In this Article
- बाळाला द्राक्षे देणे सुरक्षित आहे का?
- बाळ द्राक्षे कधी खाऊ शकते?
- द्राक्षांचे पौष्टिक मूल्य
- तुमच्या बाळाच्या आहारातील द्राक्षाचे आरोग्यविषयक फायदे
- बेबी फूडसाठी द्राक्षे कशी निवडायची आणि साठवायची?
- लहान मुलांमध्ये गुदमरणे टाळण्यासाठी द्राक्षे कापण्याची योग्य पद्धत
- बाळांना द्राक्षे खायला घालताना घ्यावयाची काळजी
- लहान मुलांसाठी द्राक्षांच्या पाककृती
आपल्या बाळाच्या आहारात विविध घन पदार्थांचा समावेश करणे तुमच्या बाळासाठी खूप रोमांचक असू शकते. मग ते शिजवलेले अन्न असो किंवा साधी फळे अथवा भाज्या असोत. तुमच्या बाळासाठी तो खूप छान अनुभव असेल कारण बाळाला नव्या चवीची ओळख होईल. आरोग्यविषयक फायदे देणाऱ्या पदार्थांपैकी द्राक्षे एक आहेत आणि बाळाला नवीन चव देतात. बाळाच्या बद्धकोष्ठतेसाठी द्राक्षाचा रस बरेच लोक वापरतात. द्राक्षाची गोड आणि आंबट चव बाळाला आवडते.
बाळाला द्राक्षे देणे सुरक्षित आहे का?
आपल्या बाळाला द्राक्षे देण्याने काही नुकसान नाही. परंतु तुम्ही काही खबरदारी घेतली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. आपल्या बाळामध्ये ऍलर्जीची कोणतीही चिन्हे आहेत का ते पाहणे देखील आवश्यक आहे.
बाळ द्राक्षे कधी खाऊ शकते?
सामान्यतः, बाळांनी घन पदार्थ खाण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना द्राक्षे दिली पाहिजेत. तुमचे बाळ १० महिने किंवा त्याहून अधिक वयाचे झाल्यावर तुम्ही त्याला द्राक्षे देऊ शकता. काहीजण बाळ ६ महिन्यांचे झाल्यापासून द्राक्षे देण्यास सुरुवात करण्यास सांगतात , परंतु सहसा किमान ८ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करण्याची शिफारस केली जाते.
द्राक्षांचे पौष्टिक मूल्य
द्राक्षांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. १०० ग्रॅम द्राक्षामध्ये खालीलप्रमाणे पौष्टिक मूल्ये असतात.
पोषक मूल्य | प्रमाण |
कार्बोहायड्रेट | १८ ग्रॅम |
प्रथिने | ०.७२ग्रॅम |
एकूण चरबी | ०.१६ग्रॅम |
आहारातील फायबर | ०.९ ग्रॅम |
व्हिटॅमिन सी | १०.८ ग्रॅम |
लोह | ०.३६ मिलीग्रॅम |
कॅल्शियम | १० मिलीग्रॅम |
झिंक | ०.०७ मिलीग्रॅम |
तुमच्या बाळाच्या आहारातील द्राक्षाचे आरोग्यविषयक फायदे
लहान मुलांसाठी द्राक्षाचा रस करून किंवा विविध पाककृतींमध्ये द्राक्षांचा वापर करून आहारात समावेश केल्यास त्याच्या आरोग्यासाठी द्राक्षाचे अनेक फायदे आहेत.
१. रक्ताची गुणवत्ता वाढते
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली असणे आवश्यक आहे जेणेकरून ऑक्सिजन शरीराच्या विविध अवयवांमध्ये वाहून नेला जाऊ शकतो आणि यशस्वीरित्या शोषला जाऊ शकतो. द्राक्षे बाळांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी राखण्यास आणि त्यांच्या अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.
२. श्वसन संक्रमणापासून संरक्षण
लहान मुलांना द्राक्षे दिल्याने ब्राँकायटिस, दमा आणि त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये सामान्य असलेल्या श्वसनाच्या इतर समस्यांची शक्यता कमी होते.
३. पचनास सोपे
लहान मुलांसाठी घनपदार्थांचे पचन थोडे कठीण होऊ शकते . त्यांना हे पदार्थ पचनास अवघड होऊ शकतात आणि कधीकधी अपचन देखील होऊ शकते. द्राक्षे पचायला अत्यंत हलकी असतात, आणि द्राक्षाचे पचन सहज होते. पिकलेल्या द्राक्षांचा आंबटपणा ऍसिडिटीच्या समस्येवरही परिणामकारक आहे.
४. संभाव्य रेचक
बद्धकोष्ठतेमुळे सुरुवातीच्या काळात असंख्य बाळांना त्रास होऊ शकतो आणि घन पदार्थांची सुरुवात करताना त्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. द्राक्षांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, आणि त्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.
५. मज्जासंस्थेचे संरक्षण
लहान मुलांच्या वाढत्या वयात मेंदूचा वेगाने विकास होत असतो, त्याच्या मेंदूच्या नेटवर्कमध्ये नवीन कनेक्शन तयार होतात आणि न्यूरॉन्स तयार होतात. मेंदूचे कार्य चालू ठेवण्यासाठी मेंदूला कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून संरक्षित केले पाहिजे. मेंदूच्या मध्यवर्ती भागाचे प्रभावीपणे संरक्षण करू शकतात असे घटक द्राक्षामध्ये आहेत.
६. अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत
मुलांची झपाट्याने वाढणारी भूक आणि आहार यामुळे चयापचय दर वाढतो, शरीरातील मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थांच्या स्वरूपात टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. प्रभावीपणे बाहेर काढण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते डीएनए रेणू आणि शरीरातील इतर निरोगी पेशींना हानी पोहोचवू शकतात. द्राक्षांमधील अँटिऑक्सिडंट्स या पदार्थांशी जोडले जातात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होण्यापासून रोखू शकतात, आणि सुरक्षितपणे बाहेर टाकले जाऊ शकतात.
बेबी फूडसाठी द्राक्षे कशी निवडायची आणि साठवायची?
बाजारातून ताजी द्राक्षे विकत घेऊन एक–दोन दिवसांत वापरणे चांगले. द्राक्षे मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवल्याने पिकतात आणि मऊ तसेच आंबट होतात. बिया नसलेली सेंद्रिय द्राक्षे तुम्हाला सापडल्यास त्यांची निवड करा. शक्य तितकी सेंद्रिय द्राक्षे खरेदी करण्याचा प्रयत्न करा, कारण इतर प्रकारच्या द्राक्षांमध्ये कीटकनाशके असू शकतात.
लहान मुलांमध्ये गुदमरणे टाळण्यासाठी द्राक्षे कापण्याची योग्य पद्धत
बाळाला द्राक्षे कशी खायला द्यावी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. बाळाला देण्यापूर्वी द्राक्षे नेहमी उभी कापली पाहिजेत आणि नंतर मॅश केली पाहिजेत. अगदी किंचित मोठ्या मुलांसाठीही, द्राक्षे आडवी कधीही कापू नका किंवा त्यांना पूर्ण देऊ नका, कारण ती घशात अडकून मुले अगदी सहज गुदमरू शकतात.
बाळांना द्राक्षे खायला घालताना घ्यावयाची काळजी
द्राक्षांची निवड ते द्राक्षाचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यापर्यंत, तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमचे लहान मूल सुरक्षित राहील.
१. द्राक्षाचा पोत नीट निवडून घ्या
आपल्या बाळासाठी द्राक्षे निवडताना, तुम्ही योग्य द्राक्षे निवडत असल्याचे सुनिश्चित करा. ज्या द्राक्षांवर डाग नाहीत किंवा मऊ भाग नाहीत अशा द्राक्षांची निवड करा. द्राक्षे कणखर आणि गोलाकार असली पाहिजेत. मऊ द्राक्षे सहसा पिकलेली असतात आणि जास्त काळ टिकत नाहीत. द्राक्षांची चव घ्या आणि नंतर थोडीशी गोड असलेली द्राक्षे निवडा.
२. द्राक्षे नीट धुवून घ्या
द्राक्षे सेंद्रिय असोत किंवा सामान्य असो, द्राक्षांवर घाण, जंतू, कीटकनाशके किंवा इतर रसायनांपर्यंत विविध बाह्य पदार्थ असण्याची शक्यता असते. द्राक्षे वाहत्या पाण्याखाली ठेवून दूषित पदार्थ धुवून टाकणे हा उपाय आहे. द्राक्षे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवा.
३. द्राक्षे मॅश करा किंवा चिरून घ्या
लहान मुले स्वतः द्राक्षे चघळू शकत नाहीत. लहान मुलांना पूर्ण द्राक्ष दिल्याने ते थेट गिळू शकतात. द्राक्षे घशात अडकून त्यांचा जीव गुदमरू शकतो. द्राक्षाचे तुकडे करा, बिया काढून टाका आणि तुमच्या मुलाला द्राक्षे देण्यापूर्वी मॅश करा.
लहान मुलांसाठी द्राक्षांच्या पाककृती
लहान मुलांसाठी द्राक्षांच्या काही चवदार पाककृती आहेत. ह्या पाककृतींचा वापर करून तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी काही चवदार खाद्यपदार्थ तयार करू शकता.
१. भाजलेले बटाटे आणि ग्रेप कॅसरोल
येथे एक नवीन वळण असलेली एक जुनी पारंपारिक डिश आहे. हि डिश तुमच्या लहान मुलाला नक्कीच आवडेल:
साहित्य:
- चेडर चीज
- लाल द्राक्षे
- ब्राऊन राईस
- व्हेजिटेबल स्टॉक
- भोपळी मिरची
- कांदा
- ऑलिव तेल
- रताळे
कृती:
- पॅनमध्ये तेल घाला, त्यामध्ये साल काढलेले रताळे, थोडी चिरलेली मिरची आणि चिरलेला कांदा घालून काही मिनिटे परतून घ्या
- भाज्या घालून उकळू द्या. ब्राऊन राईस घालून त्याचे अनुसरण करा
- ते उकळू द्या आणि चांगले शिजू द्या. बाजूला ठेवा
- थोडे थंड झाल्यावर त्यात चिरलेली द्राक्षे घाला, वरून चीझ घाला आणि ही डिश ओव्हनमध्ये अर्धा तास १८० अंशांवर बेक करा. ह्या काळात चीझ वितळून सोनेरी झाले पाहिजे
२. फ्रूटी चिकन आणि व्हेजिटेबल प्युरी
प्युरी बनवण्यासाठी वेगवेगळी फळे, भाज्या आणि मांस त्यामध्ये का घालू नये?
साहित्य:
- बोनलेस चिकन ब्रेस्ट, एक
- होममेड चिकन स्टॉक, ३/४ कप
- सोललेले आणि कापलेले गाजर, एक
- बिया नसलेली लाल द्राक्षे, १०
- साल काढलेले रताळ्याचे काप, एक
कृती:
- तुकडे केलेले चिकन ब्रेस्ट आणि इतर सर्व साहित्य मोठ्या आचेवर सॉसपॅनमध्ये उकळण्यासाठी ठेवा
- मिश्रण उकळल्यावर गॅस कमी करा
- रताळी मऊ होईपर्यंत आणि चिकन शिजेपर्यंत मिश्रण उकळू द्या
- हे ब्लेंडरमध्ये घाला आणि आवश्यक सुसंगततेनुसार त्याची प्युरी करा
३. द्राक्ष ट्यूना सॅलड
द्राक्षे आणि समुद्री अन्न ह्यांची एकत्र चव अनुभवा.
साहित्य:
- ऑलिव तेल
- कोथिंबीर
- एवोकॅडो
- द्राक्षे
- कॅन केलेला ट्यूना
कृती:
- एक भांडे घ्या आणि एवोकॅडो व्यवस्थित मॅश करा. या मॅशमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि कोथिंबीर घाला आणि ते सर्व व्यवस्थित मिसळा
- या मिश्रणात ट्यूनाचे तुकडे आणि द्राक्षे घाला आणि ढवळा
- हे मिश्रण टोस्टवर स्प्रेड म्हणून किंवा साइड स्नॅक म्हणून वापरा
४. व्हेजी ग्रेप कॉम्बो मिल
जर तुमचा मुलाला भाज्या आवडत नसतील तर त्याला ही डिश नक्की आवडेल.
साहित्य:
- लाल द्राक्षे
- तुळशीची पाने
- ऑलिव तेल
- रताळे
- गाजर
कृती:
- एका भांड्यात चिरलेले रताळे आणि गाजर घ्या. त्यात तुळशीची काही पाने टाका, वरून थोडे ऑलिव्ह ऑईल शिंपडा आणि मिक्स करा
- हे मिश्रण एका ट्रेमध्ये घ्या आणि सुमारे १० मिनिटे ओव्हनमध्ये (२३० अंश आधी गरम केलेले) राहू द्या
- कढईत थोडे तेल घेऊन द्राक्षे काही सेकंद फेटून घ्या. त्यांना ट्रेमध्ये तसेच आणखी १० मिनिटे ठेवा आणि शिजू द्या
- हे थंड झाल्यावर साइड सॅलड म्हणून सर्व्ह करा
द्राक्षांची चव छान असते आणि पहिल्यांदाच खाल्ल्यावर आपल्या मुलाला ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते. जर तुमच्या बाळाला द्राक्षाच्या चवीमुळे अस्वस्थ वाटत असेल, तर द्राक्षे घालून काही उत्तम पाककृती करा. म्हणजे त्यांना आनंद घेता येईल.
आणखी वाचा:
बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती
बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके