन प्रसूती न करण्याचा सल्ला देतात. प्रसूती कळांच्या दरम्यान, बाळ स्वतःचा मेंदू आणि फुफ्फुसांच्या विकासासाठी संप्रेरके तयार करते. शिवाय, जन्म कालव्यातून पुढे सरकत असताना बाळाच्या छातीतून सर्व अम्नीओटिक द्रवपदार्थ काढून टाकतात त्यामुळे बाळाची फुप्फुसे प्रभावीपणे विस्तारतात. एकापेक्षा जास्त मुलांची योजना असलेल्या स्त्रियांसाठी सामान्य प्रसूतीची शिफारस केली जाते. गुदद्वाराच्याभागाजवळ छेद घेऊन केलेल्या प्रसूतीच्या प्रक्रियेस एपिसिओटॉमी म्हणतात.

योनीमार्गे प्रसूती झाल्यामुळे, स्त्रिया प्रसूतीच्या तणावातून लवकर बाहेर पडतात. आणि त्यांच्या बाळासोबत लवकर घरी परत येऊ शकतात.सामान्य प्रसूतीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते. सामान्य प्रसूतीमध्ये बाळाला श्वासोच्छवासाचा त्रास होण्याची शक्यता सुद्धा कमी असते.

सामान्य प्रसूती

. नैसर्गिक प्रसूती

हा प्रसूतीच्या प्रकार सातत्याने लोकप्रिय होत आहे. ह्या पद्धतीमध्ये, कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया किंवा आक्रमक उपचारांचा समावेश होत नाही. ही प्रक्रिया शक्य तितक्या नैसर्गिक पद्धतीने होते. अशा पद्धतीने प्रसूतीचा निर्णय हा वैयक्तिक आहे आणि आईने ह्या निर्णयावर ठाम राहणे आवश्यक आहे.

नैसर्गिक पद्धतीने प्रसूती करताना विविध व्यायाम आणि स्थिती विचारात घेतल्या जातात. प्रसूती यशस्वी होण्यासाठी आणि आईची तब्येत चांगली राहण्यासाठी दाई सतत आईसोबत असते. प्रसूती रुग्णालयात किंवा घरीही होऊ शकते. प्रसूतीची सर्व तयारी आधीपासून केली जाते.

ह्या प्रक्रियेत पाण्याच्या दाबाचा वापर करून वॉटर बर्थिंग किंवा पूल बर्थिंग केल्याने प्रसूती वेदना कमी होऊ शकतात.बाळाच्या जन्मासाठी वॉटर बर्थिंग हा सर्वात नैसर्गिक आणि वेदनारहित मार्ग आहे.

नैसर्गिक प्रसूती आईसाठी चांगली असते. प्रसूतीनंतर ताबडतोब बाळ आईच्या संपर्कात राहिल्यास, आई आणि बाळामध्ये मजबूत बंध निर्माण होऊ शकतो. स्तनांमध्ये दूध तयार करण्याच्या प्रक्रियेस कारणीभूत असलेले संप्रेरक लगेच तयार होण्यास सुरुवात होते.

नैसर्गिक प्रसूती

. सिझेरियन

आपण योजना केल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत. एखाद्या आईला सामान्य प्रसूती करायची असेल पण गुंतागुंत निर्माण झाल्यास, सिझेरियन प्रसूतीचा पर्याय निवडावा लागतो.

या पद्धतीत शस्त्रक्रियेने गर्भाशय उघडून बाळाला बाहेर काढले जाते. प्रसूतीच्या ह्या प्रकारचे नाव लॅटिन शब्द ‘caedare’ वरून आले आहे. ह्या शब्दाचा अर्थ कापणेआहे. म्हणून, या प्रकारच्या शस्त्रक्रियेला सीसेक्शन असे म्हणतात अशा प्रकारे प्रसूतीच्या ह्या पद्धतीला सीसेक्शन हे नाव मिळले.

बर्‍याच माता आधीच सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालय सीसेक्शनची तयारी आधी करून ठेवतात. सीसेक्शन करणे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो किंवा सोनोग्राफीमध्ये जुळी किंवा तिळी बाळे आढळली असतील किंवा बाळ खूप मोठे असेल अथवा बाळाची स्थिती सामान्य प्रसूतीसाठी योग्य नसेल तर सीसेक्शन केले जाते.

सामान्य प्रसूतीसाठी प्रयत्न करून सुद्धा यश येत नसेल किंवा बाळ पायाळू असेल अथवा बाळाने शौचास केलेले असेल किंवा नॉर्मल प्रसूतीमध्ये काही अडथळा येत असेल तर बाळाला सीसेक्शन करून गर्भाशयातून वेळीच बाहेर काढणे आवश्यक असते.

सिझेरियन

. फोर्सेप डिलिव्हरी

ही एक विलक्षण प्रकारची प्रसूती पद्धत आहे आणि सामान्य प्रसूतीच्या काही केसेस मध्ये अशी प्रसूती करणे आवश्यक होते. फोर्सेप डिलिव्हरी सामान्य प्रसूतीस मदत करते. जेव्हा बाळ जन्म कालव्यातून जात असते परंतु पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही तेव्हा फोर्सेप डिलिव्हरी केली जाते. सामान्य प्रसूतीमध्ये छोटे अडथळे आल्यास किंवा कळा देऊन आईला थकवा आल्यास बाळ जन्म कालव्यातून बाहेर पडू शकत नाही तेव्हा फोर्सेप डिलिव्हरीची मदत घेतली जाते.

डॉक्टर प्रसूतीसाठी फोर्सेप सारखे दिसणारे विशेष तयार केलेले चिमटे वापरतात. विशेष तयार केलेले चिमटे वापरतात आणि हळूहळू हे चिमटे जन्म कालव्यामध्ये घालतात. ह्या चिमट्यानी डोके हळूवारपणे बाळाचे डोके पकडून जन्मकालव्यातून बाहेर काढले जाते.

फोर्सेप डिलिव्हरी

. व्हॅक्यूम एक्सट्रॅक्शन

फोर्सेप्स डिलिव्हरी पद्धतीप्रमाणेच, सामान्य प्रसूतीमध्ये तंत्र वापरले जाते. उदाहरणार्थ, जर बाळ जन्मकालव्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असेल परंतु पुढे सरकत नसेल, तर व्हॅक्यूम डिलिव्हरी ची पद्धत वापरली जाते.

डॉक्टर एका विशिष्ट व्हॅक्यूम पंपचा वापर करतात. हा व्हॅक्यूम पंप जन्मकालव्यातून बाळापर्यंत पोहोचेल असा आतपर्यंत घातला जातो घातला जातो. व्हॅक्यूम पंपच्या टाकला एक मऊ कप असतो. तो बाळाच्या डोक्याच्या वर ठेवला जातो. व्हॅक्यूम तयार केल्यामुळे कप डोके धरून ठेवतो आणि बाळाला हळूवारपणे जन्मकालव्यातून बाहेर काढले जाते.

व्हॅक्यूम एक्सट्रॅक्शन

. सिझेरियन नंतर योनीतून जन्म (व्हिबॅक)

एकदा स्त्रीची सिझेरियन प्रसूती झाली की, त्यानंतर तिची सामान्य प्रसूती होण्याची शक्यता खूपच कमी होते. परंतु अलिकडच्या काळात, जरी पहिल्या वेळेला सी सेक्शन झालेले असले तरीसुद्धा काही तंत्रांच्या मदतीने दुसऱ्या वेळेला सामान्य प्रसूती करणे शक्य होत आहे. अशा प्रकारच्या प्रसूतीला व्हजायनल बर्थ आफ्टर सिझेरिअन (व्हिबॅक) असे म्हणतात.

सिझेरियन नंतर योनीतून जन्म (व्हिबॅक)

छोटी रुग्णालये व्हिबॅक ह्या प्रसूती पद्धतीची निवड करत नाहीत कारण आपत्कालीन सीसेक्शनसाठी जास्त कर्मचारी आणि संसाधने आवश्यक असतात. आणि ती नेहमी उपलब्ध असणे शक्य नसते. तसेच, ह्या आधी प्रसूतीदरम्यान काही समस्या निर्माण झालेली असेल किंवा आईला त्रास झालेला असेल तर डॉक्टर सामान्य प्रसूती न करण्याचा सल्ला देतात.

बाळाच्या जन्मासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक तंत्राचे फायदे तोटे आहेत. प्रसूतीदरम्यान बाळ आणि आई सुरक्षित राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि बाळाला काहीही इजा न होता त्याने ह्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवले पाहिजे. तुम्ही प्रसूतीची कुठलीही पद्धत निवडली असली तरीसुद्धा प्रसुतीदरम्यानची गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

आणखी वाचा:

नॉर्मल प्रसूती विरुद्ध सिझेरिअन – फायदे आणि तोटे
सिझेरिअन प्रसूती – सी-सेक्शन पद्धतीने जन्माविषयी सर्व काही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article