In this Article
पहिल्यांदा बाळ घरी आले की सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येते. पण ह्या काळात बऱ्याच अनिश्चितता असतात. बाळाला तुम्ही भरवत असलेले अन्नपदार्थ तसेच तब्येतीच्या तक्रारी अशा बऱ्याच बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन हवे असते. इथे आपण १० महिन्यांच्या बाळाला काय आणि कसे भरवावे ह्याविषयी चर्चा करणार आहोत.
१० महिन्यांच्या बाळांची पोषणमूल्यांची गरज
बाळाच्या वजनानुसार त्याला ह्या वयात किती कॅलरीज लागणार आहेत हे अवलंबून असते. साधारणतः तुमच्या बाळाला ९०-१२० / कि .ग्रॅ. इतक्या कॅलरीज लागू शकतात. तज्ञांच्या मते पुरुष बाळांना ७९३ कॅलरीज आणि स्त्री बाळांना ७१७ कॅलरीज लागतात. तुमच्या बाळाला तुम्हाला लागते तसे सर्व प्रकारचे पोषण लागते. तुम्ही पिरॅमिड तक्ता बघून त्याप्रमाणे फळे, भाज्या आणि धान्ये ह्यांचे किती प्रमाण आवश्यक आहे हे बघू शकता . ह्याव्यतिरिक्त तुमच्या बाळाला योग्य प्रमाणात कॅल्शिअम आणि लोह मिळत आहे ना हे सुद्धा पहिले पाहिजे. हे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.
तुमचे बाळ एका दिवसात किती अन्न खाऊ शकते?
पोषणाच्या गरजेबरोबर, बाळाची भूक आणि गरज ह्यावर सुद्धा बाळ किती खाणार हे अवलंबून असते. परंतु साधारणपणे तुमच्या बाळाला खालील प्रमाणात अन्नाची गरज असते.
- १/४-१/२ कप सीरिअल
- १/४ -१/२ कप फळे
- १/४ -१/२ कप कापलेल्या भाज्या
- २-३ टेबल स्पून दुग्धजन्य पदार्थ
- ४ टेबल स्पून प्रथिने किंवा मांस
तुमच्या १० महिन्यांच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ
बाळाच्या वयाच्या ह्या टप्प्यावर तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाळाला नेहमीच्या जेवणासोबत स्तनपान द्यायला हवे. स्तनपान देतानाच तुम्ही त्याऐवजी घन पदार्थ किंवा फिंगर फूड देऊ शकता. पण असा काही नियम नाही की तुम्ही पूर्णपणे स्तनपान थांबवलेच पाहिजे. हा निर्णय तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. जर तुम्ही बाळाला घन पदार्थ देण्याचे ठरवले असेल तर खाली काही पदार्थ दिले आहेत ते तुमच्या बाळासाठी अगदी योग्य आहेत.
- गव्हाची इडली किंवा डोसा
- मूग डाळ खिचडी
- भाज्या घालून केलेला उपमा
- दलिया लापशी
- ताज्या फळांचा मिल्कशेक
- उकडलेली अंडी
- भाज्यांचे सूप
- घरी केलेला हलवा
- कमी तिखट सांबार
१० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता / जेवणाची योजना
इथे भारतीय बाळासाठी एक तक्ता दिला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला जेवणात काय द्यायचे ह्याची योजना करू शकता. परंतु प्रत्येक वेळेला त्यांना नवीन अन्नपदार्थाची ओळख करून दिली पाहिजे. नवीन अन्नपदार्थ देण्याआधी तीन दिवस वाट पहा, म्हणजे बाळाला त्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना ह्याची खात्री होईल. तसेच बाळाला चवीची सुद्धा ओळख होईल. तुम्ही काही बदल करून तुमच्या बाळासाठी योग्य असा आहार तक्ता बनवू शकता .
दिवस | सकाळी उठल्यावर | न्याहारी | सकाळी | दुपारचे जेवण | दुपारी | रात्रीचे जेवण | रात्री झोपताना |
सोमवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | किसलेले सफरचंद घालून सीरिअल | कापलेली पपई | भात आणि चिकन रस्सा | स्तनपान/ फॉर्मुला दूध | डोसा सांबार | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
मंगळवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | केळं घातलेली ओट्स ची लापशी | केळ्याचे तुकडे | भाज्या घालून केलेला पुलाव आणि भाजलेले मासे | स्तनपान/ फॉर्मुला दूध | चिकन सूप आणि टोस्ट | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
बुधवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | टोस्ट सोबत अंड्याचा बलक | द्राक्षे | व्हेजिटेबल पुलाव आणि दही | स्तनपान/ फॉर्मुला दूध | पोळी भाजी | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
गुरुवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | दलिया खीर | टोस्ट | भाज्या घालून केलेली खिचडी आणि दही | स्तनपान/ फॉर्मुला दूध | पोळी भाजी | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
शुक्रवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | पनीर भुर्जी सँडविच | कलिंगडाचे तुकडे | भात आणि भोपळ्याची पातळ भाजी | स्तनपान/ फॉर्मुला दूध | पोळी भाजी | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
शनिवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | फ्रेंच टोस्ट | उकडलेले गाजर | भाज्या घालून केलेलं सांबार आणि पोळी | स्तनपान/ फॉर्मुला दूध | भात आणि उकडलेले मासे | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
रविवार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | नाचणीची लापशी | उकडलेले सफरचंद | इडली सांबार | स्तनपान/ फॉर्मुला दूध | पराठा आणि बटाट्याचा रस्सा | स्तनपान/ फॉर्मुला दूध |
बाळासाठी घरी तयार करू शकतो अशा पाककृती
खाली काही पाककृती आहेत ज्या तुम्ही तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला पोषक अन्नाची ओळख करून देताना देऊ शकता
१. रवा उपमा
साहित्य
- १/२ कप रवा
- १/२ कप भाज्या जसे की गाजर, मटार, बीन्स आणि उकडलेला बटाटा
- १/४ टेबलस्पून जिरे
- १ कप पाणी
- १ चिमूटभर हळद
- १ चिमूट मीठ
- १/४ टेबलस्पून तेल किंवा तूप
कृती
- एका भांड्यात रवा चांगला खमंग भाजून घ्या. सतत हलवत रहा कारण तसे न केल्यास रवा करपण्याची शक्यता असते. आता भांडे बाजूला ठेवा. एका भांड्यात तेल किंवा तूप गरम करून घ्या.
- चांगले गरम झाल्यावर जिऱ्याची फोडणी द्या. आता वरील सर्व भाज्या घालून थोडी हळद आणि मीठ घाला, ५ मिनिटे चांगलं परतून घ्या. आता खरपूस भाजलेला रवा घालून पाणी घाला, सतत ढवळत रहा म्हणजे गाठी होणार नाहीत. उपमा थोडा पातळ असुद्या कारण थंड झाल्यावर तो आपोआप घट्ट होईल.
२. साधी खिचडी
साहित्य
- १/४ कप मटार किंवा तूर डाळ
- १/४ कप तांदूळ
- अडीच कप पाणी
- एक चिरलेला टोमॅटो
- १/४ टीस्पून तेल किंवा तूप
- १/४ टीस्पून जिरे
- एक चिमूटभर हिंग
- १/४ इंच आले
- चवीपुरते मीठ
कृती
- डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. डाळ सुद्धा पाण्यात भिजत ठेवा. नंतर दोन्हींमधील पाणी काढून टाका आणि कुकर मध्ये थोडे पाणी, हळद, मीठ घालून शिजवा. थोडे जास्त पाणी घालून खिचडी थोडी पातळ ठेवा. डाळ आणि तांदूळ चांगले शिजल्यावर एका दुसऱ्या भांड्यात तेल किंवा तूप घालून गरम करा, तेल गरम झाल्यावर थोडी जिऱ्याची फोडणी द्या. हिंग, आले, आणि टोमॅटो घालून थोडा वेळ म्हणजे साधारणतः ५ मिनिटे परतून घ्या. आता शिजवलेली खिचडी ह्यात घाला. चवीपुरते मीठ घालून खिचडी चांगली उकळू द्या. खिचडी थोडी पातळ असू द्या. आता आल्याच्या तुकडा काढून टाका कारण तुमच्या बाळाला त्याची चव आवडणार नाही.
३. अंडा भुर्जी
साहित्य
- एक अंडे
- २-३ टेबल स्पून फॉर्मुला दूध किंवा आईचे दूध
- १ टेबल स्पून किसलेले चीझ किंवा दुसरे कुठलेही ताजे चीझ
- १ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल
- चवीपुरते मीठ
- चवीसाठी मिरपूड
कृती
- एका भांड्यात अंडे फोडून घ्या. त्यामध्ये दूध घालून २ मिनिटांसाठी चांगले मिक्स करा. नंतर किसलेले चीझ घालून चांगले मिक्स करा. एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल घालून गरम करा. अंडे आणि चीझ चे मिश्रण ह्यामध्ये घालून अंडी चांगली शिजेपर्यंत चांगले मिक्स करा. मीठ तपासून पहा. तुम्ही बारीक चिरलेल्या भाज्या सुद्धा ह्यामध्ये घालू शकता.
४. चिकन आणि बटाटा सूप
साहित्य
- १/२ कप साल काढून चिरलेला पोटॅटो
- १/२ कप चिकन चे तुकडे
- १/२ कप चिरलेला कांदा
- १/२ कप ताजे किसलेले चीझ
- २ लसण्याच्या पाकळ्या
- २ टेबल स्पून बटर
- २ कप पाणी
- चवीपुरते मीठ
- चवीसाठी मिरपूड
कृती
- एका मोठ्या भांड्यात बटर गरम करून घ्या. ते गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला घाला आणि परतून घ्या. लसूण घालून २ मिनिटे हलवून परतून घ्या. बटाटे घालून पुन्हा थोडे शिजू द्या. आता थोडे पाणी घालून ते उकळू द्या. थोडे थोडे चीझ घालून सतत ढवळत रहा. पुन्हा एकदा उकळी आल्यावर त्यामध्ये चिकन चे तुकडे घाला. आता भांड्यावर झाकण ठेऊन १० मिनिटे चिकन चांगले शिजेपर्यंत ठेवा. आता चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. तुमचे सूप तयार आहे. जर तुम्ही बटाट्याचे आणि चिकन चे छोटे तुकडे केले असतील तर तुमच्या बाळाला ते खायला आवडतील. तथापि जर तुम्हाला असे वाटत असेल की बाळासाठी ते तुकडे खाणे अवघड जात आहे तर तुम्ही इमर्सन ब्लेंडर वापरून ते एकसारखं करून घेऊ शकता.
५. दलियाची खीर
साहित्य
- १/४ कप दलिया
- १ कप पाणी
- १ टेबल स्पून भाजलेल्या बदामाची पावडर
- सफरचंद किंवा केळ्याची प्युरी
कृती
- कुकर मध्ये थोडा दलिया पाणी घालून ठेवा. आणि कुकरच्या ३ शिट्ट्या करून चांगले शिजवून घ्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर, सगळे मिश्रण ब्लेंडर मध्ये फिरवून मऊ करून घ्या. सगळे मिश्रण भांड्यात काढून घ्या आणि त्यात बदामाची पावडर घालून मिक्स करून घ्या. गोड़ चवीसाठी केळं आणि सफरचंद प्युरी घाला.
बाळाला भरवतानाच्या काही टिप्स
- बाळासाठी वापरतो ते सर्व चमचे गरम पाण्याच्या भांड्यांत कमीत कमी ५ मिनिटे ठेऊन निर्जंतुक करून घ्या.
- बाळाला भरवण्याआधी तुम्ही अन्नाची चव घेऊन पहा म्हणजे, अन्न खूप जास्त गरम नाही ना ह्याची खात्री होईल.
- मीठ टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याऐवजी चीझ सारखे पदार्थ वापरून चव येईल असे पहा.
- बाळाला जी चव आवडते ते साहित्य वापरून बाळासाठी अन्नपदार्थ तयार करा
- एका वेळेला एका घन पदार्थाची ओळख बाळाला करून द्या
- बाळाला नवीन पदार्थ भरवल्यानंतर, ३ दिवस वाट पाहून बाळाला त्या पदार्थाची ऍलर्जी तर नाही ना ह्याची खात्री करा.
- बाळाला लागेल तसे स्तनपान द्या. हे वरील तक्त्यामध्ये नमूद केल्याव्यतिरिक्त आहे.
- बाळाला नवीन अन्नपदार्थ देण्याआधी तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा
१० महिन्यांच्या बाळाला भरवताना आपल्या बाळाला कुठली चव आवडते हे आपल्याला प्रयोगातूनच कळेल. आणि त्यानुसार बाळाला आवडणाऱ्या पदार्थांचा आहारतक्ता आपण तयार करू शकतो. बाळाचे अन्नपदार्थ ठरवताना फूड पिरॅमिड लक्षात असू द्या. तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधून तुम्ही बाळाला काय भरवू शकता किंवा काय नाही हे ठरवू शकता.
आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय