Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) वर्तणूक आणि शिस्त हट्टी मुलांना हाताळण्याचे प्रभावी मार्ग

हट्टी मुलांना हाताळण्याचे प्रभावी मार्ग

हट्टी मुलांना हाताळण्याचे प्रभावी मार्ग

स्वभाव ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक जण जन्माला येताना घेऊन आलो आहोत. प्रत्येक लहान मुलाला सुद्धा एक प्रकारचा स्वभाव असू शकतो आणि जर तुमचे मूल हट्टी असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. बऱ्याच पालकांची मुले हट्टी असतात. मुले खूप लहान असतात तेव्हा ते ठीक असते. पण तुम्ही तुमच्या हट्टी मुलाला ज्या पद्धतीने हाताळता त्याप्रमाणे तो घडेल. टॉडलर फेज आणि टीनएजर फेज ह्या दोन्ही काळात मुले हाताळणे सर्वात कठीण मानले जाते.

व्हिडिओ: हट्टी मुलाशी कसे वागावे (पालकांसाठी १० प्रभावी टिप्स)

हट्टीपणा हा काही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो हे समजून घेणे महत्वाचे आहे. तर काही मुलांमध्ये सीमांना झुगारून देण्याची आणि त्यांच्या इच्छेला ठामपणे सांगण्याची त्यांची पद्धत असते. त्यामुळे, तणाव हाताळण्यासाठी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला विविध मार्ग शिकवावे लागतील.

हट्टी मुलांची वैशिष्ट्ये

तुमचे मूल त्याच्या इच्छा पूर्ण करण्याबाबत ठाम असेल तर त्याला हट्टी म्हणता येणार नाही. दृढनिश्चयी असणे आणि जिद्दी असणे यात एक बारीक रेषा आहे. हट्टी मुलांची काही वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत.

हट्टी मुलांची वैशिष्ट्ये

  • हट्टी मुले प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात ज्याला लोक बंडखोर वृत्ती समजू शकतात
  • त्यांना त्यांचे ऐकून घेण्याची इच्छा असते आणि ते स्वीकारले जाण्याची अपेक्षा करतात. त्यामुळे त्यांना तुमचे लक्ष वारंवार हवे असते
  • ते स्वतंत्र आणि गोंधळलेले असतात
  • त्यांना हवे तसे वागण्याची सवय असल्यामुळे त्यांना नित्यक्रमात आणणे कठीण होऊ शकते
  • त्यांना वारंवार राग येतो
  • ते नेतृत्व गुण प्रदर्शित करतात आणि अगदी बॉसी देखील दिसू शकतात
  • प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बळावर करण्याची त्यांची प्रवृत्ती असते

हट्टी मुलांचे मानसशास्त्र

हट्टी मुलांशी कसे वागावे हे ठरवण्याआधी मुले हट्टी का आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मुलाने एखादी गोष्ट करण्याचा दृढनिश्चय करणे आणि हट्टी असणे ह्यामध्ये फरक आहे. दृढनिश्चयाची व्याख्या ‘उद्देशाची दृढता’ अशी केली जाते तर हट्टी असणे म्हणजे ‘कोणत्याही बाह्य दबावाखाली विचार, वर्तन किंवा कृती बदलण्यास नकार देणे.’ अशी आहे. हट्टीपणा अनुवांशिक असू शकतो आणि इतरांचे निरीक्षण करून शिकलेले वर्तन देखील असू शकते. परंतु ह्या वर्तनाचा फायदा चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व चांगले घडवण्यासाठी होऊ शकतो.

हट्टी मुलांना कसे हाताळायचे?

अर्भकं, लहान मुले, किशोरवयीन मुले ह्या पैकी कुठल्याही वयोगटातील मुले हट्टी असू शकतात. ह्यानंतर प्रौढत्वापर्यंत हा हट्टीपणा चालू राहू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला ताण न येता त्याचा हट्टीपणा कमी करण्याचे मार्ग तुम्ही एक पालक म्हणून शोधणे महत्वाचे आहे. हट्टी मुलाला हाताळण्यासाठी येथे काही मार्ग दिलेले आहेत.

हट्टी मुलांना कसे हाताळायचे?

१. वाद घालू नका

हट्टी मुले नेहमी वादाला तोंड देण्यासाठी तयार असतात. त्यामुळे त्यांना ती संधी देऊ नका. त्याऐवजी, तुमच्या मुलाला जे काही म्हणायचे आहे ते ऐकून घ्या आणि त्याच्याशी वाद घालण्याऐवजी संभाषण करा. जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्ही त्यांची बाजू ऐकण्यास तयार आहात, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे आहे हे तुमच्या मुलांनी ऐकण्याची शक्यता जास्त असते.

२. मुलांसोबत बंध निर्माण करा

तुमच्या मुलाला नको ते काम करायला भाग पाडू नका. यामुळे ते अधिक बंडखोर बनतील आणि जे करायला नको होते तेच करतील. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या मुलाने टीव्ही पाहणे थांबवायचे असेल आणि त्याऐवजी त्याने गृहपाठ करायचा असेल, तर त्यांच्यासोबत थोडा वेळ टी.व्ही. पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे काही सौहार्द निर्माण होईल. थोड्या वेळाने, तुम्ही तुमचे पुस्तक वाचताना किंवा जवळ बसून काही काम करत असताना त्यांना गृहपाठ करायला आवडेल का ते तुम्ही तुमच्या मुलाला विचारू शकता.

३. काही पर्याय द्या

हट्टी मुलाला कुठलीही गोष्ट करायला सांगणे म्हणजे त्याचा बंडखोरपणा आणखी वाढवण्यासारखे आहे. त्याऐवजी, त्यांना निवडण्यासाठी पर्याय द्या कारण, त्यामुळे आपल्या जीवनावर आपले नियंत्रण आहे असे त्यांना वाटते आणि त्यांना काय करायचे आहे ते स्वतंत्रपणे ठरवू शकतात. तुमचे मूल गोंधळात पडू नये म्हणून निवडी मर्यादित ठेवा आणि त्याला फक्त दोन किंवा तीन पर्याय द्या. उदाहरणार्थ, जर त्यांना त्यांची खोली स्वच्छ करायची असेल, तर त्याला, “ कुठून सुरुवात करायची आहे?” असे विचारण्याऐवजी “तुला बेड किंवा कपाटापासून सुरुवात करायची आहे का?असे विचारा.

४. तुमच्या मुलाच्या भूमिकेतून पहा

तुमच्या मुलाच्या दृष्टिकोनातून समोरच्या समस्येकडे पहा आणि ते असे का वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्यांना बागेत घेऊन जाण्याचे वचन दिले असेल परंतु हवामान खराब झाल्याने नकार दिला असेल, तर तुमचे वचन पाळणे का शक्य नाही हे त्यांना समजावून सांगा.  नाहीतर तुमच्या मुलाला तुम्ही, बाहेर का जाऊ शकत नाही हे सांगा आणि सहलीसाठी नंतरची तारीख सेट करून परिस्थती नियंत्रणात आणू शकता.

५. घरात शांतता राखा

तुमच्या घरात तुमच्या मुलाला नेहमी आनंदी, आरामदायक आणि सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवा. घरातील सर्वांशी, विशेषत: तुमच्या जोडीदाराशी नम्रपणे वागा, कारण मुले निरीक्षणातून शिकतात. मुले जे पाहतात त्याचे अनुकरण करण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही शांतता राखणे आणि वादविवाद टाळणे तसेच मुलासमोर अपमान करणे टाळणे आवश्यक आहे.

६. तुमच्या निगोशिएशन्स स्किल्स वाढवा

हट्टी मुले जेव्हा कोणत्याही गोष्टीची मागणी करतात तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणे कठीण असते. त्यामुळे त्यांना नेहमी नियम दाखवण्याऐवजी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमचे मूल झोपताना दोन गोष्टी ऐकण्याचा हट्ट करत असेल, तर त्याला आज एक गोष्ट आणि उद्या दुसरी गोष्ट ऐकवते असे सांगा.

७. सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन द्या

उदाहरणाद्वारे नेतृत्व करा आणि नेहमी सकारात्मक दृष्टीकोन सादर करा. तुम्ही ‘नाही’, ‘करू शकत नाही’ किंवा ‘करणार नाही’ हे शब्द खूप वापरत असाल, तर तुमचे मूलही तसेच करण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाच्या जिद्दीबद्दल नकारात्मक न राहता सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. तुमच्या मुलाला ‘होय’ किंवा ‘नाही’ असे उत्तर देणारे प्रश्न विचारून त्यातून एक खेळ तयार करण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रश्न अशा प्रकारे तयार करा की उत्तर बहुतेक वेळा ‘होय’ असेल.त्यामुळे आपले ऐकून घेतले जात आहे तसेच कौतुक केले जाते आहे हे त्याला समजेल.

८. दिनचर्या विकसित करा

दैनंदिन दिनचर्येचे नीट पालन केल्यास तुमच्या मुलाचे वर्तन तसेच शाळेतील कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते. झोपण्याची वेळ नीट ठरवून घेणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या मुलाला भरपूर विश्रांती मिळेल. झोपेचा अभाव आणि थकवा यांमुळे तीन ते बारा वयोगटातील मुलांमध्ये वर्तनविषयक समस्या उद्भवू शकतात

९. नियम आणि परिणाम

हट्टी मुलांना वाढण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. म्हणून, सीमा निश्चित करा आणि सगळे एकत्र असताना तुमच्या अपेक्षा सांगा. तुमच्या मुलाला त्याचे परिणाम काय होतील याविषयी माहिती विचारा तसेच प्रत्येकाला ह्या विषयावर मत मांडण्यास सांगा. सुसंगतता महत्वाची आहे, परंतु त्यासाठी फारच कडक शिस्त नको. काही वेळा लवचिक असणे महत्वाचे आहे, जसे की जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता किंवा प्रसंगी तुमचे मूल अनुकरणीय वर्तन दाखवते. असे केल्याने मुलांना समजते की नियमांचे पालन करणे फायद्याचे आहे. नियमांचा हेतू लहान मुलांना गुदमरवून टाकणे नव्हे.

हट्टी मुलांच्या समस्या

हट्टी मुलांचे पालक होणे सोपे काम नाही. जर तुम्हाला त्वरीत उपाय सापडला नाही तर प्रत्येक लहान सहन गोष्टींचे संघर्षात रूपांतर होऊ शकते. हट्टी मुलाच्या वर्तनावर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दल तुम्हाला बरीच माहिती मिळाली असेल, परंतु प्रत्येक दिवस हे एक नवीन आव्हान आहे. हट्टी मुलांना शिस्त लावणे हा काही त्यावरील योग्य उपाय नाही त्यामुळे योग्य पर्याय शोधणे महत्वाचे आहे.

हट्टी मुलांच्या समस्या

१. खायला त्रास देणारी मुले

जेवताना अनेक लहान मुले गडबड करू शकतात आणि त्यात तुमचे मूल हट्टी असेल तर हा त्रास आणखी वाढू शकतो अशा वेळी शांत राहणे उपयुक्त ठरू शकते आणि आपल्या बाळास वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे  लहान भाग देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना जास्त प्रमाणात काय खायचे आहे त्याचे योग्य पर्याय निवडू द्या. तुम्ही पौष्टिक घटकांसह क्रिएटिव्ह रेसिपी घेऊन जेवणाला चविष्ट बनवण्याचा प्रयत्न देखील करू शकता. तसेच, टेबल सेट करण्यासारख्या कामात लहान मुलांना सामावून घेऊ शकता. त्यांना वाढलेले अन्नपदार्थ संपवल्याबद्दल एखादा गोड पदार्थ देऊ शकता त्यामुळे गोष्टी अधिक सोप्या होऊ शकतात.

२. होमवर्क ब्लूज

तुमच्या मुलाला नेमून दिलेला गृहपाठ पूर्ण करण्यात अडचण येत आहे का किंवा लिखाण अथवा गृहपाठ जास्त असल्यामुळे तो भारावून गेलेला आहे का ह्याकडे लक्ष ठेवा. असे वाटत असल्यास, अभ्यास टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्याचे भाग करू शकता. मध्ये लहान ब्रेक घेतल्याने ते काम  लवकर पूर्ण होऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे त्यासोबत दुसरे क्रियाकलाप करणे. उदाहरणार्थ, तुम्ही बागेत पाणी घालत असताना, तुमचे मूल तुम्हाला मदत करत असताना शब्दलेखन शिकता येते.

३. कपड्यांची निवड

विसंवादाचे एक लोकप्रिय कारण आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्या मुलाला असे काहीतरी घालायचे असते जे त्या प्रसंगी किंवा बाहेरील हवामानासाठी योग्य नसते. हे टाळण्याचा उपाय म्हणजे तुमच्या मुलाच्या कपड्यांची क्रमवारी लावणे आणि दर दोन आठवड्यांनी ते बदलणे. तसेच, त्या हंगामासाठी योग्य नसलेले कपडे काढून बाजूला ठेवा. त्यामुळे त्रास कमी होईल. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाने कपडे बदलायचे असतील तेव्हा दोन किंवा तीन वेगवेगळे पोशाख त्याच्या पुढे ठेवा आणि त्याला निवडण्यास सांगा. अशा प्रकारे, निर्णय घेतल्याबद्दल तुमचे मूल आनंदी राहील आणि तुम्हाला त्रास देणार नाही!

४. झोपताना त्रास देणे

जसजशी झोपण्याची वेळ जवळ येते, तसतसे तुमचे मूल इकडे तिकडे धावू लागते आणि एड्रेनालाईन हे संप्रेरक वाढते, त्यामुळे त्यांना सहज झोप येत नाही. त्यामुळे, दिवे लागण्याच्या सुमारे ३० मिनिटे आधी काही सुखदायक संगीत सुरु करा आणि दिवे मंद करा.  टी.व्ही. बंद करा आणि तुमच्या मुलाला नाईट ड्रेस घालण्यास सांगा. तुमच्या मुलाला नाईट ड्रेस निवडण्याचा आणि तो स्वतःचा स्वतः घालण्याचा किंवा तुमची मदत घेण्याचा पर्याय देऊन भांडणे टाळा. बेडरुमच्या दिशेने जाण्यापूर्वी, तुमच्या मुलाशी त्यांच्या दिवसाविषयी काही सांगण्यासारखे आहे का किंवा तो चांगला दिवस होता की वाईट असा एक साधा प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही मिनिटे द्या.

हट्टी मूल असणे ही वाईट गोष्ट नाही. किंबहुना, असे दिसून आले आहे की ज्या मुलांमध्ये ही वैशिष्ट्ये आहेत ती मुले अनेकदा शैक्षणिक क्षेत्रात तसेच करिअर मध्ये यश मिळवतात. अशी मुले मित्रांच्या दबावाला बळी पडत नाहीत त्यामुळे ते मित्रांच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतात. प्रभावी शिस्तीचा सराव करा. त्यास समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास, पुढे जाऊन तुमचे मूल जबाबदार प्रौढ नागरिक बनण्यास  मदत होऊ शकते.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती एक सामान्य मार्गदर्शक आहे आणि व्यावसायिक सल्ला किंवा उपचारांना ही माहिती पर्याय नाही.

आणखी वाचा:

मुलांना योग्य प्रकारे ‘ नाही ‘ कसे म्हणावे
पालकांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत अशा चांगल्या सवयी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article