In this Article
- पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) म्हणजे काय?
- गरोदरपणावर त्याचा कसा परिणाम होतो?
- पीसीओएस आणि गर्भधारणा
- पीसीओएस होण्यामागची कारणे
- पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोमची लक्षणे
- पीसीओएस चे निदान कसे होते?
- पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज वर उपचार
- पीसीओएस मुळे आरोग्यास असलेला धोका
- पीसीओएस असताना गर्भवती कसे व्हावे
- जर तुम्हाला पीसीओएस असेल तर डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?
५ ते १० टक्के स्त्रियांना मुले होण्याच्या वयात पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस ) चा त्रास होतो, परंतु ही स्थिती काही पारंपरिक समूहांमध्ये जास्त प्रमाणात आढळू शकते. स्त्रीच्या शरीरात पुरुष संप्रेरकांची पातळी वाढली की हा त्रास होतो. नावातील संदर्भाप्रमाणे पीसीओएस असलेल्या स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट आढळतात
पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम (पीसीओएस) म्हणजे काय?
पीसीओस, संप्रेरकांमधील असंतुलनामुळे होतो. प्रजनन प्रणालीवर त्याचा परिणाम होतो तसेच हृदय आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची शरीराची क्षमता ह्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. ह्यामुळे स्त्रीला गर्भधारणा होण्यास कठीण जाते आणि ते वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे.
ह्या स्थितीमुळे पाळी उशिरा येते आणि काही शारीरिक बदल सुद्धा होतात. पीसीओस मध्ये लैंगिक संप्रेरके नाहीशी होतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्त प्रमाणात केस येतात किंवा शरीरात इन्सुलिनला प्रतिकार केला जातो. जरी नावाप्रमाणे असे वाटते की ज्या स्त्रीला पीसीओएस झाला आहे तिच्या अंडाशयात खूप सिस्ट असतील तरी प्रत्येक वेळेला पीसीओसचे निदान झाल्यावर सिस्ट असतीलच असे नाही. तसेच, सिस्ट असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला पीसीओएस असेलच असे नाही. ह्या ‘सिस्ट‘ म्हणजे बीज असलेले आणि अर्धवट तयार झालेले बीजकोष होय.
गरोदरपणावर त्याचा कसा परिणाम होतो?
पीसीओएस असलेल्या ज्या स्त्रियांना गर्भधारणा झालेली असते अशा स्त्रियांवर गर्भारपणात खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. कारण ह्या स्त्रियांना तीन पट जास्त गर्भपाताचा धोका असतो. गर्भारपणातील मधुमेह आणि अकाली प्रसूती हे पीसीओएस चे आणखी काही दुष्परिणाम आहेत जे गर्भारपणात आढळू शकतात. गर्भारपणात मेटफोर्मीन घेण्याचा सल्ला डॉक्टर घेऊ शकतात त्यामुळे गर्भपाताची शक्यता कमी होते.
पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीला नियमित व्यायामाची गरज असते. हलके व्यायाम केल्याने इन्सुलिनचा वापर शरीर करू लागते, त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन होते आणि वजन नियंत्रित राहते. चालणे आणि हलके व्यायाम हे गर्भवती स्त्रीसाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार समजले जातात. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीचा आहार सुद्धा महत्वाचा आहे. प्रथिने आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात घेल्यास गर्भारपणात इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते.
पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रियांसाठी सिझेरिअन प्रसूतीला प्राधान्य दिले जाते. कारण आईला जर पीसीओएस असेल तर गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत खूप वाढते आणि सी सेक्शन प्रसूतीदरम्यान काही समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.
पीसीओएस असताना गर्भधारणा होणे हे अशक्य नाही, परंतु पीसीओएस असताना गर्भधारणा होणे नक्कीच थोडे अवघड आहे. कारण पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन असते आणि त्यामुळे नॉर्मल ओव्यूलेशन आणि मासिक पाळी मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. स्त्रीबीजांच्या गुणवत्तेवर सुद्धा ह्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे गर्भधारणेस अडचणी येतात. पीसीओएस आणि वंध्यत्व ह्यांच्यामधील नात्याची चर्चा केली जाते आणि खूप काळापासून त्यावर अभ्यास सुद्धा सुरु आहे.
पीसीओएस आणि गर्भधारणा
ही स्थिती असलेल्या बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते आणि गर्भारपणाचे संपूर्ण दिवस घेऊन प्रसूती होऊ शकते आणि त्यामध्ये कुठल्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज भासत नाही. परंतु ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज भासते त्यांना स्त्रीरोगतज्ञ आणि एंडोक्रिनॉलॉजिस्टस गर्भधारणा होण्यासाठी आणि समस्याविरहित प्रसूतीसाठी मदत करू शकतात. पीसीओएस गर्भारपणाचा दर खूप आशादायी आहे आणि ह्याप्रकारची प्रगती विज्ञानात दररोज होत आहे. जर उपचार घेतले तर पीसीओएस असलेल्या बऱ्याचशा स्त्रिया गरोदर राहतात आणि त्यांना निरोगी बाळ होते. खाली वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय गर्भधारणा झालेल्या पीसीओएस असलेल्या स्त्रियांची आकडेवारी दिली आहे आणि त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने मदत होऊ शकते कारण प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते.
पीसीओएस असताना गर्भधारणेची शक्यता
ज्या स्त्रियांना वंध्यत्वाचे प्रश्न असतात त्यांना वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे कठीण जाते
- पीसीओएस मुळे ८–१०% स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो. कारण त्यामुळे अनियमित ओव्यूलेशन होते किंवा ओव्यूलेशन होत नाही. वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे त्यामुळे कठीण असते.
पीसीओएस होण्यामागची कारणे
पीसीओएस चे नक्की कारण अजूनपर्यंत सापडलेले नाही. परंतु जनुकीय कारण त्यामागे असू शकते, तसेच इन्सुलिनला प्रतिकार आणि संप्रेरकांचे असंतुलन ही देखील कारणे आहेत. जर कुटुंबातील अन्य व्यक्तींना जसे की आई, बहीण किंवा मावशी ह्यांना पीसीओएसचा त्रास असेल तर त्या स्त्रीला पीसीओएसचा धोका वाढण्याची शक्यता असते.
ज्या स्त्रियांमध्ये पीसीओएसचे निदान झालेले आहे अशा स्त्रियांमध्ये साधारणपणे ८०% वेळा इन्सुलिनचा प्रतिकार आढळतो. आणि त्यामुळे शरीराला जास्त वेळ काम करून जास्त इन्सुलिन तयार करावे लागते जे साखरेचे विघटन करते. ह्यामुळे स्त्रीबीज जास्त प्रमाणात टेस्टेरॉनची निर्मिती करण्यास उद्दीपित होतात आणि त्यामुळे फॉलिकल्सच्या नॉर्मल विकासात अडथळा येतो. आणि त्यामुळे ओव्यूलेशन अनियमित होते.
जनुकीय घटकांसोबतच जीवनशैली हे सुद्धा इन्सुलिन प्रतिकारासाठी कारण असू शकते. जास्त वजनामुळे सुद्धा इन्सुलिनचा प्रतिकार वाढतो. संप्रेरकांमधील असंतुलन म्हणजेच टेस्टेरॉनची वाढलेली पातळी, ल्युटिनाइझिंग संप्रेरकाची वाढलेली पातळी आणि प्रोलॅक्टीनची वाढलेली पातळी ह्यामुळे सुद्धा पीसीओएस होऊ शकतो.
पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोमची लक्षणे
पीसीओएस ची लक्षणे हळूहळू दिसू लागतात आणि लक्षात सुद्धा येत नाहीत. ही लक्षणे किशोरावस्थेत जरी सुरु झाली तरी जोपर्यंत वजनात खूप वाढ होत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही.
अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी न येणे, मासिक पाळीदरम्यान खूप जास्त रक्तस्त्राव होणे, डोक्यावरील केस कमी होणे आणि शरीरावर इतर ठिकाणी विशेषकरून चेहऱ्यावर केस येणे, वारंवार गर्भपात होणे, औदासिन्य, इन्सुलिनला प्रतिकार आणि स्लिप अप्निया ही पीसीओस ची धोक्याची लक्षणे आहेत.
इतर काही लक्षणे म्हणजे त्वचेचे गडद चट्टे, मूड सविंग्स आणि गर्भधारणा होण्यास कठीण जाणे इत्यादी होय. बऱ्याच वेळा, ह्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे पीसीओएसचे निदान होणे अवघड होते. ह्या लक्षणांव्यतिरिक्त पीसीओएस असलेल्या स्त्रियांना मधुमेह, उच्चरक्तदाब आणि कोलेस्टेरॉल ह्या समस्या सुद्धा असू शकतात.
पीसीओएस चे निदान कसे होते?
प्रत्येक स्त्री वेगळी असते आणि पीसीओएस ची लक्षणे सगळ्यांमध्येच दिसत नाहीत. तसेच पीसीओएस साठी कुठली अशी विशिष्ट चाचणी नाही आणि म्हणून पीसीओएस ची उपचारपद्धती प्रत्येक डॉक्टर प्रमाणे बदलते.
सर्वात प्रथम, डॉक्टर तुमचा वैद्यकीय इतिहास तपासून पाहतील तसेच तुमची माहिती घेतील उदा: वजन, बीएमआय, मासिक पाळी चक्र, आहार आणि व्यायामाच्या सवयी. संप्रेरकांच्या समस्या आणि मधुमेहाशी संबंधित कौटुंबिक इतिहास सुद्धा पडताळून पहिला जाईल.
तसेच स्तन, थायरॉईड ग्रंथी, त्वचा, पोट इत्यादींची शारीरिक तपासणी सुद्धा करून पहिली जाईल. अंडाशयामध्ये काही असामान्य तर नाही ना हे तपासून पाहण्यासाठी पीसीओएस अल्ट्रासाऊंड करून पहिला जाईल. जर पीसीओएस ची लक्षणे आढळली म्हणजे सिस्ट आणि अंडाशयाचा वाढलेला आकार आढळला तर चाचण्यांमध्ये ते लक्षात येईल.
टेस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, ट्रायग्लिसराईड्स, कोलेस्टेरॉल, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (टीएसएच) आणि इन्सुलिनची पातळी तपासून पाहण्यासाठी डॉक्टर्स रक्ताच्या चाचण्या करायला सांगू शकतात. लिपिड ची चाचणी, फास्टिंग ग्लुकोज चाचण्या आणि थायरॉईड च्या चाचण्यांमुळे डॉक्टरांना आवश्यक माहिती मिळेल.
जर खालील दिलेल्या तीन गोष्टींपैकी दोन गोष्टी आढळल्या तर पीसीओएस झाल्याचे निदान होऊ शकते.
- मासिक पाळी चक्राचे कार्य नीट न होणे ह्यामध्ये मासिक पाळी न येणे किंवा अनियमित येणे ह्यांचा समावेश होतो
- रक्तात पुरुष संप्रेरकांची पातळी जास्त असणे आणि त्याची लक्षणे म्हणजे शरीरावर केसांची वाढ होणे विशेषकरून चेहरा. तसेच चेहऱ्यावर मुरूम येणे
- एक किंवा दोन्ही पॉलिसिस्टिक ओव्हरीचा आकार वाढतो किंवा एका अंडाशयात १२ किंवा त्यापेक्षा जास्त फॉलिकल्स आढळतात.
पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज वर उपचार
पीसीओएस वर काही उपाय नाही, परंतु वजन कमी करून, तसेच पोषक आहार, नियमित व्यायाम आणि औषधे घेतल्याने त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. लक्षणांवरून आणि स्त्रीचे गर्भारपणाचे नियोजन ह्यास अनुसरून उपचार पद्धती ठरते.
वजन कमी करणे
जास्त वजन असलेल्या स्त्रियांमध्ये वजन कमी करणे ही सर्वोत्तम उपचार पद्धती आहे. जरी ५% वजन कमी केले तरी मासिक पाळी चक्र सुरळीत सुरु होते आणि ओव्यूलेशन सुद्धा नियमित होते.
व्यायाम आणि संतुलित आहार
कमी चरबी असलेले दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्ये, भाज्या आणि फळे असलेला आहार म्हणजे संतुलित आहार होय. त्यासोबतच नियमित व्यायाम, संतुलित आहार ह्यामुळे तुमची संप्रेरके संतुलित राहण्यास मदत होते.
धूम्रपान बंद करणे
अँड्रोजेन किंवा पुरुष संप्रेरकांचे प्रमाण हे धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त असते. ही संप्रेरके पीसीओएस साठी जबाबदार असतात. धूम्रपान बंद केल्यास पीसीओएस च्या उपचारांना मदत होऊ शकते.
औषधे
पीसीओएस साठी नेहमी औषधे लिहून दिली जातात. गर्भनिरोधक गोळ्या पाळी नियमित होण्यासाठी घेतल्या जातात. अंगावरील केसांची जास्त वाढ किंवा केस गळणे ह्यासाठी औषधे लिहून दिली जातात त्यामुळे पुरुष संप्रेरके नियंत्रित राहतात.
लेप्रोस्कोपी
पीसीओएस मुळे वंध्यत्व येऊ शकते त्यामुळे , गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास लॅप्रोस्कोपिक ओवेरियन ड्रिलिंग (एलओ डी) ची छोटी शस्त्रक्रिया केली जाते. जो टिश्यू अँड्रोजेन (पुरुष संप्रेरक) निर्मितीस कारणीभूत असतो त्यावर उष्णतेची किंवा लेसर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे संप्रेरकांची पातळी नियमित होण्यास मदत होते आणि अंडाशयाचे कार्य सुरळीत होऊन गर्भधारणेस मदत होते. परंतु काही वेळा ही उपचार पद्धती तात्पुरती ठरते.
पीसीओएस असलेल्या बऱ्याच स्त्रियांना योग्य उपचार मिळाल्यास गर्भधारणा होऊ शकते. ह्यामध्ये क्लोमिफेन किंवा मेटफोर्मीन ह्यासारखी औषधे रुग्णाच्या लक्षणांवरून किंवा स्थितीवरून दिली जातात. आयव्हीएफ ही उपचारपद्धती सुद्धा पीसीओएस असलेल्या स्त्रियांना औषधास योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर करण्यास सांगितली जाऊ शकते.
पीसीओएस मुळे आरोग्यास असलेला धोका
पीसीओएस असलेल्या स्त्रियांना वंध्यत्व, मधुमेह, एन्डोमेट्रिअल कॅन्सर, हार्ट ऍटॅक, उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉल ची वाढलेली पातळी, स्लिप अप्निया, स्तनांचा कर्करोग, चिंता आणि औदासिन्य ह्या आरोग्यविषयक समस्या होण्याची जास्त शक्यता असते. स्लिप अप्निया धोकादायक ठरू शकतो कारण ह्यामध्ये झोपेत असताना श्वासनलिकेच्या वरच्या भागात अडथळा निर्माण होऊ शकतो. पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये मेटाबोलिक सिंड्रोम सुद्धा आढळतो तसेच ह्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका सुद्धा जास्त प्रमाणात आढळतो.
पीसीओएस असलेल्या स्त्रिया जेव्हा गर्भवती होतात तेव्हा जास्त धोका असलेले गर्भारपण हाताळणाऱ्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले कारण पीसीओएस असलेल्या गर्भारपणात गर्भपात, गर्भारपणातील मधुमेह आणि अकाली जन्म होणे इत्यादी समस्या आढळतात.
पीसीओएस असताना गर्भवती कसे व्हावे
पीसीओएस ही संप्रेरकांशी संबंधित समस्या आहे आणि त्यामुळे अनियमित ओव्यूलेशन होऊ शकते तसेच स्त्रीबीजे सुद्धा उत्तम गुणवत्तेची नसतात. स्त्रीरोगतज्ञ तसेच रिप्रॉडक्टिव्ह एंडोक्रिनॉलॉजिस्ट ह्यांचे मार्गदर्शन मिळाल्यास लवकर गर्भधारणा होऊ शकते. यशस्वी गर्भारपणासाठी खालील टिप्स ते तुम्हाला सांगू शकतात.
१. मासिक पाळीवर लक्ष ठेवणे
मासिक पाळी चक्रावर लक्ष ठेवल्यास त्याची वारंवारिता लक्षात येते. पीसीओएस मुळे मासिक पाळी अनियमित होते आणि त्यामुळे ओव्यूलेशनची शक्यता कमी होते आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामुळे डॉक्टर मासिक पाळीची नोंद ठेवण्यास सांगतात त्यामुळे ओव्यूलेशन होते आहे किंवा नाही हे समजते.
२. ओव्यूलेशन पॅटर्न वर लक्ष ठेवणे
ओव्यूलेशन टेस्ट किटचा वापर आणि शरीराचे मूलभूत तापमान ह्यावर लक्ष ठेवल्यास प्रत्येक मासिक पाळी चक्रदरम्यान ओव्यूलेशन होते आहे किंवा नाही हे समजण्यास मदत होते. हे कमीत कमी सहा महिने केले पाहिजे ज्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान होण्यास मदत होते.
३. वजन नियंत्रित करणे
पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये जास्तीच्या वजनामुळे अडथळा येऊ शकतो. पोषक आहार घेणे आणि काही किलो वजन कमी केल्यास संप्रेरकांचे संतुलन राहील आणि त्यामुळे गर्भधारणा होईल.
४. पोषक आहार घेणे
पीसीओएस मुळे शरीरातील इन्सुलिन नियंत्रित होण्यास मदत होते, पीसीओएस वर उपचारांसाठी आहार प्रथिने आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध असला पाहिजे. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ आणि गोड पदार्थांपासून दूर राहिल्यास संप्रेरकांचे संतुलन होते. त्यामुळे ओव्यूलेशन नॉर्मल होते आणि गर्भधारणा होते.
५. औषधे
जर ओव्यूलेशन अनियमित किंवा उशिरा होत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला मेटफोर्मीन किंवा क्लोमींड ह्यासारखी औषधे घेतल्यास ओव्यूलेशन नियमित होईल आणि मासिक पाळी येईल. जर ओव्यूलेशन आढळले नाही तर डॉक्टर प्रोव्हेरा सारखी औषधे लिहून देतील
६. गोनॅडोट्रोपिन
गोनॅडोट्रोपिन ही उपचारपद्धती डॉक्टर तुम्हाला सुचवू शकतील. ह्या उपचारपद्धतीमध्ये दररोज लक्ष ठेवणे आवश्यक असते.
७. आयव्हीएफ
जेव्हा औषधांनी अपेक्षित परिणाम दिसत नाहीत किंवा त्या व्यक्तीला ती औषधे लागू होत नसतील तर डॉक्टर आय.व्ही. एफ करण्यास सांगू शकतात. काही प्रकरणांमध्ये स्त्रीबीजावर पीसीओएस चा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे स्त्रीबीज दाता सुद्धा लागतो.
८. लॅप्रोस्कोपी
लॅप्रोस्कोपिक ओवॅरियन ड्रिलिंग ही अगदी छोटी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे पीसीओएस च्या काही प्रकरणांमध्ये मदत होऊ शकते. पुरुष संप्रेरके तयार करणाऱ्या टिश्यूला लक्ष्य केले जाते, आणि त्यामुळे शरीराच्या संप्रेरकांचे नैसर्गिक संतुलन राखले जाते त्यामुळे गर्भधारणा होऊ शकते.
९. गर्भधारणेनंतरची काळजी
एकदा गर्भधारणा झाल्यावर काळजी घेणे महत्वाचे आहे कारण पीसीओएस मुळे गर्भपाताचा धोका असतो. औषधांमुळे संपूर्ण गर्भारपणाच्या कालावधीत घेतली पाहिजेत कारण त्यामुळे प्रसूतीची खात्री होते.
जर तुम्हाला पीसीओएस असेल तर डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?
पीसीओएस ची लक्षणे ही थायरॉईड, लठ्ठपणा आणि मधुमेह इत्यादी समस्यांसारखीच असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा हे समजणे अवघड जाते. लवकर निदान आणि उपचार केल्यास पुढील काळासाठी ते फायदेशीर ठरू शकते विशेषकरून हृदयरोग आणि मधुमेह ह्यांच्या बाबतीत. योगनिमार्गातून खूप रक्तस्त्राव, औदासिन्य किंवा मूड सविंग्स आणि मधुमेहाची लक्षणे म्हणजे धोक्याच्या सूचना आहेत आणि तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
तहान वाढणे, वारंवार लघवीला जाणे, भूक वाढणे, वजन कमी होणे, अंधुक दिसणे, हात पायांना मुंग्या येणे ही सगळी लक्षणे मधुमेह निर्देशित करतात. ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित आहे आणि १२ महिने प्रयत्न करून सुद्धा गर्भधारणा होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे कारण वाट पाहिल्याने पीसीओएस असेल तर काही फायदा होत नाही. पीसीओएस वर घरगुती उपचार, लगेच गर्भधारणा हवी असल्यास उपयोगाचे ठरत नाहीत.
ताणाची वाढलेली पातळी, प्रदूषण, उशिरा गर्भधारणा आणि इतर अनेक घटक ह्यामुळे पीसीओएस हि समस्या जगभरातील स्त्रियांमध्ये आढळते. त्यामुळे गर्भधारणेला उशीर होतो आणि गरोदरपणाच्या कालावधीत जास्त काळजी घ्यावी लागते. ताण घेणे टाळणे हे खूप महत्वाचे आणि उपचारांदरम्यान सकारात्मक विचार केल्यास त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल.
आणखी वाचा:
अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)
संतती नियमन थांबवताना त्याचे गर्भधारणेवर होणारे परिणाम