In this Article
- व्हिडिओ: 23 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ
- 23 महिन्यांच्या बाळाची पोषक घटकांची गरज
- 23 महिन्यांच्या बाळाला किती अन्न आवश्यक आहे?
- 23 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्न
- व्हिडिओ: 23 महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना
- 23 महिन्याच्या बाळाच्या आहाराचा तक्ता/जेवण योजना
- व्हिडिओ: 23 महिन्याचे बाळ अन्न पाककृती
- 23 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती
- आहारविषयक टिप्स
तुमचे बाळ बऱ्याच गोष्टी करण्यासाठी सक्षम आहे. तुमचे बाळ आता चालू शकते, धावू शकते तसेच तुमच्याशी प्रभावीपणे संवाद साधू शकते. हे टप्पे गाठत असताना बाळाच्या पौष्टिक गरजांमध्ये सुद्धा बदल होतात. गंमत म्हणजे, नवजात बाळांपेक्षा सक्रिय बाळांना कमी कॅलरी लागतात. म्हणजे,बाळाचे पोषण महत्वाचे नाही असा त्याचा अर्थ होत नाही. साधारणपणे, जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली जाते. बाळ जसजसे मोठे होते तसे अन्नपदार्थांची विविधता, चव आणि पोत हळूहळू बदलत जातात. दोन वर्षांच्या आसपास, तुमचे बाळ काही किरकोळ अपवाद वगळता जवळपास काहीही खाऊ शकते. हा लेख तुम्हाला तुमच्या लहान बाळाची अन्नाची गरज समजून घेण्यास मदत करेल, तसेच तुम्ही करून बघू शकता अशा काही पाककृती खाली दिलेल्या आहेत.
व्हिडिओ: 23 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ
23 महिन्यांच्या बाळाची पोषक घटकांची गरज
सर्वांना आवश्यक असलेले पोषक घटक सारखे असले, तरी लहान मुलांना आवश्यक असलेले गुणवत्ता आणि प्रमाण वेगवेगळे असते.
1. कर्बोदके
कर्बोदके किंवा शर्करा चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करतात, त्यामुळे हे घटक अत्यंत महत्वाचे असतात. तुमच्या लहान बाळाची वाढ आणि विकास अत्यंत वेगाने होत असल्याने, या टप्प्यावर कर्बोदकांचे प्रमाण कमी करणे अत्यंत धोकादायक आहे. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कर्बोदके आवश्यक असतात.
2. सोडियम
विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी सोडियम हा धोकादायक घटक म्हणून ओळखला जातो. परंतु हा एक आवश्यक पोषक घटक सुद्धा आहे, कारण सोडीयम रक्तातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी नियंत्रित करते.
3. चरबी
निरोगी स्तोत्रांकडून मिळत असलेली चरबी ही बाळाची वाढ, अवयवांचा विकास, मज्जातंतूंच्या ऊतींची निर्मिती आणि अशाच गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. पुढे, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, डीएचए आणि ईपीए सारखी चरबी हे वाढत्या मुलांसाठी आहारातील सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत.
4. प्रथिने
तुम्हाला आधीच माहित आहे की, स्नायू तयार करण्यासाठी तसेच शरीराची विविध कार्ये करण्यासाठी, संप्रेरके म्हणून कार्यरत राहण्यासाठी प्रथिनांची गरज असते. परंतु, लहान मुलांच्या आहारात जास्त प्रथिने आणि कमी कर्बोदके असतील तरी सुद्धा त्यांचे कार्य चांगले चालते, कारण या वयात त्यांच्या वाढीस वेग येत नाही.
5. लोह
रक्ताच्या निर्मितीसाठी आणि रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी लोह आवश्यक आहे. जगभरातील मुलांमध्ये लोहाची कमतरता खूप सामान्य आहे. सुरुवातीला, स्तनपानातून बाळाला आवश्यक असलेले लोह मिळते, परंतु स्तनपान बंद करताना बाळाला अधिक चांगल्या अन्नपदार्थांच्या स्रोतांची आवश्यकता असते.
6. पाणी
पाणी पोषक नसले तरीसुद्धा इतर पदार्थांसोबत ते पौष्टिक बनते. पाणी एक विलायक म्हणून कार्य करते, त्याशिवाय शरीरात पचनाची प्रक्रियादेखील होऊ शकत नाही. शरीरात प्रथिने, चरबी आणि कर्बोदके तयार करण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता असते.
7. तंतुमय पदार्थ
.कार्बोहायड्रेट-समृद्ध आहारातून तंतुमय पदार्थ मिळू शकतात. त्यामुळे पचनसंस्थेचे नियमन होते आणि शरीरातून सहजपणे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
8. जीवनसत्त्वे
जीवनसत्त्वे हे रासायनिक रेणू आहेत आणि ते वेगवेगळी शारीरिक कार्ये करतात. रक्त गोठणे, त्वचेची देखभाल, हाडांची वाढ, ऊर्जा उत्पादन आणि इतर असंख्य कामांसाठी जीवनसत्वे जबाबदार आहेत.
23 महिन्यांच्या बाळाला किती अन्न आवश्यक आहे?
दोन वर्षांच्या आसपासच्या लहान मुलांना दररोज अंदाजे 1000-1300 कॅलरीज आवश्यक असतात, परंतु लहान मुले किती सक्रिय आहेत ह्यानुसार ते बदलू शकते. इतर पोषक घटकांचा विचार करता, लहान मुलांना दररोज सुमारे 1 ग्रॅम सोडियम, 7 मिग्रॅ लोह, 12 ग्रॅम प्रथिने, 140 ग्रॅम कर्बोदके, 19 ग्रॅम तंतुमय पदार्थ, 40 ग्रॅम चरबी आणि सुमारे 1.5 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
23 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्न
तेवीस महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थांची यादी येथे दिलेली आहे.
1. फळे
फळे एक स्वादिष्ट नाश्ता आहेत आणि फळांचे असंख्य रंग, चव आणि पोत असतात. फळे कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी देतात. हे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि तुमच्या बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी उत्तम आहेत.
2. दही
मुलांसाठी दही हे उत्तम अन्न आहे, विशेषत: ज्यांना दुधावर प्रक्रिया करणे कठीण जाते किंवा ज्यांना लैक्टोज असहिष्णुता आहे अशांसाठी दही उत्तम आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, हे जीवाणू रोगप्रतिकारशक्ती आणि पाचक प्रणाली मजबूत करण्यासाठी ओळखले जातात.
3. धान्ये आणि तृणधान्ये
या पदार्थांमध्ये तांदूळ, गहू, बार्ली, मका, क्विनोआ, नाचणी, ओट्स, बाजरी इत्यादींचा समावेश होतो. जेव्हा उर्जेचा विचार केला जातो तेव्हा ही धान्ये उत्कृष्ट असतात, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात जटिल कर्बोदके असतात. खरं तर, तुम्ही तुमच्या मुलाला संपूर्ण धान्य खायला द्यावे, कारण परिष्कृत किंवा प्रक्रिया केलेल्या धान्यामध्ये पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात कमी होतात.
4. भाज्या
फळांप्रमाणेच भाजीपाला हे ऊर्जा,तंतुमय पदार्थ, खनिजे, पाणी, आणि अँटिऑक्सिडंट प्रदान करतात. भाज्या पचनास मदत करतात तसेच रोगांपासून संरक्षण करतात. भाज्यांवर कीटकनाशके असू शकतात म्हणून कृपया भाज्या अगोदर धुवून घ्या. तसेच भाज्यांचे साल टाकू नये कारण त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात.
5. अंडी
अंडी हा प्रथिनांचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे आणि आपल्या लहान मुलाच्या वाढीस आणि विकासास अंड्याची मदत होते. अंड्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झिंक, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक देखील असतात.
6. जनावराचे मांस
मांस देखील अंड्यांप्रमाणेच प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. स्नायूंच्या विकासास मदत करण्याव्यतिरिक्त, चिकन आणि मासे यांसारख्या माशांमध्ये सेलेनियम, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस, लोह इत्यादी भरपूर प्रमाणात असतात.
7. ब्रेड
संपूर्ण धान्य ब्रेड चवदार आणि पौष्टिक असतो. ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेडमध्ये ऊर्जा-उत्पादक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि प्रथिने असतात.
8. दूध
दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते, कारण त्यामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, खनिजे तसेच जीवनसत्त्वे भरपूर असतात. शिवाय, दात आणि हाडांच्या निर्मितीसाठी दुधातील कॅल्शियम आणि फॉस्फरस आवश्यक आहे.
9. तूप
तुपासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे गुणधर्म दुधासारखेच असतात, परंतु ते विविध प्रकारे वापरले जाऊ शकतात. पुढे, दुधाची ऍलर्जी असलेल्या मुलांना तूप वापरता येते, कारण तयार करताना ऍलर्जीन, कॅसिन आणि लैक्टोज त्यामधून काढून टाकले जातात.
10. नट्स
बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रमाणात निरोगी चरबी असते. ही चरबी बाळाची वाढ, विकास, रक्ताभिसरण आरोग्य तसेच मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असते. चरबीमधून देखील काही प्रमाणात ऊर्जा मिळते.
व्हिडिओ: 23 महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना
23 महिन्याच्या बाळाच्या आहाराचा तक्ता/जेवण योजना
येथे एक आहाराचा तक्ता दिलेला आहे. हा तक्ता तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी फॉलो करू शकता.
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 1
न्याहारी | दूध आणि किसलेले गाजर घालून केलेला दलिया उपमा |
सकाळचा नाश्ता | फ्रूट चाट |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | बदाम पावडर घालून केलेली बाजरीची लापशी |
रात्रीचे जेवण | पाव भाजी (मसालेदार नाही) आणि पालक सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 2
न्याहारी | केळी पॅनकेक आणि चॉकलेट दूध |
सकाळचा नाश्ता | फळांचा रस |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | फ्रूट कस्टर्ड |
रात्रीचे जेवण | व्हेजिटेबल रायता + भाज्या घालून केलेला पुलाव + मूग डाळ सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 3
न्याहारी | टोस्ट स्क्रॅम्बल्ड एग आणि केळी/सफरचंद मिल्कशेक |
सकाळचा नाश्ता | फळांचा रस |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | दुधासोबत घरी केलेली 2-3 बिस्किटे |
रात्रीचे जेवण | व्हेज रिसोट्टो |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 4
न्याहारी | मूग डाळ (पिवळे चणे) – पालक ढोकळा हिरव्या चटणीसह |
सकाळचा नाश्ता | फळे कापून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | ओट्स/ज्वारी पफ दलिया |
रात्रीचे जेवण | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 5
न्याहारी | दूध, बदाम आणि खजूर घालून केलेले सत्तू |
सकाळचा नाश्ता | फ्रूट चाट |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद मिल्कशेक |
रात्रीचे जेवण | चिकन किंवा पनीर (कॉटेज चीज) करी भातासोबत |
रात्रीचे जेवण 23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 6
न्याहारी | चटणी किंवा सांबारसोबत इडली |
सकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद/काळे मीठ असलेले कोणतेही स्थानिक उपलब्ध फळ |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पनीर (कॉटेज चीज) – सफरचंद मॅश |
रात्रीचे जेवण | मेथी थेपला सोबत आलू (बटाटा) सब्जी + दही |
रात्रीचे जेवण 23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 1, दिवस 7
न्याहारी | काकडीच्या रायत्यासोबत साबुदाणा खिचडी |
सकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद/स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले कोणतेही फळ |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पोळी + गूळ + एक ग्लास दूध |
रात्रीचे जेवण | मसूर डाळ सूप आणि भातासोबत सोया पॅटीज |
23-महिन्याच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 1
न्याहारी | भाज्या घालून केलेला उपमा + दूध |
सकाळचा नाश्ता | खजुराचे बारीक केलेले तुकडे + बदाम + काजू |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | बदाम पावडर घालून बाजरीचा दलिया |
रात्रीचे जेवण | पाव भाजी (कमी मसालेदार) आणि पालक सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 2
न्याहारी | नाचणी डोसा + दूध |
सकाळचा नाश्ता | सकाळचा साधा खाकरा दह्यात मिसळून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | फ्रुट कस्टर्ड |
रात्रीचे जेवण | भाज्या घालून केलेला रायता+ भाज्या घालून केलेला पुलाव+ मूग डाळ सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 3
न्याहारी | सफरचंद खीर + गाजर पराठा |
सकाळचा नाश्ता | किसलेले पनीर घालून मॅश केलेला बटाटा |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | 2-3 घरी केलेली बिस्किटे दुधासोबत |
रात्रीचे जेवण | वरण भात |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 4
न्याहारी | दलिया (तुटलेला गहू) |
सकाळचा नाश्ता | 2-3 घरी केलेली बिस्किटे दुधासोबत |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | ओट्स/ज्वारी दलिया |
रात्रीचे जेवण | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 5
न्याहारी | मखाना खीर |
सकाळचा नाश्ता | मसाला मखना + केळी मिल्कशेक |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद मिल्कशेक |
रात्रीचे जेवण | चिकन किंवा पनीर (कॉटेज चीज) करी भातासोबत |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 6
न्याहारी | गव्हाच्या पिठाचा शिरा दुधासोबत |
सकाळचा नाश्ता | दुधात बुडवलेली राजगिरा चिक्की |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पनीर (कॉटेज चीज) – सफरचंद मॅश |
रात्रीचे जेवण | मेथी थेप्ला, बटाटा सब्जी + दही |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 2, दिवस 7
न्याहारी | चॉकलेट दूध आणि केळ्याचा पॅनकेक |
सकाळचा नाश्ता | चकलीचे तुकडे |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | दूध आणि केळ्याचा पॅनकेक |
रात्रीचे जेवण | मसूर डाळ सूप आणि भातासोबत सोया पॅटीज |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 1
न्याहारी | साबुदाणा खीर |
सकाळचा नाश्ता | फिरनी |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | हिरव्या चटणी सोबत घरी बनवलेला बटाटा वडा |
रात्रीचे जेवण | पनीर (कॉटेज चीज) कटलेट किंवा कोथिंबीर टोमॅटो सूपसह ग्रील्ड फिश |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 2
न्याहारी | अंड्याचा पराठा + केसर (केशर) इलायची (वेलची) दूध |
सकाळचा नाश्ता | फळे कापून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पनीर (कॉटेज चीज) मध आणि बदाम घालून |
रात्रीचे जेवण | टोस्ट सोबत भाजलेले सोयाबीन |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 3
न्याहारी | मनुके, बदाम आणि दूध घालून |
सकाळचा नाश्ता | नाचणीचे लाडू |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पोहे |
रात्रीचे जेवण | सफरचंद नारळ- दही चटणीसह |
रात्रीचे 23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 4
न्याहारी | चॉकलेट दुधासह ओट्स वॅफल्स |
सकाळचा नाश्ता | फळे कापून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | बाजरी (मोती बाजरी) पुरी |
रात्रीचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 5
न्याहारी | मिश्र डाळ (मसूर) मिरच्या पुदिन्याच्या चटणीसह |
सकाळचा नाश्ता | खजूर-स्किम मिल्क पावडर लाडू |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | टोमॅटो चटणीसोबत संध्याकाळी फ्रेंच फ्राईज |
रात्रीचे जेवण | ताक आणि मुठिया |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 6
न्याहारी | थेपला + चुंदा + 1 छोटा ग्लास केसर (केशर) – इलायची (वेलची) दूध |
सकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद स्मूदी |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | दही वडा |
रात्रीचे जेवण | शाही पनीर सह पराठा + टोमॅटो-मशरूम सूप |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 3, दिवस 7
न्याहारी | ओट्स-सफरचंद-दालचिनी दलिया |
सकाळचा नाश्ता | चणे पावडर सत्तू + खजूर (खजूर) मिसळून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | लाडू + दूध |
रात्रीचे जेवण | पुदिन्याची चटणी सोबत आलू टिक्की |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 1
न्याहारी | दुध, पराठे |
सकाळचा नाश्ता | सत्तू (मिश्रित बेसन) लाडू |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | बदाम-अंजीर (अंजीर) मिल्कशेक |
रात्रीचे जेवण | भाज्या सूपसह ग्रील्ड चीज सँडविच |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 2
न्याहारी | पोहे + फळांचा रस |
सकाळचा नाश्ता | मेथी पुरी |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | पनीर (कॉटेज चीज) – खाखरा चाट |
रात्रीचे जेवण | छोले पुरी + लस्सी |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 3
न्याहारी | थालीपीठ + दूध |
सकाळचा नाश्ता | मॅश केलेली केळी/सफरचंद/ उपलब्ध फळ |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | शेंगदाणा चिक्की + ½ कप कोणत्याही स्थानिक उपलब्ध फळाचा रस |
रात्रीचे जेवण | कॉर्न रोटी + सरसों साग |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 4
न्याहारी | केळी/अंडी पॅनकेक |
सकाळचा नाश्ता | फळांचा रस |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा धणे/पुदिना चटणी
|
संध्याकाळचा नाश्ता | केळी/सफरचंद मिल्कशेक |
रात्रीचे जेवण | मिक्स भाज्या- पनीर (कॉटेज चीज) पराठा टोमॅटो सूपसह |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 5
न्याहारी | शेवयांचा उपमा+ केळी/सफरचंद मिल्कशेक |
सकाळचा नाश्ता | शेवयांचा उपमा+ केळी/सफरचंद मिल्कशेक |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा
|
संध्याकाळचा नाश्ता | पालक सूप ब्रेड स्टिक्ससह |
रात्रीचे जेवण | पनीर (कॉटेज चीज) कटलेट किंवा ग्रील्ड फिश |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 6
न्याहारी | नाचणीचे सत्व बदाम पावडरसह |
सकाळचा नाश्ता | फळे कापून |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा
|
संध्याकाळचा नाश्ता | बाजरीची भाकरी दूध |
रात्रीचे जेवण | वरण भात |
23 महिन्यांच्या मुलासाठी आहार – आठवडा 4, दिवस 7
न्याहारी | न्याहारी दूध पोहे आणि चिरलेली फळे वेलची घालून |
सकाळचा नाश्ता | ठेचलेल्या तिळाचे लाडू |
दुपारचे जेवण |
छोटी पोळी + डाळ + आवडीची कोणतीही भाजी+ गाजर/काकडी/टोमॅटोचे काही तुकडे + 1 चमचा
|
संध्याकाळचा नाश्ता | फळे आणि दही |
रात्रीचे जेवण | मसूर डाळ सूप आणि भात, सोया पॅटीज |
व्हिडिओ: 23 महिन्याचे बाळ अन्न पाककृती
23 महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती
तुमच्या 23-महिन्याच्या बाळासाठी येथे काही अन्नपदार्थांच्या पाककृती दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आनंद होईल.
1. न्याहारीसाठी सीरिअल
न्याहारी सीरिअल हे एक मानक जेवण आहे आणि त्यांची चव वेगवेगळी असू शकते
साहित्य
- अर्धा कप ओट्स
- अर्धा कप दूध
- अर्धा कप फळांचा रस
- एक चमचा मध
तयारी कशी करावी
एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा. मिश्रणावर थोडे मध टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यावर सुकामेवा आणि बेदाणे टाकू शकता.
2. सॅलड
हे एक स्वादिष्ट जेवण आहे आणि त्यापासून विविध आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.
साहित्य
- अर्धा कप दूध
- 2चमचे ग्रीक दही
- अर्धा कप बेरी
- अर्धा कप उकडलेले गाजर
- एका केळ्याचे तुकडे
- एक लहान क्यूब चीज
- दोन चमचे गव्हाचा कोंडा
तयारी कशी करावी
दूध आधी उकळून घ्या. सर्व साहित्य एकत्र मिसळा आणि एकत्र करण्यासाठी टॉस करा. चवीनुसार मध किंवा तूप घाला.
3. बीन राईस
ही दुपारच्या जेवणाची रेसिपी पोटभरीची आहे तसेच स्वादिष्ट सुद्धा आहे
साहित्य
- अर्धा कप तांदूळ
- चार चमचे शिजवलेले राजमा बीन्स
- अर्धा कप चिरलेले कांदे आणि गाजर
- दोन चमचे दूध
- एक टीस्पून दालचिनी
तयारी कशी करावी
तांदूळ आणि सोयाबीन शिजल्यानंतर ते एकत्र मिक्स करावे. नंतर त्यात भाज्या, दूध आणि दालचिनी घालून मिक्स करा. जर तुमच्या मुलाला गरम मसाले सहन होत असतील तर तुम्ही थोडा चिमूटभर गरम मसाला देखील घालू शकता.
4. मॅकरोनी आणि चीज
ही सामान्य रेसिपी जगभरात वापरली जाते आणि ती तयार करणे अगदी सोपे आहे.
साहित्य
- अर्धा कप मॅकरोनी
- किसलेले चीज दोन चमचे
- अर्धा कप ब्रोकोली, भोपळी मिरची आणि गाजर सारख्या चिरलेल्या भाज्या
- अर्धा कप दूध
तयारी कशी करावी
मॅकरोनी चांगली शिजवून घ्या. थंड होण्यापूर्वी त्यामध्ये चीज घाला आणि चीझ वितळू द्या. नंतर एकसमान सुसंगतता मिळेपर्यंत उरलेले घटक त्यामध्ये घाला.
5. चिकन नूडल्स
मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. तुम्ही चिकन ऐवजी टोफू, सोयाबीन, शेंगा इत्यादी शाकाहारी पर्याय घेऊ शकता.
साहित्य
- अर्धा कप चिकन, चांगले शिजवलेले
- अर्धा कप नूडल्स
- दोन चमचे चिरलेले गाजर
- दोन चमचे मटार
- अर्धा कप ग्रीक योगर्ट
तयारी कशी करावी
नूडल्स, गाजर आणि मटार एकत्र शिजवा. चिकन आणि दही मिक्स करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही चिमूटभर मिरपूड किंवा हळद घालू शकता.
आहारविषयक टिप्स
तुमच्या लहान मुलाला खायला घालताना तुम्हाला खालील टिप्सचा उपयोग होऊ शकतो.
- तुमच्या लहान मुलाला दिवसा गोड पेये पिण्यास परवानगी देऊ नका, विशेषतः जेवणादरम्यान तहान लागल्यास त्याला पाणी द्यावे.
- गुदमरून जाण्याचा धोका असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये, संपूर्ण भाज्या, सुकामेवा,मांस, कँडी, च्युइंगम, पॉपकॉर्न, बर्फाचे तुकडे इत्यादींचा समावेश होतो. तुम्हाला यापैकी कशाचाही वापर करायचा झाल्यास ते चांगले कापून घ्या.
- जेवताना तुमचे लहान मूल उठून बसले आहे याची खात्री करा.
- त्यांना शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवा कारण त्याचे विविध आरोग्यविषयक फायदे आहेत.
- पाणी अथवा इतर द्रवपदार्थ बाळाकडून सांडले तरी ठीक आहे. त्यासाठी स्पील प्रूफ कप वापरा.
- फळे आणि भाज्या सर्व्ह करताना, तुम्ही, बिया आणि खडबडीत साले काढून टाकले आहेत ना ह्याची खात्री करा.
- तुमच्या लहान बाळाला लहान घास कसे खायचे ते शिकवा आणि गिळण्यापूर्वी त्याने अन्न नीट चावून खाल्ले आहे ह्याची खात्री करा;.
- जेवणाच्या वेळा ठरवून घ्या, कारण यामुळे भूक लागणे किंवा मध्येच काही तरी खाणे टाळले जाईल.
- कृपया तुमच्या मूल जेवण करताना जास्त खात नाही ना ह्याची खात्री करा, कारण यामुळे वजन वाढणे, बद्धकोष्ठता आणि इतर अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.
- तुमच्या चिमुकलीला अद्वितीय चव आणि पोत असलेले, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वापरण्यासाठी प्रोत्साहित करा.
मुलांना नेमके कधी आणि किती खायचे आहे हे कळते. जोपर्यंत तो खायला जास्त त्रास देत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या प्रवृत्तीनुसार आहार द्यावा. जर बाळाला भरवताना अन्न ढकलणे, मान फिरवणे, अन्न बाहेर थुंकणे, तोंड उघडण्यास नकार देणे इत्यादी लक्षणे आढळली तर त्याला अन्न खाण्यास भाग पाडू नका. आपल्याप्रमाणेच लहान मुलांच्या स्वतःच्या आवडीनिवडी असतात.
अस्वीकरण:
- प्रत्येक मूल वेगळे असते आणि म्हणून ह्या लेखात दिलेल्या आहाराच्या योजना विश्वासू मार्गदर्शक म्हणून वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/आवश्यकतेनुसार जेवणात बदल करू शकता.
- मुलाला सक्तीने खायला घालू नका.
- फॉर्म्युला तयार करताना, कृपया बॉक्सवरील सूचनांचे पालन करा आणि त्यासोबत दिलेला मापाचा चमचा वापरा.
- बाळाला घन आहाराचा परिचय करून देताना, सुरुवातीला, तुम्हाला त्याच्यासाठी सूप तयार करावे लागूशकते. मूल जसजसे मोठे होते, तसतसे काळजीवाहू व्यक्तीला/आईला मुलाच्या गिळण्याच्या क्षमतेनुसार द्रवपदार्थ किती घट्ट असावा हे ठरवावे लागते. खूप घट्ट असलेल्या अन्नामुळे पोट खराब होऊ शकते. तर जास्त पाणी असलेल्या द्रवपदार्थांमुळे मूल भुकेले राहू शकते.
- काही मुले काही दिवस कमी खाऊ शकतात आणि ते अगदी ठीक आहे. परंतु, जर एखाद्या मुलाने सलग 3-4दिवसांपेक्षा जास्त काळ कमी खाल्ले तर कृपया पुढील मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- दात येत असताना किंवा बाळाला बरे वाटत नसल्यास बाळ कमी खाऊ शकते. त्या दिवशी तुम्ही आईचे दूध/फॉर्म्युला फीड वाढवू शकता. बाळाला बरे वाटू लागल्यावर पुन्हा पदार्थांची ओळख करून द्या.
- जर तुमच्या मुलाला अतिसाराचा त्रास होत असेल तर जेवण देणे थांबवू नका.
- जर मुलाने सुरुवातीला अन्न खाल्ले नाही तर तुम्ही दालचिनी, जिरे पावडर, लिंबाचा रस, कढीपत्ता इत्यादी काही नैसर्गिक चव घालून अन्नाची चव बदलू शकता.
- जर तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांपासून ऍलर्जी होत असेल, तर कृपया त्याला/तिला हे घटक असलेले कोणतेही पदार्थ खायला देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती
२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती