आहार आणि पोषण

गरोदरपणात आल्याचा चहा घेणे

गरोदरपणाची पहिली तिमाही काही स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मॉर्निंग सिकनेस, उलट्या आणि मळमळ ही गरोदरपणातील लक्षणे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. म्हणूनच ह्या काळात सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही ताजी फळे आणि पौष्टिक धान्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही हर्बल मिश्रणांचा समावेश करावा लागेल. उदा: आल्याचा चहा उलट्या आणि मळमळ कमी करते असे मानले जाते आणि गरोदरपणात मॉर्निंग सिकनेससाठी देखील मदत करू शकते. परंतु, गर्भवती स्त्रियांनी आल्याचा चहा पिणे सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रश्न चांगला आहे. चला उत्तर शोधूया!

गरोदरपणात आल्याचा चहा पिणे सुरक्षित आहे का?

आल्याचा चहा मर्यादित प्रमाणात पिणे गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषत: पहिल्या तिमाहीत आल्याचा चहा घेणे फायदेशीर ठरू शकते कारण तो मॉर्निंग सिकनेसवर नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करतो. परंतु गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात दररोज १ ग्रॅमपेक्षा जास्त आले खाऊ नये. सर्वसाधारणपणे, गर्भवती स्त्रीने दररोज १.२ ग्रॅम आल्याचे सेवन केले पाहिजे. अत्यंत क्वचित प्रसंगी, काही गर्भवती स्त्रियांना गरोदरपणात आल्याची ऍलर्जी होऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

गरोदर स्त्रियांसाठी आल्याच्या चहाचे फायदे

गरोदरपणात आल्याच्या चहाचे असंख्य फायदे आहेत; त्यापैकी काही इथे दिलेले आहेत

. मॉर्निंग सिकनेस कमी होण्यास मदत होते

आले पचन सुरळीत करते आणि श्वसनमार्गाला नैसर्गिकरित्या बळकटी देण्यास मदत करते. याव्यतिरिक्त,आल्याचा घशावर सुखदायक प्रभाव पडतो आणि उलट्या टाळण्यास मदत होते. थोडक्यात, बरेच डॉक्टर गरोदरपणात होणारा मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी आल्याच्या चहाची शिफारस करतात. रात्री आणि सकाळी उठल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने मॉर्निंग सिकनेस नियंत्रणात राहण्यास मदत होते.

. पचनास मदत होते

मॉर्निंग सिकनेस प्रमाणेच, पचन सुलभ होण्यासाठी बहुतेक डॉक्टर गरोदरपणात आल्याचा चहा घेण्याचा सल्ला देतात कारण त्याचा पचनावर सकारात्मक परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारक प्रणाली पचन प्रक्रिया अधिक कठीण करेल. एक ग्लास आल्याचा चहा घेतल्याने तुम्हाला तुमच्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यास आणि बळकट करण्यात मदत होऊ शकते.

. प्रतिकारशक्ती सुधारते

आल्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. गरोदर असताना अन्न पदार्थांमध्ये किंवा चहामध्ये घालण्यासाठी हा एक उत्तम घटक मानला जातो कारण आल्यामध्ये असलेले घटक सतत असंख्य रोगांचा सामना करण्यास मदत करतात तसेच आजारांना प्रतिबंधित करतात.

. घश्याला बरे वाटण्यास मदत होते

आल्याचा वापर घशाच्या संसर्गापासून आराम मिळविण्यासाठी केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आल्यामध्ये असलेल्या सुखदायक गुणधर्मांमुळे घशाला बरे वाटण्यास मदत होते. जर गरोदरपणात तुमचा घसा खवखवत असेल तर तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता.

. चिंता कमी करण्यास मदत होते

मेंदूला आराम देणारे गुणधर्म आल्यामध्ये आहेत आणि चिंता व्यवस्थापित करण्यात मदत करतात. मर्यादित डोसमध्ये, आल्याचा चहा घेतल्यास तुम्हाला बरे वाटण्यासाठी मदत होऊ शकते.

. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करते

आले ही खनिजे समृद्ध असलेली मूळ भाजी आहे. आले मध्यम प्रमाणात घेतल्यास तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात मदत होऊ शकते.

. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते

आल्यामध्ये असलेली आवश्यक खनिजे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राखण्यात मदत करण्यासाठी पौष्टिक आहारासोबत मर्यादित प्रमाणात आल्याचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.

. स्नायूंना बरे होण्यास मदत होते

आल्याचे सुखदायक स्वरूप तुमच्या शरीराला स्नायूंच्या थकव्यापासून बरे करण्यास मदत करते. गरोदरपणात एक कप आल्याचा चहा प्यायल्याने तुमचे सांधे आणि हाडांना मदत होते. तुमच्या शरीराला आराम मिळू शकतो आणि थकवा दूर होतो.

गरोदरपणात आल्याचा चहा किती प्रमाणात प्यावा?

आल्याचा चहा कमी प्रमाणात घेतला पाहिजे कारण जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा फायदा होण्यापेक्षा हानी जास्त होऊ शकते. बहुतेक वैद्यकीय तज्ञांनी सांगितलेले आहे की गरोदर स्त्रियांनी दररोज एक ग्रॅम पेक्षा जास्त आले कोणत्याही स्वरूपात खाऊ नये. म्हणजेच तुमच्या चहामध्ये आले घालण्याचे प्रमाण दररोज एक ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवा आणि आल्याच्या चहाचे पौष्टिक मूल्य जास्तीत जास्त वाढवण्यासाठी चहामध्ये इतर आरोग्यदायी घटक घाला.

गरोदर स्त्रियांसाठी आल्याच्या चहाच्या सर्वोत्कृष्ट पाककृती

आल्याच्या चहाच्या काही उत्कृष्ट पाककृती येथे आहेत. तुम्ही गरोदर असताना आल्याच्या चहाचे सेवन करू शकता पण आले घालून केलेला चहा तुम्ही दिवसातून दोनदा घ्यावा. आल्याचा चहा घेत असल्यास दिवसातून दोनदा तुमचा नियमित चहा घेऊ नका. गरोदरपणात तुमचा नेहमीचा चहा आणि आल्याचा चहा पिण्याबद्दल तुमच्या पोषणतज्ञ किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा.

. लिंबू आले चहा

मंद आचेवर नेहमीचा चहा तयार करा. त्यामध्ये एक चमचा आले किसून घाला, अर्धा लिंबू पिळून घ्या आणि एक चमचा मध घाला. ढवळून पुदिन्याच्या पानांनी सजवा

. आले लवंग चहा

एका भांड्यात पाणी उकळून घेऊन त्यामध्ये एक चमचा किसलेले आले आणि ३-४ लवंगा घाला. ५ मिनिटे मंद आचेवर उकळा, नंतर काही चहाची पाने घालून आणखी ३ मिनिटे उकळत रहा, गॅस बंद करा, एका कपमध्ये चहा गाळून घ्या, एक चमचा मध मिसळा आणि तुमच्या गरम आल्याच्या लवंग चहाचा आनंद घ्या.

. आले घालून ग्रीन टी

एका भांड्यात एक कप पाणी गरम करा. त्यात एक चमचा किसलेले आले घालून मंद आचेवर ८ मिनिटे उकळा. एका कपमध्ये आल्याचे पाणी घाला, ग्रीन टीची १ डिप बॅग घाला, ३ मिनिटे तशीच भिजू द्या, डिप बॅग काढून टाका आणि आले घालून केलेला हा कोमट ग्रीन टी प्या.

. कॅमोमाइल आले चहा

एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा किसलेले आले घालून मंद आचेवर उकळी आणा. नंतर ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. एक चमचा मध घालून ढवळून घ्या आणि नंतर त्यात कॅमोमाइल टी बॅग बुडवा. सुमारे २ मिनिटे टी बॅग तशीच राहू द्या. आता टी बॅग काढून घ्या आणि गरम कॅमोमाइल आल्याच्या चहाचा आनंद घ्या.

. तुळशी आल्याचा चहा

तुमचा नेहमीचा चहा करून, त्यामध्ये एक चमचा किसलेले आले आणि काही तुळशीची पाने घालून उकळी आणा. सर्व्हिंग कपमध्ये गाळून घ्या. थोडा लिंबाचा रस आणि मध घालून ढवळून घ्या. चहाचा आस्वाद घ्या.

आल्याच्या चहाचे काही दुष्परिणाम आहेत का?

आल्याचा चहा आरोग्यासाठी चांगला आहे पण विशेषतः गरोदरपणात जास्त प्रमाणात सेवन केल्यास, रक्त कमी होऊ शकते. आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा रक्त गोठण्यावर परिणाम होऊ शकतो आणि जास्त प्रमाणात रक्त कमी होऊ शकते.

गरोदरपणात आल्याचा चहा पिणे सुरक्षित आहे, परंतु आल्याचा चहा घेतल्यावर तुम्हाला अस्वस्थ किंवा आजारी वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमच्या आहारात आल्याचा जास्त प्रमाणात समावेश करू नका कारण ते हानिकारक असू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या पोषणतज्ञांशी बोला. तुम्हाला निरोगी गरोदरपणाची शुभेच्छा!

आणखी वाचा:

गरोदर असताना नारळपाणी पिणे गरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved