आहार आणि पोषण

गरोदरपणात पेरू खाणे सुरक्षित आहे का?

जर तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या आहारात आता बदल झालेला असेल. तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी तुम्ही गरोदरपणात फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि नट्स आणि इतर आरोग्यदायी पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करण्यास तुम्ही सुरुवात केलेली असेल. परंतु आरोग्यदायी असणारी प्रत्येक गोष्ट गरोदरपणात सुरक्षित असतेच असे नाही. गरोदरपणात पेरू हे अत्यंत पौष्टिक फळ तुम्ही खाऊ शकता किंवा नाही ह्याबाबतची माहिती आम्ही ह्या लेखात देणार आहोत. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की पेरू खाल्ल्याने गर्भवती स्त्रीमध्ये अॅपेन्डिसाइटिसची शक्यता वाढते. परंतु, त्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. चला तर मग गरोदरपणात तुम्ही पेरू खाऊ शकता किंवा नाही हे जाणून घेऊयात.

पेरूचे पौष्टिक मूल्य

पेरू खूप पौष्टिक असतात आणि तज्ञांच्या मते गरोदरपणात पेरू खाणे खूप फायदेशीर असते. पेरूमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॉलिक ऍसिड्स असतात. पेरूच्या पौष्टिकतेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

. पेरूमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, , बी 2 आणि ई सारखी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पेरूमध्ये संत्री आणि लिंबूपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी असते असेही मानले जाते.

. पेरू फॉलिक ऍसिड्सचा समृद्ध स्रोत आहे

एस्कॉर्बिक ऍसिड आणि फॉलिक ऍसिड हे गर्भाच्या योग्य वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत. ही दोन ऍसिड्स पेरूमध्ये आढळतात. पेरूमध्ये असलेले फॉलीक ऍसिड रक्ताभिसरण प्रणालीसाठी देखील फायदेशीर ठरते आणि लहान मुलांच्या मज्जासंस्थेच्या विकासात मदत करते.

गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे

गरोदरपणात पेरू खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सकाळी पेरू खाणे हा मॉर्निंग सिकनेसवर उत्तम उपाय आहे. तंतुमय पदार्थ आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे, पेरू हा गरोदरपणाच्या आहाराचा अविभाज्य भाग असावा. गरोदरपणात पेरू खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते आणि गर्भावस्थेतील मधुमेह टाळला जाऊ शकतो, ही एक सामान्य स्थिती आहे आणि गर्भवती महिलांमध्ये ही स्थिती आढळते.

याव्यतिरिक्त, पेरूचे इतरही आरोग्यविषयक फायदे आहेत. पेरू हे एक स्वादिष्ट फळ का आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.

वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ऊर्जा पातळी वाढते आणि शरीरातील तणावयुक्त संप्रेरक कमी होतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचा आणि केसांसाठी पेरू अत्यंत उपयोगी असतो.

पेरू खाण्याचे दुष्परिणाम

जरी पेरू चवीला स्वादिष्ट असला आणि त्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे असले तरीसुद्धा, जर तुम्ही गरोदरपणात जास्त प्रमाणात पेरू खाल्ला तर काही प्रमाणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

  1. पेरूमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. पेरू जर जास्त प्रमाणात खाल्ला तर अतिसार होण्याची शक्यता असते.
  2. पेरू, इतर फळांप्रमाणे, भरपूर रसायने वापरून साठवले जातात. या रसायनांमुळे जिवाणू संसर्ग होऊ शकतो ह्या रसायनांचा गरोदर असताना आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेरू चांगला धुवून खाणे गरजेचे आहे.

पेरूचा रस पिणे किंवा स्वतः फळे खाणे - गरोदरपणात कुठला पर्याय योग्य आहे?

बहुतेक फळे, जेव्हा त्यांच्या कच्च्या आणि नैसर्गिक स्वरूपात खाल्ली जातात तेव्हा ती अधिक आरोग्य विषयक फायदे देतात. पेरू हे असेच एक फळ आहे, पण हे फळ खाण्याचे इतरही काही पर्याय आहेत. पेरूचे सेवन जेली आणि जॅमच्या स्वरूपातही करता येते. हे फळ रस किंवा फळांच्या सॅलडच्या स्वरूपात सुद्धा खाल्ले जाऊ शकते. परंतु, गरोदरपणात, तुम्ही पेरूचा ज्यूस पिणे टाळले पाहिजे. गरोदरपणात जेली आणि जॅम सारख्या संरक्षित स्वरूपात पेरूचे सेवन करणे देखील टाळावे.

तुम्ही फळाची निवड केली पाहिजे आणि संपूर्ण पेरू खाताना, त्यावर कोणताही डाग नसलेला पिकलेला पेरू निवडला पाहिजे. पेरू चांगला स्वच्छ धुवा, त्याचे तुकडे करा आणि खा. पिकलेल्या पेरूला एक अनोखी चव असते. तुम्ही फ्रुट सॅलेड मध्ये सुद्धा पेरू घालून खाऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. पिकलेले किंवा कच्चे पेरू – गरोदरपणात आरोग्यदायी पर्याय कोणता आहे?

कच्चे पेरू खाणे अनेकांना आवडते आणि न पिकलेले पेरू खाण्यात काहीच गैर नाही. कच्चा पेरू खाणे तितकेच पौष्टिक असू शकते आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास कच्च्या पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु, गरोदरपणात, कच्चा पेरू खाण्याची शिफारस केलेली नाही. पिकलेले पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात कच्च्या पेरूच्या तुलनेत व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर तुम्ही कच्चा पेरू खाणे टाळावे कारण कच्चा पेरू चावताना तुम्हाला दातदुखीचा त्रास होऊ शकतो. कच्च्या पेरूंपेक्षा पिकलेले पेरू खा ते आरोग्यासाठी चांगले असते.

पेरू अतिशय पौष्टिक आहेत आणि गरोदरपणात खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुम्ही पिकलेले पेरू खाऊ शकता किंवा पेरूचा ज्यूस पिऊ शकता. पेरू खाण्यापूर्वी तुम्ही आवश्यक ती काळजी घ्या जेणेकरून तुमचे शरीर या रसाळ फळातील सर्व आवश्यक पोषण शोषून घेईल. तसेच गरोदरपणातील आहारात पेरूचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, एका दिवसात किंवा आठवड्यात किती पेरू खावेत यावर चर्चा करा. तुमचे डॉक्टर किंवा पोषणतज्ञ तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पेरू खाण्याची शिफारस करू शकतील. म्हणून योग्य त्या पर्यायाची निवड करा. तुम्हाला सुरक्षित गर्भारपणासाठी शुभेच्छा!

आणखी वाचा: गरोदर असताना नारळपाणी पिणे गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved