गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

तुम्ही गरोदर असताना, तुम्हाला तुमच्या बाळाविषयी सगळे जाणून घ्यायचे असते. तुमच्या पोटातील बाळाचा, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक आठवड्याला कसा विकास होतो आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असते. जर तुम्ही १७ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुमच्या बाळाची किती प्रगती झाली आहे हे जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल.

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील तुमचे बाळ तुमच्या तळहाताच्या आकाराचे असेल. त्याचे/तिचे वजन सुमारे ११३ ते १४० ग्रॅम असू शकते आणि त्याची लांबी सुमारे ११ ते १४ सेमी असू शकते. बाळाची लांबी आणि वजन आनुवंशिक घटकांवर अवलंबून असते. या आठवड्यापर्यंत, तुमच्या बाळाची चांगली वाढ झालेली असेल आणि तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली अधिक स्पष्टपणे जाणवू शकतील. तुमचे लहान मूल कसे विकसित होत आहे याचे स्पष्ट चित्र मिळविण्यासाठी, तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यावा. १७ व्या आठवड्यातील स्कॅन केल्याने बाळाच्या विकासामध्ये काही विसंगती किंवा समस्या असल्यास त्या कळण्यास मदत होते.

तुम्हाला १७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅनची गरज का आहे?

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात स्कॅन करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत -

गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी?

१७ व्या आठवड्यातील स्कॅनसाठी विशेष तयारीची आवश्यकता नाही परंतु स्कॅनच्या वेळी तुमचे मूत्राशय पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमच्या बाळाच्या चांगल्या प्रतिमा घेण्यास मदत होईल. पण म्हणून, खूप जास्त पाणी पिऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तुमच्या स्कॅनच्या ३० मिनिटे आधी तुम्ही ३ ग्लास पाणी घेऊ शकता. आरामदायक कपडे घाला जेणेकरून सोनोग्राफरला स्कॅन करणे सोपे जाईल.

१७ आठवड्याचे अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?

या स्कॅनला ४० मिनिटे ते एक तास लागू शकतो कारण तंत्रज्ञांना बाळाच्या विविध अवयवांची मापे घ्यायची असतात. जुळ्या मुलांसाठी १७-आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडला जास्त वेळ लागेल. गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यात अंतर्गत अवयव दिसू शकतील अशी बाळाची स्थिती नसेल तर स्कॅन साठी जास्त वेळ लागू शकतो.

१७ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

१७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन हे पोटाचे स्कॅन आहे. तंत्रज्ञ तुम्हाला पोट उघडे ठेऊन टेबलावर झोपायला सांगतील. त्यानंतर तंत्रज्ञ तुमच्या पोटावर जेल लावतील आणि त्वचेवर ट्रान्सड्यूसर दाबून धरतील. ट्रान्सड्यूसरद्वारे अल्ट्रासाऊंड लहरी पाठवल्या जातील ज्यामुळे मॉनिटरवर तुमच्या बाळाची प्रतिमा तयार होईल. स्कॅन केल्यानंतर, तुम्ही जेल पुसून टाकू शकता किंवा पाण्याने धुवून टाकू शकता. जर गर्भाचे काही भाग स्पष्टपणे दिसत नसतील, तर गर्भाच्या प्रतिमा मिळविण्यासाठी योनीमध्ये प्रोब घालून वेदनारहित पद्धतीने ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन केले जाऊ शकते. परंतु सहसा, टीव्हीएसची आवश्यकता नसते कारण आता गर्भाशय पुरेसे मोठे असते आणि पोटाच्या स्कॅनद्वारे मॉनिटरवर प्रतिमा स्पष्टपणे दिसतात.

तुमच्या गर्भधारणेच्या सतराव्या आठवड्यात तुम्ही स्कॅनवर काय पहाल?

१७ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्ही काय पाहू शकता ते येथे आहे:

अल्ट्रासाऊंडमध्ये काही विकृती दिसल्यास काय?

१७ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन दरम्यान कोणतीही विकृती आढळल्यास, रेडिओलॉजिस्ट तुमच्या डॉक्टरांशी बोलतील आणि त्यांना समस्या कळवतील. त्यानंतर पुढील पावले उचलण्याबाबत डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील. रक्त चाचण्या, लेव्हल टू अल्ट्रासाऊंड, सीव्हीएस आणि अॅम्नीओसेन्टेसिस यासारख्या चाचण्या विसंगतीचे नेमके स्वरूप निश्चित करण्यात त्यामुळे मदत होऊ शकते. त्यानंतर डॉक्टर तुमच्याशी उपचार आणि इतर पर्यायांवर चर्चा करतील.

न जन्मलेल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे आणि फोर डी अल्ट्रासाऊंड स्कॅनवर बाळाच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहणे हा पालकांसाठी खूप सकारात्मक आणि आनंददायी अनुभव आहे, विशेषत: पहिल्या बाळाच्या वेळेला हा आनंद खूप जास्त असतो. त्यामुळे हे अल्ट्रासाऊंड स्कॅन किंवा इतर कोणतेही अल्ट्रासाऊंड स्कॅन वगळू नका. तुम्हाला आनंदी आणि निरोगी गरोदरपणासाठी शुभेच्छा!

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved