In this Article
गरोदरपणात स्त्रीला अनेक चाचण्या कराव्या लागतात. आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहावे यासाठी काही चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांना काही शंका आली तर डॉक्टर इतर चाचण्यांची सुद्धा शिफारस करतात. डबल मार्कर ही चाचणी दुसऱ्या श्रेणीत येते.
डबल मार्कर चाचणी म्हणजे काय?
डबल मार्कर चाचणी ही विशिष्ट प्रकारची रक्त चाचणी आहे. ही चाचणी बाळांमधील कोणतीही गुणसूत्र विकृती शोधण्यासाठी केली जाते. गुणसूत्रांमध्ये कोणतीही विकृती आढळल्यास आरोग्याची स्थिती गंभीर होऊ शकते आणि विकार होऊ शकतात. त्यामुळे पोटातील बाळावर किंवा बाळाच्या नंतरच्या आयुष्यातही वाढीवर परिणाम होऊ शकतो. ह्या चाचणीच्या मदतीने, डाऊन्स सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, इत्यादीसारख्या विशिष्ट विकारांची उपस्थिती किंवा शक्यतांबद्दल आधीच माहिती मिळू शकते.
दुहेरी मार्कर चाचणी सामान्यतः गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत केली जाते, म्हणजे, साधारणपणे गरोदरपणाच्या ८ व्या ते १४ व्या आठवड्यांच्या दरम्यान ही चाचणी केली जाते. साधारणपणे ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना ह्या चाचणीची शिफारस केली जाते, कारण त्यांना दोष असलेल्या बाळांना जन्म देण्याचा धोका जास्त असतो. परंतु, आजकाल तरुण स्त्रियांना देखील ही चाचणी करून घेण्यास सांगितले जाते, विशेषत: ज्यांच्या कुटुंबात जन्मजात अपंगत्वाचा इतिहास आहे, अशा गर्भवती स्त्रियांना ही चाचणी करून घेण्यास सांगितले जाते.
डबल मार्कर चाचणीचे फायदे काय आहेत?
डबल मार्कर चाचणी गर्भातील क्रोमोसोमल असामान्यता शोधण्यात मदत करते. परंतु ही चाचणी करण्यामागचे हे केवळ एक कारण आहे. डॉक्टरांनी ही चाचणी का सुचवली याची काही इतर कारणे खाली नमूद केली आहेत:
- डबल मार्कर चाचणी ही एक अतिशय विश्वासार्ह चाचणी आहे आणि बहुतेक वेळा, ही चाचणी कोणतीही असामान्यता किंवा समस्या अचूकपणे शोधण्यात मदत करते.
- चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्यास, म्हणजे, गुणसूत्रातील विकृती आढळून आल्यास, समस्या शोधण्यासाठी पुढील निदान प्रक्रिया किंवा उपाययोजना केल्या जाऊ शकतात. ही चाचणी आरोग्यविषयक समस्या लवकर ओळखण्यास मदत करते.
- ही चाचणी झाल्यानंतर बाळामध्ये डाउन सिंड्रोम किंवा एडवर्ड सिंड्रोम तपासण्यासाठी डॉक्टर सहसा पुढच्या चाचण्या करण्यास सांगतात. ही चाचणी केल्याने, डॉक्टरांना समस्या ओळखण्यास मदत होते आणि खूप उशीर होण्यापूर्वी उपचार केले जातात.
- चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्यास, आणि न्यूरोलॉजिकल स्थितीचे निदान झाल्यास, तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, गुंतागुंत न होता गर्भारपण समाप्त करण्याचा पर्याय निवडू शकता.
चाचणीची तयारी कशी करावी?
डबल मार्कर चाचणी ही मूलत: रक्त चाचणी असल्याने, तुमच्याकडून कोणत्याही विशिष्ट तयारीची आवश्यकता नसते. परंतु, जर तुम्ही गरोदरपणात कोणतीही औषधे घेत असाल तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना कळवा. क्वचित प्रसंगी, तुम्हाला चाचणी होईपर्यंत औषध घेणे थांबवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच, तुम्हाला कोणतीही ऍलर्जी किंवा वैद्यकीय समस्या असल्यास, त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना कळवा.
ही चाचणी कशी केली जाते?
डबल मार्कर चाचणी ही एक रक्ताची चाचणी आहे. ही चाचणी अल्ट्रासाऊंडद्वारे केली जाते. एकदा रक्ताचे नमुने घेतल्यानंतर, संप्रेरक फ्री-बीटा एचसीजी आणि गर्भधारणा-संबंधित प्लाझ्मा प्रोटीन ए (पीएपीपी-ए) चे स्तर तपासले जातात. हे ग्लायकोप्रोटीन संप्रेरक गरोदरपणात नाळेद्वारे विकसित केले जाते. फ्री-बीटा एचसीजीची उच्च पातळी डाउन सिंड्रोमचा उच्च धोका दर्शवते. दुसरीकडे, प्रथिनांच्या कमी पातळीमुळे डाऊन सिंड्रोमचा धोका असतो.
चाचणीच्या परिणामांचा अर्थ कसा लावला जातो?
डबल मार्कर चाचणी परिणाम सामान्यतः दोन श्रेणींमध्ये येतात: स्क्रीन पॉझिटिव्ह आणि स्क्रीन निगेटिव्ह. चाचणीचे परिणाम केवळ रक्ताच्या नमुन्यांवर अवलंबून नसतात तर ते आईच्या वयावर अल्ट्रासाऊंड दरम्यान आढळलेल्या गर्भाच्या वयावर देखील अवलंबून असतात. हे सर्व घटक परिणाम ठरवण्यासाठी एकत्र काम करतात. परिणाम गुणोत्तरांच्या स्वरूपात सादर केले जातात. 1:10 ते 1:250 या गुणोत्तराला “स्क्रीन पॉझिटिव्ह” परिणाम असे संबोधले जाते, आणी तो उच्च-जोखीम दर्शवतो. 1:1000 किंवा त्याहून अधिक गुणोत्तराला “स्क्रीन नकारात्मक” परिणाम म्हणून संबोधले जाते, त्यामुळे कमी धोका असतो.
हे गुणोत्तर म्हणजे बाळाला एखादा विकार असल्यास तो समजून घेण्याचा निर्देशक आहे. प्रत्येक गुणोत्तर गरोदरपणात बाळाला विकार असण्याची शक्यता दर्शवते. 1:10 गुणोत्तर म्हणजे 10 गर्भारपणांमध्ये एका बाळाला विकार होण्याची शक्यता असते आणि ती खूप जास्त असते. 1:1000 गुणोत्तर म्हणजे 1000 गर्भधारणेपैकी एका मुलाला हा विकार असेल आणि हे प्रमाण खूप नगण्य आहे.
चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यास, गुणोत्तरांच्या आधारे तुमचे डॉक्टर तुम्हाला पुढील चाचण्या करण्यास सांगू शकतात, मुख्यत: अम्नीओसेन्टेसिस किंवा कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग ह्या त्या चाचण्या आहेत.
चाचणीची सामान्य मूल्ये काय आहेत?
दुहेरी मार्कर चाचणीची सामान्य श्रेणी खालीलप्रमाणे आहेत:
मार्कर | वय | प्रमाण |
फ्री-बीटा ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन | सर्व वयोगटांसाठी | 25700 ते 288000 एमएलयु प्रति मिली |
डबल मार्कर चाचणीचे काही तोटे आहेत का?
या चाचणीचे तोटे माहित नाहीत. जेव्हा आवश्यक असते तेव्हाच डॉक्टर ही चाचणी करायला सांगतात. ही चाचणी सर्व शहरांमध्ये उपलब्ध नसू शकते. तुमच्या डॉक्टरांनी ही चाचणी करून घेण्याचा सल्ला दिल्यास, तुम्हाला त्यासाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल.
चाचणीची किंमत काय आहे?
दुहेरी मार्कर चाचणीची किंमत वेगवेगळी शहरे आणि रुग्णालयांमध्ये भिन्न असते. चाचणीची किंमत कुठेतरी रु. 1000 आणि रु. 5000 या दरम्यान असते. या चाचणीची सरासरी किंमत अनेक शहरांमध्ये सुमारे रु.2500 इतकी असते.
गरोदर असताना, तुम्ही तुमच्या मुलाच्या आरोग्याशिवाय आणखी कशासाठीही प्रार्थना करत नाही. तुमचे बाळ निरोगी आहे आणि सामान्य जीवन जगण्यासाठी त्याची योग्य वाढ होण्यासाठी तुम्ही संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे. जीवनशैलीत आवश्यक ते बदल केले पाहिजेत. स्वतःला आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत. परंतु, काही वेळा योग्य काळजी घेऊन सुद्धा चाचणीचे परिणाम बाळाला विकार असल्याचे निर्देशित करतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करून बाळाविषयीचा निर्णय घेतला पाहिजे. गर्भारपण संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणे निश्चितपणे कठीण आहे, परंतु आपण परिणामांचा विचार केला पाहिजे. तुम्ही निर्णय घेऊ शकत नसल्यास, तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा ते तुम्हाला योग्य पर्याय सुचवतील.
आणखी वाचा:
गरोदरपणातील क्वाड्रपल मार्कर चाचणी
गरोदरपणातील ट्रिपल मार्कर स्क्रीन चाचणी