Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?

बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?

बाळ किंवा मुलांच्या डोक्यातील उवांपासून सुटका कशी करून घ्याल?

उवा ह्या परजीवी आहेत. उवा म्हणजे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर वाढणारे छोटे किडे होय आणि जिवंत राहण्यासाठी ते रक्ताचे शोषण करतात. उवांचा आकार १ मिमी ते ३ मिमी इतका असतो म्हणजेच त्या दिसणे खूप अवघड असते.

प्रत्येक उ पूर्णपणे वाढण्यासाठी ६१४ दिवस लागतात. ह्या काळात मादी अंडी घालते. प्रत्येक अंडे १ आठवडा ते १० दिवसात फुटते. ह्या अंड्याचे कवच केसाला चिकटून राहते. उवांचे आयुष्य २१ दिवस असते आणि ती एका वेळेला ५६ अंडी घालते. अंडी रंगानी पिवळट पांढरी असतात आणि काहींना तो केसातील कोंडा वाटू शकतो. तथापि, अंडी केसांना चिकटून राहतात आणि काढता येत नाही. कोंडा केसांना चिकटत नाही.

उवांमुळे कुठलाही रोग होत नाही परंतु त्या डोक्यात असल्यास खूप अस्वस्थता येते, तुमच्या बाळाला किंवा मुलाला ह्यामुळे डोक्यात खूप खाजवते आणि त्यामुळे त्यांना खूप बेचैनी येते. ह्याव्यतिरिक्त, तुमच्या मुलाला पाळणाघरात किंवा शाळेत दूर ठेवले जाऊ शकते कारण डोक्यात उवा होणे म्हणजे अस्वच्छतेचे लक्षण समजले जाते. तसेच ज्यांना उवांचा संसर्ग झाला आहे अशा लोकांच्या सान्निध्यात राहिल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते.

बऱ्याच लोकांना असे वाटते की अस्वच्छता आणि गरिबी हि उवांचा प्रादुर्भाव होण्याची कारणे आहेत. परंतु ते खोटे आहे. उवा स्वच्छ आणि अस्वच्छ दोन्ही प्रकारच्या केसांमध्ये होऊ शकतात. त्यांना सगळ्या प्रकारच्या केसांमध्ये राहायला आवडते. केसांची लांबी आणि स्थिती ह्या दोन्हींचा त्याचाशी काही संबंध नसतो. श्रीमंत लोकांमध्ये सुद्धा उवा झालेल्या आढळतात. जर तुमच्या बाळाच्या किंवा मुलाच्या डोक्यात उवा झाल्या तर ह्याचा अर्थ त्या अस्वच्छतेमुळे झाल्या असे नव्हे. तिच्या डोक्यात अन्य कुणाला संसर्गामुळे उवा झाल्याची शक्यता आहे. ते तुमचे नातेवाईक, शेजारी किंवा शाळेतील मुले किंवा मोठे भावंडं ह्यापैकी कुणीही असू शकते!

तुमच्या बाळाच्या किंवा मुलाच्या डोक्यात उवा झाल्या असल्याची लक्षणे

उवा झाल्याचे सर्वात सामान्यपणे आढळणारे लक्षण म्हणजे डोके खाजणे. उवा डोक्याच्या त्वचेतून रक्त शोषून घेतात आणि त्यामुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते. पहिल्या दिवसापासून तुमचे मूल डोके खाजवण्यास सुरुवात करणार नाही. उवांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सहा आठवडयांनी हे लक्षण दिसू लागेल.

इतर लक्षणे ज्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता ती खालीलप्रमाणे:

 • खूप जास्त खाजवल्यामुळे तुमच्या मुलाच्या डोक्यात फोड येऊ लागतात
 • काहीतरी डोक्यात वळवळत आहे अशी तक्रार तुमचे मूल करेल
 • अस्वस्थता आणि झोप नीट लागत नाही
 • तुमच्या बाळाच्या डोक्यात, खांद्यावर आणि मानेवर लाल फोड दिसतील
 • केसात पांढरी उवांची अंडी
 • केसांमध्ये किंवा डोक्यात मोठी ऊ आढळते

केसांमध्ये उवा होण्याची कारणे

जर तुमचे मूल शाळेत जाऊ लागले असेल तर उवा होणे म्हणजे खूप काही असामान्य नाही. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्याही डोक्यात कदाचित कधीतरी उवा झालेल्या असतील!

पाच पैकी एका मुलामध्ये शाळेत असताना उवांचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. उवा एकमेकांच्या जवळ डोके नेल्यास पसरतात, त्यामुळे इतर मुलांशी खेळात असताना तुमच्या मुलाला सहजगत्या संसर्ग होऊ शकतो. मोठ्या माणसांकडून मुलांना मिठी मारताना किंवा बाळाला कुशीत घेताना त्या पसरू शकतात.

लक्षात ठेवा, बिछाना, कपडे, टोप्या किंवा टॉवेल्स ह्यामधून उवांचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणून, ह्या गोष्टी निर्जंतुक करण्याची गरज नाही.

केसांमध्ये उवा होण्याची कारणे

बाळाच्या केसांमधील उवांसाठी उपचार

उवांपासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. उवा आणि त्यांची अंडी ह्यापासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही शाम्पू आणि तेल वापरू शकता. तुम्ही उवांसाठी असलेला कंगवा/फणी सुद्धा वापरू शकता. उवा आणि त्यांची अंडी केसांमधून पूर्णपणे नष्ट होईपर्यंत नियमितपणे त्याचा वापर करू शकता. जर तुमच्या मुलाच्या/मुलीच्या डोक्यात उवांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर योग्य परिणाम मिळण्यासाठी तुम्ही दोन्ही गोष्टी वापरू शकता.

जर तुम्ही उवांसाठीचा शाम्पू वापरत असाल तर तो कुठल्या ब्रॅण्डचा आहे त्यानुसार त्याचा वापर कसा करायचा ते ठरते. तुम्ही लेबल नीट वाचा आणि ते उत्पादन जितक्या वेळा सांगितले आहे तितक्या वेळा वारंवार वापरत रहा/ बऱ्याच वेळा, तुम्हाला सात दिवसांचे अंतर ठेवून शाम्पू दोनदा लावावा लागतो त्यामुळे मोठ्या उवा आणि आणि अंडी नष्ट होतात. तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यावर शाम्पू १०१२ मिनिटे ठेवून मग डोके स्वच्छ धुवावे लागते, हा वेळ ब्रँड नुसार बदलू शकतो. केस नीट धुवा आणि ओले असताना फणीने चांगले विंचरून घ्या. त्यामुळे मेलेल्या उवा सगळ्या निघून जातील.

बाळाच्या केसांमधील उवांसाठी उपचार

उवांसाठीचा कुठला शाम्पू वापरावा ह्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी तुमच्या मुलाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. मुलाचे वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार तसेच आरोग्यास धोका आणि इतर घटक (जसे की अस्थमा) ह्यानुसार डॉक्टर योग्य शाम्पू सांगतील. कुठल्या ब्रँडचे शाम्पू टाळले पाहिजेत हे सुद्धा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. तसेच जर तुम्ही स्तनपान देत असाल किंवा गर्भवती असाल तर काही शाम्पू सुरक्षित नसतात.

काही वेळा, काही रसायनांना उवा जुमानत नाहीत अशा वेळी एखाद्या शाम्पूचा काही उपयोग होत नाही आणि तुम्हाला दुसरा कुठला तरी ब्रँड शोधला पाहिजे. लक्षात ठेवा, हे शाम्पू तीन पेक्षा जास्त वेळा वापरू नका कारण त्यामध्ये खूप रसायने असतात. म्हणजेच, जरी एखाद्या ब्रॅण्डच्या शाम्पूचा उपयोग झाला नाही तर तुम्हाला काही वेळ वाट पहिली पाहिजे आणि नंतर दुसऱ्या ब्रॅण्डचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही ब्रँड बदलण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

मुलांच्या केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर लावायचे उवांचे औषध सुद्धा उपलब्ध असते.

बाळाच्या किंवा मुलाच्या डोक्यातील उवांवर घरगुती उपाय

जर तुम्हाला रसायनांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही बाळांच्या आणि मुलांच्या डोक्यातील उवांवर खाली दिलेले परिणामकारक उपचार करू शकता.

 • तुमच्या मुलाचे केस आणि डोके साध्या शाम्पूने स्वच्छ धुवून घ्या, नंतर खूप तेल किंवा कंडिशनर लावा ( जर तुमचे बाळ लहान असेल तर त्याचे केस कोमट पाण्याने धुवून घ्या आणि कंडिशनर लावा)
 • मोठ्या कंगव्याने तिच्या केसांमधील गुंता काढून घ्या आणि नंतर फणीने केस विंचरा. तुमच्या केसांचे छोटे छोटे खूप भाग करा आणि केसांचे हे सगळे भाग नीट विंचरून घ्या. डोक्याच्या त्वचेपासून सुरुवात करून केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत विंचरा. कंडिशनर लावलेल्या ओल्या केसांमधील उवा आणि अंडी विंचरताना फणीमध्ये येतील. केसांचा पुढचा भाग विंचरण्याआधी कंगवा/फणी स्वच्छ धुवून घ्या. नाहीतर, कापडाने स्वच्छ पुसून घ्या आणि केस विंचरण्यास पुन्हा सुरुवात करा.
 • तुम्ही केलेले केसांचे सगळे भाग विंचरून झाल्यावर डोके स्वच्छ धुवा आणि उरलेल्या उवा निघण्यासाठी पुन्हा हीच कृती करा.
 • उवांच्या कंगव्यामध्ये दोऱ्याचा तुकडा गुंफण्याचा प्रयत्न करा आणि तो कंगवा तुमच्या मुलाचे केस विचारण्यासाठी वापरा. त्यामुळे उवा नष्ट होण्यास मदत होईल. बाकी राहिलेल्या हाताने काढाव्या लागतील.
 • केस विंचरताना तुमच्या मुलाला वर्तमानपत्राच्या तुकड्यावर बसवा. त्यावर उवा पडल्यावर तो पेपर टॉयलेट मध्ये फ्लश करून टाका.
 • ही प्रक्रिया तीन दिवसांच्या गॅपने पुन्हा करा. असे केल्याने तुमच्या मुलाच्या केसातील सगळ्या उवा निघून जातील आणि तुमचे मूल १७ दिवसांमध्ये उवामुक्त होईल.

अशाप्रकारे घरी उवांपासून सुटका करता येते. तुम्ही इलेकट्रोनिक कंगवा सुद्धा वापरू शकता त्यामुळे उवा नष्ट होतात. इसेन्शिअल ऑइल आणि निम शाम्पू वापरल्याने सुद्धा तुमच्या मुलाच्या डोक्यातील उवा निघण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑइल, बेबी ऑइल आणि मेयोनीस ह्यांचा वापर अनेक मातांनी केला आहे.

तुमच्या मुलाचे पूर्ण केस काढून टाकणे हा सुद्धा हा एक पर्याय आहे. हा खूप टोकाचा पर्याय वाटू शकतो परंतु ही पद्धत परिणामकारक आहे, विशेषकरून उवांचा प्रादुर्भाव खूप जास्त झाला असेल तर.

मोठ्या मुलांच्या डोक्यातील उवांना कसा प्रतिबंध घालता येईल?

तुमच्या मुलांच्या डोक्यात उवा होऊ नयेत म्हणून इतर मुलांच्या सानिध्यात केस विंचरू नका असे मुलांना सांगू शकता. तसेच तुम्हाला नियमितपणे डोके आणि केस तपासून पहावे लागतील. त्यामुळे उवा जास्त प्रमाणात होणार नाहीत आणि तुम्ही वेळीच त्यास आळा घालू शकता. एक जरी उ दिसली तरी लगेच उपचारांना सुरुवात करा.

तुम्ही तुमच्या बाळाला पाळणाघर किंवा शाळेत पाठवू नये का?

हा काही त्यावर उपाय नाही कारण त्यासाठी मुलांच्या शिक्षणाशी तडजोड करण्याची गरज नाही. बाळाचे डोके नियमितपणे तपासून पहा आणि उवांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर उपचार करा. नवीन घातलेली अंडी डोक्यावर सहा दिवस राहतात आणि मोठ्या झाल्यावर एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात त्यांचा प्रादुर्भाव होतो. दुसरीकडे पसरण्याच्या आधी नवीन घातलेली अंडी तुम्ही उवांसाठीच्या कंगव्याने किंवा फणीने काढून टाकू शकता.

बऱ्याच शाळा आणि पाळणाघर त्यांच्या विद्यार्थ्यांची डोकी मध्ये मध्ये तपासून पहात असतात. जर तुमच्या मुलाच्या डोक्यात उवा असतील तर शाळा तुम्हाला तसे कळवते. तथापि, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या डोक्याची नियमित तपासणी करा.

निष्कर्ष

मुले जेव्हा शाळेत जाऊ लागतात तेव्हा त्यांच्या डोक्यात उवा होणे खूप कॉमन आहे. उवांपासून सुटका मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तुमच्या मुलाच्या डोक्याची नियमित तपासणी केल्यास तुम्हाला प्रश्न ओळखून तो वाढण्याआधीच त्यावर उपाय करता येईल.

आणखी वाचा:

बाळाच्या केसांच्या वाढीसाठी १० टिप्स
बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article