Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात तूप खाणे – फायदे, धोके आणि गैरसमज

गरोदरपणात तूप खाणे – फायदे, धोके आणि गैरसमज

गरोदरपणात तूप खाणे – फायदे, धोके आणि गैरसमज

तूप हे भारतातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या मुख्य घटकांपैकी एक घटक आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा घरातील वडिलधाऱ्यांकडून अनेकदा तिला तूप खाण्यास सांगितले जाते. तूप खाल्ल्याने सामान्य प्रसूती होण्यास मदत होते असे मानले जाते. (जरी हे सिद्ध करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक अभ्यास नसला तरी सुद्धा). पण गरोदरपणात तूप खाणे चांगले आहे का? गरोदरपणात तूप खाण्याबद्दल तुम्हाला कुठली माहिती असणे आवश्यक आहे ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात तूप खाणे सुरक्षित आहे का?

गरोदर स्त्रीसाठी संतुलित आहार आणि पोषण हे अत्यंत महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. गरोदरपणात, स्त्रीला निरोगी चरबीचे देखील सेवन करणे आवश्यक आहे. तूप हा चरबीचा एक स्रोत आहे आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीच्या आहारात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. परंतु, डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच तुम्ही आहारात तुपाचा समावेश करू शकता.

गरोदरपणात तूप खाण्याचे फायदे

तूप ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्, ओमेगा 9 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. तूपाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत परंतु गरोदरपणातील तूपाचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. परंतु, भारतीय संस्कृतीत तूप गर्भवती महिलेला खालील प्रकारे फायदेशीर ठरते असे मानले जाते.

  • गरोदरपणात बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो
  • तूप बाळाच्या मेंदूच्या विकासास मदत करू शकते
  • तूप स्त्रीची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते
  • तूप बाळाचे पोषण करण्यास मदत करते
  • तूप खाल्ल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते

बाजारातून विकत घेतलेल्या तूप किंवा बटरच्या तुलनेत घरगुती तूप हा एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय आहे. तुम्ही पहिल्या तिमाहीत घरचे तूप खाणे सुरू करू शकता परंतु तुमचे वजन जास्त असेल तर किंवा तुमचे वजन वाढेल अशी तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी बोलूनच तुम्ही आहारात तुपाचा समावेश करावा अशी शिफारस केली जाते.

गरोदरपणात तूप खाण्याचे फायदे

गरोदर महिलांसाठी तूप खरोखर आवश्यक आहे का?

गरोदरपणात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भवती स्त्रीने तिच्या वाढत्या बाळाचे चांगले पोषण होण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. असे मानले जाते की तूप योनीला वंगण म्हणून काम करते आणि अशा प्रकारे सामान्य प्रसूतीसाठी मदत करते. असेही मानले जाते की तूपामुळे प्रसूती वेदना कमी होतात. आकुंचन उत्तेजित करण्यासाठी देखील तूप खूप प्रभावी आहे. परंतु, ह्यास कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. वाढत्या गर्भाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेला फक्त ३५० अतिरिक्त कॅलरीजची आवश्यकता असते. या अतिरिक्त कॅलरीज चांगला आहार घेतल्याने मिळू शकतात. आहारात तूप देखील असू शकते. मात्र, जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन वाढणे ही चिंतेची बाब असेल तर तुपाचे जास्त सेवन करणे टाळावे.

गरोदरपणात तुपाचे सेवन करणे सुरक्षित का असू शकत नाही?

गरोदरपणात तूप खाल्ल्याने आईच्या किंवा तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. गरोदरपणात तुमच्या आहारात तुम्ही तूप समाविष्ट करू शकता कारण तूप म्हणजे चरबीचा निरोगी स्रोत आहे. परंतु, तुपाचे प्रमाण मध्यम असले पाहिजे कारण तूपाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत शारीरिक हालचाल देखील कमी होते, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांत जास्त तूप खाल्ल्यास तुमचे आणि तुमच्या बाळाचे वजन वाढू शकते. तुमच्या बाळाचे वजन अधिक वाढल्यास सामान्य किंवा योनीमार्गे प्रसूती होणे देखील कठीण होऊ शकते. जर तुम्ही जास्त कॅलरीयुक्त आहार घेत असाल तर तुमच्या आहारात तुपाचा समावेश केल्यास जास्त वजन वाढू शकते. जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे तुमच्या गरोदरपणात गुंतागुंत होऊ शकते आणि बाळाच्या जन्मानंतर अतिरिक्त चरबी काढून टाकणे खूप कठीण होऊ शकते.

म्हणूनच, जर तुमचे वजन आधीच जास्त असेल किंवा तुमच्या गरोदरपणात जास्त वजन वाढण्याची चिंता असेल, तर आहारात तुपाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदर असताना तूप खाण्याशी संबंधित गैरसमज

गरोदरपणात देशी तूप खाण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. हे तूप चवदार आणि आरोग्यदायी आहे, यात काही शंका नाही, परंतु अनेक लोकांचा असा विश्वास आहे की दुधात तूप घालून प्यायल्याने गर्भवती महिला आणि पोटातील बाळाला अतिरिक्त पोषण आणि कॅलरीज मिळू शकतात. असेही मानले जाते की तुपामुळे योनीला वंगण मिळते आणि प्रसव प्रक्रियेस मदत होते. गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात, आहारात तुपाचा समावेश केल्यास सामान्य प्रसूती होण्यास मदत होते, असे अनेकांना वाटते. परंतु, ही केवळ मिथकं आहेत, त्यामुळे तुम्हाला चव आवडते म्हणून तुमच्या आहारात तुपाचा समावेश करू नका. जर तुम्हाला गरोदरपणात तूप खाण्याची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच तूप खाऊ शकता.

गरोदर असताना तूप खाण्याशी संबंधित गैरसमज

तूपामुळे काही धोके आणि गुंतागुंत निर्माण होते का?

अतिरिक्त वजन वाढवण्याच्या शक्यतेशिवाय तूप खाण्याचे कोणतेही धोके किंवा गुंतागुंत नसते (जो एक परिणाम आहे). गरोदरपणात संतुलित आहाराला खूप महत्त्व आहे कारण चांगला संतुलित आहार घेतल्यास तुमचे आणि तुमच्या बाळाचे चांगले पोषण होते. ३ वेळा खूप जेवण्याऐवजी तुम्ही वारंवार थोडे थोडे खाऊ शकता असा सल्ला दिला जातो. आपल्या आहारात अधिक ताजी फळे आणि भाज्या समाविष्ट करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. जर तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेत असाल आणि तुम्हाला वजन वाढण्याची कोणतीही समस्या नसेल, तर तुम्ही तुमच्या आहारात देशी तूपाचा मध्यम प्रमाणात समावेश करू शकता. जवळजवळ सर्व भारतीय घरांमध्ये तूपाचा वापर प्राचीन काळापासून होत आहे आणि तूप हा आहारातील चरबीचा एक चांगला स्रोत देखील आहे.

जेव्हा तुम्ही गरोदरपणात आहारात कोणताही बदल करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थांचे पर्याय सुचवू शकतात.

आणखी वाचा:

गरोदरपणात खजूर खाणे
गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article