Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गुढीपाडवा २०२३: तुमच्या प्रियजनांसाठी गुढीपाडव्याच्या सर्वोत्तम शुभेच्छा, मेसेजेस आणि कोट्स

गुढीपाडवा २०२३: तुमच्या प्रियजनांसाठी गुढीपाडव्याच्या सर्वोत्तम शुभेच्छा, मेसेजेस आणि कोट्स

गुढीपाडवा २०२३: तुमच्या प्रियजनांसाठी गुढीपाडव्याच्या सर्वोत्तम शुभेच्छा, मेसेजेस आणि कोट्स

गुढीपाडव्याचा सण अगदी जवळ आला आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि कोकणवासीयांसाठी तो एक मोठा दिवस आहे! कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोकही हा दिवस उगादी म्हणून साजरा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढी पाडवा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. ह्याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होते आणि कापणीच्या हंगामाची सुरूवात देखील केली जाते. वर्षाची सुरुवात काही धार्मिक परंपरांनी साजरी केली जाते ज्यामध्ये सकाळी तेल लावून अभ्यंग स्नान करणे ह्या प्रथेचा समावेश आहे. ह्या स्नानामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो असा विश्वास आहे. अभ्यंग स्नानानंतर लोक कडूलिंबाच्या पानांचे सेवन करतात कारण ते रक्त शुद्ध करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. त्यानंतर सर्व जण गुढी उभारून देवाची प्रार्थना करतात.

नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट्स

आपल्या प्रियजनांना या सुंदर गुढी पाडव्याच्या सणासाठी अभिवादन आणि शुभेच्छा देऊन सरप्राईझ द्या.

  • तुमची नवीन वर्षाची सुरुवात रंगीबेरंगी होवो ही शुभेच्छा! हे नवीनवर्ष आपल्याला भरपूर आनंद देवो तसेच नव्या आशा घेऊन येवो ही सदिच्छा. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • ह्या काळात परमेश्वर तुम्हाला भरपूर आनंद, आरोग्य, भरभराट, संपत्ती आणि आनंद देईल. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी मी तुम्हाला आनंद, प्रेम आणि उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देतो! असेच आनंदी व हसत रहा आणि सण साजरे करत रहा. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी आपणास आणि आपल्या कुटुंबास अगणित आनंद, समृद्धी, संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळो!
  • हिंदू संस्कृतीची वैभवशाली परंपरा दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दारी आला गुढीपाडव्याचा सण
    आनंदाने जगूया आयुष्याची प्रत्येक क्षण
    हा गुढी पाडवा आपणास आरोग्य, आनंद आणि समृद्धी देवो!
  • ह्या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यातील सर्व कटुता दूर निघून जावो! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • उगादीच्या या शुभ प्रसंगी तुम्हाला खूप प्रेम, आनंद आणि आयुष्यातल्या नवीन आशेसाठी शुभेच्छा!
  • गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्वजण आपल्या भोवताली प्रेम, आनंद आणि दया दाखविण्याचा संकल्प करू या! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नवीन वर्ष सुरू होताच तुम्हाला भरपूर प्रेम, आनंद आणि समृद्धीची मिळो ही सदिच्छा! उगादीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा!
  • हा गुढीपाडवा तुमच्या सर्व शुभेच्छा व स्वप्ने सत्यात उतरवू दे. तुम्हाला भरपूर यश मिळो! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नवी पालवी, नवी आशा
    तुम्हाला मिळूदेत
    नवी संधी, नवी दिशा
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
  • गुढी दारी, नवचैतन्य घरी
    नवीन संधी मिळून तुम्ही घ्यावी उंच भरारी
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट्स

  • नवीन वर्षाचा संकल्प करण्याची वेळ आहे, आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा आपण केलेले संकल्प पाळत नाही परंतु तरीही आपण ते करतोच! तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उगादीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आशा आहे की तुम्ही आनंदाने हा सण साजरा कराल आणि आपल्या प्रियकराबरोबर काही चांगला वेळ घालवाल! तुम्हाला पुढील वर्ष आनंददायी जावो! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या नवीन वर्षाच्या दिवशी नवीन उद्दीष्टे, नवीन स्वप्ने, नवीन कृत्ये प्रत्येक गोष्टीची प्रतीक्षा करीत आहेत. अपयश विसरा, चुका दुरुस्त करा, नक्कीच यश तुमचे असेल! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • ह्या गुढीपाडव्याला, मी प्रार्थना करतो की देव तुमच्यावर चांगल्या आशीर्वादाचा वर्षाव करो! गुढी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
  • ह्या हंगामात खरा आनंद, यश, दीर्घायुष्य आणि सौभाग्य तुम्हाला लाभो! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • जीवनातील प्रत्येक आनंद एक्सप्लोर करण्यासाठी आणि आपल्या सर्व स्वप्नांना वास्तविकतेत रुपांतरित करण्यासाठी आणि आपल्या सर्व प्रयत्नांना कृतीमध्ये आणण्यासाठी हा गुढीपाडवा आपल्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येवो! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!
  • आज आपण एक नवीन पुस्तक उघडणार आहोत, त्याची पृष्ठे रिक्त आहेत, आम्ही त्यांच्यावर आपल्यासाठी शुभेच्छांची अक्षरे लिहिणार आहोत आणि पहिला अध्याय नवीन वर्षाचा दिवस आहे! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नवीन वर्षांमध्ये प्रवेश करण्याची वेळ आली आहे! ह्या नवीन वर्षासाठी तुम्हाला शांती, यश आणि आनंदमयी शुभेच्छा! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • प्रेम, हास्य आणि आनंद या सर्वांसह आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात होवो! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुम्हाला आयुष्यात खूप प्रेम मिळो. ह्या नवीन वर्षात आयुष्य तुम्हाला नवीन उंचावर नेईल! तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • चैत्र पालवी फुलली. नव्या सुरुवातीची आस लागली! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात नवीन संधी आनंदाचा बहर घेऊन येवो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
  • उभारू गुढी अंगणी, बांधू तोरण दारी, नात्यांमधील गोडव्याने करू ही नवी सुरुवात साजरी गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा

वर दिलेल्या गुढीपाडव्याच्या आणि उगादीच्या शुभेच्छा, तुमच्या जवळच्या आप्तस्वकीयांना आणि प्रियजनांना पाठवा.

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक गुढीपाडव्याच्या अनेक मेसेजेसने भरून जाईल. वर दिलेल्या संदेशांपैकी तुम्हाला आवडणारा अनोखा आणि सुंदर असा शुभेच्छा संदेश निवडा! ह्या उज्ज्वल आणि रंगीबेरंगी गुढी पाडव्याच्या शुभेच्छासंदेशांद्वारे तुमचा ह्या दिवसाचा उत्साह वाढेल.

तुम्हाला गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा:

गुढीपाडव्यासाठी चविष्ट आणि विशेष पाककृती
तुमच्या कुटुंबासोबत हा गुढीपाडवा कसा साजरा कराल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article