गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गर्भावस्था हा एक अवर्णनीय प्रवास आहे. गर्भधारणा म्हणजे पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. जेव्हा एखादी स्त्री गरोदरपणाचे वेगवेगळे टप्पे पार करीत असते तेव्हा बाळाची तपासणी करण्यासाठी तसेच बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी तिने अल्ट्रासाऊंड करून घेणे अत्यावश्यक आहे. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात सुद्धा अल्ट्रासाऊंड करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

गरोदर स्त्रियांनी १६ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?

तुम्ही गरोदरपणाच्या १६व्या आठवड्याचा टप्पा गाठला की गोष्टी थोड्या रोमांचक होऊ लागतात आणि तुमच्या बाळाची प्रगती समजून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड महत्वाचे आहे. प्रसवपूर्व काळजी हा प्रत्येक आईच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे आणि या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड का आवश्यक आहे याची काही कारणे येथे आहेत.

  1. हा अल्ट्रासाऊंड स्कॅन तुमच्या बाळाची वाढ समजून घेण्यास मदत करू शकतो आणि तसेच ह्या स्कॅन मध्ये बाळाच्या शरीराच्या काही भागांचे मोजमाप करता येते. त्याचप्रमाणे बाळामध्ये कुठल्या समस्या तर नाहीत ना हे सुद्धा हे सुद्धा ह्या स्कॅनद्वारे समजते.
  2. अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या मातृत्वाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनेल. हा स्कॅन गर्भाचा आकार, रचना आणि कोणत्याही पॅथॉलॉजिकल जखमा असल्यास त्या जाणून घेण्यास मदत करतो.
  3. ह्या स्कॅन मध्ये तुम्हाला तुमचे बाळ बघता येते. बाळाच्या नियमित आणि जन्मपूर्व काळजीसाठी तयार होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.
  4. तुमचे बाळ निरोगी आणि सुरक्षित आहे की नाही आणि बाळामध्ये काही विकृती आहेत का हे समजण्यास त्यामुळे मदत होते.
  5. डाउन सिंड्रोम किंवा इतर कोणतेही गुणसूत्र दोष किंवा इतर कोणतेही न्यूरल ट्यूब दोष यांसारख्या अनुवांशिक समस्या देखील तपासल्या जाऊ शकतात.
  6. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात बाळाच्या हृदयाचे ठोके तसेच हृदय आणि इतर अवयवांचे आरोग्य निश्चित केले जाऊ शकते. तसेच बाळामध्ये हृदय दोष तर नाही ना हे जाणून घेण्यास मदत होते.

१६ आठवड्यांच्या स्कॅनसाठी कोणती तयारी आवश्यक आहे?

गरोदरपणाच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, १६ व्या आठवड्यात तुमचे बाळ सर्वात मोठे असेल. त्यामुळे अल्ट्रासाऊंड स्कॅनला जाण्याआधी काही तयारी करणे आवश्यक आहे. तुमचे बाळ जे १६ व्या आठवड्यात सुमारे साडेचार इंचाचे असते, ते आता दर महिन्याला आकाराने दुप्पट वाढेल. ह्या काळात वजन नक्कीच वाढेल. मॉर्निंग सिकनेस पूर्णपणे नाहीसा होईल.

तुमचे शरीर दूध तयार करण्यास सुरवात करेल, त्यामुळे तुमच्या स्तनांच्या आकारात वाढ होईल. तसेच तुमच्या पोटाचा आकार सुद्धा वाढेल आणि त्वचेच्या रंगात बदल होईल.

स्कॅन करण्यापूर्वी, तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या वैद्यकीय इतिहासाची कागदपत्रे तुमच्या स्त्रीरोगतज्ञाकडे तुम्ही घेऊन जावीत. तुम्हाला जाणवत असलेली कोणतीही लक्षणे किंवा समस्यांबद्दल प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. तुम्ही थायरॉईड, स्तन, फुफ्फुस आणि हृदयासह संपूर्ण शारीरिक तपासणी देखील करून घ्यावी. लघवीच्या चाचण्यांद्वारे गरोदरपणातील मधुमेह, प्रीक्लेम्पसिया किंवा इतर कोणत्याही मूत्रमार्गाच्या संसर्गाची चिन्हे तपासण्यासाठी तुम्ही लॅब टेस्ट करून घ्यावी.

गरोदरपणाविषयी आणि अल्ट्रासाऊंड सारख्या वैद्यकीय प्रक्रियांशी स्वतःला परिचित करून घेतल्याने तुम्हाला तुमच्या बाळाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.

गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडसाठी किती वेळ लागतो?

अल्ट्रासाऊंडला १५ ते ४५ मिनिटांपर्यंत कितीही वेळ लागू शकतो. अल्ट्रासाऊंड करण्यापूर्वी, रुग्णाला भरपूर पाणी किंवा द्रव पिण्यास सांगितले जाते तसेच घन पदार्थांपासून दूर राहण्यास सांगितले जाते. जेव्हा तुम्ही स्कॅनची वाट पहात असता तेव्हा बाथरूमला जाऊ शकत नाही. स्कॅननंतर तुम्ही बाथरूमला जाऊ शकता.

चाचणीला जाण्यापूर्वी वेळ लागणार आहे अशी मनाची तयारी तुम्ही केली पाहिजे. इमेजिंग रिपोर्ट तयार होण्यासाठी देखील एक दिवस लागतो परंतु दोन्ही पालकांना त्यांच्या बाळाची प्रतिमा स्क्रीनवर दाखवली जाईल.

सोळा आठवड्याचे स्कॅन कसे केले जाते?

गरोदरपणातील १६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड करताना शरीरात उच्च ध्वनी लहरी उत्सर्जित करणारे उपकरण वापरले जाते. ह्या लहरी शरीराच्या विविध अवयवांवर आदळतात आणि उसळतात. अल्ट्रासाऊंड करण्यासाठी वापरले जाणारे प्रोब ह्या उसळणार्‍या ध्वनी लहरींमुळे निर्माण झालेले हे प्रतिध्वनी उचलते आणि त्यांचे एका हलत्या प्रतिमेत रूपांतर करू लागते. या प्रतिमा ग्राफिक्स डिस्प्ले मॉनिटरद्वारे बघितल्या जाऊ शकतात. ह्या चाचण्या सामान्यतः दवाखान्यात, निदान केंद्रात किंवा हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात घेतल्या जातात. एक विशेष प्रशिक्षित तज्ञच स्कॅन करू शकतात.

स्कॅनमध्ये काय पाहिले जाऊ शकते?

तुमच्या गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील स्कॅन करताना तुमचे पोट छोट्या टरबुजासारखे दिसेल. परंतु आतून तुमच्या पोटाचा आकार ४-५ इंच इतका असेल आणि तो वाढत राहील. बाळाचे केस आणि नखे ह्याचा विकास होण्यास सुरुवात झालेली आहे. गरोदरपणाचा कालावधी जसजसा वाढत जाईल तशी तुम्हाला आणखी प्रगती होताना दिसून येईल. नंतर तुम्हाला बाळाचे डोके, कान आणि पोटाकडील भाग सुद्धा दिसू लागेल. बाळाचे स्नायू आणि हाड़े आता तयार झालेली आहेत आणि बाळाची मध्यवर्ती मज्जासंस्था सुद्धा विकसित आणि कार्यरत होऊ लागलेली आहे त्यामुळे तुम्ही अल्ट्रासाऊंड दरम्यान बाळ हलताना बघू शकता.

अल्ट्रासाऊंडमध्ये काही विकृती दिसल्यास काय?

जेव्हा तुम्ही अल्ट्रासाऊंडसाठी जाता, तेव्हा सोनोग्राफर तुमच्या बाळाच्या वाढीतील समस्या निश्चित करण्यासाठी इतर विविध चाचण्या देखील करतील. उदा: वाढीमध्ये कोणतीही विकृती आहे हे निर्धारित करण्यासाठी बाळाच्या अनुनासिक हाडाची लांबी मोजणे. गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर उद्भवू शकणारे कोणतेही धोके किंवा असामान्यता निर्धारित करण्यासाठी अनेक रक्त चाचण्या दिल्या जातात.

बाळामध्ये कोणत्याही समस्या असल्यास त्या शोधून काढण्यासाठी ट्रिपल स्क्रीन ही जन्मपूर्व रक्त चाचणी मदत करते. ह्या चाचणीमध्ये प्रामुख्याने अल्फा-फेटोप्रोटीन (एएफपी), गर्भाच्या यकृताद्वारे तयार केलेले प्रथिने आणि दोन हार्मोन्स: मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी) आणि एस्ट्रिओलची पातळी तपासण्यात मदत करते. ह्या मुळे डाऊन सिंड्रोम, स्पिना बिफिडा असे कोणतेही जन्म दोष निश्चित करण्यासाठी मदत होते.

अल्ट्रासाऊंड दरम्यान जाणवलेल्या कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही औषधे किंवा चाचण्या करून घेणे देखील महत्वाचे आहे.

१६ आठवड्यांनंतर प्रत्येक होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर गर्भारपणाचे तेज येईल आणि दुसरी तिमाही सुरु होईल. दुसरी तिमाही म्हणजे एक आनंददायक टप्पा आहे. जसजसे तुमचे बाळ वाढत जाते, बाळाची हालचाल जाणवू लागते, पोटाचा आकार वाढू लागतो आणि शरीर स्वतःला मातृत्वाच्या पुढील टप्प्यासाठी तयार करते.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved