Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे लहान बाळ आता तुझ्याबरोबर तीन महिन्यांपासून आहे आणि बाळासोबतच्या नवीन रुटीनची तुम्हाला सवय होत आहे. तुमचे झोपेचे वेळापत्रक आता पूर्णपणे कोलमडून केले आहे आणि तुम्हाला आरशात स्वत: कडे पहाण्यासाठी सुद्धा वेळ मिळणे फारच अवघड झाले आहे. थकवा ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगलाच समजू लागला आहे. परंतु तुमच्या बाळाकडे एकदा पहा आणि तुम्ही हे सर्व विसरून जाल!. तुमचे लहान बाळ आता वयाच्या १२ व्या आठवड्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही त्याची वाढ आणि विकास कसा होत आहे हे शोधण्यासाठी उत्सुक असाल, नाही का? तर १२ आठवड्यांत तुमच्या बाळाचा विकास कसा होतो हे जाणून घेण्यासाठी वाचा!

तुमच्या १२ आठवड्याच्या बाळाचा विकास

बाळ ३ महिन्यांचे होईपर्यंत बाळाचा खूप विकास झालेला आहे. या काळात तुमच्या बाळाची वाढ झाली आहे आणि ह्यापुढेही बाळाची वाढ वेगाने होईल. ह्या काळात बाळाच्या वेगवान वाढीचा दुसरा टप्पा सुरु होईल. त्यामुळे बाळाला जास्त वेळा दूध द्यावे लागेल तसेच बाळाला पाजण्यासाठी रात्रीचे उठावे लागेल.

तुमच्या १२ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

३ महिन्यांच्या कालावधीत, बाळाला आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडून बरेच काही शिकायचे असते. १२ आठवड्यांच्या बाळाचे सरासरी वजन आधीच्यापेक्षा १. ५ ते १. ८ किलो जास्त असते.

१२ आठवड्यांच्या कालावधीत, तुमच्या बाळाला आजूबाजूला काय होते आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी कशा कार्य करतात हे समजण्यास सुरवात होईल. म्हणूनच, जेव्हा बाळाला दूध देण्याची वेळ जवळ येईल आणि जेव्हा तो तुम्हाला त्याच्याजवळ येताना पाहील तेव्हा त्याला आपल्याला दूध मिळणार आहे हे समजेल आणि त्यासाठी तो तयार राहील. त्याचप्रमाणे, झोपेच्या वेळेचा त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो तो आधी झोपेत होता त्या वेळेलाच झोपायला लागतो. परंतु बाळाची वाढ जेव्हा वेगाने होऊ लागते तेव्हा त्यात व्यत्यय येऊ लागतो.

जर तुमच्या बाळाचे झोपेचे चक्र व्यवस्थित असेल तर तुम्ही देखील थोडीशी झोप घेऊ शकता. पूर्ण वर्षाच्या विकासाचा एक चतुर्थांश भाग यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. होय, तुमच्या बाळाचा वेगाने विकास होत आहे!

दूध देणे

या काळात बाळाची वाढ वेगाने होत असते, त्यामुळे तुमच्या दुधाच्या मागणीत थोडीशी वाढ झाली आहे. काही वेळा, जर वाढ बरीच असेल तर अशी उदाहरणे देखील मिळू शकतात की बाळाला नुकतेच दूध दिलेले असताना लगेच पुढची दूध देण्याची वेळ येईल. बाळ झोपेत असताना त्याची जास्तीत जास्त वाढ होते, म्हणूनच कदाचित त्याला तीव्र भूक लागल्यामुळे दुधासाठी बाळ रडत उठते.

अन्नाची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आपोआप वेगवेगळी खाद्यउत्पादने वापरली जातात. सुरुवातीला, लहान बाळाला आवश्यक तेवढे दूध देण्यास तुमचे स्तन सक्षम नसतील, त्यामुळे फॉर्मुला सारख्या पूरक पदार्थांची आवश्यकता तुम्हाला भासू शकते. परंतु बर्‍याच वेळा, काही दिवसातच, आपल्या शरीरास वाढती मागणी समजते आणि आंतरिकपणे स्तनपानाचे देखील उत्पादन वाढवते.

झोप

हा बाळाच्या वाढीचा टप्पा असल्याने, तुमचे बाळ रात्री उठून दुधाची मागणी करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, १२ आठवड्यांच्या बाळाचे झोपेचे वेळापत्रक खूपच चांगले असते आणि बरीचशी बाळे दूध पाजल्यावर बराच काळ गाढ झोपी जातात.

झोप

बाळाला झोपण्यासाठी तुम्ही जवळ घेण्याची सवय लागू शकते आणि जर तो झोपी गेला नाही किंवा झोपायला नकार दिला तर लवकरच आपल्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. वैकल्पिकरित्या, जेव्हा खरोखर झोपेची वेळ येते तेव्हा आपण त्याला पलंगावर झोपवा आणि त्याच्यासाठी हळू आवाजात अंगाईगीत गा त्याला लगेच गुंगी येईल. काही दिवस त्याला झोपण्यासाठी तुमची गरज भासू शकेल परंतु लवकरच त्याला स्वतः झोपायची सवय होईल. जर तुम्ही खूप थकलेल्या असाल आणि एकापेक्षा जास्त रात्री तुमची झोप झालेली नसेल तर रात्रीच्या वेळी फॉर्म्युला दूध तयार करुन तुमच्या पतीला ते बाळास देण्यास सांगा. त्याऐवजी तुम्ही बाळाला स्तनपान करणे निवडले तर बाळ स्तनपान घेत असताना झोपू नका कारण यामुळे आपल्या दोघांनाही धोका होण्याची शक्यता आहे.

सुमारे १२ आठवड्यांचे बाळ इकडे तिकडे फिरण्यास उत्सुक असतील. म्हणूनच, जेव्हा ते झोपी जाते तेव्हा त्यास गुंडाळून ठेवा आणि बाळाला सुरक्षितपणे पाठीवर झोपवणे आधीपेक्षा महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही छोट्या उशांचा देखील वापर करू शकता.

वागणूक

कारण आणि परिणामाची संकल्पना आपल्या बाळाच्या मेंदूत ह्या सुमारास विकसित होऊ लागली आहे आणि एखादी गोष्ट विशिष्ट प्रकारे का कार्य करत आहे हे त्याला समजण्यास सुरूवात होते. जर बाळाला खुळखुळा किंवा आवाज करणाऱ्या इतर मऊ खेळण्यांची सवय असेल तर, खुळखुळा हलवल्यावर आवाज येतो हे त्याला समजू लागेल.

आणि गम्मत म्हणजे, खुळखुळा हलवताना त्याच्या हातामध्ये समन्वय नसेल आणि बऱ्याच वेळेला बाळ खुळखुळा आपल्या तोंडावर मारून घेते. त्यामुळे आपल्या बाळाला इजा होत नाही ना ह्याची खात्री करा आणि त्याऐवजी मऊ खेळण्यांच्या पर्यायाची निवड करा. ताकद वाढल्याने तुमच्या बाळाच्या मुठीची पकड लवकरच अधिक बळकट होईल आणि बाळाने जर तुमचे बोट पकडले तर ते तुम्हाला दूर जाऊ देणार नाही. बाळ पायांची खूप हालचाल करू लागते आणि पाय तोंडात घालू लागते.

काही वेळा, जर तुमचे बाळ थोडे जास्त उत्तेजित असेल, किंवा गुळण्या करताना जसा आवाज येतो तसा आवाज काढत असेल तर तुम्हाला बाळाच्या तोंडात दुधाचे काही थेंब पुन्हा दिसतील. जोपर्यंत हे दूध जास्त प्रमाणात नसते तोपर्यंत हे सामान्य आहे, अन्यथा कदाचित ते बाळाला उलट्या होण्याचे चिन्ह असू शकेल. तुमच्या बाळाचे वागणे हे त्यासाठी एक चांगले चिन्ह आहे.

रडणे

बाळाचे विनाकारण रडणे थांबण्यासाठी अद्याप बराच काळ जाणे बाकी आहे.परंतु आता बाळ का रडत आहे हे तुम्हाला समजू लागेल. खूप रडणाऱ्या बाळाच्या मातांपैकी तुम्ही एक असाल तर ते बाळाचे रडणे आणखी वाढणार आहे. तुम्हाला स्वतःला विश्रांती मिळावी म्हणून बाळाला व्यस्त ठेवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. आपल्या बाळाला रागावणे किंवा त्याच्यावर चिडचिड केल्याने बाळाचे रडणे आणखीनच तीव्र होईल आणि तुम्ही त्यामुळे आणखी निराश होऊ शकता.

तुमच्या १२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

तुमच्या १२ आठवड्यांच्या बाळाची काळजी तुम्ही कशी घेऊ शकता ते इथे दिलेले आहे.

  • बाळाची वाढ वेगाने होत असल्याने त्याची दुधाची मागणी वाढेल. त्यासाठी फॉर्मुला जवळ ठेवा किंवा आईचे दुध पंप करा आणि नंतर रात्री बाटलीने ते बाळास द्या
  • आपल्या बाळाजवळ कोणत्याही कठोर किंवा तीक्ष्ण वस्तू ठेवल्या गेल्या नाहीत याची खात्री करुन घ्या, कारण बाळाची उत्सुकता ह्या काळात वाढलेली असेल त्यामुळे क्षणार्धात त्या वस्तू घेऊन बाळ त्यांच्याशी खेळू लागेल
  • दररोज बाळाला दूध देण्याची, खेळण्याची आणि झोपेची वेळ ठरवा आणि त्याची दिनचर्या ठेवा. तुमच्या बाळाला त्याची सवय होईल आणि त्याला सुरक्षित वाटेल कारण पुढे काय होणार आहे हे बाळाला कळेल.

तुमच्या १२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

जर बाळाच्या दोन महिन्यांच्या वयात लसी यशस्वीरीत्या दिल्या गेल्या असतील तर ३ महिन्यांच्या वयात इतर कुठल्याही लसीची गरज भासणार नाही.

खेळ आणि क्रियाकलाप

जसे जसे आपल्या बाळाचे वय वाढत जाईल, तसतसे त्याला त्या विशिष्ट ध्वनी समजण्यास सुरवात होईल. बाळाला वेगवेगळे आवाज आणि त्यांच्यासाठी वापरलेले शब्द समजून घेण्यात मदत करण्यासाठी तुम्ही ‘क्लॅप ’ किंवा ‘बँग’असे म्हणू शकता आणि टाळी वाजवू शकता किंवा मोठा आवाज काढू शकता जेणेकरून तुमचे बाळ शब्द आणि ध्वनी यांच्यात एक संबंध बनवू शकेल. जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता आणि “टाळ्या टाळ्या” म्हणता तेव्हा तुमचे बाळ पण तुम्हाला तसेच करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपली नक्कल करून लहान मुले बरेच काही शिकतात आणि खेळांद्वारे त्यांना असे करण्याची संधी दिली जाते. हे बालगीतांद्वारे किंवा तुमच्या बाळाच्या कोणत्याही आवडत्या गाण्याद्वारे देखील केले जाऊ शकते. बाळाला त्याचे आवडते गाणे ऐकण्याची उत्सुकता वाढेल आणि त्यासोबत ते टाळ्या वाजवू लागेल.

जर तुमचे बाळ मान धरण्यास सक्षम असेल आणि चांगला आधार दिल्यास बसू शकत असेल तर त्याच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी तुम्ही आणखी एक क्रियाकलाप करून बघू शकता. मऊ गादीवर क्रॉसलेग बसा आणि आपल्या क्रॉस केलेल्या पायादरम्यान आपल्या बाळाला मध्यभागी बसवा. मग, एकतर त्याच्याकडे वाकून किंवा तुमच्या दोघांना मऊ ब्लँकेटने झाकून हळूवार आवाज करा. आपल्या बाळाला हसवण्यासाठी ब्लँकेट उघडा आणि वेगवेगळे आवाज करा. तुमच्या बाळाला हा पिकाबू खेळ आवडेल!

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

काही बाळांना इतर बाळांच्या तुलनेत काही गोष्टी शिकण्यास वेळ लागेल परंतु जर तुमच्या बाळामध्ये वाढ, प्रतिसाद किंवा ओळखण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत जसे की डोळ्यांनी तुमचा मागोवा न घेणे किंवा आवाजाला प्रतिसाद न देणे इत्यादी तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

तुमचे बाळ आता ३ महिन्यांचे झाले आहे आणि तुम्हाला वेळोवेळी विकासाची पर्याप्त आणि अधिक चिन्हे आणि लक्षणे दिसतील. तुमच्या लहान बाळाला त्याच्या शारीरिक, संज्ञानात्मक, भाषिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी मदत करणाऱ्या नवीन क्रिया करण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्या लहान बाळासोबत चांगला वेळ घालवा आणि मातृत्वाच्या ह्या टप्प्याचा आनंद घ्या.

मागील आठवडा: तुमचे ११ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १३ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article