Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांमधील उष्माघात

बाळांमधील उष्माघात

बाळांमधील उष्माघात

असंख्य पर्यावरणीय कारणांमुळे किंवा शरीराच्या अंतर्गत कार्यांमुळे एखादे मूल आजारी पडू शकतो. आरोग्याचं मोजमाप करणारी एक मुख्य बाब म्हणजे बाळाच्या शरीराच्या तापमानाचे परीक्षण करणे. मोठ्या माणसांप्रमाणेच, जर बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर गेले तर तुमच्या बाळाला उष्माघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाहीत तर बाळावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या स्थितीचा प्रतिकार करण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे ते समजून घेणे.

उष्माघात म्हणजे काय?

मानवी शरीराचे तापमान नियंत्रित असते, त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो, अवयव निरोगी राहतात आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. बाळाच्या शरीराची वाढ होत असतानाही तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्वयंचलित प्रणाली आहे. जेव्हा या प्रणालीशी तडजोड केली जाते, तेव्हा तुमच्या मुलाच्या शरीराच्या तापमानात अनियमित वाढ होण्याचा धोका असतो. हे अत्यंत धोकादायक आणि संभाव्य प्राणघातक असू शकते. जेव्हा तुमच्या मुलाचे शरीर, त्याच्या नियंत्रणाबाहेर जास्तीत जास्त गरम होण्यास सुरुवात होते आणि ते थंड होत नाही तेव्हा तो उष्माघात म्हणून ओळखला जातो.

बाळांमध्ये उष्माघाताची कारणे

उष्माघाताच्या विरूद्ध लढा देण्याची महत्त्वाची बाजू म्हणजे उष्माघाताची कारणे समजून घेणे, यामध्ये खालील काही गोष्टींचा समावेश आहे

 • निर्जलीकरण
 • अत्यंत उच्च बाह्य तापमान
 • कुपोषण
 • कोंदट आणि गुदमरवणारे कपडे
 • गरम वातावरणात ऑक्सिजनचा अभाव

बाळाच्या उष्माघाताच्या कारणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेट द्या

उष्माघाताची लक्षणे आणि लक्षणे

उष्माघाताची कारणे समजून घेण्यापलीकडे, आपल्या बाळाला उष्माघात होत असेल तर ते कसे ओळखावे हे देखील समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाळाचे शरीर अति गरम होण्याची काही लक्षणे येथे आहेतः

 • १०३ डिग्री फॅरेनहाइटपेक्षा ताप जास्त असेल आणि बाळाला घाम येत नसेल तर उष्माघाताच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. सेल्सिअसमध्ये हे तापमान ३९ अंशांपेक्षा जास्त असेल.
 • उन्हाळ्याच्या महिन्यांत किंवा गरम खोलीत वेळ घालवल्यानंतर तुमचे बाळ खूप थकत असेल तर बाळाला उष्माघात झालेला असू शकतो.
 • जर तुमच्या मुलास उष्माघात झाल्याचा संशय आला असेल तर बाळाची नाडी एक मिनिटासाठी तपासून पहा, जर वेग जास्त असेल तर ते उष्माघाताचे लक्षण असू शकते.
 • जर तुमच्या मुलाची त्वचा खूप जास्त गरम, लाल व कोरडी असेल तर ते हीट स्ट्रोकची लक्षण असू शकते.
 • विशेषत: उष्ण तापमानात चक्कर येणे हे उष्माघाताचे लक्षण आहे,

हे समजून घेणे महत्वाचे आहे की डोकेदुखी, अस्वस्थता, उलट्या किंवा शुद्ध हरपल्यासारखी इतर लक्षणे दिसून येतात. जर ही लक्षणे आपल्या बाळाशी संबंधित असतील तर कृपया ताबडतोब डॉक्टरांना भेटा

उष्माघातावर उपचार

तीव्र उष्माघाताच्या परिस्थितीत तुम्ही रुग्णवाहिका बोलवा आणि जवळच्या रुग्णालयात तुमच्या मुलाची तपासणी करा. किरकोळ उष्माघातासाठी तुम्ही करु शकता अशा काही गोष्टी येथे आहेतः

 • तुमच्या मुलास सैल वस्त्र घाला
 • त्यांना पंख्याखाली किंवा घरात वातानुकूलन असलेल्या खोलीत ठेवावे
 • त्यांच्या कपाळावर आणि खांद्यांवर थंड ओल्या कपड्याने टिपून घ्या
 • त्यांना थंड पाण्यात ठेवा

किरकोळ उष्माघाताच्या उपचारांविषयी अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

बाळांमध्ये उष्माघाताचा प्रतिबंध

बाळांमध्ये उष्माघाताचा अंदाज बांधणे खूप कठीण आहे. ते टाळण्याचे काही मार्ग येथे आहेत

 • आपल्या मुलास सैल वस्त्र घाला
 • विशेषतः बाहेर जर गरम असेल तर त्यांना घरातच ठेवा
 • त्यांना हायड्रेटेड ठेवा
 • हळू हळू तुमच्या मुलास उबदार किंवा गरम हवामानात न्या
 • दुपारच्या वेळी खूप जास्त ऊन असताना घराबाहेर घालवण्याचा वेळ मर्यादित करा
 • त्यांच्याबरोबर खोलीत पंखा आणि वातानुकूलन लावून बसा
 • वर्षाच्या गरम काळात मसालेदार पदार्थ टाळा

खबरदारी घेतली नाही तर उष्माघात फार धोकादायक ठरू शकतो. बाळाला उष्माघात टाळण्यासाठी आपण कोणती पावले उचलण्याची आवश्यकता आहे याबद्दल डॉक्टरांशी बोला. लक्षात ठेवा, प्रतिबंध हा एक चांगला इलाज आहे

आणखी वाचा: डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article