Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ लहान बाळांना होणारा जंतांचा संसर्ग – कारणे, लक्षणे आणि उपचार

लहान बाळांना होणारा जंतांचा संसर्ग – कारणे, लक्षणे आणि उपचार

लहान बाळांना होणारा जंतांचा संसर्ग – कारणे, लक्षणे आणि उपचार

जंत हे एकप्रकारचे परजीवी असतात आणि ते आतड्यात राहतात . मुलाच्या आहारातून त्यांचे पोषण होते. एक प्रकारचा जंतांचा संसर्ग, ज्याला हेलमिंथ इन्फेक्शन देखील म्हणतात, मुलांमध्ये पोटदुखीचे एक कारण आहे. हे संक्रमण सामान्य असल्याने, जंतांच्या संसर्गाची विविध कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांची माहिती ठेवणे चांगले.

जंतांच्या संक्रमणांचे प्रकार

असे अनेक प्रकारचे जंत आहेत ज्यांची पैदास मानवी शरीरात होते. बाळांना संसर्गित करणारे जंतांचे सर्वात सामान्य प्रकार खालीलप्रमाणे

. टेपवर्म

टेपवर्म, ज्याला फ्लॅटवर्म्स देखील म्हणतात, ह्यांना आकडे (हुक) असतात ज्याद्वारे ते आतड्यांशी जोडले जातात आणि अर्धवट पचलेल्या आहारावर प्रजनन करतात. टेपवर्मची लांबी काही इंचांपासून ४० फुटांपर्यंत असू शकते! सामान्यतः दूषित अन्नाद्वारे ते मुलांच्या पोटात जातात.

. राउंडवर्म्स

राउंडवर्म संसर्गाचे कारण अस्कारिस लुंब्रोकॉइड्स हे जंत असतात. ते पोकळ असतात आणि त्यांची लांबी ३५ सेमीइतकी वाढू शकते. राउंडवर्म्स खारट पाणी, माती आणि गोड्या पाण्यात राहतात आणि ते सामान्यत: पाळीव प्राण्यांद्वारे मानवामध्ये जातात.

. पिनवर्म्स /थ्रेडवर्म्स

पिनवर्म्स, ह्यांना थ्रेडवॉम्स देखील म्हणतात. हे लहान, पातळ आणि पांढरे किडे आहेत जे गुदाशयात असतात. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा मादी अळी गुदद्वाराच्या भागात अंडी देते. यामुळे खाज सुटते, खाजवल्यामुळे अंडी मुलांच्या बोटावर येतात. ही अंडी कपडे, बेडशीट्स आणि टॉयलेटच्या आसनांवर टिकून राहतात आणि दूषित अन्न आणि पेयाद्वारे शरीरात जातात. पिनवर्म इन्फेक्शन होणे लहान मुले आणि बाळांमध्ये सर्वात सामान्य आहे.

. हुकवर्म

हुकवर्म सामान्यत: अस्वच्छतेमुळे उद्भवतात. हे लहान परजीवी जंत आहेत जे स्वतःस आतड्यांच्या भिंतींवर जोडतात. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे एखाद्या मुलाला हूकवर्म इन्फेक्शन होऊ शकते.

आपल्या मुलाला जंत झाले आहेत की नाही हे कसे ओळखावे?

मुले क्वचितच संसर्ग होण्याची लक्षणे दर्शवतात. संसर्ग देखील कमीतकमी असू शकतो आणि म्हणूनच, याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. आम्ही शिफारस करतो की यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास आपण आपल्या बाळाची तपासणी करुन घ्या:

  • घाण वास येणारे शौच
  • गुदद्वाराभोवती खाज सुटणे
  • पोटदुखी
  • थकवा
  • अतिसार
  • वजन कमी होणे
  • उलट्या होणे
  • भूक लागणे
  • झोपेचा अभाव
  • कावीळ
  • चिडचिड
  • पोटाचा त्रास
  • आतड्यांसंबंधी समस्या
  • अस्वस्थता आणि चिंता
  • गॅस आणि सूज येणे
  • बद्धकोष्ठता
  • काही गंभीरसमस्या म्हणजे लहान आतड्यामध्ये अडथळा निर्माण होणे, अपेन्डिसियल लुमेन, पित्त नलिका आणि स्वादुपिंडाच्या नलिकांमध्ये अडथळा; इंटेस्टीनल व्हॉल्व्हुलस; अंतर्मुखता; व्हिस्कसच्या छिद्रांमुळे पेरीटोनिटिस आणि यकृत, फुफ्फुसामध्ये फोड.

जंत संसर्गाची कारणे कोणती?

बाळांना आणि लहान मुलांना घराबाहेर रांगताना आणि खेळताना जंतांची लागण होण्याची शक्यता असते. बाळांमधील जंतांच्या विकासास मदत करणारी सर्वात सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्कात येणे
  • संक्रमित अन्न किंवा पाणी सेवन करणे
  • स्वच्छतेचा अभाव
  • कच्च्या किंवा शिजवलेल्या अन्नाचा वापर
  • हात नीट धुणे
  • संक्रमित व्यक्तीशी संपर्क

जंत संक्रमण निश्चित करण्यासाठी चाचण्या

डॉक्टर खालील चाचण्याद्वारे मुलांमध्ये जंत संसर्ग दर्शवू शकतात

. शौच तपासणी

जंत किंवा जंतांची अंडी आहेत का हे तपासण्यासाठी शौचाचा नमुना प्रयोगशाळेत पाठविला जातो.

. बोटांच्या नखांची तपासणी

किडे किंवा त्यांची नखात जंतांची अंडी अडकली आहेत का हे तपासण्यासाठी डॉक्टर नखांची तपासणी करतील.

. स्टिकी टेप चाचणी

ही चाचणी थ्रेड वर्म्स शोधण्यासाठी विशेषतः केली जाते. कृमीची अंडी गोळा करण्यासाठी टेपचा तुकडा बाळाच्या गुदद्वारापाशी ठेवला जातो.

. कॉटन बड स्वाब

बाळाच्या गुदद्वाराजवळ जंतांची अंडी आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी कॉटन बड वापरला जातो.

. अल्ट्रासाऊंड चाचणी

ही चाचणी केवळ गंभीर संसर्गाच्या बाबतीत केली जाते. येथे, डॉक्टर वर्म्सचे अचूक स्थान शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड वापरतात.

मुलांमध्ये जंत उपचार

अळी संक्रमण नष्ट करणे कठीण नाही. बालरोग तज्ञ सहसा अँटीपॅरासाईट औषधे लिहून देतात. संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून, डॉक्टर खालीलपैकी कोणतीही औषधे लिहून देऊ शकतात.

  • मेबेन्डाझोल: मुलांमधील विविध प्रकारच्या जंत संक्रमणांवर उपचार करण्यासाठी हे सर्वात सुरक्षित मानले जाते.
  • पायरेन्टल: मुलांसाठी डॉक्टरांनी लिहून दिलेले हे आणखी एक सुरक्षित औषध आहे.
  • अल्बेंडाझोले / सस्पेंशन: १३२४ महिन्यांच्या मुलांमध्ये हे औषध वापरले जाऊ शकते. वर्षाखालील मुलांमध्ये याचा वापर करू नये.

जंत संसर्गासाठी घरगुती उपचार

जर जंतांचा त्रास झाल्याचा संशय असेल तर आपण प्रथम वैद्यकीय मदत घ्यावी. त्यानंतर आपण पूरक उपचार म्हणून खाली घरगुती उपचार वापरू शकता. आहार देण्यापूर्वी सर्व साहित्य शुद्ध करा:

  • कच्ची पपई: यामध्ये एंजाइम, पपाइन आहे जे एंथेलमिंटिक म्हणून काम करते आणि आतड्यांमधील जंत नष्ट करते.
  • लसूण: हा एक नैसर्गिक कीडनाशक घटक आहे आणि परजीवी जंत नष्ट करण्यात अत्यंत प्रभावी आहे.
  • ओवा: ओवा थायमॉलने समृद्ध आहे ज्यामुळे आतड्यांमधील परजीवी वाढ रोखण्यास मदत होते. मुलाला देताना ते गुळात मिक्स करून दिले जाते
  • भोपळ्याच्या बिया: या बियाण्यांमध्ये कुकुरबीटासिन आहे ज्यामुळे अळी पंगू बनते आणि शरीरात त्यांची वाढ रोखली जाऊ शकते.
  • कार्ले: हे पोटातील जंतांशी लढायला मदत करते. पाणी आणि मध मिसळल्याने कडू चव कमी करते.
  • कडूलिंब: ह्यामध्ये परजीवीविरोधी गुणधर्म आहेत आणि ते आतड्यांमधील विविध जंत नष्ट करण्यास उपयुक्त आहे.
  • गाजर: गाजरात व्हिटॅमिन असते जे मुलाची प्रतिकारशक्ती वाढवते आणि आतड्यांसंबंधी परजीवींशी लढण्यास मदत करते. रिकाम्या पोटी गाजरचे सेवन केल्याने अळी साफ होण्यास मदत होते.
  • हळद: ही एक अंतर्गत अँटिसेप्टिक आहे आणि सर्व प्रकारचे जंत नष्ट करण्यासाठी ओळखली जाते.

  • नारळ: यात तीव्र परजीवीपरजीवी गुणधर्म आहेत, ते किड्यांच्या उपचारासाठी फायदेशीर ठरतात. तेलाच्या स्वरूपात त्याचे सेवन केले जाऊ शकते.
  • लवंगा: लवंगा आळ्या आणि त्यांची अंडी नष्ट करू शकतात आणि भविष्यात होणाऱ्या संसर्गास प्रतिबंधित देखील करतात.

बाळाच्या वाढीवर होणारे जंतांचे परिणाम

जंत असे परजीवी असतात जे त्यांच्या यजमानाच्या शरीरावर पोषण करतात. ते मुलांच्या आरोग्यास पुढील प्रकारे नुकसान करतात:

  • जंतांमुळे लोह आणि प्रथिने नष्ट होतात आणि बऱ्याचदा मुलांमध्ये अशक्तपणा होतो.
  • राउंडवर्म्स मुळे पोषणमूल्ये शरीरात नीट शोषली जात नाहीत.
  • जंत भूक लागणे, पौष्टिक आहार कमी होणे आणि अशक्तपणा इत्यादींसाठी कारणीभूत आहेत.
  • जंतांमुळे बाळे आणि लहान मुलांना अतिसार होतो.
  • लहान मुलांचे कुपोषण, आतड्यांमधून अन्नाचे शोषण कमी होणे, पोषणासाठी स्पर्धा आणि लहान आतड्यांसंबंधी परिस्थितीत बदल इत्यादी परिणाम दिसून येतात. ह्या सगळ्याचा शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो, परिणामी वयाच्या मानाने मुलाचे वजन कमी भरते किंवा वाढ खुंटते.

आपल्या बाळाला जंत संसर्गापासून कसे प्रतिबंधित करावे

मुलांना जंत होण्यापासून रोखण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे आवश्यक आहे. बाळे रांगायला आणि चालायला लागल्यावर जंत संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे, खालील उपायांचा सराव करणे महत्वाचे आहे:

  • आपल्या बाळाचे डायपर नियमितपणे बदला. प्रत्येक वेळी जेव्हा आपण डायपर बदलता तेव्हा आपले हात धुवा.
  • घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.
  • याची खात्री करा की आपल्या मुलाने खेळताना बंद शूज घातले आहेत. घरी परत आल्यावर त्याचे हात पाय धुतले आहेत ह्याची खात्री करा.
  • त्याला पाणलोट क्षेत्राजवळ खेळू देऊ नका.
  • बाळाची नखे वारंवार कापून टाका.
  • बाळाला फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी द्या.
  • अळीचा संसर्ग टाळण्यासाठी बाळांचे अन्न चांगले शिजवावे.
  • स्वयंपाक करण्यापूर्वी फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा.
  • गरम पाण्याने कपडे आणि बेडशीट धुवा.
  • आपल्या बाळाची पॉटीसीट स्वच्छ ठेवा.

जंतांचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. काही बालरोगतज्ज्ञ संसर्ग टाळण्यासाठी आणि मुलाची इष्टतम वाढ सुनिश्चित करण्यासाठी दर महिन्यांनी एक जंतनाशक औषध देण्याची शिफारस करतात.

आणखी वाचा: बाळांची कोरडी त्वचा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article