Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे ४६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजीविषयक टिप्स

तुमचे ४६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजीविषयक टिप्स

तुमचे ४६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजीविषयक टिप्स

४६ व्या आठवड्यात बाळाचा खूप वेगाने विकास होतो. बाळ विकासाचे अनेक महत्वाचे टप्पे पार करते. बाळाच्या विकासाचे हे टप्पे नेमके कोणते आहेत? ४६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करावे? तुम्हाला तुमच्या ४६ आठवड्याच्या बाळाविषयी माहिती असाव्यात अश्या सर्व गोष्टी ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत.

४६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाची पहिल्या वर्षात झपाट्याने वाढ होते, परंतु पहिल्या वर्षाच्या शेवटी त्याची वाढ मंदावते. बाळ आता फर्निचर धरून उभे राहू लागते. काही बाळे ह्या वयात पहिले पाऊल टाकू लागतात. संवेदी आणि संज्ञानात्मक विकासासोबत, तुमच्या बाळाचा शारीरिक विकास देखील होतो. परंतु तुम्ही सावधगिरी बाळगण्याची हीच वेळ आहे कारण आता बाळ जास्त जिज्ञासू बनते आणि जी दिसेल ती वस्तू तोंडात घालू लागते.

आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

४६ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ आता लवकरच एक वर्षाचे होणार आहे. तो स्वतंत्र होत आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासातही लक्षणीय प्रगती होत आहे. ह्या टप्प्यावर त्याचा विकास वेगाने होईल.

. मोटर कौशल्ये

आता बाळ बसू लागले आहे आणि काहीतरी धरून तो उभा सुद्धा राहू शकतो. बाळाचे घरभर रांगणे आता सामान्य आहे. तुम्ही तुमच्या बाळाला ह्या वयात पहिले पाऊल टाकताना देखील पाहू शकता.

. हात आणि डोळ्याचा समन्वय

ह्या टप्प्यापर्यंत तुमच्या हात आणि डोळ्यांचा समन्वय सुधारेल. तर्जनी आणि अंगठा ह्यांच्यामध्ये धरून तो फिंगर फूड खाऊ लागेल. त्याचे स्नायू ब्लॉक्स, खेळणी इत्यादी गोष्टी एका हातातून दुसऱ्या हातामध्ये घ्यायला मदत करतील. वस्तूंकडे बोट दाखवणे आणि बोटाने धक्का देणे अशा गोष्टी बाळ आता करू लागेल.

. संवाद कौशल्ये

ह्या वयात तुम्हाला त्याच्या संवाद कौशल्यात बदल झालेला दिसेल. त्याला आता हातवारे समजू लागतील. बाय बाय करायला सांगितल्यावर तो तसे करू लागेल. मामा, दादा, बायबाय असे काही शब्द बोलू शकेल आणि खूप बडबड करायला सुरुवात करेल. खेळत असताना त्याच्याकडून खूप ओरडणे देखील तुम्हाला ऐकू येईल.

. संज्ञानात्मक कौशल्ये

तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस जसजसा जवळ येऊ लागतो तसे तुमच्या लक्षात येईल की बाळाला आता वेगवेगळ्या वस्तू समजू लागतील. लपवलेल्या वस्तू शोधण्यात तो अधिक पारंगत होईल. तो निरीक्षणाद्वारे तुमचे किंवा इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न देखील करू लागतो. त्याची दृष्टी सुधारली असल्याने, तो रंग आणि रंगीबेरंगी चित्रे असलेल्या पुस्तकांकडे आकर्षित होईल. तो वस्तू आणि खेळणी त्यांचा रंग आणि आकारानुसार ठेवू लागेल.

बाळाला आहार देणे

४६ आठवड्यांनंतर, तुमचे बाळ इडली किंवा पॅनकेक्ससारखे मऊ घन पदार्थ खाऊ लागेल. तो त्याच्या तोंडात लहान पदार्थ ठेवून चघळू लागतो, म्हणून तुम्ही त्याला स्वतःचे स्वतः खाण्याची परवानगी देऊ शकता. परंतु,बाळ गुदमरू नये म्हणून एका वेळी एक लहान घास खातो आहे ना ते पहा. मटार किंवा शेंगदाण्यासारख्या लहान आणि गोलाकार वस्तू टाळा कारण त्यामुळे बाळ गुदमरण्याची शक्यता असते. उकडलेल्या भाज्या, केळी, चिकू, संत्री, गोड लिंबू इ. यांसारखी फळे तुम्ही त्याला देऊ शकता. तुमच्या बाळाला देण्यापूर्वी फळांमधील बिया काढून टाका किंवा फळे सोलून घ्या.

तुमचे बाळ आता रांगत सगळे घरभर फिरेल आणि त्यामुळे थकून जाईल. म्हणून, त्याला केळी, सफरचंद, चिकू, नाशपाती यांसारखी मॅश केलेली फळे आणि बटाटा, रताळे, पालक, मेथी इत्यादी पौष्टिक भाज्या द्या. तुम्ही त्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भाज्यांसोबत खिचडी देऊ शकता.

ह्या वयात लहान मुले मांसाहारी अन्न जसे की शुद्ध शिजवलेले चिकन आणि उकडलेली किंवा स्क्रॅम्बल्ड अंडी खाण्यास सुरुवात करू शकतात. तुम्ही त्याला दही, ओट्स इ. देखील देऊ शकता. तुमच्या बाळाने भरपूर पाणी पिणे सुद्धा खूप आवश्यक आहे. तुम्ही आईचे दूध देखील सुरु ठेऊ शकता. परंतु, त्याला दिवसातून ३४ वेळा स्तनपान करणे टाळा, नाहीतर त्याला घन पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही. जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू शकत नसाल तर तुम्ही त्याला १५ ते २९ औंस फॉर्म्युला दूध देऊ शकता.

आणखी वाचा: ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

बाळाला आहार देणे

बाळाची झोप

तुमच्या बाळामुळे तुमची आतापर्यंत झोप नीट झालेली नाही. तो दिवसभरात दोनदा १ ते १ तास झोपू शकतो आणि रात्री १० ते १2 तास झोपू शकतो. परंतु , जर तुमचे बाळ आजारी असेल तर त्याला झोपायला त्रास होईल.

४६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

तुमच्या ४६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत

  • तुमचे बाळ आता छान रांगत आहे त्यामुळे तो घरभर फिरत राहील. घराचा प्रत्येक कोपरा आणि घरातील प्रत्येक लहान वस्तू तो शोधत असेल. त्यामुळे, घराची फरशी आणि वस्तू व्यवस्थित स्वच्छ आणि निर्जंतुक झाल्याची खात्री करा. सर्व इलेक्ट्रिक सॉकेट्स आणि इलेक्ट्रिक उपकरणे झाकून ठेवा.
  • तुमच्या बाळाला आता दात येण्यास सुरुवात झालेली असेल त्यामुळे तो सर्व काही तोंडात टाकू शकेल. त्यामुळे तो खेळत असताना किंवा रांगत असताना त्याच्यावर लक्ष ठेवा.
  • फर्निचर धरून तो आता उभा राहू शकतो, म्हणून तो तसे करत असताना खूप सावधगिरी बाळगा. त्याच्या डोक्याला किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
  • ह्या वयात मुले स्वतंत्र होतात आणि स्वतःचे स्वतः खायला लागतात. तुमचे लहान बाळ एकाच वेळी मोठा घास तोंडात घालणार नाही ह्याकडे लक्ष द्या. तो नको असलेल्या गोष्टी खात नाही ना हे पहा.
  • तुमच्या बाळाकडे दररोज लक्ष द्या. भाषा शिकण्यास आणि वस्तू, रंग, आकार इत्यादी ओळखण्यास ह्यामुळे बाळाला मदत होईल.
  • त्याला फेरफटका मारण्यासाठी घेऊन जा. त्यामुळे त्याची नवीन लोकांशी भेट होऊ शकेल. त्याला फार काही समजणार नाही, परंतु त्यामुळे किमान त्याचे सामाजिक कौशल्य वाढेल.
  • रोज एकसारखे रुटीन असणे आणि वेळा पाळणे महत्वाचे आहे. म्हणूनच, आपले लहान बाळ दररोज वेळेवर जेवत आणि झोपत आहे ना ह्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.a

चाचण्या आणि लसीकरण

बाळाला त्याच्या वयाच्या ४६व्या आठवड्यात तीन लसी दिल्या जातात.

. तोंडावाटे पोलिओ लस

तोंडावाटे पोलिओची लस देणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ही लस बाळाला योग्य वेळी दिली पाहिजे. तुमच्या परिसरातील पल्स पोलिओ लसीकरणाच्या तारखांची माहिती मिळवा आणि तुमच्या बाळाचे लसीकरण करा.

. गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर)

९ महिने पूर्ण झाल्यावर बाळाचे हे लसीकरण होते. आतापर्यंत बाळाला ही लस दिली गेली नसेल तर ती द्या. नावाप्रमाणेच, हि लस गालगुंड, गोवर आणि रुबेला ह्या ३ आजारांपासून बाळाचे संरक्षण करते.

गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर)

. टायफॉइड संयुग्म लस

टायफॉइड संयुग्म लसीचा एकच डोस बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर दिला जाऊ शकतो.

. जपानी एन्सेफलायटीस लस (जेई)

ज्या रोगांची शक्यता आहे त्या रोगांसाठी ही लस दिली जाते.

लसीकरणाव्यतिरिक्त, तुमच्या बाळाचे डॉक्टर त्याचे डोळे, हृदयाचे ठोके, नाडी, नितंब आणि हालचाली तपासतील. डॉक्टर तुमच्या बाळाच्या डोक्याचा आकार, लांबी आणि वजन मोजतील. शिशाचा संसर्ग किंवा अशक्तपणा इत्यादी समस्यांची शंका नाहीशी करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्यास देखील सांगू शकतात.

खेळ आणि क्रियाकलाप

खेळ आणि क्रियाकलाप हे बाळाला काहीतरी शिकण्यास मदत करण्याचा एक मजेदार मार्ग आहे. हे खेळ तुमच्या आणि तुमच्या बाळामधील बंध मजबूत करण्यात मदत करतील. तुमच्या बाळाला खालील गोष्टी शिकवा

. गहाळ वस्तू शोधा

एक अतिशय ठळकपणे दिसणारी वस्तू घ्या आणि ती तुमच्या बाळाला दाखवा. मग ती वस्तू अशा प्रकारे लपवा की त्याला ते शोधणे सोपे जाईल आणि तुम्ही वस्तू लपवत असताना तो बघत नाही ना हे पहा. मग, मागे वळून ती वस्तू कुठे आहे हे त्याला विचारा. खेळाच्या सुरुवातीला त्याला वस्तू शोधण्यात मदत करा. एकदा त्याला खेळ समजण्यास सुरुवात झाली की, तुमची मदत न घेता त्याला ती वस्तू शोधण्यास सांगा आणि त्याचे लक्ष नसल्याचे पाहून तुम्ही वस्तू लपवू शकता.

हा खेळ त्याच्या उत्कृष्ट मोटर कौशल्यांचा विकास करण्यास आणि वस्तूंच्या स्थायीतेची भावना विकसित करण्यास मदत करेल.

. पीठ खेळणे

हा खेळ खेळताना बाळाच्या डोळ्यात पीठ जाऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एक ट्रे घ्या आणि त्यावर थोडे पीठ पसरवा. तुमच्या लहान बाळाला बोटानी त्या पिठाला स्पर्श करू द्या. तुम्ही त्यामध्ये काही लहान कार किंवा खेळणी देखील ठेवू शकता. तुमचे बाळ पिठाशी खेळत असताना , त्याची मोटर कौशल्ये आणि हात आणि डोळ्यांचे समन्वय सुधारेल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

लसीकरणाव्यतिरिक्त, तुम्हाला पुढील गोष्टी आढळल्यास तुम्ही बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊ शकता:

  • जर तुमचे बाळ रांगत नसेल, बडबड करत नसेल, मामा आणि दादा सारखे काही सोपे शब्द बोलत नसेल किंवा वस्तू अथवा खेळणी धरत नसेल तर
  • जर तुमचे बाळ बसलेले किंवा उभे असताना स्वतःचा समतोल राखू शकत नसेल तर
  • आणि बाळ उभे असल्यावर त्याचे पाय वाकलेले किंवा असमान वाटत असतील तर

तुमच्या बाळाला पौष्टिक आहार, प्रेम आणि काळजी हवी आहे. त्याला ते द्या. त्याला वाढताना आणि त्याचा विकास होताना पहा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article