Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या २ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या २ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या २ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या बाळाच्या वाढीच्या दुसऱ्या महिन्यात पालक म्हणून तुमचे सगळे कष्ट आणि प्रयत्न दिसून येतील. तुमच्या बाळाला आता कसे वाटते आहे ते आता ते सांगू शकणार नाही परंतु ह्या महिन्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या कष्टाचे बक्षीस मिळणार आहे. ह्या महिन्यात तुम्ही बाळाचे हसणे आणि वेगवेगळे आवाज काढणे अपेक्षित धरू शकता. मातृत्वाचा आनंद तुम्ही घेत असताना तुमचा बाळाशी असलेला भावनिक बंध आणखी दृढ होईल.

बाळाची वाढ

तुमच्या दोन महिन्यांच्या बाळाचा विकासाचा महत्वाचा घटक म्हणजे ह्या काळात होणारी बाळाची शारीरिक आणि वजनात झालेली वाढ होय. दुसऱ्या महिन्यात प्रत्येक आठवड्यात बाळाचे वजन हे १५०२०० ग्रॅम्सने वाढेल. तथापि, एखाद्या आठवड्यात वजन जास्त वाढले आणि एखाद्या आठवड्यात वजनात वाढ झाली नाही तरी काळजीचे काही कारण नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे की वजनात होणारी वाढ म्हणजे विकासाचा निर्देशक आहे, वजनातील वाढीव्यतिरिक्त इतरही घटक लक्षात घेतले पाहिजेत, जसे की बाळाची लांबी, डोक्याचा परीघ, बाळाचे आरोग्य, वाढलेली भूक आणि झोपेचे वेळापत्रक इत्यादी. बाळाचे वजन प्रत्येक आठवड्यांनंतर मोजण्याऐवजी काही आठवडयांनी मोजलेले चांगले.

बाळाचा विकास

२ महिन्यांच्या बाळाची वाढ चार आठवड्यांमध्ये विभाजित केल्यास समजायला सोपी जाते. कसे ते पाहुयात:

  • ८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या कालावधीत तुमच्या बाळाला आता जर नुसत्या गडद रंगांऐवजी डिझाइन्स मध्ये रस निर्माण होईल. बाळाला मऊ खेळणी, मऊ चेंडू आणि जनावराच्या आकाराच्या उशा इत्यादी खेळण्यांना बाळाला स्पर्श करू द्या आणि ती खेळायला द्या.

बाळ तुमचा आवाज बरोबर ओळखू लागेल आणि आवाज कुठल्या दिशेने येतो आहे हे सुद्धा बाळाला समजायला लागेल. जरी बाळाने प्रतिसाद दिला नाही तरी तुमच्या बाळाशी बोलत रहा. बाळ तुमचे हावभाव आणि हालचालींचे निरीक्षण करत राहील.

  • ९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर, बाळ दिसेल ती वस्तू तोंडात घालू लागेल आणि ह्याची सुरुवात हाताची आणि पायांची बोटे तोंडात घालण्यापासून होईल. बाळाची लाळ सुद्धा आता गळू लागेल कारण ह्या काळात जास्त लाळेची निर्मिती होईल. दात येण्याला अजून अवकाश आहे, म्हणून हे लाळ गळणे हे मुख्यत्वेकरून तोंडात वस्तू घालण्याच्या उत्सुकतेपोटी होते. बाळाच्या लाळेमध्ये रोगप्रतिबंधक प्रथिनांचा समावेश असतो आणि ह्या लाळेचा थर खेळणी आणि इतर गोष्टींवर बसतो.

९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे बाळ दोन तासात उठेल अशी अपेक्षा करू नका कारण बाळ बराच वेळ झोपेल. ह्या काळात बाळ २ किंवा ४ वेळा झोपते आणि १० तास जागे रहाते.

ह्या आठवड्यात, बाळ कुशीवरून पाठीवर आणि पाठीवरून कुशीवर वळण्याचा प्रयत्न करते. बाळाच्या मानेचे आणि हाताचे स्नायू अजून पूर्णतः विकसित झालेले नसल्याने बाळ पूर्ण पालथे पडणार नाही, त्याला अजून १ महिन्यांचा कालावधी आहे. आता बाळ थोडी हालचालू करू लागत असल्यामुळे बाळाला एकटे पलंगावर सोडू नका.

  • १० आठवड्यांच्या बाळाचा विकास

१० व्या आठवड्यात तुमचे बाळ अगदी सहज हालचाली करू शकणार नाही, परंतु अस्ताव्यस्त आणि असंघटित हालचालींचा टप्पा बाळाने केव्हाच पार केला आहे. बाळाला हात पाय ताणण्यासाठी भरपूर जागा ठेवा. बाळाला हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी जमिनीवर चटई किंवा ब्लॅंकेट घालून त्यावर झोपवा. बाळाची शक्ती वाढत आणि ह्या हालचालींमुळे बाळाचे स्नायू आणखी विकसित होतील. ह्याच कालावधीत बाळ पोटावर झोपते आणि पायावर जोर देऊन पुढे सरकू लागेल.

बाळाशी कुणी बोलत असताना किंवा बाळाला घेत असताना बाळाच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य बघा. ह्या कालावधीत तुमच्या बाळाची आकलनक्षमता खूप जास्त असल्यामुळे बाळाला वेगवेगळ्या लोकांशी ओळख करून द्या विशेषकरून अशी माणसं जी सतत बाळासोबत असणार आहेत.

  • ११ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या कालावधीत बाळ निरनिराळ्या गोष्टींचा शोध घेऊ लागते. बाळ स्वतःच्या हाताकडे निरखून बघू लागते. बाळ हात तोंडात घालते आणि जोपर्यंत दुसरे काही मिळत नाही तोपर्यंत हात चोखत बसते.

११ व्या आठवड्यात तुमच्या लक्षात येईल की आधीपेक्षा थोडा जास्त वेळ बाळ मान धरू लागेल. तसेच बाळाला बसवल्यावर मान ताठ ठेऊन बाळाचे डोके जास्त वेळ स्थिर राहू शकेल.

बाळाचे आरोग्य

जर बाळ २ महिन्यांचे झाले असेल आणि बाळाच्या लसीकरणाची सुरुवात होणार असेल तर कॅलेंडरवर नीट लिहून ठेवा किंवा मोबाईलवर रिमाइंडर लावून ठेवा, असे केल्यास लसीकरणाची तारीख चुकणार नाही. तुमच्या बाळाचे पहिले लसीकरण महत्वाचे असते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. शासनाकडून आणि महानगरपालिकेलाडून लसीकरणाची मोहीम राबवली जाते त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तसेच, तुमच्या बाळाचे बालरोगतज्ञ सुद्धा ते बाळाला देऊ शकतात त्यामुळे त्यांना विचारून पहा. बाळाच्या आरोग्याच्या नोंदी ठेवण्यासाठी एक वेगळी वही ठेवणे सर्वात उत्तम. ह्या वहीमध्ये लसीकरणाच्या तारखा आणि भविष्यातील नोंदी तुम्ही ठेऊ शकता. तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या कॅलेंडरचा उपयोग करा आणि अलर्ट लावून ठेवा. मधून मधून तुमच्या २ महिन्यांच्या बाळाचे वजन तपासून पाहणे अतिशय महत्वाचे आहे आणि त्यामध्ये जर काही बदल आढळले तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

विकासाचे टप्पे २ महिने

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर जागवलेल्या रात्री ह्याचे लवकरच तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे कारण तुमचे बाळ लवकरच खालील विकासाचे टप्पे पार करणार आहे.

  • ह्या कालावधीदरम्यान तुमचे बाळ हसू लागेल. हे बाळाचे खरे हास्य असून त्याचा आनंद घेण्याची ही वेळ आहे.
  • आधी खेळणी आणि तुमचा हात अनिच्छेने धरणारे तुमचे बाळ आता ह्या क्रिया हेतुपूर्वक करू लागतील. हळूहळू बाळांना खुळखुळा आणि मऊ सुरक्षित खेळणी द्या.
  • बाळांना त्यांच्या हातांचा आणि पायाचा शोधलागेल आणि त्यामुळे बराच काळ बाळ त्यामध्ये मग्न राहील. बाळ स्वतःचे पाय पकडेल आणि स्वतःच्या बोटे न्याहाळत बसेल आणि बाळाचा बराच वेळ त्यात जाईल.
    विकासाचे टप्पे - २ महिने
  • २ ऱ्या महिन्यात बाळाची दृष्टी विकसित होईल आणि बाळाची नजर तुमचा मागोवा घेईल, तुमचा चेहरा ओळखेल तसेच तुमच्या हालचाली बाळाला समजतील. तुमची बोटे किंवा एखादे रंगीबेरंगी खेळणे जरा उंचावर धारा आणि दोन्ही डोळ्यांची एकाच दिशेने हालचाल होते आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवा.

वर्तणूक

बाळ २ महिन्यांचे झाल्यावर रडण्याचे आधीचे सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकेल. बऱ्याच पालकांना, बाळाच्या ह्या खूप जास्त रडण्याची काळजी वाटेल, परंतु काळजी करण्याचे काही कारण नाही. बाळाची सर्व काळजी घेऊनसुद्धा बाळ रडत असेल तर त्यामागे बरीच करणे असू शकतात किंवा त्यामागे काहीच कारण नसते. कदाचित बाळ खूप थकले असेल किंवा कुणीतरी जवळ घ्यावे एव्हढीच बाळाची अपेक्षा असेल. ह्या कालावधीत बाळाची गरज काय असेल हे समजण्यासाठी ‘Mother’s instinct’ सर्वात उत्तम. एक आई म्हणून आपल्या बाळासाठी काय चांगले आहे हे तुम्हाला माहित असते. जसे की बाळाला शांत करण्यासाठी त्यास फक्त मिठीत घेतल्याने ते शांत होते किंवा बाबागाडीत बसवून बाहेर फिरवून आणले तरी बाळाला बरे वाटते. तुमच्या बाळाला वारंवार तुमच्या आधाराचा स्पर्श किंवा ओळखीचा वास हवा असतो, तो मिळाल्यास बाळ शांत होते.

२ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

तुमचे बाळ जेव्हा २ महिन्यांचे होते तेव्हा खालील क्रियाकलाप करून पहा

  1. गाणी म्हणा: साध्या आणि सोप्या क्रियांमधून तुमच्या बाळाचे ऐकण्याचे कौशल्य विकसित होते आणि बाळाला भाषा समजू लागते. साध्या आवाज कमी जास्त करून बघा आणि बाळ त्यास प्रतिसाद देते आहे किंवा नाही ते तपासून पहा.
  1. नृत्य: भावनिक बंध निर्माण होण्यासाठी आणि ऐकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी हळू आवाजात गाणी लावा, तुमच्या बाळाला छातीशी धरा आणि नृत्य करा. आवाज खूप मोठा नाही आणि गाणी अगदी मधुर असतील ह्याची काळजी घ्या.
  1. खेळणी: बाळाच्या दृष्टीक्षेपात येईल असे एखादे रंगीबेरंगी आणि मऊ खेळणे न्या. बाळाचे लक्ष वेधण्यासाठी ते हलवत रहा. आणि हळू हळू ते एकीकडून दुसरीकडे न्या. असे केल्याने बाळाचा दृष्टीविकास होतो आणि बाळ मागोवा घेण्यास शिकते.
  1. मालिश: असे केल्याने बाळाला आरामदायक वाटते आणि त्यामुळे बाळाला आईचा स्पर्श सुद्धा होतो. बाळाची छोटी पाऊले, हात, बेंबी ह्यांना हळू हळू मालिश करा. बाळाचे पाय हळूहळू वर घ्या आणि वर्तुळाकार हलवत रहा.
  1. वाचन: तुम्ही वाचत असलेल्या गोष्टीतला एकही शब्द बाळाला समजला नाही तरी सुद्धा तुम्ही बाळासाठी वाचत रहा. ह्या टप्प्यावर बाळाला चित्रे दाखवणे किंवा बाळाला वेगवेगळ्या रंगांची ओळख करून देणे हे अतिशय महत्वाचे आहे. वाचताना प्रत्येक शब्दावर आणि चित्रावर बोट ठेवल्यास बाळाचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळाचे आकलनकौशल्य विकसित होण्यास मदत होते.

२ महिन्यांच्या बाळाची काळजी

ह्या काळात खाली दिलेल्या टिप्स पाळणे महत्वाचे आहे.

  • छोट्या वस्तू आणि खेळणी बाळापासून दूर ठेवा कारण बाळ त्या वस्तू तोंडात घालण्याची शक्यता असते.
  • बाळाच्या हालचाली आता वाढणार असल्याने टोकदार कडा किंवा कॉर्नर बाळाच्या आसपास नाही ना ह्याची खात्री करा.
  • प्राणी दूर ठेवणे हे महत्वाचे आहे कारण बाळाची प्रतिकार यंत्रणा संपूर्णपणे विकसित झालेली नसते आणि त्यामुळे बाळाला ऍलर्जी होण्याची शक्यता असते.
  • आवाज, स्पर्श आणि प्रकाश ह्या घटकांना बाळ कसा प्रतिसाद देते हे पहा आणि जर काही वेगळे जाणवले तर आवश्यक ती काळजी घ्या.

बाळाला दूध देणे

जेव्हा तुमच्या बाळाचे दुसऱ्या महिन्यात पदार्पण होते तेव्हा बाळाचे जग अगदी वेगळे असते. ह्या काळात भूक आणि तहान वाढते. दिवसभरात खूप वेळा बाळाला पाजावे लागते. तुम्ही बाळ हे स्वतःच किती पाजावे ह्याचे मार्गदर्शक असते. जर तुम्ही बाळाला एकाच स्तनावर स्तनपान देत असाल तर आता बाळाला दोन्ही स्तनांवर स्तनपान देण्यास सुरुवात केली पाहिजे. जर तुम्ही आतापर्यंत जागून रात्री काढल्या असतील तर आता तुम्हाला झोपण्यासाठी हा काळ चांगला आहे. जरी बाळाला पाजण्यासाठी उठावे लागले तरी सुद्धा बाळ आता सलग ५६ तास झोपू लागेल. आणि बाळ एवढा वेळ झोपल्यामुळे तुम्हाला झोपायला सुद्धा आता बराच वेळ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा बाळ झोपले की झोपून घ्या.

झोप

ह्या महिन्यात तुमच्या लक्षात येईल की बाळाच्या झोपेच्या वेळा ठरतील. बाळ त्याच्या नियमित झोपेच्या वेळेपेक्षा १३ तास अधिक झोपू लागेल. बाळाला झोपवण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे दूध पाजल्यानंतर ३०६० मिनिटे ही होय. ह्या वेळात बाळ थकलेले असल्याची लक्षणे दिसतील आणि तेव्हाच बाळाला पाळण्यात घालून झोपवले पाहिजे. बाळ १०१८ तास झोपते, परंतु ते बदलू शकते. ह्या वयात एव्हढी झोप नॉर्मल असते.

बाळाची झोप

पालकांसाठी टिप्स

  • पहिल्या काही महिन्यांमध्ये आई आणि बाळामध्ये संवादासाठी स्पर्श हे सर्वात उत्तम माध्यम आहे. तंज्ञांच्या मते बाळाला मालिश करणे, तसेच बाळाला जवळ घेऊन हळूहळू झुलवणे चांगले
  • बाळ रडते तेव्हा बाळाला शांत करण्यासाठी गाणी म्हणणे, हळू आवाजात गाणी लावणे किंवा पाऊसाचा आवाज ऐकणे अथवा व्हॅक्युम क्लिनर लावणे ह्यासारखे अन्य काही मार्ग आहेत. तुम्ही बाळाला चोखणी(pacifier) सुद्धा देऊ शकता.
  • हा अनुभव बाळ आणि बाळाचे आई बाबा दोघांसाठी नवीन आहे. त्यामुळे मदत लागल्यास ती मागण्यास अजिबात संकोच करू नका. सल्ला घेण्यासाठी तुम्ही बाळाच्या बालरोगतज्ञांची मदत घेऊ शकता आणि इतर माहितीसाठी तुम्ही पालकांची आणि मित्रमैत्रिणींची मदत घेऊ शकता.
  • इंटरनेट हा माहितीचा एक उत्तम स्रोत आहे, परंतु तुम्ही तो विशेष काळजीपूर्वक वापरला पाहिजे. ज्या संकेतस्थळांवरची माहिती विश्वसनीय असते तसेच तंज्ञांकडून ती वेळोवेळी पडताळून पहिली जाते अशी संकेतस्थळे निवडा.
  • हल्ली बाळाला घेऊन लोक बराच प्रवास करतात त्यामुळे बराच वेळ बाळ बेबी कॅरिअर आणि कार सीट मध्ये असते. जर तुम्ही पण खूप प्रवास करत असाल तर तुमच्या बाळाला स्नायूंच्या विकासासाठी पुरेशी जागा मिळत आहे ना ह्याची खात्री करा. रंगण्यासाठी, पालथे पडण्यासाठी आणि चालण्यासाठी ह्या स्नायूंचा विकास होणे महत्वाचे असते. बाळाला जवळ घ्या, मिठी मारा त्यामुळे बाळाला आपण फक्त कार सीट मध्येच असतो असे वाटणार नाही.

लक्षात ठेवा की तुमचे बाळ एकमेकाद्वितीय आहे आणि तुमच्या बाळाचा विकास तुमच्या शेजारच्यांच्या किंवा मैत्रिणीच्या बाळासारखाच होईल असे नाही. आपल्या बाळाची तुलना दुसऱ्या कुठल्याही बाळाशी करू नका. बाळाची वाढ आणि विकासात खूप जास्त उशीर तुम्हाला आढळत नसेल तर सगळे नीट होणार आहे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article