In this Article
पालक म्हणून, तुमचं बाळ मोठे होताना पाहण्याइतके सुंदर काहीही नाही. नवजात बाळापासून ३१ आठवड्यांच्या मुलापर्यंत, प्रत्येक वाढीचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. वाढीचा प्रत्येक टप्पा, बाळाचे रांगणे आणि हसणे ह्या सगळ्यामुळे बाळाविषयी तुम्हाला प्रेम आणि आसक्तीची तीव्र भावना निर्माण होऊ शकते.
पालक होणे हे आव्हानात्मक असू शकते, परंतु मदत आणि संसाधनांचे आभार, तुम्ही आता तुमच्या बाळास आनंदी आणि निरोगी व्यक्ती बनण्यास मदत करू शकता.
३१ आठवड्यांच्या बाळाचा विकास
३१ आठवड्यांपर्यंत, तुमच्या बाळाची लक्षणीय वाढ झालेली तुम्ही बघितलेली आहे. तुमच्या नवजात बाळाला जेव्हा तुम्ही नुकतेच घरी आणले होते त्याच्या तुलनेत बाळाची वाढ खूप प्रमाणात झालेली आहे. तुमच्या बाळाने घन आहार घेण्यास सुरुवात केलेली आहे, बाळ वेगवेगळे आवाज काढू लागले आहे, बाळाने रांगण्यास सुरुवात केलेली आहे आणि बाळाचा प्रचंड उत्साह आणि ऊर्जेमुळे बाळ तुम्हाला सतत व्यस्त ठेवत आहे.
बाळाच्या वाढीचे फोटो आणि व्हिडीओ काढून तुम्ही ते जतन करू शकता आणि गेम खेळून, त्याच्या संज्ञानात्मक वाढीस मदत करू शकता तसेच त्याला निरोगी आणि पौष्टिक आहार मिळेल याची खात्री करू शकता.
३१ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
तुमच्या ३१ आठवड्याच्या बाळाचे संज्ञानात्मक, भावनिक आणि शारीरिक टप्पे विकसित झाले असतील. बाळाचा प्रत्येक दिवस नवीन असेल, कारण तुमच्या बाळाच्या विकासाच्या अनुषंगाने एक नवीन विकासाचा टप्पा उलगडत आहे.
या वयानंतर, आपल्या बाळाला खालील टप्पे साध्य करण्यास सक्षम केले पाहिजे:
- आधाराशिवाय बसणे
- बर्याचदा हसत राहणे आणि बऱ्याच नवीन गोष्टी करणे
- पिकाबू किंवा लपवा आणि शोधा खेळणे
- बोटाने वस्तू घट्ट उचलणे आणि त्यांना घट्ट धरून ठेवणे
- वेगवेगळ्या गोष्टी दर्शविण्यासाठी विविध प्रकारचे आवाज करणे
- रांगणे किंवा थोडा पुढे जाण्यास सक्षम करणे
- बोलण्याचे अनुकरण
बाळाचा आहार
तुम्ही ऑफिसला जाणार आहात किंवा घरीच असणार आहात त्यानुसार तुम्ही बाळाला स्तनपान देण्याचे वेळापत्रक ठरवण्याचा निर्णय घेऊ शकता. ब्रेस्ट पंपिंग कधी सुरू करायचे हे ठरविणे आणि आपल्या बाळाला थोडा घन आहार देण्यास सुरुवात करणे हे खूप त्रासदायक ठरू शकते. आईच्या दुधातून वाढत्या बाळासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्त्वांची पूर्तता होते. विशेषत: पहिल्या वर्षामध्ये, जर तुम्ही १२ महिन्यांपर्यंत स्तनपान देण्याचा विचार करत असाल तर आपण वेगवेगळ्या आहार सत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळापत्रक तयार करा.
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, तुम्ही तुमच्या मुलाला घन आहाराची ओळख करून दिल्यांनतर ते केवळ स्तनपानास पूरक अन्न म्हणून दिले जावे. २ वर्षांपर्यंत ते स्तनपानाऐवजी दिले जाऊ नये. तुम्ही नोकरी करत असल्यास, बाळ स्तनपानाची मागणी करू शकते त्यामुळे तुम्हाला स्तनपान कमी करावेसे वाटेल, म्हणून तुमच्या ३१ आठवड्यांच्या बाळाला त्रास होऊ नये आणि योग्य पोषण मिळावे यासाठी वेळापत्रक तयार करा.
जर तुम्ही तुमच्या बाळाला फॉर्म्युला दूध देखील दिले असेल तर तुम्ही आईचे दूध, फार्मूला दूध आणि घन पदार्थांचे मिश्रण देण्यासाठी तुम्ही वेळापत्रक तयार करू शकता. तुमच्या बाळाकडून काय संकेत मिळतात ते पहा आणि जोपर्यंत बाळ स्तनपान सोडण्याचे ठरवित नाही तोपर्यंत त्याला स्तनपान देत रहा.
बाळाला कुठले दूध देता हे महत्त्वाचे नसले तरी घनपदार्थांच्या आधी आपल्या बाळाला नेहमीचे दूध, विशेषत: आईचे दूध देणे महत्वाचे आहे जेणेकरुन त्याला संपूर्ण पोषण मिळू शकेल.
बाळाची झोप
तुमच्या ३१ आठवड्यांच्या बाळाची झोप येत्या काही महिन्यांत एक महत्वपूर्ण वळण घेईल. तुमच्या बाळाने आता पसंती आणि नापसंत विकसित करण्यास सुरवात केली आहे आणि बाळ अधिक स्वतंत्र होत जाईल.
दात येणे आणि वाढत्या हालचालींमुळे तुमच्या लहान बाळाला लहान कालावधीसाठी झोप लागेल. बाळाच्या आयुष्यातील आव्हानात्मक टप्प्यांमुळे बाळ अधिक थकलेले असू शकते. तुमच्या बाळाला रात्री झोपण्यास त्रास होऊ शकेल आणि बाळाला शांत झोप लागण्यासाठी बाळाचे लक्ष विचलित होईल अशा गोष्टी कमी करणे महत्वाचे आहे. जर तुमचे बाळ काही अस्वस्थतेमुळे किंवा हालचालींमुळे जागे झाले तर स्तनपान दिल्याने बाळास पुन्हा झोपण्यास मदत होऊ शकते.
३१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स
तुम्ही कितीही दमलेले असलात तरीही, बाळाच्या ऊर्जेमुळे तुम्हास अपार आनंद मिळेल. ३१ आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचा उत्साह तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमचे मनोरंजन करेल.
- तुमच्या लहान बाळाला विविध स्वरूपात म्हणजेच प्युरी करून, मॅश केलेले किंवा फिंगर फुड्सच्या स्वरूपात विविध भाज्या आणि फळांचा परिचय देणे सुरू करा.
- जेव्हा झोपेची वेळ येते तेव्हा, बाळाला चांगल्या झोपेची सवय लागण्यासाठी नित्यक्रम तयार करा
- कुतूहल प्रोत्साहित करा
- बाळ आणि तुमच्यामधील बंध मजबूत होण्यासाठी बाळासोबत खेळ खेळा
- तुम्ही बाळाला घन पदार्थांसोबत संतुलित प्रमाणात स्तनपान देत असल्याचे सुनिश्चित करा
- त्याच्या संज्ञानात्मक क्षमता विकसित करण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्यांचा परिचय देण्यास प्रारंभ करा
- धीर धरा आणि तुमचे बाळ अस्वस्थ का होत आहे हे समजून घ्या
- घरी एक सकारात्मक वातावरण तयार करा जेणेकरून आपल्या बाळाचे लक्ष वेधून घेतले जाईल
- तुमच्या ३१ आठवड्यांच्या बाळासोबत हसा
- खेळणी, अतिरिक्त डायपर, दुधाच्या बाटल्या, टिश्यू आणि अतिरिक्त कपड्याखाली घालायच्या आतील कपड्यांसह डायपर बॅग तयार ठेवा
- तुमच्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ओळखा आणि आपल्या लक्षात येणाऱ्या बाळाच्या कोणत्याही प्रतिभेचे पालनपोषण करा.
- आपल्या बाळाची काळजी घेणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच पालक म्हणून स्वत: ची काळजी घेणेही अधिक महत्वाचे आहे. जर तुमचे बाळ झोपले असेल तर त्याच्याबरोबर एक झोप घ्या.
- पालक म्हणून, थोडी विश्रांती घ्या आणि आपल्या लहान बाळाची काळजी घेण्यासाठी एकमेकांना मदत करा.
चाचण्या आणि लसीकरण
आपल्या बाळाला लस देणे म्हणजे त्याला गंभीर आजारांपासून वाचवण्याचा एक चांगला मार्ग आहे, जो जीवघेणा देखील असू शकतो. तुमच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत करा आणि पालक म्हणून तुम्ही सर्व चाचण्या करत असल्याचे सुनिश्चित करा आणि तुमच्या ३१ आठवड्यांच्या बाळाचे लसीकरण करा. तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी (3 शॉट्स), डीटीपी / डीटीडब्ल्यूपीचे 3 शॉट्स, एचआयबी, पोलिओ, रोटाव्हायरस, गोवर, गालगुंडा आणि रुबेला घ्यावे लागतील. तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या बाळासाठी हिपॅटायटीस ए, एचपीव्ही, वेरिसेला, न्युमोकोकल आणि मेनिंगोकोकल लसींची देखील शिफारस केली आहे. काही लसी तुमच्या बाळाला धोकादायक व्हायरसपासून वाचविण्यास मदत करतात. सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचा शॉट हेपेटायटीस बी आहे जो यकृताला हानी पोहोचवणाऱ्या हिपेटायटीस बी विषाणूपासून रक्षण करतो.
जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तेव्हा तुमच्या बाळाची वाढ योग्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाची वाढ मोजा, संपूर्ण शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय इतिहासाचा आढावा घ्या.
खेळ आणि क्रियाकलाप
आपल्या चिमुकल्याबरोबर घालवलेल्या वेळेचा आनंद घ्या आणि बाँडिंगचा अनुभव वाढविण्यासाठी त्याच्याबरोबर काही खेळ खेळण्यास सुरवात करा. या वयात आपल्या बाळाची उत्सुकता वाढेल आणि त्याचे सभोवताली लक्ष देणे सुरू होईल, त्याचे मनोरंजन करण्यासाठी त्याची वेगवेगळ्या घटकांची ओळख करुन द्या.
पालक म्हणून, आपण खेळण्यांचा वापर न करता घरी खेळू शकता हा सर्वात सोपा खेळ म्हणजे पिकाबू. जेव्हा शक्य असेल तेव्हा हा खेळ आपल्या मुलासह खेळा. याव्यतिरिक्त, तुम्ही स्ट्रिंग टॉय देखील घेऊ शकता आणि तुमच्या बाळाला तारेत अडकवलेल्या त्या खेळण्याचे हळूवारपणे अनुसरण करण्यास सांगाल. आपले बाळ खेळण्याकडे जाण्यासाठी रांगेल, त्याद्वारे त्याचे मोटर कौशल्य वाढेल.
तुम्ही तुमच्या चिमुकल्याबरोबर खेळू शकाल असा आणखी एक सोपा खेळ म्हणजे टाळ्या वाजवणे. तुमचे हात एकत्र करून टाळी वाजवा आणि तुमचे बाळ तुमची नक्कल करण्यास सुरवात करेल. तुम्ही तुमच्या बाळासाठी काही बालगीते देखील गाण्यास सुरुवात करू शकता कारण ह्या टप्प्यावर, तो आवाज ओळखण्यास आणि त्याचा संदर्भ लावण्यास सुरवात करीत आहे. तुमच्या बाळासाठी आणखी एक चांगला खेळ म्हणजे त्याचे खेळणे लपवणे आणि ते शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे. खेळणी लपवण्याचे नेहमीचे ठिकाण म्हणजे ब्लॅंकेटच्या खालची जागा होय. जेव्हा बाळाला खेळणे सापडेल तेव्हा ते खूप आनंदित होईल.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
सतर्क राहणे आणि आपल्या बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे शक्य होते. जर तुमच्या बाळाला दात येण्यामुळे खूप वेदना होत असतील आणि काही दिवस झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. जर आपल्या बाळाचे डोळे लालसर झाले असतील तर निरिक्षणानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अतिसार, उच्च ताप किंवा आपण पाहू शकता अशी शारीरिकदृष्ट्या कोणतीही असामान्य लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. .जर आपल्या बाळाच्या शौचातून रक्त पडत असेल तर डॉक्टरांना फोन करा. जर तुमच्या बाळाच्या छातीत घट्टपणा असेल आणि बाळ वेगाने श्वास घेत असेल आणि श्वास घेताना आवाज येत असेल तर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. जर तुमच्या बाळाचे ओठ आणि तोंड कोरडे असेल तर बाळ डिहायड्रेट झालेले असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि या परिस्थितीसाठी तयार असणे महत्वाचे आहे.
लसींसाठी आपण नियमित तपासणी देखील करत असल्याचे सुनिश्चित करा जेणेकरुन आपण नियमितपणे आपल्या बालरोगतज्ञांना भेट देऊ शकता.
या काळात आपल्या बाळासोबत आनंद घ्या, कारण आतापासून बाळ अधिकाधिक अंतर्ज्ञानी, जिज्ञासू असेल तसेच बाळाची कल्पनाशक्ती सुद्धा वाढलेली असेल. हे सगळे तुम्हाला माहिती होण्यापूर्वी, तुमचे लहान बाळ लवकरच एक वर्षाचे होईल, म्हणून आनंदी आणि निरोगी बाळासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा!
मागील आठवडा: तुमचे ३० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ३२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी