Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके

बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके

बाळांसाठी स्ट्रॉबेरी – आरोग्यविषयक फायदे आणि धोके

मुलांना आवडणाऱ्या मधुर फळांपैकी स्ट्रॉबेरी हे एक फळ आहे आणि ते मुले आवडीने खातात. परंतु मुलांना स्ट्रॉबेरी द्यावी की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुलांना स्ट्रॉबेरी देणे सुरक्षित आणि योग्य आहे का हा सुद्धा विचार तुमच्या मनात येईल. मुलांना स्ट्रॉबेरीची गोड चव आवडते ह्यामध्ये काही शंका नाही परंतु त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी तुमच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.

बाळांना स्ट्रॉबेरी द्यावी का?

जरी स्ट्रॉबेरी हे जगातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक असले तरीसुद्धा ते बाळांना खायला देण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण स्ट्रॉबेरीमुळे काही मुलांमध्ये एलर्जी उद्भवू शकते. म्हणूनच, बाळ कमीतकमी १ वर्षांचे होईपर्यंत तुम्ही बाळाला स्ट्रॉबेरी देणे टाळले पाहिजे. तसेच तुमच्या कुटुंबाचा ऍलर्जीचा इतिहास सुद्धा विचारात घेतला पाहिजे.

बाळे स्ट्रॉबेरी कधी खाऊ शकतात?

ज्या वयात मुले स्ट्रॉबेरी खाऊ शकतात त्या वयात अलेर्जीची जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. लहान वयात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी, स्ट्रॉबेरी फक्त एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांनाच दिली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे उद्भवणाऱ्या जोखमीमुळे विविध आरोग्य संस्था मुलांना एक वर्ष पूर्ण झाल्यावरच स्ट्रॉबेरी खाऊ देण्याशी सहमत आहेत.

स्ट्रॉबेरीचे पोषणमूल्य

पोषक घटक प्रति १०० ग्रॅम पौष्टिक मूल्य
पाणी ९०.९५ ग्रॅम
प्रथिने .६७ ग्रॅम
कर्बोदके .६८ ग्रॅम
तंतुमय पदार्थ २ ग्रॅम
साखर .८९ ग्रॅम
व्हिटॅमिन ए .०३६ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ६ .०४७ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी ५८.८ मिग्रॅ
व्हिटॅमिन के .ug
व्हिटॅमिन ई .२९ मिग्रॅ
कॅल्शियम २८ मिग्रॅ
फॉस्फरस २७ मिग्रॅ
पोटॅशियम २२० मिग्रॅ
मॅग्नेशियम १३ मिग्रॅ
फोलेट २४ ug

स्रोत:https://en.wikipedia.org/wiki/Strawberry

वर दिलेले टेबल असे दर्शवते की स्ट्रॉबेरी केवळ चविष्ट नाहीतर तर जीवनसत्त्वे आणि पौष्टिक मूल्यांचा एक समृद्ध स्रोत आहेत. स्ट्रॉबेरी निरोगी आणि स्वादिष्ट असतात. जर बाळाला स्ट्रॉबेरीची ऍलर्जी नसेल तर तुमच्या बाळासाठी तो एक उत्तम चविष्ट पर्याय आहे.

स्ट्रॉबेरीचे पोषणमूल्य

बाळासाठी स्ट्रॉबेरीचे आरोग्यविषयक फायदे

बाळ जेव्हा खूप लहान असते तेव्हा पालक म्हणून आपल्याला नेहमीच त्याच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी हव्या असतात. स्ट्रॉबेरीचे बरेच फायदे असल्यामुळे बाळासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.

  • व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत: आपले शरीर व्हिटॅमिन सी स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे ते बाह्य स्रोतांकडून घ्यावे लागते. स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्यांचे आजार कमी होतात.
  • कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत: कॅल्शियम हाडांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, तसेच हृदय, स्नायू आणि रक्तवाहिन्या ह्यांचे कार्य चांगले चालावे म्हणून सुद्धा ह्याची मदत होते. फॉस्फरस पचन सुधारू शकते, पेशी दुरुस्त करण्यास मदत करते, प्रथिनांचे विघटन होते आणि आपल्या शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचे नियमन करण्यास ते जबाबदार असते.
  • यकृताचे रक्षण करते: स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे यकृतावरील ताण कमी होतो आणि यकृताचे नुकसान टाळता येते.
  • फोलेटचा चांगला स्त्रोत: फॉलीक ऍसिड किंवा फोलेट हे मुलाच्या मेंदूच्या योग्य विकासासाठी अत्यावश्यक असते. ते शरीरातील लाल रक्त पेशी तयार करण्यात मदत करते.

तुमच्या बाळाला स्ट्रॉबेरी देण्याचे काही धोके आहेत का?

बाळाला स्ट्रॉबेरी देताना त्याचे काही धोके आहेत ते खाली दिलेले आहेत:

  1. गुदमरणे: स्ट्रॉबेरी खूप चवदार असतात आणि त्यांचे आवरण खूप मऊ आणि गुळगुळीत असते. बर्‍याचदा, लहान मुले स्ट्रॉबेरीचे तुकडे चावत नाहीत तसेच गिळून टाकतात. त्यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते. म्हणूनच, मुलांना स्ट्रॉबेरी चावून खाण्यास सांगा किंवा सर्व्ह करण्यापूर्वी त्याचे बारीक तुकडे करून द्या. खाताना आपल्या मुलावर बारीक लक्ष ठेवा.
  2. ऍलर्जी प्रतिक्रिया: आपल्या मुलास स्ट्रॉबेरीची ऍलर्जी असू शकते आणि अशा प्रकारे, आपल्या मुलाच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही ह्या शक्यतांचा विचार केला पाहिजे. काही कुटुंबांना अन्न, किंवा दम्याच्या ऍलर्जीचा इतिहास असतो. अशा वेळी, आपल्या मुलाला स्ट्रॉबेरी देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. चेहरा, जीभ किंवा घशाला सूज येणे ही ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचेवर पुरळ सुद्धा उठू शकतात. ह्या ऍलर्जीचा उपचार केला जाऊ शकतो.

बाळांना स्ट्रॉबेरी कशी द्यावी?

स्ट्रॉबेरी कधी खायची हे माहिती करून घेतल्यानंतर आपण त्यांना स्ट्रॉबेरी कशी खाऊ घालायची हे जाणून घेऊयात.

  • आपले बाळ स्ट्रॉबेरी खाण्यास तयार आहे ह्याबाबतची चिन्हे पहा: आपल्या मुलास स्ट्रॉबेरी देण्यापूर्वी विशिष्ट चिन्हे तुम्ही तपासून पहिली पाहिजेत. बाळाचे डोक्यावर नियंत्रण, आधार घेऊन बसण्याची क्षमता, चघळण्याच्या हालचाली, वजन, पालक काय खात आहेत याची उत्सुकता, ही काही चिन्हे आहेत ज्याद्वारे मुले स्ट्रॉबेरी खाण्यास तयार आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल.
  • लहान तुकडे करा: गुदमरण्याची शक्यता टाळण्यासाठी, बाळाला खायला देण्यापूर्वी स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे करणे चांगले.

बाळांना स्ट्रॉबेरी कशी द्यावी?

  • स्ट्रॉबेरी प्युरी: आपल्या मुलाला स्ट्रॉबेरीची ओळख करून देण्यासाठी संपूर्ण फळ देण्याऐवजी तुम्ही त्यास प्युरी करून देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार स्ट्रॉबेरी दुधात किंवा पुडिंग मध्ये घालून सुद्धा देऊ शकता.
  • तीन दिवस प्रतीक्षा करा: असे केल्याने फळ किंवा अन्नामुळे ऍलर्जी उद्भवली आहे की नाही याची कल्पना येण्यास मदत होते. नवीन खाद्यपदार्थाची ओळख करून देण्यापूर्वी तुम्हाला तीन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागेल.

प्रत्येक वेळी तुम्ही बाळांना किती स्ट्रॉबेरी देऊ शकता?

बाळाचे वय लक्षात घेता, त्यांना सुरुवातीच्या काळात पाव किंवा अर्ध्या स्ट्रॉबेरीपेक्षा जास्त देऊ नये. बाळाच्या आहारामध्ये सर्व प्रकारची पोषण मूल्ये असावीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. फक्त फळांमुळे मुलाला आवश्यक असलेले सर्व पोषण मिळण्यास मदत होऊ शकत नाही.

आपल्या बाळाच्या डायपरमध्ये स्ट्रॉबेरी बियाणे आढळल्यास काय?

आपल्या मुलाच्या डायपरमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी बियाणे सापडल्यास ते अगदी सामान्य आहे! काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे कुठलाही धोका आंही

स्ट्रॉबेरी नक्कीच चवदार आणि फायदेशीर आहे, परंतु आपल्या बाळाच्या आहारात त्याचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या बाळाच्या खाण्यावर लक्ष ठेवा आणि नवीन खाद्यपदार्थांचा समावेश करण्याआधी सांगितलेल्या पद्धतींचे अनुसारण करा.

आणखी वाचा:

बाळांसाठी साबुदाणा – फायदे आणि पाककृती
तुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article