Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी संतती नियमन थांबवताना त्याचे गर्भधारणेवर होणारे परिणाम

संतती नियमन थांबवताना त्याचे गर्भधारणेवर होणारे परिणाम

संतती नियमन थांबवताना त्याचे गर्भधारणेवर होणारे परिणाम

अनेक वर्षांपासून संतती नियमाच्या अनेक पद्धतींचा विकास झाला आहे. बाळ होण्यासाठी आपण तयार नसताना, गर्भधारणा होऊ नये म्हणून संतती नियमन ही एक प्रतिबंधात्मक पद्धती आहे. संतती नियमनाच्या पद्धतींपैकी काही पद्धती म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, इम्प्लांट्स तसेच प्रोजेस्टिन वापरून (प्रोजेस्टेरॉन हा नैसर्गिक संप्रेरकाचे हे कृत्रिम स्वरूप आहे) काही प्रमाणात संप्रेरकांची पातळी बदलणे इत्यादी होय. ह्या बदललेल्या संप्रेरकांच्या पातळीमुळे अंडाशयातून स्त्रीबीज सोडले जात नाही तसेच गर्भाशयाचा श्लेष्मा घट्ट होतो त्यामुळे शुक्रजंतूला गर्भाशयात जाण्यास प्रतिबंध होतो. तसेच काँडोम्स आणि सर्व्हायकल कॅप हे फलनाच्या प्रक्रीयेत अडथळा निर्माण करतात.

संतती नियमन सोडून देणे

गर्भधारणा टाळण्याच्या व्यतिरिक्त इतरही कारणांसाठी स्त्रिया संतती नियमनाची साधने वापरतात आणि ह्यामध्ये विशेषकरून गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होतो.  मासिक पाळी नियमित होण्यासाठी तसेच खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर किंवा  मासिक पाळीशी निगडित काही लक्षणे जसे की पेटके येणे किंवा मुरुमांचा त्रास कमी व्हावा म्हणून  ह्या गोळ्या घेतल्या जातात. अशा परिस्थितीत, गर्भधारणेस प्रतिबंध होण्याचा दुष्परिणाम  शरीरावर होतो. खाली काही संतती नियमनाचे मार्ग आहेत आणि ते थांबवल्यास काय परिणाम होतात ते सुद्धा पाहुयात.

१. संतती नियमनासाठी इंजेकशन्स

ह्यास इंग्रजीमध्ये ‘Depo-Provera shot’ असे म्हणतात. ह्याचा परिणाम तीन महिन्यांसाठी राहतो त्यानंतर तुम्हाला पुन्हा हे इंजेक्शन घ्यावे लागते.

कसे थांबवावे:

जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर तीन महिन्यांनंतर पुढचे इंजेक्शन घेऊ नका.

थांबवल्यास काय होईल:

हे इंजेक्शन थांबवण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे अनियमित रक्तस्त्राव होय. हा रक्तस्त्राव इंजेक्शन थांबवल्यावर बराच काळ सुरु राहतो.

२. संतती नियमनासाठी  इम्प्लांट

ह्यास इंग्रजीत ‘nexplanon किंवा implanon’ असे म्हणतात. हा अगदी आगपेटीच्या काडीएवडा छोटासा इम्प्लांट असतो. जो तुमच्या हातात बसवला जातो आणि त्यामुळे शरीरात प्रोस्टाग्लान्डिनची निर्मिती होते. ह्यामुळे गर्भधारणेपासून ४ वर्षांपर्यंत संरक्षण मिळते.

कसे थांबवावे:

जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटून इम्प्लांट  काढून घेऊ शकता.

थांबवल्यास काय होईल:

जेव्हा इम्प्लांट काढून घेतला जातो तेव्हा तुमची मासिक पाळी लवकरच नियमित सुरु झाली पाहिजे. तुमचे डॉक्टर त्वचेची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला सांगतील कारण तुमच्या त्वचेला झालेली जखम भरून निघण्यास २ आठवडे लागतील.

३. शुक्रजंतूनाशक: (स्पर्मीसाईड)

संतती नियमनाची ही रासायनिक पद्धत आहे ह्याचे कार्य २ पद्धतीने चालते: गर्भाशयाच्या  मुखात अडथळा निर्माण करून शुक्रजंतूंचे स्त्रीबीजाकडे वहन होत नाही. तुम्हाला शुक्रजंतूनाशक सर्व्हायकल कॅप किंवा डायफ्रॅम  सोबत वापरले पाहिजे नाही तर त्याचा तितकासा उपयोग होत नाही. क्रीम,जेल, फोम किंवा योनीमार्गात ठेवता येईल अशा घन गोळीच्या स्वरूपात हे येते.

कसे थांबवावे:

स्पर्मीसाईड उत्पादने विकत आणणे आणि वापरणे बंद करा.

थांबवल्यावस काय होईल:

जेव्हा तुम्ही वापर थांबवाल तेव्हा कुठल्याही दुष्परिणामांशिवाय तुम्ही लगेच गरोदर राहू शकता.

४. नुवारींग (NuvaRing)

ही छोटी चकती योनीमार्गात घातली जाते त्यामुळे शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

कसे थांबवावे:

नुवारींग २१ दिवसांनंतर म्हणजेच एका संपूर्ण चक्रानंतर काढून टाकू शकता.

थांबवल्यास काय होईल:

नुवारींग मधील संप्रेरक पूर्णतः निघून जाण्यास थोडा वेळ लागेल आणि त्यामुळे अनियमियत मासिक पाळी येईल. ही रिंग काढून टाकल्यावर १३ ते २८ दिवसांमध्ये नियमित ओव्युलेशन होईल. काही स्त्रियांना ६ महिन्यांपर्यंत मासिक पाळी येत नाही.

५. गर्भ निरोधक गोळ्या

सर्वसामान्यपणे सर्वांना माहित असलेली ही संतती नियमन पद्धती आहे. बाजारात भरपूर प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. ह्या गोळ्यांचे काम ठीक व्हावे म्हणून त्या नियमित म्हणजेच दिवसाच्या विशिष्ट वेळेला घेतल्या पाहिजेत. ह्या गोळ्यांचे आरोग्याला अजूनही काही फायदे आहेत उदा: तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो तसेच मासिकपाळी दरम्यान तुमची पोटदुखी थांबते.

कसे थांबवावे:

शक्यतोवर  मासिकपाळी चक्र संपेपर्यंत गोळ्या थांबवण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला जातो तरीही गोळ्या घेणे केव्हाही थांबवू शकता.

थांबवल्यास काय होईल:

गोळ्यांकडून संप्रेरके न मिळण्याची शरीरास सवय होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. दोन मासिकपाळी चक्रादरम्यान हलके डाग पडतील किंवा रक्तस्त्राव होईल. तुम्हाला काही महिने अनियमित मासिक पाळीचा त्रास होईल परंतु लवकरच ती नियमित होईल.

६. स्त्रियांचे काँडोम्स

स्त्रियांसाठीचे काँडोम्स म्हणजे छोट्या मऊ प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात आणि शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्या योनीमार्गात घातल्या जातात. योनीमार्गातील भाग ह्यामुळे झाकला जातो त्यामुळे शुक्रजंतूंकडून स्त्रीबीजाचे फलन होत नाही.

कसे थांबवावे:

स्त्रियांसाठीचे काँडोम्स हे फक्त संभोगाच्या आधी योनीमार्गात घालायचे असतात. स्त्रियांसाठीच्या काँडोम्स प्रमाणेच, शारीरिक संबंधांच्या आधी हे योनीमार्गात घालणे थांबवावे.

थांबवल्यास काय होईल:

ह्यामुळे कुठलीही संप्रेरके कार्यरत होत नाहीत म्हणून त्यामुळे तुमच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. तुम्ही ह्याचा वापर करणे थांबवल्यावर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते.

७.सर्व्हायकल कॅप

स्पर्मीसाईड सोबत सर्व्हायकल कॅप वापरली जाते. सर्व्हायकल कॅप गर्भाशयाचे मुख बंद करते आणि फलनाची प्रक्रिया प्रतिबंधित करते.

कसे थांबवावे:

स्त्रियांसाठीच्या काँडोम्स प्रमाणे शारीरिक संबंधांच्या आधी संतती नियमनाच्या ह्या साधनाचा वापर थांबवणे जरुरीचे आहे.

थांबवल्यास काय होईल:

सर्व्हायकल कॅप कार्यरत राहण्यासाठी कुठल्याही संप्रेरकांची गरज नसते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. जर तुम्ही त्याचा वापर करणे थांबवलेत तर तुम्ही गर्भवती व्हाल.

८. बर्थ कंट्रोल पॅच

हे गर्भनिरोधक तुम्ही तुमच्या पोटावर, कुल्ल्यांवर, पाठीवर किंवा खांद्यावर लावू शकता त्यामुळे तुमच्या शरीरात संप्रेरके तयार होतात. प्रत्येक आठवड्याला नवीन पॅच असे तीन आठवडे केले जाते आणि मध्ये एक आठवड्याची विश्रांती घेतली जाते.

कसे थांबवाल:

तुम्हाला गर्भधारणा व्हावी असे वाटत असेल हा पॅच वापरणे बंद करा.

थांबवल्यास काय होईल:

ह्या पॅचचा वापर करणे सोडल्यास स्त्रीची मासिक पाळी नियमित होण्यास एक किंवा दोन महिने लागू शकतात.

जर तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची संततिनियमनाची शस्त्रक्रिया झाली असेल तर काय?

स्त्रियांमधील संततिनियमनाच्या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये ‘Tubal litigation or Tubal Sterilization’ असे म्हणतात. गर्भधारणा टाळण्यासाठी हा कायमचा उपाय आहे. ज्या स्त्रियांना कधीच मुले नको आहेत अशा स्त्रियांनी ह्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. हे दोन मार्गानी केले जाते, पहिला म्हणजे ह्यामध्ये बीजवाहिन्या कापून त्या बांधल्या जातात आणि दुसरी पद्धत म्हणजे बीजवाहिन्या ब्लॉक केल्या जातात. जर स्त्रीबीज बीजवाहिन्यांमधून पुढे जात नसेल तर त्यांचे शक्रजंतूंकडून फलन होत नाही. स्त्रियांमध्ये ह्या प्रक्रियेस वॅसेक्टोमी  असे म्हणतात. तर पुरुषांमध्ये ह्या प्रक्रियेत पुरुषाच्या शरीरातून ज्या वाहिनीमधून शुक्रजंतू बाहेर टाकले जातात ती बंद केली जाते.

ही प्रक्रिया एकदा केल्यावर पुन्हा पूर्ववत करण्याची प्रक्रिया खूप महागडी असते आणि त्यासाठी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. जर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून खूप काळ झाला असेल आणि पुन्हा गर्भधारणेसाठी परिस्थिती पूर्ववत करायची असेल तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता कमी असते. जरी पूर्ववत होण्याची प्रक्रिया यशस्वी झाली तरी  गर्भधारणा होईलच ह्याची कायमच खात्री नसते.

ट्युबल लिटिगेशन मध्ये उलट शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा यशस्वी होण्याचे प्रमाण ३१% – ८८% इतके आहे. हे प्रमाण वेगवेगळ्या केसेस वर अवलंबून असते आणि ती प्रक्रिया कशी केली आहे ह्यावर सुद्धा ते अवलंबून असते. ज्या स्त्रियांची ट्युबल लिटिगेशनची शस्त्रक्रिया झाली आहे आणि नंतर पुन्हा उलट शस्त्रक्रिया झालेली असते तेव्हा त्या स्त्रियांमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सीचा खूप धोका असतो. ह्या स्थितीत गर्भाशयाच्या बाहेर स्त्रीबीजाचे फलन होते आणि ते खूप धोकादायक असते. वॅसेक्टोमीची उलट शत्रक्रिया झालेले ३०%-७५% पुरुष स्त्रीला गर्भवती करण्यात यशस्वी होतात.

जर ही उलट शस्त्रक्रिया अयशस्वी झाली तर स्त्री आणि पुरुष दोघांसाठी “In Vitro Fertilization” ही उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि शुक्रजंतू ह्यांचा संयोग घडवून आणला जातो आणि नंतर गर्भाशयाच्या मुखातून ते गर्भाशयात सोडले जाते.

गर्भधारणा होण्यासाठी संतती नियमनाची साधने वापरणे बंद करण्याआधी लक्षात घ्यावात अशा काही गोष्टी

जर तुम्ही गर्भधारणेसाठी संतती नियमनाची साधने वापरणे थांबवण्याचा विचार करत असाल तर लक्षात असुद्या की संतती नियमनाची जी पद्धत तुम्ही वापरत होतात त्यानुसार  ते वापरणे थांबवल्यावर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसतील. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा हवी असते तेव्हा  गर्भधारणेत अडथळा निर्माण करणाऱ्या पद्धती वापरणे बंद करणे सोपे असते. संप्रेरकांच्या पातळीत बदल घडवणारी संतती नियमनाची साधने मात्र शरीरात काही बदल घडवून आणतात. संतती नियमन थांबवण्याआधी खाली काही गोष्टी दिल्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत.

१. लगेच गर्भधारणा होऊ शकते

बऱ्याच लोकांना असे वाटते की संतती नियमन थांबवल्यावर लगेच गर्भधारणेची शक्यता कमी असते. हे काही लोकांच्या बाबतीत बरोबर आहे मात्र सर्वांसाठी नाही. काही स्त्रियांसाठी संतती नियमनाची  साधने वापरणे बंद केल्यावर एक आठवड्यात गर्भधारणा होऊ शकते. जर तुम्हाला गर्भधारणा नको असेल आणि जर तुम्ही  त्या भाग्यवंतांपैकी एक असाल ज्यांना गर्भधारणा लगेच होत नाही तर ताण घेण्याचे काहीच कारण नाही. संतती नियमनाची साधने वापरणे बंद केल्यावर शरीराचे नैसर्गिक चक्र सुरळीत होण्यास साधारणपणे २ महिने इतका कालावधी लागतो.

२. संक्रमणादरम्यान अस्थिर मासिक पाळी

आधी नमूद केल्याप्रमाणे, तुमची मासिक पाळी नियमित होण्यासाठी दोन महिने लागू शकतात. संक्रमणाच्या कालावधीत तुम्हाला हलके डाग, खूप जास्त रक्तस्त्राव, खूप कमी किंवा अजिबात रक्तस्त्राव न होणे इत्यादी लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. हे सगळं लवकरच सुरळीत होणार आहे कारण तुमच्या शरीराला बाहेरून संप्रेरके न मिळण्याची लवकरच सवय होईल.

३. मासिक पाळी दरम्यानच्या वेदना पुन्हा सुरु होतात

पेटके येणे, मुरमे आणि मनस्थितीतील बदल ह्या सगळ्या वेदनादायी परिस्थितीला मासिक पाळी दरम्यान स्त्रीला सामोरे जावे लागते. जर तुम्ही ही सगळी लक्षणे नियंत्रित राहावीत म्हणून संततीनियमाच्या साधनांचा वापर करीत असाल तर वापर करणे बंद केल्यावर पुन्हा हे सगळे सुरु होईल. तथापि, जर तुम्हाला अशी तीव्र लक्षणे कधीच जाणवली नसतील आणि तुम्ही अन्य काही कारणांसाठी संतती नियमनाच्या साधनांचा वापर करीत असाल तर तुम्हाला ह्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही. दुसरीकडे, जर दीर्घकाळ संतती नियमनाच्या साधनांचा वापर केला असेल तर काही स्त्रियांच्या  मासिक पाळी चक्रामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या १८व्या वर्षी संततिनियमनाची साधने वापरणे सुरु केले असेल आणि आता तुमचे वय ३० असेल तर तुमचे मासिक पाळी चक्र वेगळे असेल कारण मासिक पाळी चक्र स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यात बदलत असते.

४. संतती नियमनाची साधने वापरल्यावर मासिक पाळी नियमित होण्यास जास्त वाट पाहावी लागते

तुमच्यापैकी ज्यांनी इंजेक्शने घेतली असतील आणि जरी ह्या इंजेक्शन्सचा परिणाम शरीरावर ३ महिनेच राहील अशा पद्धतीने ती तयार केली गेली असतील, तरी सुद्धा मासिक पाळी पूर्ववत होण्यासाठी साधारणपणे ६ महिने वाट बघावी लागेल. संतती नियमन थांबवल्यास लगेच गर्भधारणा होणे तुम्हाला अपेक्षित असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय योग्य नाही.

काही संतती नियमनाची साधने वापरणे बंद केल्यास शरीराचे नैसर्गिक चक्र आधीप्रमाणे पूर्ववत होते, तर दुसरीकडे काही साधने वापरणे बंद केल्यानंतर तुमचे मासिक पाळी चक्र नियमित होण्यास शरीराला खूप समायोजन (adjustment) करावे लागते. लक्षात असूद्या की तुम्ही वर नमूद केलेल्यापैकी संप्रेरकांची साधने वापरत असाल तर तुम्ही जेव्हा ती साधने वापरणे बंद करता तेव्हा तुमचे मासिक पाळी चक्र संपूर्णतः बदललेले असते. खरं तर हा बदल संतती नियमनाच्या साधनांपेक्षा वय आणि जीवनशैली मुळे झालेला असतो. त्यामुळे जर तुम्ही मासिक पाळी स्थिर होण्यासाठी किंवा मासिक पाळीची लक्षणे कमी व्हावीत म्हणून संतती नियमन वापरत असाल तर गर्भधारणेसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत आहात ना ह्याची खात्री करा. हे महत्वाचे आहे कारण संप्रेरके वापरून केलेल्या संतती नियमांमुळे मासिकपाळी चकरादरम्यानची लक्षणे स्त्रीला जाणवत नाहीत, त्यामुळे जेव्हा संतती नियमनाची साधने वापरणे बंद होते तेव्हा स्त्रीला ओव्यूलेशनची लक्षणे कळत नाहीत.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article