कावीळ हे बिलिरुबिन वाढल्याचे लक्षण आहे. पूर्ण वाढ झालेल्या बालकांमध्ये ६०% आणि अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये कावीळ होण्याचे प्रमाण ८०% आहे. बिलिरुबिन हे नवजात बाळांमध्ये जुन्या लाल रक्त पेशींच्या विघटनाचे उप–उत्पादन आहे. बिलिरुबीनच्या उच्च पातळीची प्राथमिक कारणे पुढीलप्रमाणे: प्रौढांच्या तुलनेत नवजात बाळांमध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी असते. त्याचा परिणाम म्हणून बिलिरुबीनची रक्तातील पातळी जास्त असते. मेकोनिअम […]