Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भपात – प्रकार, कारणे आणि लक्षणे

गर्भपात – प्रकार, कारणे आणि लक्षणे

गर्भपात – प्रकार, कारणे आणि लक्षणे

गर्भवती स्त्रीला गर्भपाताची भीती वाटणे खूप साहजिक आहे. बऱ्याच वेळा गर्भपातासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते. परंतु पुरेशी काळजी घेतल्यास आणि वेळेवर कार्यवाही केल्यास ही घटना टाळता येते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भाच्या आरोग्यवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची माहिती असल्यास गर्भपात टाळण्यास मदत होते.

गर्भपात म्हणजे काय?

सूत्रांच्या मते, गर्भपात किंवा उत्स्फूर्त गर्भपात म्हणजे गरोदरपणात गर्भ गमावण्याचा एक प्रकार आहे. गर्भ स्वतंत्रपणे जगण्याआधीच त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो. गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यांत स्त्रियांचा गर्भपात होणे हे अत्यंत सामान्य आहे आणि त्याला पहिल्या तिमाहीत गर्भपात म्हणून ओळखले जाते. पहिल्या गरोदरपणात गर्भपात होण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे म्हटले जाते, म्हणूनच गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. एकूण गर्भधारणेपैकी सुमारे १० ते २५ % गर्भपात होतात.

पाळी उशिरा येत असल्यास नक्की गार्भपात झालेला आहे हे समजत नाही. गरोदरपणात गर्भपात होणे सामान्य असले तरीही गर्भपात होणाऱ्या स्त्रीसाठी तो हा एक विनाशकारी आणि क्लेशकारक अनुभव असू शकतो.

गर्भधारणा आणि गर्भपात

गर्भधारणा आणि गर्भपात

गर्भ २४ आठवड्यांचा होण्यापूर्वी गर्भपात होतो. गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांमध्ये गर्भपात झाला तर त्यास सामान्यतः लवकर होणारा गर्भपात म्हणून ओळखली जाते, तर १२२४ आठवड्यांच्या दरम्यान गर्भाची हानी झाल्यास त्यास उशीरा होणारा गर्भपात म्हणून ओळखली जाते.

. गर्भपात कसा सुरू होतो?

बहुतेक गर्भपात अनुवांशिक समस्यांमुळे होतात. पण दिलासा देणारा मुद्दा म्हणजे या समस्या अनुवांशिक नाहीत. कारण ह्या घटना पुढील गरोदरपणापर्यंत जात नाहीत. गर्भाशयाच्या काही विकृतींमुळेही गर्भपात होऊ शकतो. थायरॉईड विकारांमुळे गर्भपात होऊ शकतो, परंतु त्याची टक्केवारी कमी आहे. गर्भाशयाचे मुख कमकुवत किंवा अकार्यक्षम असेल तर सामान्यतः दुसऱ्या तिमाहीत गर्भपात होऊ शकतो.

. गर्भपाताची कारणे

गर्भपात होण्याची विविध कारणे असू शकतात. गर्भपात होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे एखादी सवय आणि जीवनशैली. ड्रग्ज, मद्यपान आणि धूम्रपान या सवयींचा गरोदरपणावर परिणाम होऊ शकतो. वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, अंडी आणि कच्च्या मांसामध्ये आढळणारे काही जीवाणू शरीरात जाऊन गर्भात होऊ शकतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या, मातृत्वाच्या धक्क्यामुळे देखील अश्या दुर्दैवी घटना देखील घडू शकतात. हार्मोनल समस्या , जुनाट आजार आणि विलंबित गर्भधारणा ही गर्भपात होण्याची इतर काही कारणे आहेत.

. तुमचा गर्भपात झाल्यावर काय होते?

गर्भपाताचा सामना करणार्‍या स्त्रीला प्रचंड मानसिक आघात होणे साहजिक आहे कारण ह्या परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण होते. ठराविक कालावधीसाठी, नैराश्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो आणि ह्या काळात भावनिक आधाराची पूर्वीपेक्षा जास्त गरज असते. तसेच, गर्भपातामुळे काही स्त्रियांमध्ये गरोदरपणाविषयी भीती निर्माण होते. ह्या भीतीमुळे त्या पुढील गर्भधारणेसाठी नाखूष असतात.

. एखाद्या स्त्रीला गर्भपात होऊन सुद्धा कळत नाही असे होऊ शकते का?

काहीवेळा, रक्तस्त्राव आणि पेटके आल्यास गर्भपात झाल्याची शक्यता असते. गर्भपाताची कोणतीही शक्यता असल्यास, अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केवळ अल्ट्रासाऊंड गर्भपाताची पुष्टी करू शकते आणि म्हणून रक्तस्रावासोबत सोबत पेटके येण्याच्या कोणत्याही परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे .काहीवेळा गर्भपाताच्या रक्तस्त्रावाच्या शक्यतेकडे दुर्लक्ष केले जाते.

. गर्भपातामुळे वेदना होतात का?

एखाद्या महिलेला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सौम्य अथवा गंभीर पेटके येतात तसेच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

. गर्भपात किती सामान्य आहे?

चार गरोदर स्त्रियांपैकी एका स्त्रीचा गर्भपात होण्याची शक्यता असते. जवळजवळ ८५% गर्भपात गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत होतात. ३० वर्षांखालील महिलेला गर्भपात होण्याची शक्यता १० पैकी १ असते आणि ही वारंवारता वयानुसार वाढते.

गर्भपाताची सुरुवातीची लक्षणे

गरोदरपणाच्या सुरुवातीलाच गर्भपात झालेला असल्यास पाळी आली आहे असे मानले जाते. अशा परिस्थितीत, स्त्रीला मासिक पाळीची सामान्य लक्षणे दिसतात उदा: हलके डाग किंवा रक्तस्त्राव, पाठदुखी आणि सौम्य पेटके इत्यादी. ही लक्षणे लवकरच पूर्ण वाढ झालेल्या रक्तस्त्रावापर्यंत वाढू शकतात, त्यासोबत गंभीर पेटके येणे आणि रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात. जर तुमचे गर्भारपण निरोगी असेल तर तुम्ही लवकर प्रसूतीच्या टप्प्यापर्यंत देखील जाऊ शकता. गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यात रक्तस्त्राव होणे किंवा अनिश्चित वेदना होणे हे चिंताजनक आहे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे.

गरोदरपणात काही वेळेला गर्भपात होत असताना, स्त्रीला वेदना किंवा रक्तस्त्राव होत नाही. गर्भपात झालेला आहे ह्याकडे तिचे पूर्ण दुर्लक्ष होऊ शकते. नियमित स्कॅन करतानाच गर्भाची हानी झाल्याचे लक्षात येते. ह्याला मूक गर्भपात किंवा मिसकॅरेज म्हणतात.

गर्भारपण लवकर संपुष्टात येण्याची कारणे

गरोदरपणात गर्भपात होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे गुणसूत्रातील समस्या होय. त्यामुळे गर्भ पूर्णपणे विकसित होत नाही. अनुवांशिक विकृती व्यतिरिक्त, इतर काही घटक गरोदरपणात गर्भपात होण्यास कारणीभूत ठरतात. ह्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • हार्मोन्सची असामान्य पातळी: गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी गरोदरपणात संप्रेरके महत्वाची असली तरी, हार्मोन्सच्या असामान्य पातळीमुळे गर्भपात होऊ शकतो.
  • मधुमेह: अनियंत्रित मधुमेहामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते.
  • घातक पदार्थांशी जवळीक: कामाच्या ठिकाणी थोडदायक गोष्टी, रसायने, पर्यावरणीय विकिरण आणि विषारी पदार्थांचा संपर्क.
  • वेदनाशामक औषधे (इबुप्रोफेन, नेप्रोक्सन इ.).
  • गरोदरपणात जास्त धूम्रपान आणि मद्यपान.
  • बेकायदेशीर औषधांचा वापर आणि गर्भाशयाच्या विकृती उदा: युटेराइन सेप्टम: काही विकृती जन्मापासून असतात आणि इतर प्रौढत्वात विकसित होतात.
  • काही ऍन्टीबॉडीज आपले संरक्षण करतात तर काही हानिकारक असतात म्हणूनच रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारे घटक गर्भपातास कारणीभूत ठरू शकतात.

गर्भपाताचे विविध प्रकार

गर्भाच्या किंवा स्त्रीच्या शरीराच्या स्थितीवर आधारित गर्भपाताचे विविध प्रकार आहेत

1. रासायनिक गर्भधारणा

रासायनिक गर्भधारणेच्या बाबतीत, अंड्यांचे फलन होते परंतु गर्भाशयात कधीही रोपण केली जात नाही. शरीराला चुकीचे संदेश दिले जातात. त्यामुळे गर्भारपणातील संप्रेरक तयार होतात आणि मासिक पाळी येण्याच्या तीन ते चार दिवस स्त्रीची गरोदर चाचणी सकारात्मक येऊ शकते. अंड्याचे रोपण न झाल्यामुळे, गर्भधारणेचे कोणतेही चिन्ह दिसत नाही, कारण गर्भधारणा किंवा प्लेसेंटा अस्तित्वात नसते. अशा परिस्थितीत, गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या व्यवहार्य नाही असे म्हटले जाते. मासिक पाळीत पेटके येणे आणि गर्भधारणेचा सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर काही दिवसांत रक्तस्त्राव होणे ह्यासारखी इतर काही लक्षणे दिसतात.

2. मिस्ड मिसकॅरेज

अल्ट्रासाऊंड केल्यानंतर गर्भपात झालेला आहे हे लक्षात येते. परंतु गर्भपात झालेल्या स्त्रीला गर्भपाताची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे आढळत नाहीत. अशा गर्भपाताला मूक गर्भपात देखील म्हणतात.

3. ब्लाइटेड ओव्हम

ब्लाइटेड ओव्हममध्ये, गर्भ पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्याऐवजी गर्भाशयाद्वारे शोषला जातो. अशा परिस्थितीत स्त्रीमध्ये गर्भारपणाची लक्षणे दिसू लागतील आणि गर्भाशयाची पिशवी देखील तयार होईल, परंतु बाळाचा विकास होणार नाही.

4. अपूर्ण गर्भपात

काही स्त्रियांच्या बाबतीत, गर्भाशयात काही ऊती असतात. गर्भाशय रिकामे करण्यासाठी राहिलेल्या उती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याने अधिक क्रॅम्पिंग आणि रक्तस्त्राव होतो. गर्भाशय रिकामे करण्यासाठी डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकतात.

5. पूर्ण गर्भपात

गर्भाशय जेव्हा पूर्णपणे रिकामे केले जाते तेव्हा पूर्ण गर्भपात होतो. रक्तस्त्राव आणि पेटके चालू राहू शकतात कारण गर्भाशय आकुंचन पावते आणि रक्त बाहेर पडते.

6. वारंवार गर्भपात

केवळ थोड्याच महिलांचा वारंवार गर्भपात होतो. वारंवार होणारे गर्भपात सहसा फारसे आढळत नाहीत आणि क्रोमोसोमल विकारांव्यतिरिक्त गर्भाशयाच्या स्थितीला कारणीभूत असतात.

7. एक्टोपिक गर्भधारणा

अश्या प्रकारच्या गर्भधारणेमध्ये गर्भाचे रोपण गर्भाशयाव्यतिरिक शरीराच्या इतर भागात होते. असा गर्भ जगू शकत नाही आणि गर्भपात होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आईला योनीतून रक्तस्त्राव आणि ओटीपोटाच्या खालील भागात तीव्र वेदना जाणवू शकतात.

8. मोलर गर्भधारणा

मोलर प्रेग्नेंसीमध्ये, ज्या ऊतीचा गर्भ व्हायला हवा होता, त्याऐवजी त्यांची गर्भाशयात असामान्य वाढ होते. सर्व ऊती काढून टाकल्या गेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

गर्भपातासाठी उपचार

गर्भपातासाठी निश्चित उपचार नाही. तथापि, डॉक्टर तुम्हाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देऊ शकतात आणि/किंवा तुमच्या गर्भाशयातील उरलेल्या गर्भाच्या ऊतींना शस्त्रक्रियेने काढून टाकू शकतात.

गर्भपाताची जोखीम

गर्भपात ही एक दुर्दैवी घटना असली तरी, त्यामुळे किती धोका निर्माण होतो हे स्त्रीचा गर्भ किती महिन्यांचा आहे ह्यावर अवलंबून असते. एकूण गर्भधारणांपैकी १५% गर्भधारणा गर्भपात होऊन संपतात आणि गरोदरपणाच्या पहिल्या २० आठवड्यात संपतात.

परंतु जर गर्भपात (८ महिन्यांच्या दरम्यान) उद्भवला तर ते धोकादायक असू शकते आणि रक्तस्त्राव, वंध्यत्व आणि अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये मृत्यू यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु, नियमित तपासणी केल्याने तुम्हाला शांत राहण्यास मदत होईल आणि लवकर गर्भपात होण्याचा धोका आहे की नाही हे तुम्हाला शोधण्यात मदत होईल.

1. गर्भपात होण्याची शक्यता

पहिल्या त्रैमासिकातील गर्भपात ही एक मोठी चिंतेची बाब आहे कारण गर्भ अद्याप जगण्यासाठी पुरेसा विकसित झालेला नसतो. येथे प्रत्येक आठवड्याला गर्भपात होण्याच्या शक्यतांचे चित्रण आहे:

आठवडा ०-६ ७५%
आठवडा ७-१२ ५%
आठवडा १३-२० ३%
२० आठवड्यांपेक्षा जास्त N/A

2. वयानुसार गर्भपात होण्याची शक्यता

शिकागोच्या प्रगत प्रजनन केंद्राच्या मते, ४४४६ वर्षे वयोगटातील महिलांना गर्भधारणा कमी होण्याचा सर्वाधिक धोका असतो, असा अंदाज ६०% इतका आहे. ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमध्ये सर्वात कमी म्हणजे ८ टक्के गर्भपात नोंदवले गेलेले आहेत. त्यामुळे वृद्ध स्त्रियांच्या तुलनेत तरुण स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता कमी असते

आईच्या वयानुसार गर्भपात होण्याच्या शक्यतांचे टेबल खाली दिलेले आहे.

<३० ८%
३०-४० १२ %
३५-३७ १६%
३८-३९ २२%
४०-४१ ३३%
४२-४३ ४५%
४४-४६ ६०%

गर्भपात होऊन किती गर्भधारणा संपुष्टात येतात?

सुमारे १५२० % गर्भधारणा गर्भपात होऊन संपुष्टात येतात. बहुतेक गर्भपात गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत होतात किंवा काही वेळा दुसऱ्या तिमाहीत सुद्धा गर्भपात होण्याची शक्यता असते. स्त्रीचे वय जसजसे वाढेल तसे गर्भपाताची शक्यता वाढते.

गर्भपातानंतरची काळजी

गर्भपातानंतर बरे होण्यासाठी तुम्ही पाळल्या पाहिजेत अश्या गोष्टींची यादी आहे. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बरे होण्यासाठी स्वतःला वेळ द्या. तुम्हाला काही दिवस रक्तस्त्राव होऊ शकतो आणि ते वेदनादायक आणि निराशाजनक असू शकते, परंतु तुमच्या प्रियजनांपासून स्वतःला दूर करू नका. पुढील काही दिवस किंवा एक आठवडा तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान तपासले पाहिजे कारण मानसिक आघात आणि शारीरिक सहनशक्ती कमी झाल्याने त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. पुढील काही दिवस कोणताही लैंगिक संभोग टाळा. स्वत: ला आणि तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी थोडा वेळ देऊन आराम करण्याचा प्रयत्न करा. तसेच, गर्भपातामुळे होणारा रक्तप्रवाह टाळण्यासाठी पुढील एक किंवा दोन दिवस सॅनिटरी पॅड वापरण्याचा प्रयत्न करा.

गर्भपात टाळता येईल का?

तुम्हाला गर्भपात झाल्याचे आढळून आल्यावर सुद्धा तो रोखणे तुमच्या हातात नाही. तुमचे ओटीपोट सुरक्षित आहे याची खात्री करणे आणि त्याची चांगली काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमची औषधे तपासण्याचा नियम बनवा आणि डॉक्टरांकडून औषधे योग्य असल्याची खात्री करून घ्या.

गर्भपाताचे निदान कसे केले जाते?

गर्भपाताची लक्षणे आढळल्यानंतर डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या करतात. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे एचसीजी रक्त तपासणी. डॉक्टर ओटीपोटाची तपासणी, गर्भाच्या हृदयाचे स्कॅनिंग आणि अल्ट्रासाऊंड इत्यादी तपासण्या आणि चाचण्या करतात. अल्ट्रासाऊंडमध्ये, गर्भ थैलीचा विकास न होणे, गर्भाच्या हृदयाचे ठोके नसणे, गर्भ ५ मिमी पेक्षा मोठे असताना गर्भाच्या हृदयाचा ठोका नसणे यासारख्या काही बाबी विचारात घेतल्या जातात.

आधीच्या टप्प्यात, ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडला प्राधान्य दिले जाते आणि नंतरच्या टप्प्यात, एक्स्ट्रा ऍबडॉमिनल अल्ट्रासाऊंडला प्राधान्य दिले जाते. अल्ट्रासाऊंड सुरक्षित आणि सकारात्मक गर्भधारणेच्या बाजूने परिणाम देऊ शकतो किंवा देऊ शकत नाही हे विसरता कामा नये. गर्भपात झालेला असेल तर त्याची खात्री करण्यासाठी डॉक्टर गर्भाच्या हृदयाच्या मॉनिटरचा वापर करतील. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, हृदयाचे ठोके चुकले तरी गर्भपात झालेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. गर्भाशयाचे तोंड उघडत असल्याची खात्री करण्यासाठी ओटीपोटाची तपासणी केली जाते आणि तो गर्भपात झालेला असल्याचा मजबूत संकेत आहे.

गर्भपातानंतर गर्भधारणेचा प्रयत्न करणे

अयशस्वी गर्भधारणेनंतर गर्भधारणेचा प्रयत्न करणे खूप कठीण आणि कधीकधी क्लेशकारक असू शकते, परंतु आशा नेहमीच जागृत असते. गर्भपात झाल्यानंतर तुम्हाला गर्भधारणा होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. बाळासाठी पुन्हा प्रयत्न करावेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निर्णय घेऊन पुढे जावे. गर्भपातानंतर गर्भवती होणे शक्य आहे आणि निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने याबद्दल बोलणे आवश्यक आहे.

. गर्भपातानंतर गर्भधारणा

सर्व स्त्रियांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो आणि तो म्हणजे मी गर्भपातानंतर गर्भवती होऊ शकते का? गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी डॉक्टर थोडा वेळ थांबण्याचा सल्ला देऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तयार नसाल तर तुम्ही थांबावे.

परंतु हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. हा निर्णय पूर्णपणे स्त्रीच्या मानसिक स्थितीवर आणि कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा, संसाधने आणि इतक्या लवकर पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा यासारख्या इतर अनेक भावनिक आणि मानसिक घटकांवर आधारित असू शकतो. एकदा गर्भपात झाला म्हणजे पुन्हा तो होईलच असे नाही. डॉक्टरांना भेट द्या आणि तुमच्या निवडींचे मूल्यांकन करा. तुम्हाला आत्मविश्वास वाटत असल्यास, तुम्ही पुन्हा गर्भधारणेचा प्रयत्न करू शकता. अशा परिस्थितीत डॉक्टर तुमचे सर्वोत्तम मार्गदर्शक असतील आणि तुमचे दोनपेक्षा जास्त गर्भपात झालेले असतील तर डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. अशा गंभीर परिस्थितीत, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे.

. गर्भपात झाल्यानंतर किती लवकर तुम्ही गर्भवती होऊ शकता?

काही स्त्रिया गर्भपातानंतर २ आठवड्यांच्या आत गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकतात, परंतु आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ६ महिन्यांच्या आत गर्भधारणेमुळे पुन्हा सकारात्मक आणि यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. वैद्यकीय गुंतागुंत उद्भवू शकते असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

पुन्हा गर्भपात होण्याची काही शक्यता असते का?

पुन्हा गर्भपात होण्याची काही शक्यता असते का?

गर्भपातानंतर सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा होणे शक्य आहे. सामान्यतः गर्भपात एकदाच होतो. केवळ फारच कमी महिलांमध्ये दोन किंवा अधिक सलग गर्भपात होण्याची प्रवृत्ती असते. अहवालानुसार, एकदा गर्भपात झाल्यानंतर दुसयांदा गर्भपात होण्याची शक्यता कमी आहे आणि अशा फक्त १४ टक्के घटनांची नोंद झाली आहे.

तुमच्या गरोदरपणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होणे हे एक चिंतेचे कारण आहे. रक्तस्त्राव झाल्यास, गर्भपाताची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर गर्भाशयाच्या मुखाची तपासणी आणि अल्ट्रासाऊंड करतील. चाचणीदरम्यान जर गर्भशयात कुठल्याही ऊती नसल्या किंवा तो गरोदरपणाचा अगदीच सुरुवातीचा कालावधी असेल तर पुढील उपचारांची आवश्यकता नाही. परंतु, जर गर्भ किंवा इतर ऊती अजूनही असतील तर ते शस्त्रक्रियेने किंवा औषधोपचाराने काढून टाकणे आवश्यक आहे.

भूल देऊन गर्भपाताच्या खुणा काढून टाकण्याची प्रक्रिया केल्यास रक्तस्त्राव आणि पेटके ह्यासारखे दुष्परिणाम जाणवतील. जर गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यावर बाळाचा मृत्यू झाला असेल, तर डॉक्टर जबरदस्तीने प्रसूती करतील. प्रसूतीनंतर डॉक्टर बाळाच्या मृत्यूची कारणे नाकारण्यासाठी बाळाची आणि नाळेची तपासणी करतील.

कुटुंब सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी गर्भपात हा एक कठीण अडथळा असू शकतो. परंतु , कधीकधी अव्यवहार्य गर्भधारणेतून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग असतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुरेशी काळजी घेणे, संभाव्य कारणे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि पुन्हा गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी ब्रेक घेणे ह्या गोष्टी पुढील गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. कुटुंबाकडून भावनिक आधार महत्त्वाचा असतो आणि अशा परिस्थितीत तो निर्णायक भूमिका बजावतो. पुढील गरोदरपणासाठी प्रयत्न करण्यापूर्वी विश्रांती घेऊन वस्तुस्थिती समजून घ्या आणि त्यानुसार निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्या.

आणखी वाचा:

गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता
गर्भपातानंतर लैंगिक संबंध ठेवण्याआधी किती वेळ वाट पाहावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article