In this Article
प्रत्येक स्त्री आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असते आणि गर्भारपण ही त्या अभूतपूर्व साहसाची सुरुवात आहे. ह्या काळात स्त्रीला सावध रहावे लागते आणि आहाराच्या बाबतीत दक्ष रहावे लागते. पाचव्या महिन्यात तुम्हाला कमीत कमी दररोज ३४७ जास्त कॅलरी घेतल्या पाहिजेत आणि १ किंवा २ पौंड्स वजन वाढले पाहिजे. ह्या कॅलरीज प्रथिने आणि कॅल्शिअम च्या स्रोतांपासून मिळाल्या पाहिजेत. त्या कॅलरीज चरबीयुक्त पदार्थ, साखर आणि कर्बोदके ह्यांपासून मिळणार नाहीत ह्यासाठी पूर्ण प्रयत्न करा.
गर्भारपणाच्या ५ व्या महिन्यात काय खावे?
आम्ही इथे काही पदार्थांची यादी दिली आहे ज्यांचा समावेश तुम्ही गर्भारपणाच्या ५व्या महिन्याच्या आहार तक्त्यामध्ये केला पाहिजे.
१. प्रथिनांनी समृद्ध अन्नपदार्थ
प्रथिनांनी समृद्ध अन्नपदार्थ बाळाच्या शारीरिक विकासाची खात्री देतात, कारण प्रथिनांमध्ये असलेले अमिनो ऍसिड्स हे शरीराच्या प्रथिनांसाठी बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. डाळी, सीरिअल्स, छोले, कॉटन चीझ आणि टोफू हे काही अन्नपदार्थ आहेत जे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत आणि ते ५व्या महिन्याच्या गर्भारपणचे उत्तम अन्न आहेत.
२. संपूर्ण धान्य
संपूर्ण धान्य मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ह्यांनी समृद्ध असतात. संपूर्ण धान्यामध्ये, धान्याच्या दाण्याचे ३ भाग असतात, म्हणजेच एन्डोस्पर्म, ब्रॅन आणि जर्म. नाश्त्याचे सीरिअल्स, कणकेचे पीठ, ब्रेड आणि इतर अनेक गोष्टी ह्या संपूर्ण धान्यापासून बनलेले असतात,
३. कॅल्शिअम समृद्ध
आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कॅल्शिअम हे हाडे आणि दातांसाठी आणि ते तुमच्या वाढणाऱ्या बाळासाठी लागणार आहे ह्यात काही नवीन नाही. बाळाची हाडे मजबूत व्हावीत म्हणून भरपूर प्रमाणात कॅल्शिअम घेत आहात ना ह्याची खात्री करा. किवी, मलबेरी, सुके अंजीर, खजूर हे कॅल्शिअम ने समृद्ध आहेत.
४. तंतुमय पदार्थांचे जास्त प्रमाण
गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता हा सर्वज्ञात प्रश्न आहे. तंतुमय पदार्थानी समृद्ध आहार हा ते टाळण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. फळे आणि भाज्या, ओट्स, गहू, सुकामेवा हे सगळे पदार्थ तंतुमय पदार्थानी समृद्ध आहेत.
५. भरपूर प्रमाणात सॅलड खा
जर तुमची सलाड खात नसाल तर तुम्ही सलाड खाण्याची सवय ठेवा. तुम्ही सलाडची क्रिएटिव्हिटी सुद्धा करू शकता आणि सलाड म्हणजे तुमच्या शरीराला लागणारी योग्य पोषणमूल्ये, खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ ह्यांचा उत्तम स्रोत आहे. ड्रेसिंग केलेले सलाड, किंवा चमचमीत भाज्या असलेले सलाड खाण्याचे टाळा, कारण त्यामध्ये सोडियम जास्त प्रमाणात असते.
६. भरपूर फळे खा
सफरचंद, द्राक्षे, केळी, अवोकाडोस, पेअर, पीच आणि बरेच काही! कितीतरी फळे आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्या आवडीची फळे निवडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा कंटाळा येणार नाही. त्यामध्ये खूप जास्त खनिजद्रव्ये आणि व्हिटॅमिन्स असतात आणि ते दुसऱ्या तिमाहीत खावे असे महत्वाचे अन्न आहे.
७. सजलीत रहा
सजलीत रहा त्याची मानवी शरीराला खूप फायदे आहेत आणि विशेष करून गर्भावस्थेत ते खूप महत्वाचे आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूत्रमार्गाचा संसर्ग होत नाही, आणि हे दोन्ही प्रश्न गर्भवती महिलांना येतात. द्रवपदार्थ घेतल्याने तुमच्या शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. जर तुम्हाला साधे पाणी पिणे आवडत नसेल तर ताजा उसाचा रस आणि आंब्याचा रस घ्या त्यामध्ये कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ असतात.
गर्भधारणेच्या ५व्या महिन्यात काय खाऊ नये?
जर तुम्हाला एखाद्या अन्नपदार्थाची लालसा असेल तर काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे गर्भावस्थेदरम्यान स्पष्टता राहील
१. कार्बोनेटेड द्रवपदार्थ
ह्या पेयांमध्ये खूप जास्त कॅलरी, साखर आणि कॅफेन असते. ही पेय घेण्याऐवजी ताज्याफळांचा रस किंवा लिंबू पाणी घ्या
२. काही फळे आणि भाज्या
अननस, डाळिंब आणि पपई सारखी फळे टाळा, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते आणि त्यामुळे गर्भपात होतो. काळी द्राक्षे टाळणे चांगले कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे बाळास हानी पोहचू शकते. कोबीसारख्या भाज्या आणि लेट्युस मुळे आजारी पडण्याची शक्यता असते आणि वांग्यामुळे मासिक पाळी प्रेरित होते आणि त्यामुळे गर्भावस्थेत गर्भपात होण्याची शक्यता असते.
३. कॅफेन
गर्भावस्थेत खूप जास्त कॅफेन घेतल्यास, बाळ जन्मल्यानंतर ते झोपत नाही आणि अस्वस्थ असते. चहा, कॉफी आणि चॉकलेट मध्ये कॅफेन असते आणि ते टाळणे उत्तम. पण तुम्हाला कॉफी घेतल्याशिवाय चैन पडत नसेल तर कॉफीचे प्रमाण कमी करा, म्हणजेच जास्तीत जास्त २ कप दिवसाला.
४. भाजलेले आणि कच्चे समुद्री अन्न
जर तुम्हाला सुशी आणि साशिमी आवडत असेल तर थोडाकाळ ते न खाणे उत्तम. भाजलेल्या समुद्री अन्नामध्ये ‘लिस्टेरिया मोनोसायटोगेनस जिवाणू” असतात ज्यामुळे लिस्टेरिओसिस होतो, त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू होणे, गर्भपात किंवा नवजात बालकांमध्ये आजारपण आढळते.
५. पारा असलेले मासे
पारा असलेले मासे तुम्हाला समुद्र, झरे आणि तलावात आढळतात. आपल्या शरीरात ते मिथिल मर्क्युरी मध्ये परावर्तित होतात, हे नयूरोटॉक्सिन आहे आणि त्यामुळे मेंदूला हानी पोहोचते आणि अर्भकांमध्ये विकासास उशीर होतो. शार्क, सोर्डफिश, किंग मॅकरेल आणि तैलफिश हे काही मासे आहेत जे तुम्ही टाळले पाहिजेत. साल्मोन किंवा कमी मांस असलेले टुना सुद्धा तुम्ही खाऊन बघू शकता.
६. कच्चे किंवा कमी शिजवलेली अंडी आणि मांस
जर तुम्ही शाकाहारी नसाल तर अंडी आणि मासे हे तुमच्या आहाराचा मोठा भाग असतील. तुम्ही कच्ची अंडी किंवा मांस खाणार नाही ह्याची खात्री करा तसेच ते चांगले शिजवले गेले आहेत ना हे सुद्धा पहा.
कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा जिवाणू असतो त्यामुळे फूड पोइसोनिंग होते. जेंव्हा तुम्हाला फूड पोइसोनिंग होते तेव्हा तुमच्या बाळाला हानी पोहचू शकते, तुमची प्रतिकार प्रणाली अशक्त होते आणि त्याचा तुमच्या बाळाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो.
कच्या मांसामध्ये टॉक्सओप्लास्मा असते त्यामुळे प्रसूतीदरम्यान मृत्यू होऊ शकतो किंवा गर्भधारणेदरम्यान गर्भपात होऊ शकतो.
७. हर्बल टी आणि पूरक औषधे
काही हर्बल घटक हे चहा, सिझनिंग आणि पूरक औषधांमध्ये वापरले जातात ते आई आणि बाळासाठी हानिकारक असतात. कावा कावा किंवा ब्लॅक आणि ब्लु कोहोष आणि इतर गर्भाशयाचे संप्रेरक म्हणून म्हणून कार्य करते आणि ते संपूर्णपणे टाळले पाहिजे.
वनौषधी जसे की काळा अक्रोड, मेथी,जेष्ठमध, कडू दवणा ह्यामुळे गर्भपात होऊ शकतो. इतर पुष्पौषधी जसेकी जिनसेंग, कोरफड, प्रिमरोझ हे सुद्धा खाण्यासाठी सुरक्षित नाहीत.
५ महिन्यांच्या गरोदर स्त्रीसाठी आहाराच्या टिप्स
आयुष्याच्या ह्या महत्वाच्या काळात संतुलित आहारासाठी काही टिप्स:
- दररोज तुम्ही जे अन्न खाता त्याच्या पोषणमूल्यांवर तुम्ही नीट लक्ष ठेवले पाहिजे आणि रोज तुम्ही किती आहार घेतला पाहिजे ह्यावर थोडेसे काम करा आणि तुमच्या आहाराचा कुठला भाग बदलायला पाहिजे हे सुद्धा पहा.
- तुमच्यासाठी तुमचा आहाराचा प्लॅन तयार करा. तुमच्या बाळाच्या वाढीसाठी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषणमूल्ये मिळत आहेत ह्याची खात्री करा.
- तुमच्या आहारातील ज्या अन्नपदार्थांची तुम्हाला ऍलर्जी आहे आणि त्याऐवजी तुम्ही दुसरा कुठला पर्यायी पदार्थ घेतला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- एकाच वेळी सगळे अन्नपदार्थ खाऊ नका, त्याऐवजी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने खात रहा.
- तुम्हाला तोंडात टाकण्यासाठी काही हवे असेल तर सुकामेवा आणि बिया खा. तसेच तुम्ही कोवळे गाजर आणि इतर भाज्या नाश्त्यासाठी, दोन जेवणांच्या मध्ये खाऊ शकता.
- गर्भधारणेआधी उंची आणि वजन हे महत्वाचे आहे कारण त्यामुळे पोषक आणि संतुलित आहार नियमित करण्यासाठी कुठल्या प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.
रस्त्यावरचे पदार्थ खावेसे वाटणे आणि ती इच्छा दाबून ठेवणे तुमच्यासाठी अवघड आहे. परंतु तुमच्या बाळासाठी ते खाणे टाळा. किंबहुना ज्या पदार्थांचे पोषणमूल्य कमी आहे अशा पदार्थांची लालसा तुम्हाला वाटत असेल तर त्याऐवजी आरोग्यपूर्ण पदार्थ खा त्याचा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला फायदा होईल. तुम्ही काय खाता ह्याचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही पण तुमच्या बाळावर सुद्धा होतो. तुमच्या बाळाचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पलीकडे काहीही महत्वाचे नाही त्यामुळे तुम्ही काय खाता आहात त्याविषयी जागरूक आणि सावध राहिले पाहिजे.