बहुतेक विवाहित जोडपी जेव्हा बाळाचा विचार करतात म्हणजेच स्वतःचे कुटुंब सुरू करण्याची त्यांची योजना असते तेव्हा ते आर्थिक स्थिरता, शारीरिक आरोग्य, चांगले स्त्रीरोगतज्ञ, कुटुंबातील सदस्यांशी जवळीक इत्यादी बाबींचा विचार करतात. जोपर्यंत गर्भधारणा होत नाही तोपर्यंत वंध्यत्वाचा विचार सुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. जेव्हा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही तेव्हा ते वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा निर्णय घेतात. प्रजनन समस्या पुरुष किंवा स्त्री किंवा दोघांमध्ये असू शकतात. वंध्यत्व हे विवाहित जोडप्यांच्या आयुष्यातील अडथळा ठरू शकतो, त्यामुळे वितर्क आणि अस्वस्थता उद्भवू शकते. वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कुणालाही दोष न देता प्रजनन क्षमता वाढविणारे योग्य उपाय शोधणे हा आहे.
वंध्यत्वाचे कारण काय?
स्त्रियांमध्ये वंध्यत्व खालील कारणांमुळे होऊ शकते:
- प्रजननाच्या भौतिक मार्गांमध्ये अडथळा
- प्रोलॅक्टिनची पातळी वाढलेली असणे
- पॉलीसिस्टिक ओवॅरियन सिंड्रोम (पीसीओएस) ची उपस्थिती
- एंडोमेट्रिओसिसची उपस्थिती
- अयोग्य पोषण
- जास्त वय
- सेलिआक रोग
पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काही कारणे अशी आहेत:
- शरीरात संप्रेरकांचे असंतुलन
- अयोग्य पोषण
- व्हॅरिकोसेल कंडिशन
- उत्सर्गविषयक समस्या
- शुक्राणूविरोधी प्रतिपिंडांची उपस्थिती
- प्रजननक्षमतेवर परिणाम करणारी काही औषधे
- रसायनांचा आणि हानिकारक पर्यावरणीय स्थितीचा संपर्क
- मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचा वापर
प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी नैसर्गिक उपाय
वर नमूद केलेल्या काही परिस्थितींमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असू शकते. तथापि, वंध्यत्वासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय आहेत जे उपयुक्त म्हणून ओळखले जातात. स्त्रियांमधील वंध्यत्वाचे हे घरगुती उपचार म्हणजे निरोगी आणि नैसर्गिक पर्याय आहेत जे शरीराला हानी पोहोचवत नाहीत. हे उपाय सेंद्रिय आहेत आणि आपल्या गरजा, अभिरुची आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार आपल्या घरात आरामात केले जाऊ शकतात. तथापि कुठलेही घरगुती उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
चला तर मग हे घरगुती उपचार काय आहेत ते पाहू या!
१. चास्टबेरी
तुम्हाला तुमच्या संप्रेरकाच्या पातळीत संतुलन साधण्याची आवश्यकता असल्यास चास्टबेरी एक चांगला पर्याय आहे. चास्टबेरी थेट पिट्यूटरी ग्रंथीवर परिणाम करते आणि प्रोलॅक्टिनची पातळी वाढलेल्या महिलांसाठी हे वरदान आहे. पाण्यामध्ये बेरी उकळवून त्या काढून राहिलेला काढा प्यायल्यास स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन वाढते. ह्याच्या कॅप्सूल सुद्धा मिळतात आणि तुमचे डॉक्टर त्या योग्य प्रमाणात घेण्याची शिफारस करतात. स्तनाचा कर्करोग, सायकोसिससाठी औषध आणि आयव्हीएफच्या बाबतीत सामान्यत: हा उपाय टाळला जातो
२. माका रूट
स्त्रिया तसेच पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा उपचार म्हणून हे अतिशय लोकप्रिय आहे. शरीरातील हार्मोन्सच्या निर्मितीसाठी हे मूळ खूप फायदेशीर आहे, विशेषत: ज्या महिलांना हायपोथायरॉईडीझम आहे अशा स्त्रियांसाठी ते जास्त उपयुक्त आहे. कोमट दूध किंवा एक छोटा चमचा माका चूर्ण वापरणे हा उत्तम मार्ग आहे. ते अगदी न्याहारीसाठी स्मूदी किंवा तृणधान्यांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. गरोदरपणात हे खावे की नाही हा अद्याप चर्चेचा विषय आहे म्हणूनच गर्भवती असताना ते खाणे टाळावे किंवा गरोदरपणाच्या आहारामध्ये त्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३.अश्वगंधा (विंटर चेरी)
विंटर चेरी किंवा अश्वगंधा ही एक लोकप्रिय औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती स्त्रीच्या वांझपणावर उपचार करण्यासाठी वापरली जाते. मासिक पाळीनंतर साधारणपणे एक आठवड्याने ही वनस्पती खाल्ली पाहिजे. ह्या औषधी वनस्पतीच्या चूर्णाचा एक छोटा चमचा, दुधामध्ये मिसळून घेतल्यास आपली प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी तो योग्य डोस आहे.
४. हेलोनिआस रूट
‘फॉल्स युनिकॉर्न रूट’ म्हणूनही ओळखले जाणारे हेलनोनियास रूट मासिक पाळी, रजोनिवृत्ती, गर्भधारणेची लक्षणे आणि वंध्यत्व यासारख्या विविध पुनरुत्पादक–संबंधित समस्यांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. ते शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी अनुकूल करते आणि नंतर संपूर्ण एस्ट्रोजेनचे कार्य सुधारित करते. ही औषधी वनस्पती ओव्हुलेशनच्या टप्प्यात गर्भाशयाला आवश्यक असणारी शक्ती निर्माण करण्यास मदत करते. याचा परिणाम असा होतो की शरीरातील पुनरुत्पादक हार्मोन्स स्थिर होतात. एकूणच, या औषधी वनस्पतीमुळे स्त्रीची संप्रेरक पातळी पुनर्संचयित होते आणि परिणामी ओव्हुलेशन वाढते.
५. अल्फाल्फा
त्यातील विटामिन मूल्याच्या अस्तित्वामुळे बहुतेक लोक या घरगुती उपचाराची निवड करतात. अल्फल्फामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के ह्यासारखी विविध प्रकारची जीवनसत्त्वे असल्याचे ओळखले जाते आणि त्या मध्ये जवळजवळ ८ पाचक एन्झाइम्स आणि पूरक खनिज पदार्थ असतात. हे संपूर्णपणे शरीरावर बर्याच प्रकारे परिणाम करते. अल्फाल्फा कमी इस्ट्रोजेन पातळी वाढवून संप्रेरक पातळी संतुलित करते. ह्यामुळे ते फायटोस्ट्रोजेन म्हणून ओळखले जाऊ शकतात. विविध सॅलडमध्ये स्प्राउट्स घालून त्याचा वापर करणे हा उत्तम मार्ग आहे. जास्त सेवन टाळण्यासाठी आपल्या डॉक्टरांद्वारे त्याची तपासणी करा.
६. पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड (डॅनडेलियन)
पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड आहे. त्याचे इंग्रजी नाव डॅनडेलियन असे आहे. ह्या फुलझाडांची चव कडू आहे परंतु त्यात जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ विपुल प्रमाणात आहेत. आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ए, सी, के, फोलेट, कॅल्शियम आणि पोटॅशियम. त्याच्या पानांमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म असतो, त्यामुळे शरीराला विविध विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत होते. शरीराची स्वच्छता करणारी औषधी वनस्पती म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. पिवळ्या रंगाची फूले येणाऱ्या ह्या रानटी फुलझाडामुळे संप्रेरकांचे संतुलन राखले जाते तसेच यकृताचे कार्य सुरळीत आणि निरोगी ठेवले जाते. शिवाय, संप्रेरकांचे संतुलन सुद्धा सुधारते.
७. द्राक्षांच्या बियांचा अर्क
पुरुषांमधील सामर्थ्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. द्राक्षांच्या बियाण्याचा अर्क हा व्हिटॅमिन सी चा एक अद्भुत स्त्रोत आहे, त्यामुळे पुरुषांमधील प्रजननक्षमता वाढते. ह्या अर्कामध्ये मजबूत अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत. हे सगळे गुणधर्म पुरुषांमध्ये अतिरिक्त सामर्थ्य आणि संरक्षणासह शुक्राणू प्रदान करतात, अशा प्रकारे त्यांचे आयुष्यमान वाढते आणि ते अंड्यांपर्यंत पोहोचेपर्यंत शुक्राणूंची जगण्याची शक्यता वाढते.
८. रॉयल जेली
मधमाश्यांतून मिळविलेली ही जेली क्रीम सारखी असते. ही मधमाश्यांद्वारे राणी मधमाशांच्या पोषणासाठी तयार केली जाते. ह्यामध्ये विविध प्रकारची प्रथिने, फॅटी ऍसिड्स, जीवनसत्त्वे, साखर, अमीनो ऍसिड्स आणि इतर घटक भरपूर प्रमाणात असतात. लोह आणि कॅल्शियम देखील योग्य प्रमाणात असतात. रॉयल जेलीचा वापर संप्रेरक पातळीला पुन्हा संतुलित करते आणि त्यामुळे प्रजनन समस्या सुधारण्याची शक्यता वाढते.
९. बडीशेप
ज्या स्त्रियांचे वजन जास्त असते त्यांना वंध्यत्वाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर बडीशेपचा उपयोग होतो. बडीशेपमध्ये नैसर्गिकरित्या एस्ट्रोजेन आढळते आणि बडीशेप खाल्ल्यावर नैसर्गिक संप्रेरक पुनरुत्पादक चक्र नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. बडीशेप पावडर शुद्ध बटर सोबत एकत्र केल्यास मिश्रण तयार होते ते काही महिने दररोज खावे. प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे.
१०. खजूर
खजूर चवदार तर असतातच परंतु त्यामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक देखील असतात ते गर्भधारणेला मदत करतात. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. या सर्व गोष्टी स्त्रीच्या गर्भधारणेसाठी आवश्यक आहेत, तसेच शेवटपर्यंत निरोगी गर्भारपण देखील आवश्यक आहे. ते बद्धकोष्ठतेच्या उपचारात आणि आतड्यांसंबंधी हालचाली नियमित करण्यास मदत करतात. खजूर आणि धणेपूड ह्यांची पेस्ट तयार करावी, ही पेस्ट गाईच्या दुधात उकळवून घ्यावी. दररोज हे थंडगार मिश्रण पिणे आपल्या फायद्याचे आहे. स्नॅक म्हणून किंवा स्मूदीद्वारे खजूर खाल्ल्यास ते सुद्धा खूप चांगले आहे.
११. ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स
काही हार्मोन्स ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स आणि डीएचए (डॉकोहेहेक्साएनोइक acidसिड) चे नियमन करू शकत नाही. स्त्रियांमध्ये चांगले ओव्हुलेशन आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहेत. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स भरपूर प्रकारच्या पदार्थांमध्ये आढळते, जसे की विविध प्रकारचे मासे, फ्लेक्स आणि सब्जा , अक्रोड, अंडी आणि पालकांसारख्या पालेभाज्या. तथापि, गरोदरपणात मासे खाण्यापासून सावध रहा कारण त्यामध्ये पारा असतो. ओमेगा पूरक आहारामुळे गर्भवती होण्याची शक्यता वाढते आणि गर्भधारणा झाल्यावरही गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
१२. रासबेरीची पाने
रासबेरीची पाने, तसेच बियाणे तेल हे अत्यंत उपयुक्त म्हणून ओळखले जाते. त्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, तसेच कॅल्शियम आणि लोह असते. ही पाने पुरुष आणि स्त्रिया दोन्हीमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी ओळखली जातात. ही पाने ओव्हुलेशन नियमित करण्यात मदत करतात. ह्या पानांमधील कॅल्शियम गर्भाशय बळकट होण्यास मदत करतात. वाळलेल्या रास्पबेरीच्या पानांना गरम पाण्यात मिसळून हर्बल टी म्हणून पिणे सुलभ जाते. दररोज दोन कप असा चहा प्यायल्यास प्रजननक्षमता सुधारण्यास मदत होते.
१३. रेड क्लोव्हर
पौष्टिक औषधी म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. रेड क्लोव्हरमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजे असतात. त्यामध्ये रक्त शुध्दीकरणाचे उत्तम गुण आहेत. रक्त प्रवाह वाढविण्यासाठी आणि इस्ट्रोजेन पातळीस उत्तेजन देण्यासाठी ही वनस्पती मदत करते. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजांची उपस्थिती शरीराच्या स्नायूंच्या कार्यास योग्य ठेवण्यास मदत करते आणि स्त्रीच्या गर्भाशयाचे आरोग्य योग्य राखण्यास मदत करते. इस्ट्रोजेनमुळे योनीतील कोरडेपणा सुधारतो आणि योनीमार्गातील स्रावाचे प्रमाण वाढते.
१४. रॉक सॉल्ट
कधीकधी, वंध्यत्वाचा उपचार करण्यासाठी आपल्याला फॅन्सी आणि विदेशी औषधी वनस्पतींची आवश्यकता नसते. रॉक सॉल्ट बाजारात सहज उपलब्ध असते आणि प्रजनन क्षमता सुधारण्यात मदत करू शकते. रात्रभर पाण्यात खडे मीठ भिजवून पहाटेच्या वेळी हे पाणी प्यायल्यामुळे किंवा ते तुमच्या आहारात सामील केल्याने गर्भवती होण्याची शक्यता साधारण ५ ते ६ महिन्यांनंतर सुधारू शकते. रॉक सॉल्ट मध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह असते आणि ते पुरुष आणि स्त्रियांमधील सुपीकता सुधारण्यासाठी महत्वाचे आहे. पाण्यात विरघळणाऱ्या मीठाचे सेवन केल्याने स्त्रियांची मासिक पाळी सामान्य होण्यास मदत होते, परिणामी गर्भाशय निरोगी होते. हे शक्य आहे की या पाण्याचे सेवन केल्याने उलट्यांचा त्रास होऊ शकतो किंवा अतिसार होऊ शकेल – परंतु ती एक सामान्य प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही औषध घेणे थांबवू नये. काही वेळा, आपण वापरत असलेल्या रॉकसॉल्ट पाण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही सुचवितो की तुम्ही हा उपाय करून पहाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१५. दालचिनी
हा आणखी एक पर्याय आहे जो सहजपणे उपलब्ध आहे आणि तो गरोदरपणाची शक्यता वाढविण्यात मदत करू शकतो. पीसीओएस, हे वंध्यत्वाचे कारण आहे आणि त्यावर दालचिनीच्या सेवनाने मात केली जाऊ शकते. पीसीओएस असलेल्या महिलांच्या मासिक पाळीत सुधारणा करून ते अंडाशयाचे योग्य कार्य करण्यास मदत करते. दालचिनी मादीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करणार्या इतर समस्यांवर सुद्धा मदत करू शकते जसे की अनियमित पाळी , गर्भाशयातील फायब्रोइड्स किंवा एंडोमेट्रिओसिस इत्यादी. शिवाय, हे जिवाणू आणि यीस्ट–संबंधित संसर्गांवर उपचार करण्यास देखील मदत करतात. दररोज गरम पाणी पिणे आणि आहारात दालचिनीचा समावेश करण्याची शिफारस केली जाते. तथापि ती २ पेक्षा जास्त चमचे खाणे टाळा.
१६. फॉलिक ऍसिड
गरोदरपणात गर्भाच्या जन्माशी संबंधित दोष रोखण्यासाठी मुख्यतः ओळखले जाणारे फोलिक ऍसिड देखील गर्भवती होण्यासाठी मदत करू शकते. ओव्हुलेशनशी संबंधित प्रक्रिया नियमित करून योग्य प्रजनन स्थिती राखण्यासाठी फॉलिक ऍसिड हा मुख्य घटक आहे. गर्भधारणेपूर्वी काही महिन्यांसाठी फॉलिक ऍसिडच्या ४०० एमसीजी गोळ्या घेणे आवश्यक आहे. फॉलिक ऍसिड तुम्हाला गर्भवती होण्यास मदत करते तसेच मेंदू आणि पाठीच्या कण्यातील दोषांपासून बचाव करून, न जन्मलेल्या बाळाच्या विकासास मोठी मदत करते.
१७. स्टिंगिंग नेटल
गर्भाशयाशी संबंधित समस्यांचे उपचार आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी अत्यंत शिफारसीय, स्टिंगिंग नेटल एक औषधी वनस्पती आहे जी थेट मूत्रपिंडांजवळील ग्रंथीवर परिणाम करते आणि आवश्यक संप्रेरक प्रदान करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यात मदत करते. गर्भाशयाच्या आत गर्भ राहतो आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते आणि गर्भारपणाचे ९ महिने पूर्ण भरतात. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्त्रोत असल्याने प्रसुतिनंतरही स्टिंगिंग नेटलची शिफारस केली जाते कारण ते दूध निर्मितीस मदत करते तसेच नवजात बाळाला पोषकद्रव्ये प्रदान करते. दोन कप चहाचे अनेक महिने सेवन केल्याने गर्भवती होण्याची शक्यता वाढते.
१८. तुरटी
काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित असते आणि तरीही गर्भधारणा होत नाही. अशा परिस्थितीत प्रजननक्षमता वाढण्यासाठी तुरटी हा एक चांगला उपाय आहे. तुरटीचा एक छोटा तुकडा घेऊन कापसात गुंडाळा. रात्री झोपताना, योनीच्या आत ठेवा आणि सकाळी काढा. कापसावर पांढरा दुधाचा थर येईल. जोपर्यंत हा पांढरा थर दिसणार नाही तोपर्यंत याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. हे गरोदर राहण्याचे सक्षम असल्याचे लक्षण आहे. ह्यानंतर तुम्ही तुरटीचा तुकडा वापरणे थांबवू शकता आणि गर्भवती होण्यासाठी प्रयत्न सुरू करू शकता. परंतु ह्या पद्धतीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक कमतरता आणि संक्रमणाचा संभाव्य धोका असतो, म्हणूनच हा उपाय करण्यापूर्वी आपल्या स्त्रीरोग तज्ञाशी सल्लामसलत करा. टीपः एखाद्या तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय या उपायाचा प्रयत्न करू नये.
१९. डाळिंब
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे फळ दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी एक वरदान असल्याची अफवा आहे. त्याही पलीकडे, हे फळ पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यात यशस्वी असल्याचे ज्ञात आहे. डाळिंबामुळे गर्भाशयाच्या रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे थेट गर्भाशयाचे अस्तर जाड आणि मजबूत होते. परिणामी, गर्भपाताची शक्यता अत्यंत कमी होते. मजबूत आणि सुरक्षित गर्भाशय असल्याने, गर्भ निरोगी पध्दतीने विकसित होऊ शकतो. ताजे डाळिंब तसेच किंवा त्याचा रस करून काही आठवडे योग्य प्रमाणात खाऊ शकता.
२०. जीवनशैली मधील बदल
वरीलपैकी कोणतेही घरगुती उपाय करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीत आणि वंध्यत्वाचा सामना करण्यासाठीच्या दिनचर्यामध्ये बदल करू शकता. अल्कोहोल, तंबाखू आणि चहा, कॉफी ह्यासारखी उत्तेजक द्रव्ये कमी करणे, नियमित व्यायाम करणे, भरपूर आणि निरोगी नाश्ता खाणे, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि विश्रांती घेणे हे छोटे उपाय आहेत. हे उपाय तुमच्या गर्भधारणेच्या प्रयत्नांना पूरक ठरू शकतात.
चांगली आणि निरोगी गर्भधारणा होण्याच्या मार्गावरील वंध्यत्व ही एक लहान अडचण आहे. पुरुष किंवा स्त्रीच्या शरीरातील काही अडचणी यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी हस्तक्षेप आणू शकतात. तथापि, बऱ्याच वेळेला स्त्री आणि पुरुषांच्या वंध्यत्वावरील उपचारादरम्यान घरगुती उपचार चांगले असतात. ते नक्कीच तुमच्या शरीरास गर्भधारणेसाठी मदत करतील!
आणखी वाचा:
महिला नसबंदी (ट्युबेक्टॉमी किंवा ट्युबल लिगेशन) विषयक मार्गदर्शिका
बर्थ कंट्रोल (गर्भनिरोधक) पॅचविषयक माहिती आणि वापर