गर्भारपण

प्रसूतीनंतरची केसगळती

गरोदरपणानंतर बऱ्याच स्त्रियांना केसगळती सारख्या त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागते. प्रसूतीनंतर खूप प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच मातांची तक्रार असते. परंतु प्रसूतीनंतर केस गळणे हे खूप सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत. हे उपाय होणाऱ्या आईने जाणून घेणे गरजेचे आहे.

व्हिडिओ: प्रसूतीनंतर केस गळणे - कारणे आणि उपाय

https://youtu.be/hNSLaALez_0

प्रसूतीनंतरची केस गळती म्हणजे काय?

प्रसूतीनंतर केस गळणे तात्पुरते असते. ही समस्या प्रसूतीनंतर फक्त काही काळ राहते, त्यामुळे थोडी काळजी घेतल्यास, तुमचे लहान बाळ एक वर्षाचे होईपर्यंत तुमचे केस पुन्हा पूर्वीसारखेच होतील. त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त आराम करा आणि आपल्या लहान बाळासोबत वेळ घालवून मातृत्वाचा आनंद घ्या.

गरोदरपणानंतर केस गळणे सामान्य आहे का?

गरोदरपणानंतर केस गळणे अगदी सामान्य आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपले सुमारे 85% केस सक्रियपणे वाढतात तर त्यातील 15% केस आहेत तसेच राहतात हे 15% केस धुताना किंवा विंचरताना गळतात. ह्या कालावधीस केस गळतीचा काळ किंवा 'शेडिंग पीरियड' असे म्हणतात आणि त्यामुळे नवीन केसांसाठी कूप तयार होतात.

गरोदरपणातील एस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे केसांच्या वाढीचा टप्पा लांबतो. इस्ट्रोजेन हे संप्रेरक रक्ताचा प्रवाह आणि परिसंचरण वाढवते, त्यामुळे मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे कमी होते. ह्याचाच परिणाम म्हणून गरोदरपणात स्त्रियांचे केस दाट आणि मजबूत असतात.

तथापि, प्रसूतीनंतर गोष्टी बदलतात. शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि केसांचे कूप विश्रांतीच्या स्थितीत जातात आणि केस अचानक गळू लागतात. संप्रेरकांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे, प्रसूतीनंतर केस गळतात, परंतु ही स्थिती कायमस्वरूपी नसते. गरोदरपणानंतर, मातांना ह्या समस्येचा कमी कालावधीसाठी सामना करावा लागतो. ही समस्या सहसा फक्त ६ ते ८ महिने टिकते. त्यामुळे हा तीव्र बदल तात्पुरता असतो.

गरोदरपणानंतर केस गळतीचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळे असते हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, लांब केस असलेल्या स्त्रियांमध्ये ठळकपणे केस गळती झालेली दिसून येते. तुमचे केस गळणे दिवसेंदिवस वाढत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळ झाल्यानंतर केस गळण्याची चिन्हे

गर्भवती नसतानाही, सर्वसाधारणपणे स्त्रियांचे दररोज सुमारे १०० केस गळतात. परंतु, प्रसूतीनंतर सुमारे ४ ते ५ महिन्यांनी, तुमच्या केसांच्या ब्रशमध्ये केसांची गुंतावळ किंवा बाथरूम मध्ये केस अडकलेले दिसू शकतात. प्रसूतीनंतरचे केस गळण्याचे हे पहिले आणि एकमेव लक्षण आहे. तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दरम्यान ही केस गळती हळू हळू कमी होते.

केस गळणे कायम राहिल्यास उपचारासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सामान्य कारणे

गरोदरपणात केस कशामुळे गळतात हे आता गूढ राहिलेले नाही. गर्भारपणानंतर केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे हे होय. यामुळे अधिक केस विश्रांतीच्या स्थितीत जातात आणि प्रसूतीनंतर ४ महिन्यांपर्यंत हे केस गळत राहतात. हा टप्पा नवीन मातांमध्ये ६ ते ८ महिने इतका टिकतो आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. परंतु हे केस गळणे सुरूच राहिल्यास, ते अशक्तपणामुळे किंवा प्रसूतीनंतरच्या थायरॉईडायटीसमुळे असू शकते - गरोदरपणामुळे शरीरातील फेरीटिनची पातळी बदलू शकते आणि तुमची थायरॉईडची पातळी बदलू शकते. दोन्ही समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार

प्रसूतीनंतर केस गळणे ही संप्रेरकांमधील बदलांमुळे होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही समस्या टाळता येत नाही त्यामुळे, प्रसूतीनंतर ज्यामुळे ही केस गळती थांबू शकेल असे केसगळतीचे कोणतेही उपचार नाहीत. येथे काही टिप्स दिलेल्या आहेत. ह्या टिप्स वापरल्यास प्रसूतीनंतरच्या केसगळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकेल.

घरगुती उपाय

केस गळणे कमी करण्यासाठी प्रसूतीनंतर केस गळतीसाठी आधी करून बघितलेल्या उपायांची यादी येथे आहे:

वर सांगितलेले उपाय आणि घरगुती उपचार केल्यास तुम्हाला प्रसूतीनंतरच्या केसगळतीची चिंता राहणार नाही आणि तुम्ही बाळाच्या आगमनाचा आनंद घेऊ शकाल.

स्रोत: Healthline, Today’s Parent

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर होणारी सांधेदुखी प्रसूतीनंतर होणारा मूळव्याध

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved