Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय? कोरोनाविषाणूच्या उद्रेकाच्या काळात ते का आवश्यक आहे?

सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय? कोरोनाविषाणूच्या उद्रेकाच्या काळात ते का आवश्यक आहे?

सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय? कोरोनाविषाणूच्या उद्रेकाच्या काळात ते का आवश्यक आहे?

नुकत्याच जगभर पसरलेल्या कोविड १९ च्या साथीने अनुषंगाने, सोशल मिडीया वापरत असताना तुम्ही कदाचित सोशल डिस्टंसिंगहा शब्द ऐकला असेल. मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करणे, बहुतेक कार्यालयांनी घरून काम करा असे घोषित करणे किंवा जगभरातील बरेच कार्यक्रम रद्द होणे ह्या सर्व गोष्टी म्हणजे सोशल डिस्टंसिंगचे प्रयत्न आहेत. तर मग सोशल डिस्टंसिंग काय आहे आणि सरकार व संघटनांकडून त्याचा आग्रह का धरला जात आहे? हे आपण पाहुयात

सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय?

सोशल डिस्टंसिंग म्हणजे विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी जगभरातील नागरिकांनी केलेला एक प्रयत्न आहे, सध्या हा विषाणू म्हणजे कोविड १९ कोरोनाव्हायरस हा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा लोक प्रत्यक्षात भेटतात किंवा संवाद साधतात तेव्हा ते जंतू किंवा सूक्ष्मजंतूंची देवाणघेवाण करतात, आणि नंतर भेटणाऱ्या लोकांकडे तो संसर्ग पसरतो. अशाप्रकारे एका कडून दुसऱ्याकडे ह्या विषाणूच्या संसर्गाची लागण होते. सोशल डिस्टंसिंग म्हणजे फक्त जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आणि बाहेर काही काम असेल तरच घराबाहेर पडणे होय. जेव्हा लोक घरी स्वतःचे विलगीकरण करतात तेव्हा ते संसर्ग होण्यापासून सुरक्षित राहतात. सोशल डिस्टंसिंगचा सराव करणारा एखादा माणूस स्वत: ला वाचवू शकतो, परंतु याचा सराव करणारा संपूर्ण समाज ह्या विषाणूचा संसर्ग एकत्रितपणे पूर्णपणे थांबवू शकतो. हे इतके का महत्वाचे आहे ते पाहुयात.

सोशल डिस्टंसिंगचे फायदे

स्रोत: Pinterest

सोशल डिस्टंसिंगचा फक्त तुम्हाला नव्हे तर पूर्ण समाजाला फायदा होतो. साथ येते तेव्हा त्याची गरज का भासते त्याची कारणे खालीलप्रमाणे

. लोकांना सुरक्षित ठेवते

सोशल डिस्टंसिंगचा पहिला आणि सर्वात स्पष्ट फायदा म्हणजे आपण सुरक्षित राहतो तसेच त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे संरक्षण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की काही विशिष्ट लोक विषाणूंमुळे बळी पडतात. कोविड १९ च्या बाबतीत, वृद्ध किंवा श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना तो होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणूनच, जरी तुम्हाला संसर्ग होण्याची जोखीम कमी असली तरी तुमच्या इतरांना विषाणूचा गंभीर संसर्ग होऊ शकतो सोशल डिस्टंसिंगचा सराव करून, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची देखील जबाबदारी घ्या.

. विषाणूच्या प्रसाराची गती कमी करून तो थांबवला जातो

नक्कीच, असे बरेच घटक आहेत जे विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखतात, परंतु तो थांबविण्याची गुरुकिल्ली म्हणजे संसर्गाची गती कमी करणे. जेव्हा लोक एकमेकांच्या सानिध्यात येत नाहीत, तेव्हा विषाणूचा प्रसार थांबतो. एकदा सर्व संक्रमित लोकांचे विलगीकरण झाले आणि ते बरे झाले, म्हणजे विषाणूचा प्रसार अधिकृतपणे थांबतो. हा मार्ग अशा प्रकारच्या साथीचा रोग संपविण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.

. आरोग्य सेवेवरील ओझे कमी करते

प्रत्येक देशाच्या आरोग्यसेवाची मर्यादा असते आणि एका वेळी विशिष्ट रुग्णसंख्या हाताळू शकते. हे विसरू नका की, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी दररोज रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. तुम्ही स्वत: ला आणि तुमच्या सभोवतालच्या इतरांना सुरक्षित ठेवून हेल्थकेअर इंडस्ट्रीवरील ओझे कमी करण्यासाठी मदत करता अशाप्रकारे, बाधित लोक बरे होऊ शकतात आणि तुम्ही विषाणूचा संसर्ग लवकर थांबवू शकता.

सोशल डिस्टंसिंगचे इतर फायदे

आधी सांगितलेले फायदे हे सोशल डिस्टंसिंगचे मूलभूत फायदे आहेत, परंतु येथे आणखी काही फायदे आहेत जे निश्चित बोनस आहेत.

. स्वतःसाठी जास्त वेळ (मीटाइम)

आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळेस्वतःसाठीचा किती वेळ आपण गमावत आहोत हे देखील आपल्या लक्षात येत नाही. जर तुमचा कामावर जाण्यायेण्याचा वेळ तुम्ही वाचवत असाल किंवा आधीसारखे वारंवार प्रवास न केल्याने वेळ वाचवित असाल, तर ज्याला सर्वात जास्त आवश्यक आहे अशा व्यक्तीस तुम्ही वेळ देत आहात आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः! म्हणून, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा ह्यामध्ये , छान उबदार पाण्यात पाय ठेवून बसणे , एखादं चांगले पुस्तक वाचणे, गरम कॉफी पिणे किंवा फक्त चांगली झोप काढणे इत्यादींचा समावेश होतो.

. अधिक बचत

दररोज वाहतुकीचा खर्च नाही, बाहेर खाणेपिणे नाही त्यामुळे आपण किती पैसे वाचवले हे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. नक्कीच, हे आपल्या जीवनशैलीवर देखील अवलंबून आहे, म्हणून जेव्हा आपण घरात अडकलेले आहोत तेव्हा बाहेरून ऑर्डर करणे मर्यादित करा

. कुटुंबातील सदस्यांशी बंध घट्ट होण्याची वेळ

सोशल डिस्टंसिंगमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत घरी घालविण्यासाठी अधिक वेळ मिळतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासह, मुलांबरोबर किंवा सासरच्या माणसांसोबत वेळ घालवू शकता आणि मागील काही महिन्यांत काय काय करायचे राहून गेले याविषयी बोलू शकता. घरात अडकून असताना कुटुंबासाठी काही मनोरंजक क्रियाकलाप करण्यास विसरू नका

. राहिलेल्या गोष्टी पूर्ण करा

आपल्या सगळ्यांनाच गेल्या अनेक महिन्यांपासून करायची इच्छा असलेल्या गोष्टींची मोठी यादी आहे, मग ते घरातील काही काम असेल, वाचायचे राहून गेलेले एखादे चांगले पुस्तक असेल किंवा शिकण्यासाठी नवीन छंद असेल. त्या यादीमधील काही गोष्टी खरोखर घडवून आणण्याची ही संधी चालून आलेली आहे

अनुसरण करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग नियम

नक्कीच, आपण आपण काळजी घेणार आहोत, परंतु सोशल डिस्टंसिंग याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःस जगापासून अगदीच अलिप्त ठेवले पाहिजे. तुम्ही पाळले पाहिजेत असे सोशल डिस्टंसिंगचे नियम खालील प्रमाणे

. शक्यतोवर प्लेडेट किंवा घरातील पार्ट्या टाळा

हे अगदी अध्याहृत आहे. प्लेडेट्स आणि घरातील पार्ट्या घरी होत असल्या तरी सहसा त्यामध्ये एखाद्याला प्रवास करावा लागू शकतो. म्हणूनच, प्रवास करताना आणि नंतर त्यांना आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विषाणूची लागण होऊ नये म्हणून प्लेडेट्स आणि घरगुती पार्टीची वारंवारता कमी करून पहा. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकणार नाही तेव्हा आपल्या मित्रांनी आणि कुटूंबाने प्रवास करताना खबरदारी घेतली असल्याचे सुनिश्चित करा आणि घरात प्रवेश होताच त्यांना स्वच्छ हात धुण्यास सांगा

. बाहेर चाला / धावा , परंतु गर्दी असलेली ठिकाणे टाळा

स्रोत: Pinterest

आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण फिरायला जाऊ शकता किंवा घराबाहेर पळायला जाऊ शकता परंतु गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपण इतरांपासून कमीतकमी ६ मीटर अंतर ठेवत आहात ना ह्याची खात्री करा आणि बाहेर कमी गर्दी असेल अशा वेळेला जा.

. निवडक व्हा

सोशल डिस्टंसिंगच्या वेळी आपले सर्कल लहान ठेवा, दहापेक्षा जास्त लोकांच्या कोणत्याही मेळाव्यात भाग घेणे टाळा आणि अर्थातच ते लोक कोण आहेत याबद्दल निवडक रहा. विवेकबुद्धीने निवड केल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित ठेवण्यास मदत होईल

. किराणा सामानाचा साठा

अर्थात, याचा अर्थ असा नाही की सर्वनाश होणार आहे इतका साठा करून ठेवावा, परंतु एका वेळी बराचसा किराणा सामान विकत घ्या, जेणेकरून तुमची खरेदीसाठी सारखे बाहेर जावे लागणार नाही. काही स्नॅक्स किंवा प्रीपॅकेज्ड फूड जसे की चिप्स, पॉपकॉर्न, बेबी फूड, अन्नधान्य इत्यादी आणून ठेवा

. इंटरनेटचा संपूर्ण वापर करा

तुम्ही काम करीत असाल किंवा आपल्या मित्रांशी बोलत असलात तरीही इंटरनेटमुळे तुम्ही आरामात घरात बसून ते करू शकता. आपण ऑनलाईन छंदवर्ग देखील जॉईन करू शकता, आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलू शकता किंवा त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलसुरु ठेऊन रात्रीचे जेवण घेऊ शकता तसेच बुक क्लब किंवा किट्टीपार्टी ऑनलाइन सुरू ठेवू शकता. आपण बरेच काही करू शकता, म्हणून त्याविषयी आणखी शोध घ्या.

हा साथीचा रोग सर्वत्र पसरलेला असूनही नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणून सोशल डिस्टंसिंग आता सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी, वर्क फ्रॉम होमची विचारणा करा, बाहेर जाणे मर्यादित ठेवा आणि जोपर्यंत बाहेर जाणे सुरक्षित नाही तोपर्यंत काही काळ आपल्या कुटुंबासमवेत आरामात रहा.

आणखी वाचा: कोरोना विषाणू आणि सामान्य फ्लू – डॉक्टरांच्या दृष्टीकोनातून तुम्हाला हे माहित असावे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article