Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) मुलांवर मोबाईल फोनमुळे होणारे ५ दुष्परिणाम

मुलांवर मोबाईल फोनमुळे होणारे ५ दुष्परिणाम

मुलांवर मोबाईल फोनमुळे  होणारे ५ दुष्परिणाम

जगभरातील मुले विविध कारणांसाठी स्मार्टफोन वापरतात. काही मुले त्यांच्या मित्रांशी बराच वेळ बोलत असतात, तर काही मुले फोनवर असंख्य गेम खेळण्यात त्यांचा वेळ घालवतात. इंटरनेट हे मुलांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. स्मार्टफोनचा किती उपयोग आहे ह्यावर वादविवाद करता येत नसला तरी, सतत वापर आणि एक्सपोजरमुळे मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात.

व्हिडिओ: मुलांच्या आरोग्यावर स्मार्टफोनचे 8 हानिकारक परिणाम होतात. आणि पालकांना ते माहित असणे आवश्यक आहे

लहान मुलांवर स्मार्टफोन/सेल फोनचे होणारे वाईट परिणाम

मोबाईल फोन मुलांचे लक्ष विचलित करण्याचा किंवा त्यांना व्यस्त ठेवण्याचा एक सोपा मार्ग असू शकतो. परंतु, मोबाईल फोनचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात. मोबाइल फोनच्या नियमित वापराच्या काही नकारात्मक परिणामांमध्ये खालील दुष्परिणामांचा समावेश होतो.

१. ट्यूमर

ह्या माहितीने तुम्हाला घाबरवण्याचा आमचा हेतू नाही, परंतु सेलफोनच्या जास्त वापरामुळे ट्युमर होण्याची जास्त शक्यता असते असे अभ्यासानुसार लक्षात आले आहे. सेलफोन रेडिएशनमुळे ट्यूमर होतात याचे मर्यादित पुरावे आहेत, परंतु पालक म्हणून, इतर संभाव्य धोके टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांचा फोन वापरण्याचा वेळ मर्यादित करू शकता.

२. मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो

अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि. मानवी मेंदू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठी संवेदनशील आहे; परंतु, किरणोत्सर्गामुळे मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये अडथळा येऊ शकतो. हे सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. कारण, मोबाईल फोन प्रामुख्याने सर्व प्रकारच्या संप्रेषणासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींवर कार्य करतात,  आणि मेंदूचे स्वतःचे विद्युत आवेग असतात. त्यामध्ये न्यूरल नेटवर्कमध्ये संप्रेषण केले जाते, त्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे, रेडिएशनमुळे मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो हे सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

मूल ज्या सामग्रीशी संपर्क साधते आणि स्क्रीन टाइम ह्या दोन घटकांचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, पालकांनी स्क्रीन टाइम नियंत्रित करणे किंवा मर्यादित करणे आवश्यक आहे. मुलांना त्यांच्या वयासाठी योग्य असे काही कार्यक्रम, खेळांमध्ये  दाखल करावे. मुलांनी मर्यादित प्रमाणावर सेलफोनचा वापर केल्यास मुलाच्या शिकण्यावर किंवा इतर अभ्यास, छंद आणि खेळ इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

३. शैक्षणिक कामगिरी

अनेक मुले त्यांच्या शाळेत फोन सोबत घेऊन जातात. शाळेच्या सुट्टीत मित्रांसोबत गप्पा मारणे किंवा गेम खेळणे किंवा वर्गातही फोन घेऊन जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे मुले वर्गात लक्ष देण्यास अयशस्वी होतात, महत्त्वाचे धडे चुकवतात. परिणामी, अभ्यास आणि परीक्षांबद्दल मुले अनभिज्ञ असतात.

शैक्षणिक कामगिरी

४. शैक्षणिक गैरव्यवहार

स्मार्टफोन केवळ मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित करत नाही तर परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांच्या गैरव्यवहारांचे साधन देखील असू शकतात. जिथे परवानगी नाही अशा परीक्षांमध्ये इनबिल्ट कॅल्क्युलेटर वापरणे, परीक्षेत फसवणूक करण्यासाठी छायाचित्रे किंवा संदर्भ माहिती संग्रहित करणे किंवा परीक्षेदरम्यान इतर विद्यार्थ्यांशी चॅटवर उत्तरांची देवाणघेवाण करणे, हे विविध शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. अशा वर्तनामुळे केवळ शैक्षणिक कार्यक्षमतेवरच परिणाम होत नाही तर व्यक्तिमत्वाची समस्या देखील उद्भवते

५. अयोग्य माध्यम

इतर कोणत्याही गॅझेटप्रमाणे, मोबाईल फोन देखील एक साधन आहे. हे साधन चुकीच्या हेतूंसाठी वापरले जाऊ शकते. अयोग्य संदेश, प्रतिमा किंवा मजकूर इत्यादी सामग्री मित्रांकडून किंवा गटामध्ये सामायिक केली जाऊ शकते. पुढे लहान मूल ती सामग्री इतरांपर्यंत पोहोचवू शकते.  त्यामुळे मुले’ लहान वयातच पोर्नोग्राफीचा मार्ग शोधू शकतात, त्यांची धारणा आणि विचार प्रक्रिया बदलतात. अगदी बेजबाबदारपणे त्यांच्या स्वत:च्या प्रतिमांची देवाणघेवाण केल्याने त्यांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होणारी एखादी  फसवणूक सुद्धा होऊ शकते.

६. झोपेत व्यत्यय

मुले उशिरापर्यंत मित्रांशी बोलणे, गेम खेळणे किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत राहू शकतात. त्यामुळे वेळोवेळी थकवा आणि अस्वस्थता येते. शैक्षणिक जीवनातही व्यत्यय येतो, कारण मुलांना शाळेत जे शिकवले जाते त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांना झोप लागते. म्हणून, मोबाईल वापराचा हा “डोमिनो इफेक्ट” आहे आणि तो त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करतो.

७. वैद्यकीय समस्या

मुले मोकळ्या वेळेत मोबाईल फोनवर चिकटून राहिल्याने, त्यांच्या शारीरिक हालचाली होत नाहीत. मुले  ताजी हवा घेत नाहीत. त्यामुळे त्यांना लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका असतो, आणि नंतर मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या हानिकारक रोगांमध्ये विकसित होऊ शकतो.

८. मानसिक आरोग्य

सोशल मीडियावरील मुले सायबरबुलीजच्या संपर्कात येऊ शकतात. ते त्यांना इंटरनेटवर त्रास देतात आणि धमकावतात. सायबर-धमकीची शिकार झालेली अनेक मुले त्यांच्या नंतरच्या आयुष्यात हे अनुभव स्वीकारू शकतात परंतु त्यांचे मानसिक नुकसान आधीच झालेले असते. जेव्हा लक्ष दिले जात नाही तेव्हा सोशल मीडियामुळे मुलांना नैराश्य आणि चिंता ह्यासारखे मानसिक विकार सुद्धा देखील होऊ शकतात.

काही पालक जागरूकतेने सावध होऊ शकतात आणि वर नमूद केलेल्या सर्व किंवा बहुतेक धोक्यांपासून मुलांना वाचवू शकतात. मुलांमधील मोबाइल फोनचा धोका कमी करण्यासाठी तुमच्यासाठी काही सुरक्षा टिप्स वाचा.

जोखीम कमी करण्यासाठी मोबाइल फोन वापरासंबंधित सुरक्षितता टिप्स

लहान मुले मोठी होत असताना मोबाईल फोन सुरक्षितपणे वापरण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • सामान्य सराव म्हणून, १६ वर्षांखालील मुलांना सेल फोन देणे टाळा. गरज पडल्यास तुमच्या मुलाची सुरक्षितता आणि आरोग्यह्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही शिक्षक आणि शाळेतील कर्मचार्‍यांच्या संपर्कात राहू शकता.मुलाला त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मर्यादित प्रमाणात किंवा अजिबात सामग्रीशी संपर्क न येणे चांगले.
  • जर तुम्हाला रेडिएशनबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला वायर्ड हेडसेट घालायला लावू शकता किंवा तो फोनवर बोलत असताना त्याच्या बोलण्याचा वेळ मर्यादित करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे, सेलफोन रेडिएशनमुळे ट्यूमर होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, परंतु जर ह्या उपायामुळे तुमची चिंता कमी होत असेल तर हा उपाय करा.
  • तुमचे मूल एखादा खेळ खेळात असल्यास तुमच्या मुलाला सतत तुमचा मोबाईल फोन देणे टाळा  कारण त्यामुळे त्याचे लक्ष विचलित होऊन तो पडू शकतो आणि जखमी होऊ शकतो.
  • प्रौढ म्हणून, पालकांनी आणि घरातील इतर लोक जेव्हा मुलांच्या आसपास असतात तेव्हा त्यांच्या फोनचा वापर प्रतिबंधित करणे महत्वाचे आहे. हे केवळ किरणोत्सर्ग टाळण्याच्या उद्देशानेच नाही तर वर्तनाचा नमुना तयार करण्यासाठी देखील आहे.
  • तुमचा मोबाईल फोन सुरक्षितपणे तुमच्याजवळ ठेवा आणि रात्री तुमच्या मुलांच्या नजरेपासून दूर ठेवा. मुलं शांतपणे तुमच्या नकळत फोन घेऊ शकतात.

प्रत्येक तंत्रज्ञान किंवा साधनांप्रमाणे, मोबाईल फोन म्हणजे दुधारी तलवार आहे. स्मार्टफोनचे तांत्रिक उपयोग खूप आहेत आणि ते मुलांसाठीही शिकण्याचे साधन आहे. परंतु, गोष्टी संयत ठेवणे आणि वापराचे तास मर्यादित करणे हे मुलांच्या चांगल्यासाठी आणि त्यांना चांगल्या वर्तणुकीच्या सवयी लावण्यासाठी आवश्यक आहे.

संदर्भ:

  1. WebMD – Effects of cellphone radiation on children
  2. WebMD – Cellphone effects on the brain

आणखी वाचा:

आपल्या मुलाला योग्य मार्गाने ‘नाही’ कसे म्हणाल
पालकांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत अशा चांगल्या सवयी
तुमच्या मुलाला नुकसान पोहचवू शकतील असे सनस्क्रीन मधील सामान्य घटक

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article