वांगे ही एक स्वादिष्ट भाजी आहे. वांगी भाजून त्याचे भरीत करता येते तसेच वांग्याचे काप तळून त्याचे चिप्स सुद्धा करता येतात. वांगी चविष्ट तर असतातच परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि कोलेस्ट्रॉलचे नियमन करणे यासारखे वांग्याचे आरोग्य विषयक फायदे आहेत.
वांग्याला इंग्रजी मध्ये औबर्गिन किंवा ब्रिन्जल म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती, फळांसाठी मोठ्या प्रमाणावर वाढविली जाते. वांग्याचा आकार अंड्यासारखा असतो. वांगे चकचकीत दिसते आणि त्याचा रंग जांभळा असतो. वांग्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. जगभरातील लोकांना विविध आरोग्य विषयक फायद्यांमुळे वांगे आवडते.
गरोदरपणात वांगी खाणे फायदेशीर आहे का? उत्तर सोपे आहे - गर्भवती महिलांसाठी त्याच्या विविध आरोग्य फायद्यांमुळे वांगे खाण्याची शिफारस केली जाते. वांगी गर्भाच्या विकासास मदत करते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारखी जीवनसत्त्वे असतात. वांग्यात फॉलिक ऍसिड देखील असते आणि ते विकसनशील गर्भाच्या लाल रक्तपेशींच्या विकासास चालना देते. तर, गरोदरपणात वांगी खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे होतात? अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.
गरोदरपणात वांगी खाण्याचे काही फायदे येथे आहेत.
वांग्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते, आणि ते विविध रोगांविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. अशा प्रकारे, गरोदरपणात वांगी खाणे चांगले असते, कारण त्यामुळे गर्भवती महिला आरोग्य समस्यांपासून दूर राहते. आई आणि बाळ दोघेही त्यामुळे सुरक्षित राहतात.
गरोदर स्त्रीला उच्च रक्तदाब आणि रक्तदाबाच्या समस्यांचा अधिक धोका असतो आणि या कारणास्तव, वांगी खाण्याची शिफारस केली जाते. वांग्यामध्ये थायामिन, बायोफ्लाव्होनॉइड्स आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात आढळतात, आणि ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. वांग्यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते , हृदय गती चांगली राहते आणि गरोदरपणातील इतर आरोग्य विषयक समस्यांचा धोका कमी होतो.
वांग्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स आणि नियासिन भरपूर प्रमाणात आढळतात. हे समृद्ध स्त्रोत एकत्रितपणे गर्भाच्या योग्य वाढीस मदत करतात.
वांगी खराब कोलेस्टेरॉल किंवा लो-डेन्सिटी लिपोप्रोटीनची (एलडीएल) पातळी कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल किंवा उच्च घनता लिपोप्रोटीनची (एचडीएल) पातळी वाढवतात असे मानले जाते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करून, वांगी हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यात आणि गर्भवती महिलेच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना देण्यासाठी देखील मदत करतात.
वांग्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळून आले आहे. ह्या तंतुमय पदार्थांमुळे अन्न आणि आतड्यांतील नको असलेल्या घटकांवर सुलभतेने प्रक्रिया होते आणि गर्भवती स्त्रीच्या पचन समस्या कमी करण्यास मदत होते. वांगी सामान्य आतड्याची हालचाल देखील सुनिश्चित करतात , अशा प्रकारे गर्भवती स्त्रीला भेडसावणारी एक प्रमुख समस्या कमी होते आणि ती समस्या म्हणजे - बद्धकोष्ठता.
लाल रक्तपेशी (आरबीसी) गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असतात कारण ह्या पेशी मज्जातंतू, मेंदूच्या पेशी आणि स्नायूंच्या विकासात मदत करतात. आई आणि बाळ दोघांमध्ये लोहाची पुरेशी पातळी सुनिश्चित करतात. वांग्यामध्ये फोलेट असते, ह्या फोलेटचे फॉलिक अॅसिडमध्ये रूपांतर होते. फॉलिक ऍसिड लाल रक्तपेशींच्या निर्मितीचा मूळ स्त्रोत आहे, त्यामुळे गर्भवती महिलांसाठी वांगी हे एक आवश्यक अन्न बनते.
वांग्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त आणि मॅंगनीज यासारखी विविध खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ही खनिजे एकत्रितपणे शरीराच्या इलेक्ट्रोलाइट संतुलनाचे नियमन करण्यास मदत करतात आई आणि बाळ दोघांमध्ये रक्तपुरवठा नियंत्रित करतात.
गरोदर स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, एखाद्याच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. वांग्यामुळे नेमके हेच होते. वांगी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि रक्तातील साखरेच्या पातळीमधील कोणत्याही प्रकारचे चढउतार वांग्यामुळे व्यवस्थापित होतात.
वांग्याचे सेवन करण्याचे फायदे भरपूर आहेत, परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आम्ही त्यापैकी काही दुष्परिणाम खाली सूचीबद्ध केले आहेत:
इतर कोणत्याही फळ किंवा भाज्यांप्रमाणेच, वांगी शिजवण्यापूर्वी पूर्णपणे धुवून घेणे आवश्यक आहे. वांगी टोक्सोप्लाज्मोसिसने समृद्ध असलेल्या मातीमध्ये उगवतात, त्यामुळे वांगी खाल्ल्यास अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे, तुम्ही वांगी (आणि तुम्ही वापरत असलेली इतर कोणतीही भाजी) खाण्यापूर्वी नीट धुवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
काही वेळा, गर्भवती स्त्रियांना जास्त प्रमाणात वांगी खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. जरी तुम्हाला वांग्याची ऍलर्जी नसली तरी सुद्धा, वांग्यामुळे सौम्य खाज सुटते किंवा पुरळ उठू शकते. वांग्याची ऍलर्जी असल्यास वांग्याची भाजी खाऊ नये.
वांग्यामुळे गर्भवती स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात ऍसिडिटी निर्माण होते तसेच त्यामुळे चिंता आणि अस्वस्थता येते. ऍसिडिटी टाळण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी जास्त प्रमाणात वांगी न खाणे चांगले.
साधक आणि बाधकांवर चर्चा केल्यावर, गर्भवती महिलेच्या आहारात वांगी कशी जोडली जाऊ शकतात यावर चर्चा करूया. वांग्यामुळे दुष्परिणामांऐवजी अधिक फायदे होण्यासाठी खालील सर्व्हिंग सूचना लक्षात ठेवाव्यात.
गरोदरपणात वांग्याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
वांग्याचे असंख्य आरोग्य विषयक फायदे आहेत. वांग्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि गर्भावस्थेतील मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. अकाली प्रसूती देखील होऊ शकते. अशाप्रकारे, काही वेळा वांगी खाल्ल्यास अशा आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. याचा आढावा घेऊन वांग्याचे सेवन कमी प्रमाणात करणे चांगले. जर तुम्हाला वांग्याची ऍलर्जी असेल तर वांगे खाणे पूर्णपणे टाळा.
स्रोत: Being the Parent
आणखी वाचा:
गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का? गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम