Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी

जीईआरडी किंवा गॅस्ट्रोऊसोफेगल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारामध्ये लोअर यूसोफ्यागल स्फिन्क्टर किंवा एलईएस ह्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू अन्ननलिकेच्या खालच्या भागात पोटाजवळ असतो. हा आजार मोठी माणसे आणि बाळे दोघांना होऊ शकतो.

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी म्हणजे काय?

मोठ्यांमधील जीईआरडी मुळे गॅस होणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बाळांमध्ये जीईआरडी मुळे नेहमीपेक्षा जास्त लाळ गळते, उलट्या आणि अस्वस्थता येते. त्यामुळे श्वसनास त्रास होतो आणि पोटदुखी सुद्धा होते. जीईआरडी मुळे लहान बाळांमध्ये ऍसिड रिफ्लक्स होतो.

मोठ्यांप्रमाणेच बाळांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टीनल रिफ्लक्स मुळे कुठलाही धोका नसतो. जीईआरडी किंवा रिफ्लक्स ही गंभीर स्थिती समजली जात नाही आणि त्यामुळे मुलाची वाढ किंवा क्षमता ह्यावर परिणाम होत नाही.

जीईआरडी आणि रिफ्लक्स किती सामान्यपणे आढळते?

बाळांमध्ये खाल्ल्यानंतर दूध किंवा अन्न बाहेर काढणे हे सामान्यपणे आढळते. परंतु, जर असे सारखे होत राहिले तर जीईआरडी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचवेळा, आतड्यांची हालचाल नीट झाली नाही तर त्यामुळे जीईआरडी होऊ शकतो. बाळांची पचनसंस्था विकसित होत असते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आतड्याचा खालचा भाग हा तितकासा सशक्त नसतो आणि त्यामुळे उलटी होण्याचा त्रास होतो आणि त्याचे रूपांतर अगदी सहजगत्या जीईआरडी मध्ये होते.

अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की नॅशनल डायजेस्टिव्ह क्लिअरिंग हाऊस नुसार बऱ्याच मुलांना त्यांच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत जीईआरडी चा त्रास होणे कमी होते. त्यामुळे असे गृहीतक मांडले गेले की बाळाची विकसित होत असलेली पचनसंस्था ह्या रिफ्लक्सचे कारण असू शकते.

बाळांमधील ऍसिड रिफ्लक्स आणि जीईआरडी ची कारणे काय आहेत?

बऱ्याच वेळा बाळाच्या आतड्याचा खालचा भाग (एलईएस) नीट विकसित झालेला नसतो किंवा त्याचे कार्य नीट होत नसते. काही वेळा, आईच्या आहारामुळे तसे होते, विशेषकरून बाळ स्तनपान घेतानाच्या टप्प्यावर हा त्रास होतो. मोठ्या मुलांमध्ये जीईआरडी होण्याची खूप कारणे असतात.

  • औषधे
  • सोडा
  • जास्त दुधग्धजन्य पदार्थांचे सेवन
  • लॅकटोज इंटॉलरन्सचा दुष्परिणाम
  • लठ्ठपणा
  • मसालेदार अन्नपदार्थ
  • खूप जास्त खाणे

सर्वात महत्वाचा मुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे जर तुमच्या बाळाला लहान वयात हा आजार झाला असेल तर मोठेपणी सुद्धा होण्याची शक्यता असते.

लक्षणे आणि चिन्हे

जीईआरडीची लक्षणे ही समजण्यासाठी खूप अवघड असतात कारण बाळाला पाजल्यावर बाळाला उलटी झाली कि जीईआरडी मुळे ह्यातील फरक लक्षात येत नाही. जर दोन्हीची लक्षणे सारखी असतील तर बाळाला ऍसिड रिफ्लेक्स झाला आहे का किंवा जीईआरडी झाला आहे हे समजत नाही.

त्याचे नीट निदान होण्यासाठी, तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणे सर्वात उत्तम. तो पर्यंत तुम्ही इतर लक्षणांकडे लक्ष ठेऊ शकता.

  • जोरदार उलटी होणे: स्तनपानाच्या सुरुवातीच्या काळात किंवा बाटलीने दूध पाजताना

बाळाने थोडेसे दूध बाहेर काढणे आणि थोडी उलटी करणे हे नॉर्मल आहे. परंतु, जर बाळाने जोरदार उलटी केली आणि वेदना होऊन ते रडू लागले असेल तर ते जीईआरडी चे लक्षण असू शकते.

  • खाताना त्रास होणेजर बाळाला खाताना त्रास होत असेल किंवा भरवल्यावर गिळायला नकार देत असेल तर खाल्लेले अन्न वर येते. आणि हे सौम्य जीईआरडी चे लक्षण आहे.
  • दूध न पिणे जर बाळाला दूध पाजताना ते सतत रडत असेल तर ते अतांड्यच्या खालच्या भागात अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे होत असावे आणि ते जीईआरडी चे लक्षण आहे.
  • झोपेत व्यत्यय: अनियमित झोपेचे चक्र किंवा झोपेत व्यत्यय येणे हे ऍसिड रिफ्लक्स मुळे पोटात अस्वस्थता आल्यामुळे होते. आणि हे जीईआरडी चे लक्षण आहे.

जीईआरडी ची लक्षणे चांगली समजून घेण्यासाठी तुमच्या जवळील आरोग्यतज्ञांची भेट ह्या.

जीईआरडी आणि रिफ्लक्सचे निदान कसे होते?

बऱ्याच वेळा जीईआरडी चे निदान लक्षणांवरून होते. बाळाच्या आहाराचा इतिहास आणि वाढीच्या तक्त्यावरून ह्याची सुद्धा निदान होण्यास मदत होते. परंतु जीईआरडीचे निदान होण्यासाठी काही तपासण्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात.

  • बेरियम स्वयालो: ह्या प्रकारचा एक्सरे मुळे अन्ननलिका, लहान आतड्यांचा वरचा भाग आणि पोटाचा भाग अरुंद झाला आहे का ह्याचे निदान होते.
  • पीएच प्रोब: ह्या चाचणीमध्ये ,२४ तास, पोटातील आम्लाची पातळी मोजण्यासाठी प्रोब असलेली लांब, अरुंद नळी अन्ननलिकेत घातली जाते. ही नळी नाकातून घातली जाते. ह्या चाचणीमुळे जीईआरडी चे निदान होते. ह्या चाचणीद्वारे बाळाला जीईआरडी मुळे काही श्वसनाचे त्रास तर नाहीत ना हे तपासले जाते.
  • जीआय एन्डोस्कोपी: ह्या चाचणीमध्ये लांब, पातळ नळी घशात घातली जाते. ह्या नळीला (त्यास एंडोस्कोप म्हणतात) कॅमेरा लावलेला असतो. जीईआरडी ची अशा पद्धतीने तपासणी केल्यास पोटात किंवा अन्ननलिकेत काही अडथळे असतील तर लक्षात येतील.

जर तुमच्या डॉक्टरांना वाटले तर तुमचे डॉक्टर तुम्हाला जीईआरडी आणि रिफ्लक्स साठीच्या ह्या तपासण्या करण्यास सांगतील.

बाळांना होण्याऱ्या जीईआरडी चे धोके

आधीच्या काही आजारांमुळे आणि बाहेरील कारणांमुळे तुमच्या बाळाला जीईआरडी चा धोका असतो.

  • लॅकटोज इंटॉलरन्स जर बाळाला लॅकटोज इंटॉलरन्स असेल आणि बाळाने दुगधजन्य पदार्थांचे सेवन केले असेल तर ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.
  • मसालेदार अन्नपदार्थ जर स्तनपान करणाऱ्या आईने मसालेदार अन्नपदार्थ खाल्ले तर, स्तनपान घेणाऱ्या बाळाला ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.
  • अरुंद अन्ननलिका जन्मतःच बाळाची अन्ननलिका अरुंद असेल तर बाळाला जीईआरडी होण्याचा धोका असतो.
  • यूसोफ्याजीटीस ह्या आजारात अन्ननलिकेला सूज येते आणि त्यामुळे मुलांना ऍसिड रिफ्लेक्स होतो.

खूपशा ऍलर्जिक प्रतिक्रियांमुळे किंवा संसर्गांमुळे जीईआरडी वाढतो आणि आणि ते त्याचे कारण पण असू शकते. जर बाळाची पचनसंस्था मजबूत नसेल तर जीईआरडी होऊ शकतो.

बाळांमधील ऍसिड रिफ्लक्स साठी उपचारपद्धती

जीईआरडी च्या तीव्रतेनुसार उपचारपद्धती बदलते

औषधोपचार

जीईआरडी वर औषधांनी उपचार केला जाऊ शकतो. सौम्य प्रकारचा जीईआरडी तोंडातून औषधे देऊन बरा करता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे नाश्त्याच्या आधी ३० मिनिटे औषधे घेणे आणि थोड्या अधिक तीव्र प्रकरणांमध्ये रात्रीच्या जेवणाच्या आधी ३० मिनिटे औषधे घेणे होय. जीईआरडी चे लक्षण म्हणजे खूप जास्त ढेकर देणे होय आणि तुम्ही त्यावर उपचार म्हणजे अँटासिड्स घेऊ शकता. खूप तीव्र प्रमाणातील जीईआरडी साठी डॉक्टर औषधे इंजेक्शनद्वारे देऊ शकतात कारण औषंधानी पटकन परिणाम करणे महत्वाचे आहे. लहान बाळांमध्ये ते कमी प्रमाणात दिले जाऊ शकते. तुमच्या बाळांना औषधे देण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

रिफ्लक्स नियंत्रित राहण्यासाठी औषधे

रिफ्लक्स नियंत्रित राहण्यासाठी वेगवेगळी औषधे (जसे की पॅन्टोप्राझोल) मदत करतात. ही औषधे औषधांच्या दुकानात विकली जातात. तुमच्या मुलाला कुठलेही औषध देण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या.

शस्त्रक्रिया

खूप गंभीर प्रकरणांमध्ये, काही लोकांना जीईआरडी साठी सर्जरीची गरज भासू शकते. हे लहान बाळांसाठी खूप दुर्मिळ आहे.

गंभीर प्रकरणांमध्ये, लहान बाळांना श्वसनाचा त्रास होतो किंवा ऍसिड रिफ्लक्स मुळे वाढ थांबली असेल तर तुमचे बालरोगतज्ञ तुम्हाला सर्जरी सुचवतील त्यास फंडोप्लिकेशनअसे म्हणतात. ह्या सर्जरीमध्ये, एलईएस घट्ट करून ठेवतात ज्यामुळे कमी ऍसिड अन्ननलिकेत परत जाईल. ही शस्त्रक्रिया खूप दुर्मिळ असते आणि जर औषधांचा काहीच परिणाम दिसला नाही तरच ती केली जाते.

लहान बाळे जीईआरडी वर मात करतात का?

एक वर्षाचे होईपर्यंत ९५%बाळे जीईआरडीवर मात करतात. बऱ्याच कमी टॉडलर्स मध्ये ह्याच लक्षणे दिसतात. परंतु, मोठ्या मुलांना सुद्धा असे होऊ शकते.

बेबी जीईआरडी किती काळ राहतो?

बरीचशी बाळे एक वर्षांची होईपर्यंत त्यावर मात करतात. पुढील दोन वर्षात तुम्हाला जीईआरडी सगळी लक्षणे नष्ट झालेली दिसली पाहिजेत

जीईआरडी मुळे होणाऱ्या समस्या

जीईआरडी मुळे खालील गोष्टी होऊ शकतात

  • हिरव्या/पिवळ्या आणि तपकिरी रंगाची उलटी होणे
  • दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ रडत राहणे आणि खूप अस्वस्थ होणे
  • उलटी केल्यानंतर श्वसनास त्रास होणे
  • वजनवाढ न होणे आणि भूक मंदावणे
  • खोकला, सायनस, कानात संसर्ग किंवा न्यूमोनियाचा धोका
  • पोटातील आम्लामुळे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचणे

रिफ्लक्स असताना बाळाला दूध पाजण्याविषयी टिप्स

बाळाला दूध पाजताना, तुम्ही खालील काही गोष्टी करून बाळाची अस्वस्थता खूप कमी करू शकता

  • बाळाला दूध पाजताना डोक्याकडून थोडे वरती उचलून घ्या
  • थोडे थोडे परंतु वारंवार दूध पाजा
  • ढेकर काढल्याने पचनास मदत होते
  • बाळाला आरामदायक वाटण्यासाठी त्यास डाव्या कुशीवर झोपला

बाळाचा ऍसिड रिफ्लक्स घालवण्यासाठी घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल

  • बाळाला झोपवताना: बाळाचे डोके ३० डिग्री उंचावर येईल असे ठेवा. ह्या स्थितीत गुरुत्वाकर्षणामुळे पोटातील आम्ल पुन्हा अन्ननलिकेत येणार नाही.
  • मसाज थेरपी: तुमच्या बाळाच्या पोटावर नैसर्गिक तेल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरवा. त्यामुळे श्वसनप्रणाली आणि पचनसंस्था नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूना उत्तेजना मिळते.

  • ऍपल सिडर व्हिनेगर: बाळांमधील रिफ्लक्स वर हा चांगला उपाय आहे. पोटातील पी. एच. संतुलित होते. एक कप पाण्यात १/४ टीस्पून अँपल सिडर व्हिनेगर टाका. तुमच्या बाळाला थोड्या थोड्या वेळाने हे पाणी देत रहा.
  • नारळाचे तेल: उंची बाळाच्या पोटाला आराम मिळावा म्हणून नारळाच्या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो. तुम्ही तुमच्या बाळाच्या पोटावर दररोज काहीवेळा नारळाच्या तेलाने चोळून मसाज करू शकतो.
  • कॅमोमाइल: ह्या तेलाच्या अँटीस्पॅजमोडीक गुणधर्मांमुळे पचनाच्या समस्या असतील तर त्यासाठी मदत होते. ह्या फुलांच्या अर्धा चमचा पाकळ्या गरम पाण्यात टाका. दहा मिनिटे फुले त्यात तशीच राहू द्या. थंड होऊ द्या आणि पाकळ्या काढून टाका. तुमच्या बाळाला दोन दोन चमचे वारंवार दिवसभर देत रहा.

जीईआरडी म्हणजे तुमच्या बाळाला खूप अस्वस्थ करणारी स्थिती आहे. तुमच्या बाळाचा ताण कमी करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलून तो कमी करण्यासाठी विविध पर्याय जाणून घ्या.

आणखी वाचा:

बाळांमधील हिरवे शौच
बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article