गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

तुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटातील बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत.

गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅन का केले पाहिजे?

तुमच्या गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या नियमित तपासणीचा एक भाग आहे. खालील कारणांमुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्याचा सल्ला देऊ शकतात:

हा स्कॅन करण्यासाठी कोणती तयारी करणे आवश्यक आहे?

स्कॅनसाठी फारशी तयारी आवश्यक नसते. तुमचे मूत्राशय भरलेले राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. भरपूर पाणी प्यायलेले असल्याने डॉक्टरांना गर्भ स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. खूपही जास्त पाणी पिऊ नका कारण त्यामुळे स्कॅनींग करताना तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते. तुम्हाला किती पाणी पिण्याची गरज आहे हे तुम्ही तुमच्या रेडिओलॉजिस्टला आधीच विचारून ठेवू शकता.

प्रक्रियेसाठी आरामदायी आणि सैल कपडे घालणे चांगले जेणेकरुन रेडिओलॉजिस्टला स्कॅन करणे सोपे होईल.

१८ आठवड्यांचा अल्ट्रासाऊंड स्कॅन पूर्ण होण्यास किती वेळ लागतो?

१८-२० आठवड्यांच्या आसपास केल्या जाणाऱ्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला साधारणपणे ३०-४५ मिनिटे लागू शकतात.

हे स्कॅन कसे केले जाते?

रेडिओलॉजिस्ट तुमच्या पोटाच्या भागावर जेल लावतील आणि तुमच्या पोटावर ट्रान्सड्यूसर फिरवतील. स्कॅन रिअल-टाइममध्ये केले जाते, म्हणजेच तुम्ही स्क्रीनवर जे पहात असता ते त्या काळात तुमच्या गर्भाशयात घडत असते. तुम्ही डॉक्टरांना स्क्रीनवर फ्लॅश झालेल्या प्रतिमा स्पष्ट करण्यास सांगू शकता. अल्ट्रासाऊंड स्कॅनचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भाच्या आरोग्याचे स्कॅन करणे हा आहे.

१८ आठवड्यांच्या स्कॅनवर तुम्ही काय पाहू शकता?

स्क्रीनवर स्कॅनच्या प्रतिमा पाहण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या रेडिओलॉजिस्टला आधी विचारू शकता. बहुतेक रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रे ही सुविधा पुरवत असली तरी, आधी माहिती देणे केव्हाही चांगले.

तुम्हाला स्कॅनची झलक दाखवल्यानंतर, रेडिओलॉजिस्ट स्क्रीन स्वतःकडे वळवतील आणि इतर मूल्यांकन करतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्कॅनची सॉफ्ट कॉपी किंवा डीव्हीडी दिली जाईल.

गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील स्कॅन मध्ये काही धोके आणि परिणाम आहेत का?

अल्ट्रासाऊंड स्कॅनचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि तुम्ही तुमचे दैनंदिन क्रियाकलाप सहजपणे पुन्हा सुरू करू शकता. तसेच, गर्भवती आई आणि तिच्या पोटातील बाळावर स्कॅनचे कोणतेही दुष्परिणाम सिद्ध करणारे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. प्रतिमा मिळविण्यासाठी कोणतेही हानिकारक विकिरण वापरले जात नाहीत, त्याऐवजी, स्कॅन करण्यासाठी अतिशय उच्च-फ्रिक्वेंसीच्या ध्वनी लहरी वापरल्या जातात. जेव्हा गर्भ ट्रान्सड्यूसरपासून दूर असतो,तेव्हा प्रक्रिया थोडी कठीण होते आणि थोडा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला काही दिवसांनी पुन्हा स्कॅन करण्यासाठी बोलावले जाऊ शकते.जुळी किंवा एकाधिक बाळे असतील तर तुमच्या डॉक्टरांना गर्भाची रचना स्थापित करण्यात अडचणी येऊ शकतात आणि तुम्हाला काही दिवसांनी स्कॅन साठी पुन्हा येण्यास सांगितले जाऊ शकते.

१८ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये कोणत्या विकृती दिसू शकतात?

यापैकी काही विकृतींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

ह्या वैद्यकीय समस्या फार सामान्य नसतात आणि लहान मुलांमध्ये क्वचितच आढळतात. तथापि, अल्ट्रासाऊंड स्कॅन करणे आणि या सर्व वैद्यकीय परिस्थितींच्या शक्यता नाकारणे ही चांगली कल्पना आहे.

स्कॅनमध्ये समस्यांची चिन्हे आणि लक्षणे दिसत असल्यास काय?

जर रेडिओलॉजिस्टला स्कॅनमध्ये गर्भ स्पष्टपणे दिसत नसेल, तर तुम्हाला नंतरच्या तारखेला पुन्हा स्कॅनसाठी बोलावले जाईल. जर तुम्ही लठ्ठ असाल, किंवा बाळ गर्भाशयात खूप खोलवर असेल, तर पुन्हा स्कॅन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. तथापि, जर तुमच्या डॉक्टरांना वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची असामान्यता किंवा इतर दोष दिसले तर तुम्हाला त्याबद्दल सांगितले जाईल. समस्यांची गुंतागुंत आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांची भेट घेण्यास सुद्धा सांगितले जाऊ शकते.

गंभीर विकृतींच्या बाबतीत, तुम्हाला गर्भधारणा संपवण्याची सूचना केली जाऊ शकते. तथापि, काही समस्यांसाठी बाळाच्या जन्मानंतर त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते.

१८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन हा तुमच्या बाळाच्या आरोग्याविषयी जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काही पालक स्कॅनसाठी खूप उत्सुक असतात तर काही पालक स्कॅन न करून घेण्याचा निर्णय घेतात. अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घ्यायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे पालकांवर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्याबद्दल बोलू शकता.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved