गर्भारपण

स्तनपान बंद केल्यानंतर स्तनांमध्ये होणाऱ्या वेदना

काही स्त्रियांना स्तनपान थांबवल्यानंतरही स्तनांमध्ये वेदना होत असतात. अचानक स्तनपान बंद केल्याने दुग्धनलिकांमध्ये अडथळा निर्माण होणे, स्तनांना सूज येणे आणि स्तनदाह होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. ह्या समस्या टाळण्यासाठी, तुम्ही हळूहळू बाळाचे दूध सोडवावे अशी आम्ही शिफारस करतो. सर्वात आधी स्त्रिया स्तनपान देणे का थांबवतात ह्यामागची कारणे जाणून घेऊयात:

व्हिडीओ

https://youtu.be/sjXHEwULYJA

स्तनपान थांबवण्यामागची सामान्य कारणे

खाली दिलेल्या काही कारणांमुळे स्त्रिया बाळाला स्तनपान देणे थांबवतात:

1.सुजलेले किंवा वेदनादायक स्तन

काही स्त्रियांना पहिल्यांदा स्तनपान करणे अस्वस्थ वाटते. परिणामी त्यांना स्तनाग्रांना भेगा पडणे आणि वेदनादायक स्तनांचा त्रास होतो. ह्या वेदनांमुळे काही स्त्रिया स्तनपान बंद करतात.

2. पुरेसे दूध नसणे

अंगावरचे दूध बाळाच्या गरजांसाठी पुरेसे नाही म्हणून, काही स्त्रिया त्यांच्या बाळांना फॉर्म्युला दूध देतात.

3. करिअर

बाळंतपणानंतर लगेच कामावर रुजू होऊ इच्छिणाऱ्या नवीन मातांना स्तनपान थांबवण्याशिवाय पर्याय नसतो. कामावर किंवा घर सोडण्यापूर्वी दूध काढून ठेवणे नेहमीच शक्य नसते.

4. मोठे झालेले बाळ

पहिल्या सहा महिन्यांसाठी आईचे दूध हे बाळाच्या पोषणाचा एकमेव स्त्रोत आहे. जेव्हा मुलं हा टप्पा गाठतात, तेव्हा बऱ्याच स्त्रिया त्यांच्या मुलांना घन पदार्थांची ओळख करून देऊ शकतात.

तुम्ही स्तनपान थांबवल्यानंतर स्तनदुखीचे काय कारण असते?

स्तनपान थांबवल्यानंतर सुद्धा काही आठवड्यांपर्यंत स्तनपान करणार्‍या आईचे शरीर दूध तयार करत असते. स्तनपान करणा-या स्त्रियांना किंवा ज्या स्त्रिया पंप करून दूध काढून ठेवतात त्या स्त्रियांचे शरीर दूध तयार करत असते. या दुधाचा परिणाम दुग्धनलिकांवर होतो. बाळाला स्तनपान न दिल्यामुळे दुग्धनलिकांमध्ये दूध साठून राहते आणि त्यामुळे स्तनदाह होतो. स्तनांना सूज येते. अचानक स्तनपान करणे सोडल्याने स्तन घट्ट होऊन त्यांना वेदना होऊ शकतात

स्तनपान बंद केल्यानंतर वेदनेसह जाणवणारी इतर लक्षणे

स्तनदुखीसह तुम्हाला जाणवणारी इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

स्तनपान बंद केल्यानंतर स्तनदुखी किती काळ टिकते?

स्तन दुखणे अनेक दिवस किंवा आठवडे टिकू शकते. बहुतेक स्त्रियांना दूध सोडण्याच्या सुरुवातीच्या दिवसांत तीव्र वेदना होतात. स्तन दुखणे वेळेनुसार कमी किंवा नाहीसे झाले पाहिजे. परंतु बरेच दिवस होऊन सुद्धा स्तनातील वेदना कमी होत नसल्यास, स्त्रीरोगतज्ञांची मदत घ्या.

स्तनपान थांबवल्यानंतर स्तनदुखीवर घरगुती उपाय

जर तुम्ही स्तनपान करणाऱ्या आई असाल, तर तुम्हाला स्तनपान थांबवल्यानंतर स्तनदुखी कशी दूर करावी हे जाणून घ्यायचे आहे.  त्यासाठी इथे काही उपयुक्त घरगुती उपाय दिलेले आहेत:

1. उबदार पाण्याने आंघोळ करा

कोमट आंघोळ केल्याने किंवा कोमट पाण्याच्या टबमध्ये बसून राहिल्यास स्तनाच्या ऊती लवचिक बनू शकतात आणि त्यातून साचलेल्या दुधाचा प्रवाह कमी होतो. गरम शेक घेतल्यानेदेखील वेदनांपासून आराम मिळू शकतो

2. ब्रेस्ट पंप वापरा

तुमचे स्तन खूप भरलेले वाटत असल्यास तुम्ही ब्रेस्ट पंप देखील वापरू शकता.

3. आपल्या स्तनांची मालिश करा

तुम्हाला ब्रेस्ट पंप वापरायचा नसेल, तर दूध सोडण्यासाठी तुमचे स्तन हळू हळू दाबा. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा स्तनपान तज्ञांना योग्य पद्धतीबद्दल विचारू शकता. यामुळे तुम्हाला स्तनदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो. उबदार पाण्याने आंघोळ करताना तुम्ही तुमच्या स्तनांची  हलक्या हाताने मालिश देखील करू शकता

4. कोल्ड पॅक लावा

स्तनांवर बर्फाचे पॅक लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात.

5. तुमचे द्रवपदार्थांचे सेवन वाढवा

निर्जलीकरण आणि ताप टाळण्यासाठी पाणी प्या आणि द्रवपदार्थांचे सेवन वाढवा.

6. औषधे घेऊन पहा

तुमच्या स्तनातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही अॅसिटामिनोफेन किंवा पॅरासिटामॉल सारख्या वेदनाशामक औषधांचा वापर करू शकता. परंतु, कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

7. सेज टी प्या

सेज टी दिवसातून दोनदा पिऊनही आराम मिळतो.

8. आपल्या स्तनांवर कोबीची पाने ठेवा

आपल्या स्तनांवर ताजी आणि थंड कोबीची पाने ठेवणे हा स्तनदुखीसाठी एक उपयुक्त उपाय आहे. पाने कोमेजल्यावर ती बदला.

9. निरोगी जीवनशैली

संतुलित आहार घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तुमच्या शरीराला नवीन दिनचर्येशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी जन्मपूर्व जीवनसत्त्वे घ्या.

10. पुरेशी झोप घ्या

झोपल्यावर शरीर स्वतःला बरे करते. त्यामुळे रात्रीची चांगली झोप घ्या.

11. इतर मातांशी कनेक्ट व्हा

कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करू शकत नाही अश्या समस्यांमधून तुम्ही जात असल्यास या टप्प्यातून गेलेल्या इतर मातांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

वेदना न होता स्तनपान थांबवण्यासाठी काही टिप्स

या टिप्स तुम्हाला वेदनाशिवाय स्तनपान थांबवण्यास मदत करतील: स्तनपान थांबवणे हे आई आणि बाळ दोघांसाठी एक मानसिक आणि शारीरिक आव्हान आहे. तुमच्या बाळाचे दूध सोडवण्याचा प्रयत्न करताना धीर धरा कारण त्यासाठी वेळ लागतो आणि दोन्हीकडून खूप प्रयत्न करावे लागतात. तुमच्या बाळाला नवीन पदार्थांशी जुळवून घेण्यात खूप त्रास होऊ शकतो आणि तरीही आईच्या दुधाची मागणी होऊ शकते. त्यामुळे घाई करू नका आणि बदलांना सामोरे जाण्यासाठी   तुमच्या शरीराला आवश्यक तेवढा वेळ द्या. आणखी वाचा: स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध स्तनपान करीत असतानाच्या कालावधीत घशाचा संसर्ग होणे – उपाय आणि खबरदारी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved