गर्भधारणा होताना

ओव्हुलेशन दरम्यान होणारा रक्तस्त्राव – मी गरोदर आहे का?

तुमची पाळीची तारीख नसताना सुद्धा तुम्हाला स्पॉटिंगचा अनुभव येत असल्यास ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. रोपण प्रक्रियेदरम्यान असा रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु मासिक पाळी चक्राच्या मध्यावर हलका रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असल्यास ते ओव्हुलेशनचे देखील एक लक्षण असू शकते. चला तर मग ह्या विषयावरची अधिक माहिती घेऊयात आणि ओव्हुलेशन दरम्यानच्या रक्तस्रावाबद्दल अधिक जाणून घेऊया.

मासिक पाळी चक्राच्या मध्यावर (मिड-सायकल) होणारा रक्तस्त्राव म्हणजे काय?

मासिक पाळीची तारीख नसताना सुद्धा काही वेळा हलके डाग दिसतात किंवा रक्तस्त्राव होतो. ह्यास इंग्रजीमध्ये मिड-सायकल ब्लिडींग असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुमची मासिक पाळी येऊन गेल्यावर एका आठवड्यानंतर हा रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव ओव्हुलेशन, गर्भाशयाच्या मुखाजवळील विकृती, एंडोमेट्रिओसिस इत्यादी कारणांमुळे होऊ शकतो. मासिक पाळीच्या मध्यावर होणारा रक्तस्त्राव हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते असे बऱ्याच स्त्रिया मानतात. ओव्हुलेशनमुळे होणारे सपोर्टिंग हे प्रजननक्षमतेचे चांगले लक्षण आहे परंतु याचा अर्थ नेहमीच गर्भधारणा झालेली आहे असा होत नाही.

रक्तस्त्राव कसा असतो?

ओव्हुलेशनदरम्यान होणारा रक्तस्त्राव एक किंवा दोन दिवस टिकतो. हा रक्तस्त्राव हलका गुलाबी किंवा तपकिरी-लाल असतो. हा रक्तप्रवाह हलका असतो आणि त्यासोबतच गर्भाशयाच्या मुखातून स्त्राव येऊन  ओटीपोटात हलके पेटके येतात.

ओव्हुलेशन दरम्यान रक्तस्त्राव होण्याची संभाव्य कारणे

ओव्हुलेशन दरम्यान रक्तस्त्राव होण्याचे नेमके कारण कोणीही ठरवू शकत नसले तरी येथे काही संभाव्य कारणे दिलेली आहेत:

ओव्हुलेशन रक्तस्त्राव आणि गर्भधारणा यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?

ओव्हुलेशनच्या काळात होणारा रक्तस्त्राव प्रजनन क्षमता दर्शवतो. बाळासाठी प्रयत्न करण्याची ही योग्य वेळ आहे. मासिक पाळी चक्राच्या मध्यावर होणारा रक्तस्त्राव हे ओव्हुलेशनचे लक्षण आहे आणि कुठलीही गंभीर आरोग्यविषयक स्थिती नाही ह्याची तुम्हाला खात्री झाल्यास गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही लैंगिक संभोगाची योजना करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. मासिक पाळी चक्राच्या मध्यावर होणारा रक्तस्राव,रोपण रक्तस्रावापेक्षा कसा वेगळा आहे?

ओव्हुलेशन आणि रोपण रक्तस्त्राव यांच्यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत.

2. मासिक पाळी चक्राच्या मध्यावर (मिड-सायकल) होणारा रक्तस्त्राव आणि रोपण रक्तस्राव हा मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावापेक्षा कसा वेगळा आहे?

मासिक पाळीच्या मध्यावर होणारा रक्तस्त्राव आणि मासिक पाळी  दरम्यान होणारा रक्तस्राव ह्यामध्ये  काही फरक आहेत. हे फरक खालीलप्रमाणे आहेत:

3. ओव्हुलेशन दरम्यान तुम्हाला खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास काय?

जर तुम्हाला गंभीर रक्तस्त्राव आणि वेदना होत असतील तर गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जर एकापेक्षा जास्त वेळा मासिक पाळीसारखा रक्तस्त्राव होत असेल, तर ते ओव्यूलेशन होत नसल्याचे लक्षण असते. गर्भाशयातील पॉलीप्स, एंडोमेट्रिओसिस आणि गर्भाशयाला सूज येणे ह्यासारख्या समस्यांमुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अल्ट्रासाऊंड आणि हिस्टेरोस्कोपी करण्यासाठी आणि योग्य निदान करण्यासाठी तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.

4. मासिक पाळी चक्राच्या मध्यावर रक्तस्त्राव होणे हे गर्भधारणेचे लक्षण आहे का?

मासिक पाळी चक्राच्या मध्यावर रक्तस्त्राव ओव्हुलेशनमुळे होतो आणि म्हणजेच तुम्ही प्रजननक्षम आहात असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा तुम्हाला मासिकपाळी चक्राच्या मध्यावर रक्तस्त्राव होत असेल आणि तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असल्यास तुमची गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. परंतु, हे गर्भधारणेचे लक्षण नाही.

5. जर तुम्ही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल तर ओव्हुलेशन दरम्यान आढळणाऱ्या तपकिरी रंगांच्या स्रावाची तुम्हाला मदत होऊ शकते का?

ओव्हुलेशन दरम्यान तपकिरी रंगाचे स्पॉटिंग म्हणजे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याची योग्य वेळ आहे. परंतु जर योनीमार्गाला सूज येऊन तपकिरी रंगांचे डाग दिसत असतील तर ते आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. काही स्त्रियांना ओव्हुलेशन दरम्यान रक्तस्त्राव होणे सामान्य आहे. त्याबद्दल घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी सहसा उपचारांची आवश्यकता नसते. परंतु, जर तुम्हाला मासिक पाळी चक्राच्या मध्यावर रक्तस्त्राव होत असेल आणि त्यामुळे तीव्र पेटके आणि अस्वस्थता येत असेल तर ते इतर आरोग्याच्या समस्यांचे लक्षण असू शकते. रक्तस्त्राव होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी तसेच अल्ट्रासाऊंडसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा: ओव्युलेशन प्रेडिक्टर किट (ओ. पी. के.) ओव्युलेशनसाठी गर्भाशयाच्या श्लेष्माचा मागोवा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved