Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का?

ताजी फळे आणि भाज्या गर्भवती स्त्रीच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे कारण एखादा चुकीचा अन्नपदार्थ  गंभीर समस्या निर्माण करू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल तर साहजिकच तुम्ही काहीही खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल. गरोदर असताना, तुम्ही संत्र्यासारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता की नाही असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. संत्री हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे. संत्री खाल्ल्याने तुम्हाला लगेच आनंद मिळतो. संत्र्याच्या गोड आणि आंबट चवीमुळे तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होण्यास मदत होते. पण गरोदरपणात तुम्ही संत्री खाऊ शकता का? चला जाणून घेऊयात!

गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का?

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी संत्री हे नक्कीच सर्वोत्तम फळ आहे. जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी तुम्ही हे संपूर्ण फळ खावे. जर तुम्हाला संत्र्याच्या फोडी खायला आवडत नसतील तर तुम्ही संत्र्याचा रस घेऊ शकता. परंतु, टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध संत्र्याचा रस पिणे टाळा कारण त्यात संरक्षक असतात आणि ते शरीरासाठी चांगले नसतात. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून विकला जाणारा संत्र्याचा रस पिणे देखील टाळावे. जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, संपूर्ण फळ खा किंवा घरी तयार केलेला संत्र्याचा रस प्या.

गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का

गरोदरपणात संत्री खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, जस्त आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. गरोदरपणात संत्री खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, मेंदूचा विकास चांगला होतो आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत संत्री खाणे चांगले असते  कारण त्यामुळे गर्भाच्या मेंदूच्या विकासास मदत होते. गरोदरपणात संत्री खाण्याचे काही आरोग्यविषयक फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

1. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गरोदर स्त्रीची आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. संत्र्यामध्ये लोह आणि जस्त देखील असते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात. संत्री खाल्ल्याने गरोदरपणात ऍलर्जीचा धोका कमी होतो. बाळांमधील   कूर्चा, ऊती, रक्तवाहिन्या आणि हाडांच्या विकासास देखील संत्र्यामुळे मदत होते.

2. बाळाच्या मेंदूचा विकास करण्यास मदत होते

संत्री हे व्हिटॅमिन बी 6 आणि फॉलिक ऍसिडचा चांगला स्रोत आहेत. गरोदर असताना संत्री खाल्ल्याने तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास होण्यास आणि न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत होते. त्यामुळे  बाळामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्यातील विकृती निर्माण होतात. संत्र्यांमधील फोलेट घटक रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये तसेच नवीन ऊतींच्या वाढीसाठी आणि निरोगी प्लॅसेंटाच्या  विकासासाठी मदत करू शकतात. परंतु, जास्त प्रमाणात फोलेट घेतल्याने बाळाचे वजन वाढू शकते.

3. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी मदत होते

संत्र्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर आणि सेल्युलोज भरपूर असतात आणि ते आतड्याची हालचाल नियमित करण्यास मदत करतात. गरोदरपणातील सामान्य समस्या म्हणजे बद्धकोष्ठता, बरी करण्यास देखील संत्री खाण्याने मदत होऊ शकते . संत्र्यामधील तंतुमय पदार्थ पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी आणि पोट फुगण्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

4. रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत होते

संत्र्यामध्ये असलेली उच्च पोटॅशियम सामग्री गर्भवती महिलांमध्ये रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि त्यामुळे उच्चरक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते.

5. सजलीत ठेवण्यास मदत करतात

रोजच्या द्रवपदार्थामध्ये योगदान देतात. तसेच शरीरातील द्रव पातळीचे संतुलन राखण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम प्रदान करतात. ८८% पाण्याचे प्रमाण असलेल्या संत्र्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन आणि हायड्रेशन होण्यास मदत होते.

6. तुमच्या त्वचेला फायदा होऊ शकतो

संत्री शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहेत. संत्री खाल्ल्याने त्वचेवर सुखदायक प्रभाव पडू शकतो. त्वचा घट्ट राहण्यास त्यामुळे मदत होते आणि मुरुम टाळण्यासाठी पुरेसा ओलावा मिळतो.

गरोदर असताना तुम्ही किती संत्री खाऊ शकता?

गर्भवती स्त्रियांसाठी दररोज 85 मिग्रॅ व्हिटॅमिन सीचा डोस आवश्यक आहे. ही गरज दररोज तीन संत्री खाऊन किंवा व्हिटॅमिन सी असलेले इतर पदार्थ खाऊन पूर्ण केली जाऊ शकते. परंतु, जर तुम्ही इतर पदार्थांसोबत संत्री खात असाल, तर दिवसभरात तुम्ही खात असलेल्या इतर पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण देखील विचारात घ्या. लक्षात ठेवा की तुमचे रोजचे संत्र्याचे सेवन शिफारस केलेल्या सेवनापेक्षा जास्त नसावे कारण संत्र्यामुळे आम्लपित्त होऊ शकते. जर तुम्ही इतर व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थ खात असाल तर तुम्ही संत्री मध्यम प्रमाणात खा. तुमच्या आहारात किती संत्र्यांचा समावेश केला पाहिजे  याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संत्री खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

संत्र्याचे सेवन दिवसभरात केव्हाही करता येते, अगदी रिकाम्या पोटीही. तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा कधी आणि कसा समावेश करावा यावर कोणतेही बंधन नाही.

गरोदरपणात संत्र्याचा रस पिणे

गरोदरपणात संत्र्याचा रस पिणे

गरोदरपणाच्या रोजच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी कोणतेही संरक्षक घटक नसलेला पाश्चराइज्ड संत्र्याचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही दररोज दोन ग्लास संत्र्याचा रस पिऊ शकता. कॅल्शियमचा समृद्ध स्रोत असल्याने, पाश्चराइज्ड संत्र्याचा रस तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करू शकतो. जर तुम्ही लॅक्टोज असहिष्णु असाल तर तुम्ही फोर्टिफाइड संत्र्याचा रस पिऊ शकता कारण तो दुधासाठी एक  चांगला पर्याय आहे आणि त्यामुळे मॉर्निंग सिकनेस बरा होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही ताज्या संत्र्यांचा रस काढून त्याचा आनंद घेऊ शकता. पण त्यामध्ये जास्त साखर घालू नका कारण त्यामुळे तुमची ग्लुकोजची पातळी वाढू शकते.

गरोदरपणात संत्री खाण्याचे काही दुष्परिणाम होतात का?

संत्री चवीला चांगली असतात आणि गरोदरपणात संत्र्याचे बरेच फायदे देऊ शकतात. परंतु, जेव्हा संत्र्याचे  जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा त्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.

  • सायट्रिक ऍसिडच्या उच्च सामग्रीमुळे घसा खवखवणे आणि दातांची झीज होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात
  • संत्र्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ओटीपोटात पेटके येऊन अतिसाराचा त्रास होऊ शकतो
  • संत्री अम्लीय असल्याने, जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) ग्रस्त गर्भवती महिलेच्या छातीत जळजळ होऊ शकते
  • शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते

तुमच्या आहारात संत्र्याचा समावेश करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत

  • संत्र्याचे काप करा आणि ते तुमच्या नेहमीच्या सॅलडच्या वाटीत घाला
  • ते इतर फळांमध्ये घालून फ्रूट सॅलड बनवा
  • संत्री सोलून ज्युसरमध्ये घाला आणि घट्टसर  अश्या संत्र्याच्या रसाचा आनंद घ्या.
  • संत्र्याच्या कापांवर थोडी ब्राऊन शुगर शिंपडा आणि मायक्रोवेव्ह करा. मिष्टान्न म्हणून डिशचा आनंद घ्या

गरोदरपणात तुम्ही संत्र्याच्या बिया खाऊ शकता का?

गरोदरपणात संत्र्याच्या बियांमुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण जर तुम्ही चुकून मोठ्या बियांचे सेवन केले तर तुम्ही गुदमरू शकता. सत्सुमा किंवा टेंगेरिन्स सारखी लहान संत्री निवडण्याचा प्रयत्न करा ह्या प्रकारच्या संत्र्यांच्या बिया खूप लहान आहेत आणि अशी संत्री सोलणे सोपे आहे.

गरोदर स्त्रियांना संत्र्यांचे अनेक फायदे होऊ शकतात. परंतु जर तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात संत्र्यांचा समावेश करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी शिफारस केली जाते. जर तुमच्या डॉक्टरांनी ते मान्य केले तर तुम्ही संत्री माफक प्रमाणात खा. तुम्ही गरोदरपणानंतर संत्री खाऊ शकता कारण गरोदरपणात खाण्यासाठी ते उत्तम फळ आहे. संत्र्यांमधील कमी चरबीयुक्त सामग्री आणि ग्लायसेमिक इंडेक्स तुम्हाला प्रसूतीनंतर पुन्हा आकारात येण्यास मदत करू शकतात. त्वचेचे पोषण करणारे आणि अकाली वृद्धत्व टाळणारे गुणधर्म देखील संत्र्यांमध्ये आहेत. त्यामुळे गरोदरपणात हे चविष्ट फळ खात रहा आणि निरोगी रहा!

आणखी वाचा:

गरोदरपणात अंजीर खाणे
गरोदरपणात किवी हे फळ खाणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article