In this Article
- सर्दी आणि खोकल्याची औषधे लहान बाळे आणि मुलांसाठी सुरक्षित आहेत का?
- लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे देणे सुरक्षित आहे का?
- बाळे आणि लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे देण्याचे धोके
- हे लक्षात घ्या
- लहान बाळे आणि मुलांसाठी सर्दी खोकल्याच्या औषधांवर पर्याय
- सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करणारे घरगुती उपचार
- आपण आपल्या मुलास जास्त ओव्हर –द– काउंटर औषधे देऊ शकता का?
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
सर्दी आणि खोकला हे सामान्य आजार आहेत आणि त्यामुळे लहान मुले त्रस्त होऊ शकतात. मुलांना या आजारांनी ग्रासणे सामान्य आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना खोकला आणि सर्दीसाठी औषधे द्यावीत का? मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे? ही पोस्ट वाचा आणि आपल्या मुलाला किंवा मुलांना औषधे देण्याबाबतची तपशीलवार माहिती जाणून घ्या.
सर्दी आणि खोकल्याची औषधे लहान बाळे आणि मुलांसाठी सुरक्षित आहेत का?
नवजात बाळे किंवा लहान मुलांना सर्दी आणि खोकल्याची औषधे देणे चांगले नाही. ह्याचे कारण असे आहे की सर्दी खोकल्याची औषधे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. हे देखील सिद्ध झाले आहे की सर्दी आणि खोकल्याची औषधे ही मुलांचे फायद्यापेक्षा जास्त नुकसान करतात. शिवाय, अशी कोणतीही औषधे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच दिली पाहिजेत.
लहान बाळे आणि मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे देणे सुरक्षित आहे का?
तुम्ही बाळाला किंवा लहान मुलांना खालील सर्दी खोकल्याची औषधे देणे टाळले पाहिजे
- कफ सप्रेसंट्स
- डेकोन्जेस्टंट
- कफ एक्स्पेकटोरेन्टस
- काही प्रकारचे अँटीहास्टामाइन्स जसे की क्लोरफेनिरामाइन मॅलएट, डिफेनहायड्रॅमिन आणि ब्रोम्फेनिरामाइन
बाळे आणि लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी औषधे देण्याचे धोके
सर्दी खोकल्याची औषधे कधीकधी दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. मुला–मुलींना फिट येणे किंवा हृदयाची गती वाढणे हे काही दुष्परिणाम आहेत. तसेच, अति प्रमाणात घेतल्यास किंवा तत्सम घटकांसह दोन किंवा अधिक काउंटर औषधे घेतल्यास धोकादायक दुष्परिणाम नोंदवले गेले आहेत. सर्दी बरी करण्यासाठी औषधांचा उपयोग होतो ह्यासाठी कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे संभाव्य जोखीम टाळण्यासाठी सर्दी खोकल्यासाठी औषधे कधीतरी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय देऊ नये.
हे लक्षात घ्या
आपल्या लहान बाळाला सर्दी आणि खोकल्याची कोणतीही औषधं देण्यापूर्वी खालील मुद्द्यांचा विचार कराः
- जर आपण आपल्या बाळाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधे देत असाल तर आपण अत्यंत काळजीपूर्वक घटकांची तपासणी करत असल्याचे सुनिश्चित करा. याचे कारण असे आहे की कधीकधी औषधांमध्ये समान प्रकारचे घटक असू शकतात आणि अशी औषधे दिल्यास औषधांचा ओव्हरडोस होऊ शकते.
- मुलाचे वजन आणि वयानुसार औषधे नेहमीच द्यावीत. सहसा, औषधाच्या लेबलवर डोसेजच्या सूचना नमूद केल्या जातात, त्या काटेकोरपणे वाचा आणि त्यांचे अनुसरण करा.
- आपल्या मुलास ऍस्पिरिन देऊ नका. ऍस्पिरिन मुळे मुलांमध्ये रेयेज सिंड्रोम सारखी वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते.
लहान बाळे आणि मुलांसाठी सर्दी खोकल्याच्या औषधांवर पर्याय
बऱ्याच वेळा, छोटी बाळे आणि लहान मुलांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणे सौम्य असू शकतात आणि काही दिवसातच कमी होतात. म्हणून, कोणतीही औषधे देण्याऐवजी आपण इतर पर्याय देखील वापरुन पहा. आपल्या मुलास बरे होण्यास मदत करण्यासाठी असे बरेच घरगुती उपचार उपाय आहेत ज्याचा अवलंब तुम्ही करू शकता.
सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करणारे घरगुती उपचार
आपल्या मुलामध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दूर करण्यात मदत करणारे काही घरगुती उपचार येथे आहेतः
१. लिंबू आणि मध
लिंबू आणि मध खोकला आणि सर्दीसाठी एक उत्तम उपाय आहे. एक चमचा दिवसातून तीन वेळा, द्यावे. कोमट पाण्यात मिसळलेले मध देखील एक चांगला पर्याय आहे. तथापि, बॉटुलिझमचा धोका टाळण्यासाठी एका वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मध देऊ नका.
२. हळद दूध
हा जुनाट उपाय पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. एका ग्लास दुधात फक्त एक चिमूटभर मध ढवळून घ्या आणि रात्री झोपाच्या आधी आपल्या मुलास द्या. आपण गोडीसाठी थोडासा गूळ देखील घालू शकता.
३. संत्रा रस
सर्दी होण्यास कारणीभूत असलेले जंतू नष्ट करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप चांगले काम करते. सर्वोत्तम परिणामासाठी आपल्या मुलास नियमितपणे संत्र्याचा रस द्या. परंतु, जर आपल्या मुलाचा घसा खवखवत असेल तर संत्र्याचा रस देणे टाळा.
४. चिकन सूप
गरम सूप मुळे नाक मोकळे होऊन सहजतेने श्वास घेण्यास सोपे करते. तसेच, मुलाला खोकला असेल तर त्यात दाहक–विरोधी गुणधर्म चांगले आहेत.
५. आले चहा
थोडेसे आले घालून चहा उकळवा आणि त्यातील काही चमचे आपल्या मुलास द्या. एका वर्षाखालील बाळांना काही चमचे आल्याचा चहा देऊ शकता आणि मोठ्या मुलांना आल्याचा चहाचा एक छोटा कप देऊ शकता.
आपण आपल्या मुलास जास्त ओव्हर –द– काउंटर औषधे देऊ शकता का?
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे मिळू शकतात परंतु औषध योग्य पद्धतीने कसे द्यायचे हे आपल्याला माहित नसल्यास आपल्या मुलास ते देणे टाळा. बऱ्याच डॉक्टरांचा असा विश्वास आहे की २ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना आणि मुलांना पूर्णपणे आवश्यक होईपर्यंत खोकला किंवा सर्दीची औषध देऊ नये. म्हणूनच, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय १ वर्षाच्या बाळासाठी किंवा मोठ्या मुलांसाठी सर्दी खोकल्याची औषध देताना तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचे कारण असे की बहुतेक सर्दी आणि खोकल्याची औषधे मुलाच्या वयाप्रमाणे नव्हे तर वजनानुसार दिली पाहिजे. पालकांना समजण्यास हे अवघड होऊ शकते. तसेच, ही औषधे सहजपणे उपलब्ध असल्याने आपण त्यांना आपल्या मुलास देऊ नये कारण सर्व बाबतीत त्यांची शिफारस केली जाऊ शकत नाही.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
आई–वडिलांना मुलाला डॉक्टरांकडे नेताना त्यांचे विश्लेषण करणे कठीण वाटू शकते. आपल्या मुलाच्या तंदुरुस्तीबद्दल काळजी वाटत असल्यास आपण अनुसरण करू शकता असा एक साधा नियम म्हणजे स्वत: औषधे देण्यापूर्वी त्याला ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. लहान मुले आपली वेदना किंवा अस्वस्थता व्यक्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे कधीकधी गंभीर चिन्हे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. जर आपल्या मुलाचे नाक चोंदलेले असेल तर त्यामुळे बाळाच्या झोपेत अडथळा येऊ शकेल आणि त्यामुळे बाळ चिडचिड करू शकते, म्हणूनच याची खात्री करा की आपण आपल्या बाळाला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जावे जेणेकरून त्याची अस्वस्थता कमी होईल. तसेच, डिहायड्रेशन चिंतेचे कारण बनू शकते. जर तुमच्या मुलचे तोंड सुकलेले असेल तर त्याचे कारण डिहायड्रेशन असू शकेल. तो रडत असताना कमी अश्रू येतील तसेच तो इतरही लक्षणे दर्शवेल. आपल्याला ही लक्षणे दिसल्यास त्यास पाणी द्या. आणि आपल्या लहान मुलाला सर्दी आणि खोकल्याची औषधे देण्याऐवजी वैद्यकीय मदत घ्या.
जर तुम्ही वेळेवर योग्य उपाय केले तर आपल्याला सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी कोणतेही औषध द्यावेच लागणार नाही. तथापि, जर आपले मूल आजारी दिसत असेल आणि घरगुती उपचार दिल्यानंतरही सुधारणा दिसत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.
आणखी वाचा:
बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय
मुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय