Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ स्तनपान स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध

स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध

स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध

कावीळ हे बिलिरुबिन वाढल्याचे लक्षण आहे. पूर्ण वाढ झालेल्या बालकांमध्ये ६०% आणि अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये कावीळ होण्याचे प्रमाण ८०% आहे. बिलिरुबिन हे नवजात बाळांमध्ये जुन्या लाल रक्त पेशींच्या विघटनाचे उपउत्पादन आहे. बिलिरुबीनच्या उच्च पातळीची प्राथमिक कारणे पुढीलप्रमाणे:

 • प्रौढांच्या तुलनेत नवजात बाळांमध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी असते. त्याचा परिणाम म्हणून बिलिरुबीनची रक्तातील पातळी जास्त असते.
 • मेकोनिअम (बाळाचे पहिले शौच) शरीरातून बाहेर टाकण्यास उशीर झाल्यामुळे बिलीरुबिन आतड्यांमधे पुन्हा शोषले जाते.
 • यकृत बिलीरुबिनचे विघटन करण्यास मदत करते जे मलाद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. नवजात मुलांमध्ये यकृत अविकसित असते त्यामुळे चयापचय मंदावते.

बाळांना, स्तनपानामुळे होणारी कावीळ (ब्रेस्ट फिडींग जॉन्डिस) आणि स्तनपानाच्या दुधामुळे (ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस) होणारी कावीळ म्हणजे काय?

स्तनपानाशी संबंधित दोन प्रकारची कावीळ होते. स्तनपान करताना होणारी कावीळ ही कावीळची सुरूवात म्हणजे कॅलरी कमी पडल्यामुळे आणि / किंवा अपुरे पोषण यामुळे होते. खासकरून जर बिलिरुबीनची पातळी वाढली तर आहार वाढवल्यास अशा प्रकारची कावीळ टाळण्यास किंवा त्यावर उपचार करण्यात मदत होऊ शकते.

बाळांना, स्तनपानामुळे होणारी कावीळ (ब्रेस्ट फिडींग जॉन्डिस) आणि स्तनपानाच्या दुधामुळे (ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस) होणारी कावीळ म्हणजे काय?

दुसरीकडे, स्तनपानाच्या दुधामुळे होणाऱ्या काविळीस उशिरा सुरुवात होते. स्तनपानाच्या दुधाच्या असामान्यतेमुळे कावीळ होते. जर निरोगी पूर्णमुदतीच्या अर्भकांमध्ये बिलीरुबिन एकाग्रता २७० एमयुएमओएल /ली च्या खाली राहिली तर स्तनपानामुळे होणाऱ्या काविळीमुळे किंवा दीर्घकाळापर्यंत राहणाऱ्या काविळीस जास्त थेरपीची आवश्यकता नाही. जेव्हा बिलीरुबिन एकाग्रता २७० एमयुएमओएल /ली किंवा त्यापेक्षा जास्त वाढते तेव्हा स्तनपान करताना तात्पुरता व्यत्यय येऊ शकतो.

आईच्या दुधाची कावीळ बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या आठवड्यानंतर विकसित होते आणि कोणत्याही विशिष्ट ओळखण्यायोग्य कारणाशिवाय फिजिओलॉजिकल काविळीपेक्षा जास्त काळ टिकून राहते. स्तनपानाच्या काविळीस पहिल्या काही दिवसात होते, पुढच्या काही आठवड्यांमध्ये ती सर्वात उच्च पातळीवर असते आणि बाळाच्या आयुष्याच्या ३ ऱ्या आठवड्यात अदृश्य होते. स्तनपानाची कावीळ झालेल्या बाळांच्या आयुष्यात पहिल्या काही दिवसांमध्ये सौम्य डिहायड्रेशन जाणवते आणि वजन कमी होते.

स्तनपान घेणाऱ्या बाळाला कावीळ होण्याचे कारण काय आहे?

बिलीरुबिन एक पिवळा रंगद्रव्य आहे ज्यामुळे शरीर जुन्या लाल रक्त पेशींचे पुनर्चक्रण करतो. यकृत हा एक अवयव आहे जो बिलीरुबिनचे विघटन करतो आणि त्यामुळे ते मलाद्वारे शरीरातून बाहेर पडते. नवजात मुलांच्या आयुष्यातील पहिले १ ते ५ दिवस बाळ पिवळे दिसणे सामान्य गोष्ट आहे. ३ ऱ्या किंवा ४ थ्या दिवशी रंग फिकट होत जातो.

स्तनपानाच्या दुधाची कावीळ (ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस) होण्याची कारणे

आईच्या दुधाची कावीळ बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या आठवड्यानंतर दिसून येते. कारण संपूर्णपणे माहित नसले तरी आईच्या दुधातील पदार्थ, बाळाच्या यकृतातील काही प्रथिनांचे बिलीरुबिन मध्ये विघटन करू देत नाहीत अशी शक्यता आहे.

स्तनपानाच्या काविळीची (ब्रेस्ट फिडींग जॉन्डिस) कारणे

जेव्हा बाळाला आईचे पुरेसे दूध मिळत नाही तेव्हा त्यास स्तनपान करण्यास असमर्थेमुळे झालेली ]कावीळ(ब्रेस्ट फिडींग फेल्यूर जॉन्डिस) किंवा स्तनपान न केल्यामुळे झालेली कावीळ(ब्रेस्ट नॉन फिडींग जॉन्डिस) किंवा भुकेले राहिल्यामुळे झालेली कावीळ(स्टार्व्हेशन जॉन्डिस) असे म्हणतात. पुढील परिस्थितीत अशी स्थिती उद्भवते.

 • जेव्हा अकाली जन्मलेली मुलं (मुदतीआधी जन्मली) योग्य प्रकारे आहार घेण्यास असमर्थ असतात.
 • वेळापत्रकानुसार आहार घेण्याची सवय असलेल्या बाळांनाही या अवस्थेत त्रास होऊ शकतो.
 • स्तनांना योग्य प्रकारे लॅच होण्यास सक्षम नसलेली मुले.
 • मुलांना जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा त्यांना पॅसिफायर दिले जाते आणि त्यामुळे स्तनपानात व्यत्यय येतो.

आईच्या दुधामुळे होणारी कावीळ बऱ्याच कुटुंबांमध्ये आढळते आणि बहुधा सर्व नवजात बालकांपैकी जी बालके आईच्या दुधावर अवलंबून असतात त्यापैकी एक त्रितीयांश मुलांमध्ये कावीळ झालेली आढळते.

स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये होणाऱ्या काविळीवर उपचार

स्तनपानाच्या काविळीच्या (ब्रेस्टफीडिंग जॉन्डिस) उपचार पद्धती आणि स्तनपानाच्या दुधाच्या (ब्रेस्ट मिल्क जॉन्डिस) काविळीच्या उपचार पद्धती ओव्हरलॅप होतात आणि जेव्हा बिलीरुबिनची पातळी २० मिलीग्रामपेक्षा कमी असेल (तेव्हा संपूर्ण दिवस घेतलेल्या निरोगी अर्भकांमध्ये) उपचारांचा सराव केला पाहिजे.

 • दिवसातून १० ते १२ वेळा बाळाला खायला द्या. त्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाली वाढवून बिलीरुबिन उत्सर्जित करण्यास मदत होईल.
 • बाळ स्तनाग्रांना योग्य पद्धतीने लॅच होण्यासाठी आणि बाळांचे चांगले पोषण होण्यासाठी तंज्ञांची मदत घ्या.
 • तुम्हाला बाळासाठी फॉर्मुला वापरावा लागत असल्यास, अंगावरचे दूध वाढवण्यास मदत करणाऱ्या साहित्याचा वापर करा. अंगावरच्या दुधाचा पुरवठा सुरु राहण्यासाठी पंपाच्या साहाय्याने दूध काढा. स्तनपानात येणार व्यत्यय टाळण्यासाठी अंगावरचे दूध आणि फॉर्म्युला दूध दिले जाऊ शकते.
 • जर बाळाच्या बिलीरुबिनची पातळी २० मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर फोटोथेरपी (बाळाला एक किंवा दोन दिवस प्रकाशाखाली ठेवणे) वापरुन बिलीरुबिनची पातळी खाली आणली जाऊ शकते. कारण रेणूंच्या रचनेत बदल होऊन ते शरीरातून त्वरीत काढले जाऊ शकतात. यादरम्यान, स्तनपानाच्या पुढील समस्या टाळण्यासाठी तुम्हाला स्तनपानाच्या साधनांचा वापर करण्याची आवश्यकता असेल.

स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये होणाऱ्या काविळीवर उपचार

स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये कावीळ कमी करण्यासाठी कोणत्या उपचारांची शिफारस केलेली नाही?

कावीळ कमी करण्यासाठी उपचार म्हणून काही तंत्रे वापरली जाऊ नयेत.

 • स्तनपानासोबत बाळाला साखरेचे पाणी दिल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. असे केल्याने आईच्या दुधाचे सेवन आणि उत्पादनास अडथळा येऊ शकतो आणि बिलीरुबिनच्या पातळीत घट होण्यास उशीर होऊ शकतो.
 • स्तनपान थांबविणे ही सुद्धा चांगली कल्पना नाही, कारण बाळाला सर्व पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. त्याऐवजी, बाळाला देण्यात येणाऱ्या स्तनपानाची वारंवारता वाढविणे आवश्यक आहे.

स्तनपानाच्या दुधाची कावीळ आणि स्तनपान कावीळ ह्यांचे निदान कसे केले जाते?

तुमचे बाळ स्तनाला योग्य प्रकारे लॅच होत आहेत ना तसेच आईच्या दुधाचा पुरवठा बाळासाठी पुरेसा आहे ना हे जाणून घेण्यासाठी स्तनपान तज्ञ स्तनपानाच्या वारंवारितेवर लक्ष ठेवतील. बाळाच्या डोळ्यांचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळसर तर दिसत नाही ना हे जाणून घेण्यासाठी बाळाची शारीरिक तपासणी केली जाईल . बिलीरुबिनची पातळी मोजण्यासाठी डॉक्टर अनेक चाचण्या सुचवू शकतात. लाल पेशींची संख्या, पेशींचा आकार ओळखण्यासाठी रब्लड स्मीयर इ. चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे काविळीचा धोका ओळखण्यासाठी मदत होऊ शकते. तुम्हाला, क्वचित प्रसंगी, २४ तास स्तनपान थांबवण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यादरम्यान बाळाला फॉर्म्युला दूध द्यावे असे सांगितले जाईल. बिलीरुबिनची पातळी कमी होते किंवा नाही हे तपासण्यासाठी असे करण्यास सांगितले जाते.

बाळाला स्तनपान देताना कावीळ कसा रोखावा?

कावीळ होण्यापासून रोखण्यासाठी कोणताही विहित मार्ग नाही परंतु त्याची तीव्रता नियंत्रित केली जाऊ शकते.

 • आपल्या बाळासह स्तनपानाद्वारे बंध अधिक मजबूत होण्यासाठी जन्माच्या पहिल्या काही तासांत स्तनपान सुरू करा.
 • बाळ स्तनास योग्य पद्धतीने लॅच होते आहे आणि पुरेसे दूध घेत आहे ह्याची खात्री करून घ्या. आवश्यक असल्यास तुम्ही दुग्धपान तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
 • शक्य तितक्या वेळा आपल्या बाळाला स्तनपान द्या आणि खात्री करा की आपल्या बाळाला पुरेसे दूध मिळालेले आहे.
 • जर तुम्हाला शक्य असेल तर स्तनपानात व्यत्यय आणू नका बाळाला स्तनपान देत रहा.

बाळाला स्तनपान देताना कावीळ कसा रोखावा?

एखाद्या बाळाला काविळी झाल्यास आई स्तनपान चालू ठेवू शकते?

कावीळ झालेल्या मुलांना स्तनपान सुरु ठेवले जाऊ शकते. जसजशी स्तनपानाची वारंवारिता वाढत जाते, तसतसे आईच्या दुधाचे उत्पादन वाढते, बाळाला अधिक आहार देण्यात मदत होते आणि नवजात बाळाच्या उष्मांकात वाढ होते आणि हायड्रेशन वाढते. असे केल्याने बिलीरुबिनची पातळी कमी करण्यास मदत होते. स्तनपान देत राहिल्यास मेकोनियम म्हणजेच बाळाचे पहिले शौच शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. त्याद्वारे रक्तातील जादाचे बिलिरुबिन शौचाद्वारे बाहेर पडते. स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये दीर्घकाळापर्यंत कावीळ झाल्यामुळे स्तनपान तात्पुरते बंद होऊ शकते. तथापि, मातांनी वेळोवेळी स्तनांमधून दूध काढून टाकून दुधाचे उत्पादन सुरु ठेवले पाहिजे आणि त्याला कालावधीत बाळाला फॉर्मुला दूध दिले पाहिजे. त्यामुळे बाळाच्या आणि आईच्या दरम्यानच्या स्तनपानामुळे निर्माण झालेल्या नात्यामध्ये व्यत्यय येणार नाही आणि त्यामुळे याच्या अंगावरील दुधाचा पुरवठा अबाधित राहील.

कावीळ होणे नवजात मुलांमध्ये सामान्य आहे. बाळासोबत नाते निर्माण होण्यासाठी स्तनपान सुरु ठेवणे आवश्यक आहे तसेच आईच्या दुधाचा पुरवठा कायम राखणे हे देखील मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे. केवळ डॉक्टरांनी शिफारस केल्यानंतरच स्तनपान देणे थांबवले पाहिजे आणि स्तनपानामुळे निर्माण झालेल्या नात्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून दुधाचा सतत पुरवठा करण्यासाठी पर्यायी पद्धती वापरल्या पाहिजेत.

आणखी वाचा:

स्तनपानाविषयीच्या भारतातील ५ विचारशील योजना
अंगावरील दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी ३१ सर्वोत्तम पदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article