आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे का? तर मग तुमच्या मनात पुढे दिलेले विविध प्रश्न असू शकतात जसे की त्याच्यासाठी कुठले बोर्ड निवडावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तुम्ही होम स्कुलिंग किंवा शाळा नको ह्या पर्यायांचा विचार करत आहात का?
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रे अवलंबली जात आहेत, बर्याच पालकांनी आपल्या मुलांसाठी होम स्कुलिंग सुरु केले आहे. ही प्रणाली सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि बरेच काही मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. खरं तर, संपूर्ण जगामध्ये शिक्षण व्यवस्था अशी आहे जी कधीही तशीच रहात नाही. नवीन पद्धती आणि कल्पनांसह विकसित होत राहते.
म्हणून आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल चर्चा करणे अगदी सामान्य गोष्ट आहे. भारतात अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक बोर्डाविषयी माहिती शोधणे देखील महत्त्वाचे आहे. सामान्यत: चांगले बोर्ड कुठले आहे हे शोधण्याऐवजी, आपल्या मुलासाठी कुठले बोर्ड चांगले आहे ते शोधले पाहिजे.
भारतातील विविध शिक्षण मंडळे
तुम्ही वेगवेगळे अभ्यासक्रम आणि बोर्डांबद्दल चांगले किंवा वाईट समजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास, त्यानंतर भारतात जी शिक्षण मंडळे आहेत त्याबद्दल एक संक्षिप्त आढावा इथे दिलेला आहे.
१. सीबीएसई
सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आज भारतातील सर्वात सामान्य आणि सर्वाधिक मान्यताप्राप्त बोर्ड मानले जाते. जेव्हा देशातील बहुतेक शाळांकरिता सामान्य शिक्षण मंडळाचे मानकीकरण करण्याचा विचार केला जातो तेव्हा सीबीएसईने ते साध्य केले. हे राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड आहे जे देशभरातील अनेक खाजगी तसेच सार्वजनिक शाळांमध्ये अवलंबले जाते.
फायदे
- भारतात, हा सर्वात सामान्यपणे अनुसरण केलेला अभ्यासक्रम आहे आणि म्हणूनच तो सर्वत्र स्वीकारला जातो.
- भारतातील उच्च शिक्षणासाठी बर्याच महत्त्वाच्या परीक्षा सीबीएसई अभ्यासक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत कारण त्या बोर्डाची प्रासंगिकता आणि लोकप्रियता आहे.
- देशभर फिरणाऱ्या कुटुंबांना, सीबीएसई चांगले आहे कारण शाळा बदलणे सोपे आहे आणि मुलांना त्रास होत नाही.
तोटे
- जेव्हा कला विषयांचा विचार केला जातो तेव्हा निवडण्यासाठी बरेच पर्याय नसतात.
- राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना राज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएससीच्या मुलांना कमी जागा असतात.
२. आयसीएसई बोर्ड
आयसीएसई किंवा भारतीय माध्यमिक शिक्षणासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा एक मजबूत अभ्यासक्रम आहे जो संकल्पनांच्या मूलभूत गोष्टी आणि पाया ह्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो.
फायदे
- प्रत्येक डोमेनसाठी मुलांसाठी बरेच पर्याय आहेत.
- हा अभ्यासक्रम जे विद्यार्थी देशाबाहेर अभ्यास करू इच्छित आहे त्यांना मदत करतो.
तोटे
- एखाद्या विद्यार्थ्याला ह्या बोर्डाचे शिकण्याचे तंत्र नित्याचे झाल्यावर दुसर्या बोर्डात जाणे कठीण होऊ शकते.
- जर चांगले शिक्षक किंवा अध्यापनाच्या पद्धती अवलंबल्या गेल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस आणि शिकवणीद्वारे अतिरिक्त मदत घ्यावी लागते.
३. आयबी
इंटरनॅशनल बॅचलरॅट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशंसित अभ्यासक्रम आहे आणि जगभरात त्याची ओळख आहे. हा अभ्यासक्रम भारतातील १०० हून अधिक शाळांमध्ये आहे.
फायदे
- ह्या अभ्यासक्रमात शिकण्याच्या पद्धतींमध्ये विविधता आहे.
- अभ्यासक्रमात आधुनिक शिक्षण पद्धती वापरल्या जातात आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते.
- प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अगदी कमी असते आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे खूप फरक पडतो.
- हा अभ्यासक्रम बर्याचदा, जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करतो, कारण जगाच्या बर्याच देशांमध्ये हा अभ्यासक्रम आहे.
- अभ्यासक्रम रचनेत परस्परसंवाद आणि क्रियाकलाप–आधारित शिक्षण आवश्यक आहे जे मुलांना शिकण्यासाठी एक उत्तम तंत्र आहे.
तोटे
- हा अभ्यासक्रम असलेल्या बर्याच शाळा महाग आहेत.
- ह्या बोर्डाच्या शाळा बहुधा केवळ मेट्रो शहरांमध्येच आढळतात.
- केंद्रीय किंवा राज्य अभ्यासक्रमामध्ये संक्रमण करणे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे खूप अवघड जाते.
४. राज्य मंडळ
प्रत्येक राज्यात एक राज्य बोर्ड अभ्यासक्रम असतो. ह्या बोर्डाद्वारे एक मानक परीक्षा देखील घेतली जाते. राज्य अभ्यासक्रम खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमध्ये देखील आहे. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम प्रत्येक राज्यात वेगळा असतो आणि तो विशिष्ट राज्यासाठी बनविला जातो.
फायदे
- अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संबंधित आहे.
- शिक्षणाची किंमत तुलनात्मकदृष्ट्या फारच कमी आहे.
तोटे
- बहुतेक राज्य मंडळाचा अभ्यासक्रम हा मजबूत अभ्यासक्रम आहे, परंतु अध्यापन पद्धती कालबाह्य असू शकतात.
- राज्य अभ्यासक्रम असलेल्या शाळांमधील शिक्षकांची गुणवत्ता बर्यापैकी कमी आहे.
- काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते आणि यामुळे मुलांचे शिकणे आणि त्यांच्या ज्ञानात वाढ होणे कठीण होते
५. आयजीसीएसई
आयजीसीएसई अभ्यासक्रम विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त अभ्यासक्रम करायचा आहे त्यांच्यासाठी तयार केला आहे. आयजीसीएसई अभ्यासक्रमात ब्रिटनबाहेरील रहिवाशांना आणि इंग्रजी पात्रता प्रणालीचा पाठपुरावा करू इच्छित विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
फायदे
- केंब्रिज आयजीसीएसई जगभरातील, विविध महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये देखील ओळखला जातो. ज्या मुलांना काही काळाने भारताबाहेर शिक्षण घेण्याची इच्छा आहे ते ह्या मंडळाची निवड करू शकतात.
- सहयोगात्मक शिक्षणास उत्तेजन दिले जाते. ही पद्धत विद्यार्थ्यांना एकत्र शिकण्यास मदत करते आणि स्पर्धेचा दबावही बर्याच प्रमाणात कमी करते.
- प्रमाणिकरणामुळे जगात ह्या अभ्यासक्रमाला जगात सर्वत्र मागणी आहे.
तोटे
- कठोर व्यवस्थापन पद्धती ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापित करण्यास त्रास देऊ शकतात.
- परीक्षांचे गुणांकन देखील खूप कठोर असते आणि यामुळे विद्यार्थ्यांना उच्च गुण मिळविणे कठीण होते.
- ज्या विद्यार्थ्यांना भारतात परत रहायचे आहे आणि अभ्यासाची इच्छा आहे त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे कठीण होईल कारण त्यांचे निर्माते दुसर्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांइतकेच चांगले नसतील.
६. सीआयई
केंब्रिज आंतरराष्ट्रीय परीक्षा, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त शिक्षण देते आणि जगातील दीडशेहून अधिक देशांमध्ये परीक्षा घेतली जाते.
फायदे
- विद्यार्थ्यांना विशिष्ट पद्धतीने शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी ही शिक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त आहे.
- सीआयईचा एक मोठा फायदा म्हणजे ही शिक्षणपद्धती नाविन्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे मुलाला पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे एक्सप्लोर करण्याची परवानगी मिळते.
- शिक्षकांना सुद्धा बरेच मटेरियल पुरवले जाते त्याची त्यांना मदत होते, यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे खरोखर मनोरंजक बनते.
- अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार केला आहे की त्यामुळे सर्व प्रकारचे भेदभाव आणि पक्षपातीपणा वगळला जातो.
तोटे
- सीआयई सोडून जर विद्यार्थ्याने दुसरा अभ्यासक्रम निवडला तर विद्यार्थ्यांना सीआयई सिस्टममध्ये अवलंबल्या गेलेल्या बर्याच तंत्रामुळे समायोजित करणे कठीण होऊ शकते.
- केंब्रिज बोर्ड असलेल्या शाळा सहसा बऱ्याच महाग असतात.
७. एनआयओएस
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) चे उद्दीष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण लवचिक आणि सार्वत्रिक बनविणे हे आहे. हे भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात अनुकूल बोर्डांपैकी एक बोर्ड आहे. हे बोर्ड विद्यार्थ्यांनुसार चालते आणि मुलांनी काय शिकावे, त्यांना कसे शिकायचे आहे आणि कधी शिकायचे आहे याविषयी निर्णय घेण्याची परवानगी विद्यार्थ्यांना ह्या बोर्डाने दिलेली आहे.
फायदे
- ही प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत: च्या गतीने अभ्यासाचा पर्याय प्रदान करते. या प्रणालीची लवचिकता इतर कोणासारखी नाही.
- हे शिकण्यास अनुकूल आहे आणि विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
- जुन्या शिक्षण तंत्रांपासून अधिक संबंधित आणि आधुनिक तंत्रांमधील बदल स्पष्ट केले आहेत.
- वर्गातच राहण्याचे बंधन नाही कारण शिकणे अक्षरशः कुठेही होऊ कते.
- विद्यार्थ्यांच्या आवडीवर लक्ष केंद्रित करून परीक्षा घेतल्या जातात.
तोटे
- त्यावर कोणतेही कडक नियम नसल्याने परीक्षा यंत्रणेला बरीच समस्या असल्याचे समजते.
- एनआयओएस विद्यार्थ्यांविरूद्ध सामान्यतः पक्षपात असलेला आढळून येतो, विशेषत: खासगी संस्थांकडून असे झाल्याचे आढळते. (तथापि, हे प्रमाणपत्र सरकार आणि मान्यताप्राप्त संस्थांनी मान्य केले आहे.)
जेव्हा शालेय शिक्षण आणि शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा पालक आणि मुले यांच्यावर खूप दबाव आणि तणाव असतो. खरं तर, ह्यामुळे संपूर्णपणे मुलाच्या शिक्षणाबद्दलच्या संकल्पना समजून घेण्यासही त्रास होऊ शकतो. म्हणूनच, हे सुनिश्चित करणे फार महत्वाचे आहे की आपले मूल ओझे म्हणून नव्हे तर आनंदाने शिक्षण घेते आहे. असे असले तरी मुलांवर अभ्यासासाठी दबाव आणला जात नाही अशा शाळा शोधणे अशक्य आहे, तरीही आपण घरी हे बदल करू शकता.
समजून घ्या की प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे. आपले मुल कोठे बसते हे शोधणे महत्वाचे आहे. यामुळे शिक्षणासोबत येणारा ताण आणि दबाव देखील कमी होईल.
वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे, पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य बोर्ड निवडणे कठिण वाटू शकते. कधीकधी सामाजिक पक्षपात देखील विशिष्ट बोर्डाकडे दिसतो. तथापि, प्रत्येक बोर्ड कसे आहे आणि ते आपल्या मुलासाठी योग्य आहे का हे शोधणे आवश्यक आहे. जर तुमचे मूल खालच्या वर्गात शिकत असेल तर त्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुम्ही एका वर्षानंतर त्याची शाळा नेहमीच बदलू शकता. आपल्या मुलासाठी कुठले बोर्ड चांगले आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा, तुमच्या बाळाची उत्सुकता शिक्षणाद्वारे पोसली जात आहे का आणि तो शिक्षणाच्या प्रक्रियेचा आनंद घेत आहे का हे पहिले पाहिजे.
आणखी वाचा: घरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स