आहार आणि पोषण

गरोदरपणात लिंबू पाणी पिणे – सुरक्षितता, फायदे आणि दुष्परिणाम

लिबू पाणी हे आपल्याला ताजेतवाने करणारे एक पेय आहे. त्यामुळे पोटाला सुद्धा आराम मिळतो. मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस पासून देखील सुटका होते. म्हणूनच गर्भवती स्त्रियांसाठी ते एक आदर्श पेय बनते. सालीशिवाय एका लिंबामध्ये मॅग्नेशियम, नियासिन, कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन बी , व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचे पौष्टिक फायदे लक्षात घेता, गरोदरपणाच्या आहारात लिंबू पाण्याचा समावेश करणे आवश्यक आहे. परंतु गरोदरपणात सावधगिरी बाळगणे देखील अत्यावश्यक आहे

गर्भवती असताना लिबू पाणी पिणे सुरक्षित आहे का?

जर गर्भवती महिलांना लिंबाची ऍलर्जी नसेल तर त्यांनी लिबू पाणी पिणे पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु आपण ते मध्यम प्रमाणात प्यावे. लिंबू सरबत जास्त प्रमाणात घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून, दररोज १-२ लिंबाचा रस पिणे सुरक्षित आहे. तुमच्या दैनंदिन आहारात याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

गरोदरपणात लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू पाणी मध्यम प्रमाणात घेतल्यास त्याचे गर्भवती स्त्रीला अनेक फायदे आहेत. यापैकी काही फायदे खाली स्पष्ट केले आहेत.

. मॉर्निंग सिकनेस वर उपयोगी

लिंबू पाणी घेतल्याने गर्भवती स्त्रियांच्या मळमळ होण्याच्या संवेदना कमी करण्यास मदत होऊ शकते. ज्या स्त्रियांना, विशेषत: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो अश्या स्त्रियांनी लिंबू पाणी प्यायल्यास पित्ताचा अतिरिक्त प्रवाह नियंत्रित राहतो आणि पचनसंस्थेमध्ये जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्थेतील अडथळे दूर होतात. लिंबू हे माउथ फ्रेशनर देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला ह्याचा फायदा होत नसेल आणि तुम्हाला तीव्र मळमळ होत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते

लिंबू हे जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहेत. रक्तवाहिन्या मजबूत करण्यास लिंबाची मदत होते. लिंबाचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांची लवचिकता आणि मऊपणा टिकून राहण्यास मदत होते. लिंबामुळे अंतर्गत रक्तस्त्राव रोखण्यास आणि उच्च रक्तदाब पातळी कमी होण्यास मदत होते. लिंबाचा रस प्यायल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहू शकते.

. बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो

अनेक गर्भवती महिलांनी अनुभवलेली आणखी एक समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. पण काळजी करू नका कारण रोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होऊ शकते! लिंबाचे सेवन यकृताच्या आरोग्याशी देखील संबंधित आहे कारण त्यामुळे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करू होते तसेच यकृत स्वच्छ करण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे यकृताचे कार्य तसेच आपले आरोग्य सुधारते.

. अपचनाचा त्रास कमी होतो

गरोदरपणात अपचनाचा अनुभव येणे असामान्य नाही. पोट शांत करण्यासाठी एक उपयुक्त उपाय म्हणजे लिंबू पाणी घेणे. लिंबू पाणी प्यायल्याने पचन व्यवस्थित होते आणि पोटातील अस्वस्थता कमी होते.

. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

फ्लू, सामान्य सर्दी आणि विशिष्ट प्रकारचे ताप यांसारखे सामान्य संक्रमण लिंबू पाण्याच्या सेवनाने टाळता येते असे म्हटले जाते. व्हिटॅमिनसीचा समृद्ध स्रोत असल्याने, लिंबू शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली सुधारू शकते आणि जिवाणू तसेच विषाणूंची लढण्यास मदत करू शकते.

. पोटातील बाळाला मदत करते

लिंबू पाणी तुमच्या पोटातील बाळाला आवश्यक खनिजे पुरवते. तसेच, लिंबूमधील पोटॅशियम बाळाच्या मेंदू आणि चेतापेशींचे पोषण करण्यास देखील मदत करू शकते.

. मूत्रमार्गातील संसर्ग रोखण्यास मदत करते

लिंबामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा घटक असल्याचे म्हटले जाते. हा घटक किडनीचे आरोग्य राखण्यास आणि त्यांना सामान्यपणे कार्य करण्यास मदत करतो. अशा प्रकारे, लघवी आणि जननेंद्रियाच्या भागात संक्रमण होण्याची शक्यता देखील कमी होते.

. शरीराची पीएच पातळी राखते

लिंबू पाणी निरोगी क्षारता प्राप्त करून शरीरातील पीएच पातळी राखण्यास मदत करते. होय, लिंबू अम्लीय असतात, परंतु एकदा लिंबू पाणी आपल्या प्रणालींमध्ये पोहोचले की ते अल्कधर्मी असतात. त्यामुळे ऍसिडोसिसची लक्षणे कमी करण्यास मदत होते. मानवी रक्ताची पीएच श्रेणी किंचित अल्कधर्मी आहे . ही पी एच पातळी ७.३० आणि ७. ४५ च्या दरम्यान असते. जेव्हा पीएच पातळी अम्लीय होते, तेव्हा शरीर भरपाईसाठी हाडे आणि दातांमधून क्षारता उधार घेऊन बफरिंग क्रिया करते. लिंबू पाणी पिऊन हे टाळता येते. त्यामुळे शरीरातील अल्कधर्मी पातळी राखून ठेवली जाते आणि गर्भाच्या विकास प्रक्रियेदरम्यान मदत होते. रक्तातील पीएच पातळी वर पेशींना ऑक्सिजनची उपलब्धता होणे अवलंबून असते. गर्भाच्या विकासासाठी योग्यरित्या ऑक्सिजनयुक्त पेशी असणे आवश्यक आहे.

. पायांची सूज कमी होण्यास मदत होते

गरोदरपणात पायांना सूज येणे किंवा पाय सुजणे सामान्य आहे. पण ते वेदनादायक नाही असे म्हणता येणार नाही. ही स्थिती खूप अस्वस्थ आणि वेदनादायक असू शकते. परंतु, कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस घालून घेतल्यास त्यावर उपचार केले जाऊ शकतात. लिंबू पाणी वेदना कमी करण्यास मदत करते आणि पायांची सूज कमी करते.

१०. निर्जलीकरण प्रतिबंधित करते

गरोदरपणात हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे डोकेदुखी, मळमळ, पेटके, चक्कर येणे आणि सूज यासारख्या विविध समस्या टाळल्या जातात. लिंबू पाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटू शकते. लिंबू पाणी चवदार असते आणि त्याचे सेवन केल्याने तुम्ही हायड्रेटेड राहू शकता.

लिंबू पाणी कसे तयार करावे?

तुमचा गरोदरपणाचा कालावधी हा उन्हाळ्यात असेल तर लिंबू सरबत पिऊन ताजेतवाने वाटू शकते, पण तुम्ही प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असलेला कॅन मध्ये उपलब्ध लिंबाचा रस पिऊ शकत नाही. गरोदरपणात तुम्ही नेहमी ताजे लिंबू पिळून केलेले लिंबू पाणी प्यावे. हे लिंबू पाणी कसे तयार करावे हे खाली दिलेले आहे -

. लिंबू पाणी

तुम्ही लिंबू पाणी कसे तयार करू शकता याची कृती खाली दिलेली आहे -

. आले आणि लिंबू चहा

आले आणि लिंबाचा चहा मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस वर मात करण्यास मदत करू शकतो. गरोदरपणात घेण्यासाठी हे एक चांगले आरोग्यदायी पेय आहे.

गरोदरपणात लिंबाचा रस घेताना घ्यावयाची काळजी

लिंबू पाण्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते पिण्यास सुरक्षित आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात लिंबाच्या सेवनाबाबत तुम्ही काही खबरदारी घ्यायला हवी.

लिंबू पाणी पिण्याचे दुष्परिणाम

गर्भवती स्त्रियांसाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर असले तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेत. रोजच्या आहारात लिंबाच्या पाण्याचा समावेश करण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. काही संभाव्य दुष्परिणाम खाली दिलेले आहेत.

. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर आणि छातीत जळजळ

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात गरोदर स्त्रियांना पोटात अस्वस्थता आणि छातीत जळजळ होऊ शकते. लिंबामध्ये असलेली सायट्रिक ऍसिडची उच्च पातळी कधीकधी ही परिस्थिती बिघडवू शकते. अशी लक्षणे कमी होईपर्यंत सावध राहण्याचा आणि लिंबाचे पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

. दातांच्या समस्या

गरोदरपणात दात आणि हाडे डिकॅल्सिफिकेशनसाठी अत्यंत संवेदनशील असतात. लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिड मुळे हे वाढू शकते. दातांना डाग पडणे आणि इतर दातांच्या समस्या उद्भवू शकतात. दातांच्या समस्यांसाठी तुमच्या दंतवैद्याचा सल्ला घ्या आणि तुमच्या दातांचा पोत आणि रंग बदलला नाही याची खात्री करा. जास्त प्रमाणात लिंबू पाण्याचे नियमित सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

. खोकला आणि सर्दी

गरोदरपणात थंडगार लिंबू सरबत प्यायल्याने काहीवेळा तापमान किंवा ऍलर्जीमुळे खोकला आणि सर्दी होऊ शकते. त्यामुळे विशेषतः कोमट लिंबू पाण्याचे सेवन करणे चांगले असते.

गरोदरपणाचे नऊ महिने चढ-उतारांनी भरलेले असतात. तुमच्याकडे आनंदाचे आणि आनंदविरहित असे काही क्षण असतील. गरोदरपणात तुम्ही जे खाता त्यावर तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत सावध राहणे अत्यावश्यक आहे.

लिंबू पाणी पिणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. बहुतेक गर्भवती स्त्रियांसाठी, पहिल्या तिमाहीत येणाऱ्या अस्वस्थतेसाठी लिंबू पाणी हे टॉनिक आहे. कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती आणि त्याचे दुष्परिणाम ह्याविषयी स्वतःला शिक्षित करा. लिंबाची कोणत्याही औषधांवर नकारात्मक रिऍक्शन होत नाही, म्हणून काळजी करू नका. आपल्या डॉक्टर आणि पोषणतज्ञांशी चर्चा करा आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य मार्गाची निवड करा!

आणखी वाचा:

गरोदर असताना नारळपाणी पिणे गरोदरपणात तूप खाणे – फायदे, धोके आणि गैरसमज

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved