Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

बाळाची त्वचा खूप नाजूक आणि मऊ असते, बाहेरचे प्रदूषण आणि जिवाणू ह्याविषयी खूप संवेदनशील असते. हे जिवाणू हवेत, अन्नामध्ये आणि  बाळांसाठी आपण जी उत्पादने वापरतो जसे की टिशू, साबण आणि मॉइश्चरायझर्स मध्ये सुद्धा असतात. म्हणून बाळासाठीची उत्पादने जसे की साबण, शाम्पू, टिशू निवडताना त्यातील मुख्य घटक समजून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या बाळासाठी अंघोळीचे महत्व

बाळाला अंघोळ घालण्याआधी त्याचे महत्व जाणून घेणे जरुरीचे आहे. बाळाची प्रतिकार यंत्रणा खूप नाजूक असते. बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते आणि शरीरावरच्या जिवाणूंशी लढा देण्याइतकी ती सक्षम नसते. अंघोळीमुळे त्वचेवरचे हे जिवाणू नष्ट होण्यास मदत होते आणि त्वचेची रंध्रे मोकळी होतात, त्यामुळे आतील अशुद्ध घटक बाहेर येण्यास मदत होते. तसेच पालकांना सुद्धा बाळाच्या त्वचेवर काही खुणा, फोड आणि ऍलर्जी तर नाही ना हे जाणून घेण्यास मदत होते.

लक्षात ठेवा बाळाची त्वचा नाजूक असते त्यामुळे मोठ्यांसाठीची उत्पादने बाळास वापरल्यास बाळाला इजा होऊ शकते. त्यामुळे बाळाला बेबी प्रॉडक्ट्स वापरली पाहिजेत जेणेकरून बाळाची त्वचा मऊ राहील आणि त्वचेला योग्य पोषण मिळेल.

बाळाला किती वेळा अंघोळ घातली पाहिजे?

बरेच पालक बाळ दवाखान्यातून घरी आल्याबरोबर रोज बाळाला अंघोळ घालतात. ह्याची खरंतर काहीही गरज नसते. नुकतेच जन्मलेले बाळ सुरक्षित वातावरणात ठेवलेले असल्याने विषारी गोष्टींच्या कमी संपर्कात येते. बाळाची अजून घन पदार्थ घेण्यास सुरुवात झालेली नसते तसेच अस्वच्छ पृष्ठभागांच्या संपर्कात ते येत नसल्यामुळे नवीन जन्मलेल्या बाळाला आठवड्यातून ३ वेळा अंघोळ घालावी. जेव्हा बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते आणि रांगायला सुरुवात करते, तेव्हा जिवाणूंशी लढा देण्यासाठी तुम्ही बाळाला आठवड्यातून जास्त वेळा अंघोळ घालू शकता. तुम्ही दिवसागणिक अंघोळीचे सत्र वाढवा म्हणजे बाळाच्या त्वचेला अंघोळीच्या वारंवारितेशी जुळवून घेता येईल.

बाळाला कुठे अंघोळ घालावी?

बाळाला कुठे अंघोळ घालावी हे महत्वाचे आहे. लक्षात असू द्या की बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा खूप नाजूक असते. जर तुम्ही थंड प्रदेशात राहात असाल तर बाळाला टबमध्ये घरातच जी खोली उबदार असेल तिथे अंघोळ घाला. जर तुम्ही उष्ण प्रदेशात राहात असाल तर पाण्याचे तापमान तपासून पहा. बाळाला कुठे अंघोळ घालावी हे तुम्ही बाळाला कशी अंघोळ घालत आहेत ह्यावर अवलंबून असते.

जर तुम्ही बाळाला तुमच्या बेडरूम मध्ये अंघोळ घालत असलात तर खोली आधी गरम करून ठेवली आहे ह्याची खात्री करा. बाळाला अंघोळ घालण्याआधी टबखाली मॅट ठेवा.

अंघोळीमुळे शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रित होते. जर तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला आणि जर तुम्ही रहात आहात तिथे उष्ण हवामान असेल तर पाणी थोडे गार करून घ्या.

खूपच थंड अथवा गरम वातावरण असेल तर बाळाला अंघोळ घालू नका. हे लक्षात असुद्या की तुमच्यासाठी जे उबदार असते ते बाळासाठी गरम असू शकते. तसेच तुमच्यासाठी थोड्या थंड असणाऱ्या गोष्टी बाळासाठी बर्फासारख्या थंड असू शकतात कारण बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. बाळाच्या गरजेनुसार आणि वातावरणाप्रमाणे तापमान नियंत्रित करा.

बाळाची अंघोळीची वेळ कशी ठरवाल?

बाळाची अंघोळीची वेळ ही अंघोळीपेक्षा जास्त महत्वाची जास्त महत्वाची असते. काही सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे,

 • जर बाळाला भूक लागली असेल तर अंघोळ घालू नका.
 • जर बाळ तापाने आजारी असेल तर बाळाला अंघोळ घालू नका.
 • जर बाळाला त्वचेला काही आजार असेल तर अंघोळ घालण्याआधी, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ह्याशिवाय काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बाळाच्या अंघोळीच्या वेळेला लक्षात घेतल्या पाहिजेत :

बाळाची अंघोळीची वेळ कशी ठरवाल?

 • संध्याकाळी अंघोळ म्हणजे मज्जा आणि त्यामुळे बाळाला रात्रभर छान झोप लागते. तसेच दिवसभर शरीरावर असलेले जिवाणू सुद्धा नष्ट होतात.
 • पहाटे अंघोळ घालणे म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या आईबाबांसाठी योग्य वेळ आहे. त्यामुळे कामावर जाण्याआधी बाळाला अंघोळ घातल्यास पालकांचा बाळाबरोबर बंध तयार होतो आणि बाळाला उर्जा मिळते.
 • दुपारी जेव्हा सर्वात जास्त तापमान असते तेव्हा अंघोळ घातल्यास बाळाच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
 • तिन्हीसांजेला बाळाला अंघोळ घालू नका, त्यामुळे बाळ आजारी पडण्याची शक्यता वाढते.

वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या बाळाच्या गरजांनुसार बाळाच्या अंघोळीची वेळ ठरवा.

तुम्ही बाळासाठी कुठला क्लिंजर किंवा साबण वापरला पाहिजे?

तुम्ही बाळासाठी कुठला क्लिंजर किंवा साबण वापरला पाहिजे?

साबणाची निवड करताना सर्वात महत्वाचा मुद्धा म्हणजे pH बॅलन्स. अगदी किंचित ऍसिडिक किंवा न्यूट्रल pH असलेले साबण किंवा उत्पादने बाळाच्या नाजूक त्वचेसाठी उत्तम असतात, त्यामुळे त्वचेची आर्द्रता नियमित ठेवणाऱ्या सुरक्षित कवचाचे नुकसान होत नाही. मोठ्यांसाठी वापरला जाणारा अल्कलीयुक्त pH असलेला साबण बाळासाठी खूप उग्र असतो, त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडून बाळाला रॅशेस होऊ शकतात.

असेही सांगितले जाते की बाळासाठी द्रव साबण वापरावा, कारण त्यामध्ये मॉइश्चरायझर्स असल्याने बाळाच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते. बाळासाठी कुठला साबण वापरावा ह्यासाठी बालत्वचारोगतज्ञांची सल्ला घेतल्यास नक्की मदत होईल.

अंघोळीचे वेगवेगळे प्रकार

बाळाला वेगवेगळ्या प्रकाराने अंघोळ घातली जाते.

१. बाथ सीट

बाथ सीट

बाथ सीट वापरल्याने बाळावर आपली घट्ट पकड राहील. तुम्ही netted bather किंवा bath seat वापरू शकता. त्यामुळे बाळ थोडे उंचावर असते, त्यामुळे ते अंघोळीच्या पाण्यात स्वतःचे स्वतः बसते. ह्यामध्ये पाण्याचा प्रवाह बाळाच्या दिशेने असतो आणि मग ते पाणी हळूच खालच्या टब मध्ये सांडते आणि नंतर बाहेर वाहून जाते.

२. पारंपरिक अंघोळ

ही पद्धत कदाचित तुमच्या बाळासाठी सर्वात आरामदायी असेल. तुम्ही बाथरूम मध्ये बसून बाळाला तुमच्या मांडीवर झोपवता, बाळाचे हात पाय ताणून त्यांना मसाज देता, मध्येच थोडे थोडे पाणी बाळाच्या अंगावर शिंपडता त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटते. परंतु ह्या अंघोळीच्या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा ओले होता आणि साबण लागतो.

३. बाथ टब

बाथ टब

बाथ टब मध्ये अंघोळ करताना बाळाला सर्वात जास्त मज्जा येते तसेच त्यामुळे पालकांसोबत बाळाचा बंध तयार होतो.

तुमच्या बाळाला बाथटबमध्ये अंघोळ कशी घालाल?

 • अंघोळीचे साहित्य हाताच्या अंतरावर ठेवा म्हणजे तुम्हाला एका हाताने सहज घेता येईल.
 • बाथ टब कोमट पाण्याने भरून घ्या. जर पाण्याच्या तापमान ३२ डिग्री पेक्षा जास्त असेल आणि अशा पाण्यात बाळाला ३० सेकांदापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास बाळाला चटके बसतात.
 • बाळाला जिथे टब आहे तिथे घेऊन या, बाळाचे सगळे कपडे काढा. बाळाचे पाय पाण्यात ठेवा आणि बाळाच्या खांद्यांना धरून ठेवा.
 • बाळाला हलक्या हाताने साबण लावा, कप किंवा हॅन्ड शॉवर वापरून साबण धुवून टाका.
 • बाळाला स्वच्छ टॉवेलने कोरडे करा आणि टॉवेल बाळाभोवती गुंडाळा. टॉवेलला टोपीसारखा कोपरा असेल ह्याची खात्री करा त्यामुळे बाळाचे कान आणि डोके उबदार राहील.

टबमध्ये बाळाला अंघोळ घालताना घ्यावयाची सुरक्षिततेची काळजी

आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी हे उपाय आवश्यक आहेत.

 • तुम्ही बाळाला हाताने घट्ट धरून ठेवले आहे ह्याची खात्री करा.
 • पाण्याचे तापमान २-३ वेळा तपासून पहा. बाळाला ३२ डिग्री पेक्षा जास्त तापमान असलेल्या पाण्यात ठेवल्यास बाळाला खुप चटके बसू शकतात.
 • खूप जास्त साबण वापरू नका. त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडून रडून बाळाच्या त्वचेवर रॅशेस येतील.
 • ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बाळाला अंघोळ घालू नका. जास्त वेळ अंघोळ घातल्यास बाळाला थकवा येऊ शकतो.
 • अंघोळ घालताना बाळाला एकटे ठेऊन अंघोळीची खोली सोडून जाऊ नका.

४. स्पंज बाथ

पहिल्या काही आठवड्यांमध्ये, बाळाला स्पंज बाथ देणे सोपे जाते. ह्यामध्ये बाळाला कोमट पाण्यात ओलं केलेल्या स्पंजने बाळाला पुसून घेतले जाते. ही प्रक्रिया करताना इथे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 • जिथे बाळाला स्पंज बाथ द्यायचा आहे ती खोली उबदार आहे ह्याची खात्री करा आणि एका भांड्यात कोमट पाणी घ्या.
 • बाळाच्या खाली एक कोरडा आणि स्वच्छ टॉवेल ठेवा, त्यामुळे स्पंज बाथ नंतर तुम्हाला लगेच बाळाला पुसून घेता येईल.
 • सुरुवातीला बाळाचे डोळे हळूच पुसून घ्या.
 • कान पुसताना खूप खोलवर पुसू नका. त्यामुळे बाळाच्या कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचू शकते. कान आणि कानाचा मागचा भाग स्वच्छ पुसून घ्या.
 • बाळासाठी असलेलीच उत्पादने वापरा त्यामुळे बाळाची त्वचा सुरक्षित राहील.
 • बाळाला स्पंज बाथ देऊन झाल्यावर बाळाला काळजीपूर्वक हलकेच पुसून घ्या. बाळाला मॉइश्चरायझर वापरून बाळाला उबदार वाटावे म्हणून गुंडाळून ठेवा.

बाळाच्या अंघोळीसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी लागतील?

बाळाच्या अंघोळीसाठी लागणाऱ्या गोष्टी इथे दिल्या आहेत.

बाळाला योग्यरितीने कशी अंघोळ घालावी

 • तुम्हाला योग्य आकाराचा टब लागेल. ज्यांच्या कडा धारदार आहेत अशा प्लास्टिक च्या गोष्टी वापरू नका.
 • बाळासाठीचा सौम्य साबण.
 • पाणी बाजूला करण्यासाठी मऊ स्पंज.
 • बाळाचे डोळे स्वच्छ करण्यासाठी साधे कॉटन पॅड्स.
 • बाळाला हलकेच पुसून घेण्यासाठी मऊ टॉवेल.

बाळाचा चेहरा केव्हा आणि कसा धुवावा?

अंघोळीच्या आधी बाळाचा चेहरा धुवा. कोमट पाण्यात स्पंज बुडवून घ्या आणि खूप हलक्या हाताने बाळाचा चेहरा धुवून घ्या. बाळासाठी पाणी खूप गरम तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या. नंतर बाळाचे डोळे पुसून घ्या. तसेच कानाची मागची बाजू आणि कानाचा बाहेरील भाग पुसून घ्या. कानातील मेण स्वच्छ करण्यासाठी कापसाची काडी किंवा बोटे वापरू नका, त्यामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचू शकते. डोळ्याजवळ किंवा नाकातील कोरडा श्लेष्म स्वच्छ करण्याआधी कापसाने आधी डोळे आणि नाक ओले करून घ्या त्यामुळे तो मऊ होईल आणि स्वच्छ करणे सोपे जाईल.

बाळाचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला साबणाची गरज नाही.

बाळाला अंघोळ घालण्याची पद्धत – बाळाची अंघोळ सोपी करण्यासाठी काही गोष्टी

बाळाला योग्यरितीने कशी अंघोळ घालावी :

 • बाथ टब काही इंचभर गरम पाण्याने भरून घ्या. जर तुमच्याकडे थर्मोमीटर असेल तर पाण्याचे तापमान ९०-१०० डिग्री फॅरेनहाईट दरम्यान आहे ह्याची खात्री करा. मुठीच्या आतल्या बाजूने तापमान तपासून पहा.
 • बाळाला मानेच्या खाली आणि डोक्याला आधार देऊन टब मध्ये ठेवा. एका हाताने बाळाला आधार द्या.

बाळाला योग्यरितीने कशी अंघोळ घालावी

 • कापसाने बाळाचे डोळे स्वच्छ करून घ्या. पाण्याने थोडे मऊ करून घ्या आणि बाहेरच्या दिशेने हलकेच पुसून घ्या. दोन्ही डोळ्यांसाठी वेगवेगळा कापूस वापरा. बाळाचे तोंड, नाक, चेहरा, मान आणि कान स्वच्छ करण्यासाठी मऊ स्पंज वापरा.
 • बाळासाठीचा सौम्य क्लिन्जर वापरून स्पंजच्या साह्याने बाळाचे शरीर स्वच्छ करा.
 • बाळाचा नॅपीचा भाग पुढून मागच्या दिशेने स्वच्छ करून घ्या. जर तुमचे बाळ मुलगा असेल तर फोरस्किन मागे ओढू नका.
 • सगळ्या बाळांना पाण्यात खेळायला आवडते. तुम्ही बाळाच्या अंगावर थोडे थोडे पाणी ओतत रहा त्यामुळे बाळाला उबदार वाटेल.
 • बाळाला आता हळूच पाण्याच्या बाहेर काढा. बाळाच्या मानेच्या आणि डोक्याच्या खाली हात ठेवा आणि लागलीच बाळाला टॉवेल मध्ये गुंडाळा.
 • मऊ टॉवेल ने बाळाला पुसून घ्या. सगळ्या खाचांमधून पुसून घ्यायला विसरू नका आणि पुसताना नुसते टिपून घ्या.
 • बेबी मॉइश्चरायझर लावा, त्यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राखली जाईल. बाळाची त्वचा खूप नाजूक असते आणि ती कोरडी पडण्याची शक्यता असते.

बाळाच्या सुरक्षित अंघोळीसाठी घ्यावयाची काळजी

 • अंघोळ घालताना एका सेकंदासाठी सुद्धा बाळाला सोडून जाऊ नका. जर तुम्हाला काही तातडीचे काम असेल तर बाळाला पाण्याबाहेर काढून तुमच्यासोबत घेऊन जा.
 • जर बाळ टब मध्ये असेल तर नळ बंद ठेवा. पाण्याचे तापमान अचानक आणि अनपेक्षित रित्या बदलू शकते.
 • वॉटर हिटर असेल तर तापमान १२० डिग्री फॅरनहाईट पेक्षा कमी ठेवा.

बाळाच्या अंघोळीविषयी काही महत्वाच्या टिप्स

 • कोमट पाण्याने अंघोळ घातल्यानंतर बाळाला गाढ झोप लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाची अंघोळीची वेळ ठरवताना ही गोष्ट लक्षात ठेवा.
 • तुम्ही बघू शकता तेच शरीराचे भाग स्वच्छ करा, कानाचा आतला भाग किंवा नाकाच्या आतला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका.
 • जिथे तुम्ही बाळाला अंघोळ घालाल तिथे अँटिस्किड मॅट घाला, त्यामुळे अपघात टळतील.
 • बाळ पाण्यात असताना बाळाला एकटे सोडून जाऊ नका.

निष्कर्ष: बाळाला अंघोळ घालण्याआधी तुमच्या बाळाची गरज समजून घेणे महत्वाचे आहे, आपण बाळाला अंघोळ घालताना बाळांसाठीच्या स्वच्छता उत्पादनांची शिफारस केली जाते. बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर फोड किंवा रॅशेस तर येत नाहीत ना ह्याकडे लक्ष ठेवा. जर तुम्हाला बाळाच्या त्वचेवर ह्यापैकी काहीही आढळले तर तात्काळ तज्ञांची मदत घ्या. बाळाला अंघोळ घालण्यासाठी ऑरगॅनिक साबण आणि शाम्पू वापरा आणि रोजच्या वापरासाठी ऑरगॅनिक मॉइस्चरायझर्स आणि वाईप्स वापरा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article