Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे ६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

ह्या टप्प्यावर आईला आणि बाळाला एकमेकांची जाणीव होऊ लागते बाळाने तुमच्यासोबत ६ आठवडे एकत्र घालवलेले असतात आणि त्यामुळे बाळाला तुमची सवय झालेली असते. बाळामध्ये ह्या कालावधीत खूप अंतर्गत बदल झालेले असतात आणि आधीपेक्षा बाळाची लक्षणीय वाढ झालेली असते.

तुमच्या ६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

जसजसे आठवडे पालटतात, तसे तुमच्या ६ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचा वेग आता अधिक स्पष्ट होईल. तो आपला चेहरा पाहून तुम्हाला इतर लोकांमध्ये सुद्धा ओळखू लागेल. हीच वेळ अशी आहे जेव्हा तुमचे बाळ खरोखरच तुम्हाला ओळखू लागते आणि तुम्हाला पाहून हसण्याची शक्यता असते. जरी ह्या आठवड्यात तसे झाले नाही तरीही पुढील काही आठवड्यात तसे व्हायला पाहिजे. तुमच्या बाळाला तुमच्या सोबत जास्त वेळ घालवायला आवडेल आणि तुम्ही बाळाच्या जवळ असल्यास बाळ वेगवेगळे आवाज काढून प्रतिसाद देईल.

सहा आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

या अवस्थेत, आपल्या डॉक्टरांकडून बाळाची संपूर्ण तपासणी करण्याचे वेळापत्रक तयार करणे महत्वाचे आहे. आतापर्यंत बाळाची वाढ झपाट्याने झालेली आहे, तुम्ही गेल्या वेळी तपासणी केल्यापासून ६ आठवड्यांच्या बाळाचे वजन जवळजवळ अर्धा ते एक किलो वाढलेले असू शकते. आपले डॉक्टर बाळाची पुन्हा तपासणी करतील आणि निरोगी वजन वाढ होत असल्याची खात्री करुन घेतील. पाय, कुल्ले आणि अगदी मणक्यांसारख्या शरीराच्या सर्व महत्वाच्या सांध्यांची तपासणी केली जाईल तसेच बाळाच्या हृदयाचे ठोके तपासले जातील. आपले डॉक्टर आपल्याला दररोजचे वेळापत्रक आणि विशिष्ट समस्या कशा हाताळल्या जातात याबद्दल काही प्रश्न विचारू शकतात. तसेच एक आई म्हणून तुम्ही स्वतःची देखील तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

हा टप्पा आतापर्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्या बाळाची श्रवणक्षमता पूर्णपणे विकसित झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत त्याला बरेचसे आवाज समजू शकतील आणि विविध टोनमधील बारकावे देखील समजतील. तुम्ही तुमच्या बाळासाठी शांत आणि हलके संगीत लावू शकता. जोरात आणि तीव्र संगीत लावणे टाळा. नंतर, हे गाणे तुम्ही बाळासाठी स्वतः म्हणून शकता आणि त्याला ऐकताना किंवा कौतुक करताना पाहू शकता.

जेव्हा बाळ हसायला सुरुवात करते तेव्हा बाळाच्या चेहऱ्यावरील स्नायूंचा, अभिव्यक्तीसाठी किंवा संवादासाठी वापर करण्यास सुरुवात होते. ह्या अवस्थेत आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव मोहक आणि आनंददायक असतात. बाळ आपले ओठ फडफडवू लागेल, आश्चर्याने आपल्याकडे पाहू लगेल किंवा एका वेळी एकच भुवई उंचावेल आणि हे सगळे क्षण म्हणजे आनंदाची उच्चानुभूती असेल.

दूध पाजणे

ह्या अवस्थेत, ६ आठवड्यांच्या बाळाच्या पोषण आहारात थोडा बदल होतो. बाळाला आता पूर्वीप्रमाणे सारखे सारखे दूध पाजावे लागत नाही. बाळाला दिवसभरात पाजण्याच्या वेळा ठरतील. तुम्हाला एका पेक्षा जास्त स्तन आहेत हे सुद्धा तुमच्या बाळाला समजेल आणि दुसऱ्या स्तनावर दूध पिण्याची इच्छा बाळ दर्शवेल. बाळ दूध पिताना अगदी मधेच असे होऊ शकते. बाळ अचानक स्तनपान चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या स्तनाकडे वळू शकते. जर त्याची भूक वाढली असेल तर किंवा त्याला नेहमीपेक्षा जास्त दूध हवे असेल तर बाळ दुसऱ्या स्तनाकडे वळते.

दूध पाजणे

बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल की बाळ आता पटकन फॉर्मुला संपवते. कधीकधी, कदाचित तुमचे बाळ पॅकवर नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा थोडेसे कमी किंवा थोडेसे जास्त दूध घेऊ शकते. जोपर्यंत वजन वाढण्याच्या मार्गावर आहे तोपर्यंत असे होणे पूर्णपणे ठीक आहे.

झोप

बाळाच्या झोपेच्या प्रमाणात सुद्धा ह्या कालावधीत बदल होतो. ६ आठवड्यांच्या बाळाचा झोपेचा नमुना आधीपेक्षा खूप वेगळा आहे. पूर्वी, अनेक तास सलग झोपणारे आपले बाळ आता अर्ध्या तासात भूक लागली म्हणून उठेल किंवा उठून खेळू लागेल. जरी हे नैसर्गिक असेल तरीही आपल्या बाळाला पुन्हा झोपवणे महत्वाचे आहे कारण त्यांना दररोज विशिष्ट तासांच्या झोपेची आवश्यकता असते. झोपण्याआधी बाळाला आता दूध पिण्याची आणि त्यानंतर झुलवण्याची सवय लागल्याने बाळ दूध प्यायल्यानंतर लगेच झोपत नाही. बाळाला झोपण्याची सवय लागण्यासाठी बाळाला पाळण्यात ठेवा.

वागणूक

ह्या आठवड्यात तुमच्या बाळाची वाढ होत असल्यामुळे, तुम्हाला कदाचित बाळासाठी नवीन कपडे आणावे लागतील. काही बाळांचे वजन इतरांपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते, म्हणून तुलना करू नका. जोपर्यंत बाळाचे निरोगी वजन वाढते तोपर्यंत ते ठीक आहे.

ह्या काळात बाळाने तुमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला ओळखू लागेल आणि गोड हसेल. अगदी साध्या हसण्याने देखील दोघांमध्ये संवाद होऊन मजबूत बंध निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

बाळाचे रडणे

या अवस्थेच्या आसपास असलेल्या बाळांचे जागे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. कंटाळले असल्यास किंवा त्यांना पुरेशी झोप न मिळाल्यास बाळ रडू शकते. जर तुमच्या ६ आठवड्यांच्या बाळाचे झोपेचे वेळापत्रक विस्कळीत झाले तर त्यांना पुन्हा झोपण्यास त्रास होईल आणि बाळ चिडचिडे व अस्वस्थ होईल.

कधीकधी, खूप खेळण्यांमुळे किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे बाळाची सहनशीलता संपते किंवा बरेच तास एकटेच राहिल्यामुळे मोठ्याने ओरडून त्यांची निराशा व्यक्त होऊ शकते. अशा वेळी त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांच्याबरोबर खेळल्यामुळे बाळ शांत होऊ शकत नाही आणि ते रडतच राहील. बाळाला हातात घेऊन फिरणे, त्याच्याशी बोलून त्याचे लक्ष विचलित करणे किंवा त्याला जवळ घेणे इत्यादी उपाय केल्याने बाळ लगेच शांत होऊन झोपी जाईल किंवा रडायचे थांबेल.

बाळाचे रडणे

काही वेळा तीव्र भूक किंवा वेदना देखील त्याला अस्वस्थ करतात आणि बाळ खूप रडते. आपल्या बाळाच्या रडण्यामागचे कारण शोधणे हे एक मोठे काम असू शकते. खूप वेळा बाळ रडण्याच्या घटना झाल्यानंतर तुम्हाला बाळ रडण्यामागचे कारण समजेल आणि तुम्ही त्याला शांत करू शकाल.

६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

  • बाळाला योग्य प्रमाणात दूध द्या. जर बाळ स्तनपान घेत असेल तर प्रमाण कमी करा आणि बाटलीने दूध घेत असेल तर ते वाढवा
  • अधून मधून बाळ झोपेतून जागे होत असले तरी आपल्या बाळास पुरेशी झोप मिळत आहे हे सुनिश्चित करा आणि जर तो जागा झाला असेल तर त्याला पुन्हा झोपवा
  • जोपर्यंत आपल्या मुलाचे रडणे खूपच जोरदार आणि दीर्घकाळ टिकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त बाळाला जवळ घेऊन त्याला शांत करू शकता
  • नेहमीच योग्य स्वच्छतेची खात्री करुन घ्या
  • उत्तम श्रवणशक्तीसह, दिवसाच्या विशिष्ट वेळी हलके संगीत ऐका आणि आपल्या बाळाला त्याचा आनंद द्या

चाचण्या आणि लसीकरण

सुमारे सहा आठवड्यांच्या कालावधीत, दोन प्रमुख लसीकरण होणार आहेत.

प्रथम ट्रिपल लस डीपीटी किंवा डिप्थीरिया, पेर्ट्यूसिस आणि टिटॅनस लस आहे. हे लसीकरण श्वसनाचे अनेक आजार होण्यापासून रोखण्यासाठी महत्वपूर्ण आहे, ज्यात डांग्या खोकल्याचा समावेश आहे. प्रथम टिटॅनस शॉट देखील ह्या टप्प्यावर दिला जातो.

दुसरी लस ही आयपीव्ही पोलिओ लस आहे. ह्या दोन्ही लशी दिल्यानंतर, आपल्या बाळाला अगदी हलका ताप येऊ शकतो आणि लस दिलेल्या भागात थोडीशी वेदना आणि सूज देखील येऊ शकते.

खेळ आणि क्रियाकलाप

आपले बाळ स्वतःहून शब्द तयार करण्यास अगदी लहान आहे. तथापि, त्याच्या दृश्य शक्तींमध्ये वाढ झाली आहे आणि तो वस्तू लक्षात ठेवण्याचा किंवा तत्सम आवाज काढण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्या कालावधीत वृत्तपत्रातून येणारी पत्रके किंवा सीरिअलचे जुने बॉक्स ह्यांचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. मोठी चित्रे असलेली जुने कॉमिक्स सुद्धा ह्या काळात उपयोगी आहेत. आपल्या बाळाला चित्रे किंवा रंग दाखवा आणि त्यांचे नाव जोरात आणि स्पष्ट सांगा. “निळाकिंवा पिवळाह्यासारखे सोपे शब्द वापरून पहा आणि तुमचे बाळ सुद्धा तसेच छान आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही ते पहा. तुम्ही बाळाच्या पाळण्यावर प्राण्यांच्या छोट्या वस्तू देखील टांगू शकता.

बाळ नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ पोटावर झोपून राहू शकेल. आपण बेडवर एका छोट्या शीटवर त्याला पोटावर झोपवू शकता. जेव्हा तो मान वर करून स्वतःचे संतुलन राखण्यासाठी हातांचा उपयोग करू लागेल, तेव्हा हळूवारपणे ते शीट तुमच्याकडे खेचा. असे केल्याने त्याला हालचाल केल्यासारखा भ्रम होईल आणि त्यामुळे हालचाल कशी होते हे समजेल.

खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

जर तुमचे ६ आठवड्यांचे बाळ चिडचिडे किंवा अस्वस्थ असल्याची लक्षणे असतील तर बाळ आजारी असण्याची शक्यता आहे.

बाळाचे तापमान तपासा. जर ते १००. ५ किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्या डॉक्टरांना त्याबद्दल सांगा. स्वतःहून कोणतेही औषधोपचार करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते धोकादायक असू शकते. त्याच वेळी, जर बाळाची भूक बऱ्याच प्रमाणात कमी झाली असेल तर, त्याला दूध प्यायवेसे वाटत नाही. बाळ सुस्त आणि उदास होते. कोणत्याही गंभीर परिस्थितीसाठी डॉक्टरांनी त्याची योग्य तपासणी करुन घेणे महत्वाचे आहे.

जवळजवळ दीड महिना आपल्या बाळासोबत घालविल्यामुळे, त्याच्याबरोबरचे आपले बंधन दिवसेंदिवस घट्ट होत जाईल. जसजसा बाळाशी संवाद वाढेल तसे बाळाचे नियमित वेळापत्रक तयार होईल. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल तसेच तुमच्या बाळाला सुद्धा सुरक्षित वाटेल.

मागील आठवडा: तुमचे ५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article