Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांमधील हिरवे शौच

बाळांमधील हिरवे शौच

बाळांमधील हिरवे शौच

दररोज आपल्या शिशुची नॅपी बदलताना अगदी सहज बाळाचे मल तपासून पहिले जाते. आकार, पोत, रंग, आणि वास सर्व परिचित असतील तर ठीक, पण जेव्हा आपल्या लक्षात येईल की नेहमीच्या पिवळ्या रंगाऐवजी बाळाच्या शौचाचा रंग हिरवा आहे तर? हे काळजीचे कारण आहे का? अर्थातच नाही! घाबरून लगेच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा त्यामागच्या संभाव्य कारणांविषयी स्वत: ला शिक्षित करणे आपल्याला निश्चिन्त ठेवण्यासाठी पुरेसे असते. कारण प्रत्येक बाळाला केव्हा ना केव्हातरी हिरव्या रंगाची शी झालेली असते.

बाळांना हिरव्या रंगाचे शौचास कशामुळे होते?

हिरव्या रंगाचे शौचास होण्याची कारणे खालीलप्रमाणे:

1. शौचाच्या रंगाचे संक्रमण

जेव्हा आपले बाळ जन्माला येते आणि स्तनपान सुरू होते तेव्हा बाळ मेकोनियम (नवजात शिशुच्या प्रथम अवयव बनवणाऱ्या गडद हिरव्या पदार्थ) च्या स्वरूपात पहिले मल उत्सर्जित करतात. जेव्हा बाळाला स्तनपान सुरू होते तेव्हा, शौचाचा रंग काळ्या/ हिरव्या/ तपकिरी पासून पिवळ्या रंगामध्ये संक्रमित होईल. हे नैसर्गिक आहे आणि चिंतेचे कारण नाही.

2. बाळाचा आहार

हिरव्या पालेभाज्या जसे की पालक किंवा मटार ह्यामुळे बाळाला हिरवी शौचास होऊ शकते. हे असे होण्याचे कारण म्हणजे बाळाने योग्यरित्या न चावता अन्न खूप वेगाने खाल्ले आहे किंवा अन्न पचनतंत्राद्वारे खूप लवकर निघून गेले आहे.

3. सुरवातीचे घट्ट दूध (Fore Milk) / नंतरचे पातळ दूध (Hind Milk) असंतुलन

जेव्हा सुरुवातीचे घट्ट दूध आणि नंतरचे दूध यांचे अयोग्य मिश्रण असते तेव्हा बाळाला हिरव्या रंगाचे शौचास होण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या दुधामध्ये कमी चरबी असते आणि ते लॅक्टोज समृद्ध असते. नंतरचे दूध चरबीने समृद्ध असते. एकत्रितपणे, दोघांचे परिपूर्ण मिश्रण बाळाच्या आहारासाठी आवश्यक आहे. तथापि जेव्हा पहिले दूध भरपूर प्रमाणात येते तेव्हा बाळाची भूक नंतरचे दूध येण्यापूर्वी पूर्ण होते. यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात कारण लॅक्टोज चे विघटन करण्यासाठी पुरेसे लॅक्टेज (Lactase) नसल्याने हिरव्या रंगाचे मल तयार होते.

कशामुळे

4. आजार

बाळाला विषाणूंचा संसर्ग झाला असेल किंवा पोटाचा फ्लू असेल तर बाळाला पाण्यासारखे हिरव्या रंगाचे जुलाब होतात. आईचे दूध बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करू शकते म्हणून आपण बाळाला अशा परिस्थितीत स्तनपान चालू ठेवावे. ही परिस्थिती एक दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास, बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा. कारण बाळाला निर्जलीकरणाचा (Dehydration) धोका उद्भवू शकतो.

5. बाळांना दात येताना

बाळांना दात येत असताना, ते जास्त प्रमाणात लाळ गिळतात, त्यामुळे आतड्याची जळजळ होते व बाळाला चिकट हिरवे शौचास होते.

6. आईचा आहार

आपल्या आहारात पालक आणि मटार सारख्या अनेक हिरव्या भाज्या आहेत का? आपल्या बाळाला शौचास हिरवी होण्याचे हे कारण असू शकते. अशा परिस्थितीत स्तनपान देखील हिरवे असते आणि ते हानिकारक नसते.

7. औषधे

लोह पूरक गोळ्या हिरव्या रंगाचे मल देतात जे सामान्य आहे. खरं तर, ते हिरवे किंवा काळे नसल्यास, औषधे पूरक नसल्याचे हे लक्षण आहे.

8. ऍलर्जी प्रतिक्रिया

जर आपल्या बाळाला, स्वतः खाल्लेल्या पदार्थांची कोणतीही ऍलर्जी असेल तर याचा परिणाम म्हणजे शौचास हिरवी होते. ही एलर्जी गाईच्या दुधाची किंवा कुठल्याही औषधाची सुद्धा असू शकते. तथापि, जेव्हा त्वचेची एलर्जी किंवा सौम्य श्वासोच्छवासाच्या समस्यांसह इतर लक्षणे दिसतात तेव्हा खात्री करून घेण्यासाठी तात्काळ आपल्या वैद्यांचा सल्ला घ्या.

9. काविळ

काही नवजात पिलांना कावीळ होते कारण त्यांचे यकृत अपरिपक्व असते आणि शरीराच्या उत्पादित बिलीरुबिनवर प्रक्रिया करण्यास अक्षम असते. हे खूप सामान्य आहे आणि एक दोन आठवड्यात अदृश्य होते. जर ही परिस्थिती जास्त काळ राहिल्यास अंतर्भूत यकृत स्थितीचे सूचक असू शकते आणि डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.

संभाव्य उपचार काय आहेत?

हिरवे मल असण्याची बहुतेक कारणे हानिकारक नसतात आणि यामुळे बाळांना दीर्घकालीन नुकसान होत नाही. तथापि, अशी काही कारणे आहेत ज्यांना उपचारांची आवश्यकता असू शकते.

  1. कोणत्याही विषाणूंच्या संसर्गामुळे पोट बिघडू शकते. हिरव्या रंगाचा मल हा बऱ्याचदा अतिसार असतो. ज्यामुळे गंभीर समस्या येते जसे की निर्जलीकरण. सौम्य निर्जलीकरणावर ओरल रिहायड्रेटिंग सोल्यूशनच्या (ors ) च्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात आणि ते बाळाच्या वजनानुसार दिले जाते.
  1. हरित मल टाळण्यासाठी अतिपुरवठा नियंत्रित केला जाऊ शकतो. हे खालीलप्रमाणे विविध पद्धतीने केले जाऊ शकते.
  • विशेष आहार: सुरुवातीचे दूध फारच जास्त आणि नंतर पुरेसे दूध येत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. विशेषतः स्तनपान करताना केवळ एका स्तनावर स्तनपान करणे हे बाळाला दुधाचे दोन्ही भाग मिळत आहेत हे सुनिश्चित करते. जर दुसरे स्तन खूप भरत जाणे सुरू राहिले तर आपण पंप वापरू शकता.
  • औषध: जर आईला दूध जास्त प्रमाणात येत असेल तर, दूध पुरवठा कमी करण्यासाठी शीतऔषधे आपण वापरू शकता वापरू शकता. तथापि, हा दृष्टिकोन काळजीपूर्वक वैद्यांशी सल्लामसलतीनंतरच वापरला जावा कारण इतर दुष्परिणाम होऊ शकतात.
  • कोबीचा वापर: दुधाचा पुरवठा कमी करण्यासाठी कोबी ज्ञात आहेत. आपण आपल्या निपल्सवर थंड कोबी दिवसातून तीन वेळा पेक्षा ३० मिनिटांसाठी लावून ठेऊ शकता.

उपचार

बाळांचे हिरवे शौचास होणे कसे टाळावे?

  • हिरव्या पालेभाज्या खाणे टाळा.
  • बाळाला गाईचे दूध देणे टाळा कारण त्यामध्ये लैक्टोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे हिरव्या रंगाचे मल होऊ शकते.
  • आपला आणि आपल्या जोडीदाराचा वैद्यकीय इतिहास तयार करा त्याअनुषंगाने कोणताही ऍलर्जीयुक्त पदार्थ बाळाला देण्यास प्रतिबंध बसेल.
  • जर आपल्या मुलास ऍलर्जी असेल तर आपणास प्रतिक्रियांचे कारण काय आहे हे ठरवण्यासाठी आपण एक तक्ता तयार करा. त्यामध्ये आपल्या आणि आपल्या बाळाच्या आहाराची नोंद करा. आपल्या मुलाला एखाद्या विशिष्ट पदार्थाची दुसऱ्यांदा एलर्जी झाली तर, त्याची एक टीप बनविली जाते. हे अन्न नंतर बंद केले जाते. त्यानंतर काही दिवसात ते पुन्हा खाण्यास दिले जाते. जर ऍलर्जिक प्रतिक्रिया असेल तर, आपल्या मुलाला तो पदार्थ ऍलर्जिक असल्याची खात्री होते.

हिरव्या रंगाचे मल सामान्य नसले तरी बऱ्याच बाबतीत वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे हस्तक्षेप केल्याशिवाय त्याचे निराकरण होऊ शकते. जर आपल्या बाळाला हिरवी शौचास होत असेल पण बाळाचे आरोग्य परिपूर्ण असेल तर त्यात चिंता करण्यासारखे काहीही नसते. तथापि, ही समस्या पुनःपुन्हा उद्भवत असल्यास, बालरोगतज्ञांकडे जाणे चांगले.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article