आहार आणि पोषण

गरोदरपणात चिकन खाणे

गरोदरपणात, आईने तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. गरोदरपणात अनेक शारीरिक बदल होतात आणि त्यामुळे आहाराच्या सवयींमध्ये बदल होतो. म्हणून होणाऱ्या आईने आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीला गरोदरपणात चिकन खाण्याची शिफारस केली जाते. कारण चिकन हा एक प्रथिनांचा चांगला स्रोत आहे तसेच चिकन मधून इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे सुद्धा मिळतात.

गरोदरपणात चिकन खाणे सुरक्षित आहे का?

चिकन हे एक अत्यंत पौष्टिक अन्न आहे. चिकन मध्ये प्रथिने आणि नऊ अत्यावश्यक अमीनो आम्ल असतात - हे दोन्ही घटक स्नायूंचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकनमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही. म्हणूनच गर्भवती स्त्रियांसाठी चिकन हे आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे.

गरोदर स्त्रियांनी चिकन चांगले शिजवलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. कच्चे, न शिजवलेले चिकन टाळावे कारण त्यामध्ये लिस्टेरिया नावाचे जिवाणू असतात. चिकनला १६० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त गरम केल्याने जिवाणू नष्ट होऊ शकतात, त्यामुळे शिजवलेले चिकन खाण्यासाठी सुरक्षित होते.

गरोदर असताना चिकन खाण्याचे फायदे

चिकन मध्ये प्रथिने आणि इतर महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे तसेच खनिजे भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात चिकन खाल्ल्याने गर्भातील बाळाच्या निरोगी विकासास मदत करण्यासाठी आवश्यक पोषण मिळते.

हे पोषक घटक बाळाच्या पेशी,अवयव, आणि हाडांच्या विकासात मदत करतात. चिकनमुळे मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आजार यासारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण मिळते.

गर्भवती स्त्रीला दररोज १०० ग्रॅम शिजवलेले कोंबडीचे मांस खाण्याची शिफारस केली जाते.

गरोदरपणात चिकन खाण्याचा आनंद घेण्याचे काही मार्ग येथे आहेत:

1. तुम्ही काही त्वचाविरहित, हाडेविरहित चिकन ब्रेस्ट पॅन मध्ये शिजवू शकता आणि काही अत्यंत आवश्यक प्रथिनांसाठी ते तुमच्या सॅलडमध्ये घालू शकता.

2. तुम्ही स्वादिष्ट चिकन करी बनवू शकता आणि भात, रोटी किंवा ब्रेड सोबत खाऊ शकता.

3. तुम्ही शिजवलेले, कापलेले चिकन काही घरगुती मेयोनेझमध्ये मिक्स करू शकता आणि सँडविचमध्ये वापरू शकता.

4. तुम्ही चिकनमध्ये काही मसाले घालून शिजवून घेऊ शकता आणि हेल्दी सूपच्या स्वरूपात सेवन करू शकता.

5. जर तुम्हाला चिकनचा वेगळा प्रयोग करावासा वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी बारीक चिकन पॅटीज बनवू शकता आणि स्वादिष्ट, घरगुती ग्रील्ड चिकन बर्गर तयार करू शकता.

चिकन खाण्याचे हानिकारक परिणाम

गर्भवती स्त्रियांसाठी अयोग्य असलेले कोणतेही हानीकारक पदार्थ चिकनमध्ये नसतात. चिकन हे गरोदरपणात सुरक्षित अन्न मानले जाते.

चिकन खाण्याचा एकमात्र धोका म्हणजे दूषित चिकन मध्ये लिस्टेरिया नावाचे संसर्गास कारणीभूत जीवाणू आढळतात. आणि त्यामुळे लिस्टेरिओसिस नावाचा संसर्ग होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये लिस्टेरिओसिसमुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात, नवजात अर्भकामध्ये संसर्ग किंवा अकाली मृत्यूचा धोका वाढतो. अभ्यासानुसार, प्री-नॅटल लिस्टिरोसिस प्रकरणांपैकी 22% नवजात मुलांचा मृत्यू होतो.

गर्भवती स्त्रियांमध्ये लिस्टेरिया संसर्गाची प्रकरणे सामान्य नाहीत. परंतु गर्भवती स्त्रिया गरोदर नसलेल्या स्त्रियांपेक्षा कोणत्याही रोग किंवा संसर्गास बळी पडतात.

हा जीवाणू १६० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमानात टिकू शकत नाही. म्हणूनच बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी चिकन खाण्यापूर्वी या तापमानापेक्षा जास्त तापमानावर शिजवण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती स्त्रीने फक्त चांगले शिजवलेले चिकन खावे आणि कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले चिकन खाणे टाळावे.

सँडविच, बर्गर आणि इतर झटपट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे मांस गरोदर स्त्रियांनी टाळावे. कारण ह्या मांसावर' प्रक्रिया करताना ते दूषित होण्याची दाट शक्यता असते.

गरोदरपणात आपल्या आहारात कोणत्याही खाद्यपदार्थाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

स्रोत: Baby Med

आणखी वाचा:

गरोदरपणात अंडी खाणे गरोदरपणात मखान्याचे (लोटस सीड्स) आरोग्यविषयक फायदे

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved