Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही

गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही

गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही

गरोदरपणात, आईच्या प्रत्येक कृतीचा बाळावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. स्त्रीच्या खाण्याच्या सवयींचा तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो आणि म्हणूनच पोषक तत्वांनी युक्त असा संतुलित आहार तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाला गरोदर स्त्रीच्या आहार योजनेचा भाग बनवण्याआधी, आई आणि बाळ या दोघांवर होणारे हानीकारक परिणाम (असल्यास) आणि फायदे याची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.

गरोदरपणात आवळा खाणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात आवळा खाणे सुरक्षित आहे. आवळा हे एक लिंबासारखे दिसणारे फळ आहे. पिकल्यावर त्याची चव आंबट गोड असते आणि त्याचा रंग चमकदार हिरवा असतो. फळामध्ये भरपूर पोषक घटक असतात. विशेषत: व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्यामध्ये खूप जास्त असते. त्यामुळे आवळा हे एक खूप चांगले अँटिऑक्सिडेंट आहे. आवळा हा बहुतेक आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्त्वाचा घटक आहे. गर्भवती स्त्रियांना आवळा खाण्याची शिफारस केलेली आहे. आवळ्यामध्ये जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ जास्त असतात. गर्भवती स्त्रियांसाठी तो एक चांगला पर्याय आहे.

गरोदरपणात आवळा खाण्याचे फायदे

आवळा सामान्यतः संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध आहे आणि पावडरच्या स्वरूपात आवळा संरक्षित केला जाऊ शकतो. गरोदरपणात आवळ्याचे आई आणि बाळासाठी अनेक फायदे आहेत. आवळा खाण्याचे काही फायदे खाली दिले आहेत.

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आवळा एक उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे. आवळा रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतो. व्हिटॅमिन सीचे उच्च प्रमाण गरोदरपणात सामान्य फ्लू आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या संक्रमणांशी लढण्यास मदत करते. आवळ्याचा एक फायदा म्हणजे प्रसूतीनंतर स्तनपान करवण्यास मदत करते, अशा प्रकारे आपल्या बाळाला रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे आईचे दूध मिळते.

2. बद्धकोष्ठता रोखण्यास मदत

आवळा उच्च फायबर सामग्रीमुळे, आतड्याची हालचाल नियमित होते. तसेच गरोदरपणात बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

3. पचनशक्ती वाढवते

अपचन आणि आम्लपित्त तयार होण्यासारख्या समस्या कमी करण्यास आवळा मदत करतो कारण आवळ्यामुळे पोटात गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतो आणि अन्न पचन होण्यास मदत होते.

4. रक्तदाब राखण्यास मदत करते

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यास मदत होते, त्यामुळे, सामान्य रक्तदाब राखण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत होते.

5. थकवा आणि तणावापासून आराम मिळतो

आवळ्याची गोडआंबट चव गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत होणारी सामान्य मळमळीची भावना नियंत्रित करण्यास मदत करते. आवळ्याचा रस प्यायल्यास किंवा तो कच्चा खाल्ल्याने मॉर्निंग सिकनेस कमी होण्यास मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

6. एडेमा नियंत्रित करण्यास मदत करते

दाहकविरोधी गुणधर्मांमुळे, आवळा हातापायांची सूज कमी करण्यास मदत करतो.

7. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो

आवळा हे एक उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने लघवीची वारंवारता वाढते. आवळा शरीरातून रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो.

8. गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका कमी करते

मधुमेहाचा इतिहास नसलेल्या स्त्रियांनाही गरोदरपणात मधुमेह होऊ शकतो. गरोदरपणातील हार्मोन्स शरीरातील इन्सुलिनच्या पातळीमध्ये हस्तक्षेप करतात. आवळ्यामध्ये मधुमेहविरोधी गुण आहेत आणि ते आईला गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता मर्यादित ठेवण्यास मदत करतात.

9. बाळाची स्मरणशक्ती वाढवते

आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने बाळाची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

10. तोंडाचे आरोग्य चांगले राखते

आवळ्यातील व्हिटॅमिन सी तोंडाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, श्वासाची दुर्गंधी किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव यांसारख्या परिस्थितीस प्रतिबंध करण्यास मदत करते. कॅल्शियम मुळे दातांची कीड टाळण्यास देखील मदत करते.

गरोदरपणात तुम्ही किती आवळा खाऊ शकता?

गरोदरपणात, दररोज एक किंवा दोन ताजे आवळा खाणे सुरक्षित आहे. जर तुम्ही आवळा पावडरच्या स्वरूपात घेत असाल तर पावडरचा एक चमचा घेणे ठीक आहे.

गरोदरपणात आवळा खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत?

गरोदर स्त्रियांना आवळ्याचे अनेक फायदे आहेत. तथापि, जर तुम्ही गरोदरपणात आवळा जास्त प्रमाणात खाल्ला कि अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार होऊ शकतो आणि पोट खराब झाल्याने तुम्हाला निर्जलीकरण देखील होऊ शकते. त्यामुळे आवळा मर्यादित प्रमाणातच खाण्याचा सल्ला दिला जातो.

गरोदर असताना तुम्ही आवळ्याचा रस (गूसबेरी ज्यूस) पिऊ शकता का?

गरोदरपणात गुसबेरी किंवा आवळ्याचा रस पिणे सुरक्षित आहे. परंतु, तुम्ही बाजारात मिळणारा पॅक केलेला आवळ्याचा रस घेणे टाळावे कारण तो रस गोड असू शकतो किंवा त्यात अतिरिक्त संरक्षक असू शकतात. गर्भवती महिलांसाठी याची शिफारस केलेली नाही.

तुम्ही घरी आवळ्याचा गर काढा आणि पाण्यात मिसळून प्या. दररोज सुमारे ५ मिली ते १० मिली आवळ्याचा रस घेणे हे एक आदर्श प्रमाण आहे.

गरोदर असताना तुम्ही आवळ्याचा रस (गूसबेरी ज्यूस) पिऊ शकता का?

शिजवलेला आवळा गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का?

कच्चा आवळा खाणे उत्तम आहे जेणेकरून त्यातील पोषक तत्वांचा शरीराला पुरेपूर उपयोग होईल. आवळा शिजवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि त्यामुळे त्याची शिफारस केली जात नाही. जर तुम्ही कच्चा आवळा खाऊ शकत नसाल तर ताज्या आवळ्याचा रस प्यावा किंवा आवळा पावडर पाण्यात मिसळून प्यावे.

गरोदरपणात आवळा कधी टाळावा?

आवळ्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नसले तरी, जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला होत असेल तर फळ टाळणे चांगले. आवळ्याचा शरीरावर थंड प्रभाव होतो. जर तुम्हाला सर्दी असेल तर यामुळे तुमची सर्दी वाढू शकते. जर तुम्हाला जुलाब होत असतील तर आवळा टाळा, कारण त्याचे रेचक परिणाम तुमची स्थिती बिघडू शकतात.

तुमच्या आहारात गुसबेरी (आवळा) समाविष्ट करण्याचे मार्ग

काही स्त्रियांना कच्चा आवळा खायला आवडतो तर काहींना त्याची आंबट चव आवडत नाही. त्यामुळे आवळा वेगळ्या स्वरूपात खाण्यास ते प्राधान्य देतात. तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करण्यासाठी या काही टिप्स.

. आवळ्याचे लोणचे

तुम्ही न्याहारीच्या वेळेला आवळ्याचे लोणचे खाऊ शकता कारण त्याची तिखट चव तुमची लालसा कमी करेल आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून परावृत्त करेल. तुम्ही जेवताना सुद्धा आवळ्याचे लोणचे खाऊ शकता.

. आवळा कोशिंबीर

तुमच्या नेहमीच्या सॅलडमध्ये आवळ्याचे काही चिरलेले तुकडे मिसळल्याने देखील त्याची चव चांगली लागते.

. ताजा रस

आवळ्याचा गर काढून त्यात पाणी मिसळून तो रस स्वरूपात प्या. तुम्ही आवळा ज्युसरमध्ये बारीक करून त्याचा ज्यूस करून तो पुदिन्याच्या पानांनी सजवू शकता.

ताजा रस

. मिष्टान्न

तुम्ही जेवणानंतर आवळा मधासोबत खाऊ शकता. आवळ्याची पौष्टिक आणि आरोग्यदायी मिठाई तुम्ही करू शकता.

मिष्टान्न

. अन्नपदार्थातील एक घटक

जर तुम्हाला कच्चा आवळा खाणे आवडत नसेल, तर तुम्ही सांबार, करी, कोरमा इ.मध्ये घालून खाऊ शकता.

अन्नपदार्थातील एक घटक

गरोदरपणात पॅकबंद आवळा ज्यूस पिणे चांगले आहे का?

पॅक केलेला आवळा ज्यूस टाळणे चांगले असते कारण त्यात गोडसर आणि संरक्षक घटक असू शकतात. जर तुम्ही ताजा ज्यूस घेऊ शकत नसाल तर पॅक केलेला ज्यूस निवडताना तो विश्वासार्ह ब्रँडचा निवडावा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

. मी गरोदरपणात सुका आवळा खाऊ शकते का?

तुम्ही आवळा पाचक किंवा आवळा सुपारी गरोदरपणात सेवन करू शकता. तो आवळ्याचा वाळलेला प्रकार आहे. यामध्ये ताज्या आवळ्याचे जवळपास सर्व फायदे आहेत. सुका आवळा तुम्ही घरी सहज बनवू शकता.

. मी गरोदर असताना खारट आवळा खाऊ शकतो का?

गरोदरपणात मिठाचे सेवन मर्यादित करणे आणि जास्त प्रमाणात खारवलेले पदार्थ टाळणे चांगले, कारण ते द्रवइलेक्ट्रोलाइट संतुलनावर विपरित परिणाम करू शकतात आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकतात.

आवळा हे गर्भवती महिलांसाठी अनेक फायदे असलेले सुपरफूड आहे. फक्तयोग्य खबरदारी घ्या. गरोदर असताना तुम्ही हे फळ खाण्याचा आनंद घेऊ शकता.

आणखी वाचा:

गरोदरपणात केळी खाणे
गरोदरपणात डाळिंब खाणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article