Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी मॉर्निंग सिकनेस’साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय

मॉर्निंग सिकनेस’साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय

मॉर्निंग सिकनेस’साठी सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय

गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक टप्पा असू शकतो परंतु त्यासोबत येणारा मॉर्निंग सिकनेस नक्कीच स्वागतार्ह नाही. सुमारे ७०८०% स्त्रिया पहिल्या तिमाहीत मळमळ, उलट्या आणि थकवा (मॉर्निंग सिकनेसची सामान्य वैशिष्ट्ये) अनुभवतात. मॉर्निंग सिकनेस साधारणपणे गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यापासून सुरू होतो आणि आठव्या व नवव्या आठवड्यात खूप वाढतो. तुम्ही गरोदर असताना तुमचे शरीर ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोफिन (HCG) हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार करते, आणि त्यामुळे मळमळ होते. नाळ तयार होईपर्यंत हे संप्रेरक तुमच्या बाळाला पोषण देते. त्यानंतरच मळमळ मोठ्या प्रमाणात कमी होते. सुमारे १४ ते १६ आठवड्यांपर्यंत, तुमचा मॉर्निंग सिकनेस लक्षणीयरीत्या कमी होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत मात्र हा मॉर्निंग सिकनेसचा त्रास संपूर्ण गर्भारपणाच्या कालावधीत तसाच सुरु राहतो. आजारी असल्यावर चांगले वाटत नाही. परंतु, जर तुमचे वजन आणि इतर बाबी नियंत्रणात असतील तर काळजी करण्याची गरज नाही. दरम्यान, मॉर्निंग सिकनेस पासून मुक्त होण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांची माहिती करून घेण्यासाठी हा लेख वाचा.

मॉर्निंग सिकनेससाठी नैसर्गिक उपाय

गरोदरपणातील मॉर्निंग सिकनेस ही एक दयनीय अवस्था असू शकते आणि तुमची त्यापासून सुटका करून घेण्यासाठी जे काही उपाय असतील ते तुम्ही करून पहाल. मॉर्निंग सिकनेस पूर्णपणे रोखणे शक्य नाही कारण हा गरोदरपणाचा तो एक सामान्य आणि नैसर्गिक भाग आहे. तथापि, त्यावर काही घरगुती आणि पूरक उपाय आहेत. ह्या उपायांमुळे मॉर्निंग सिकनेस पासून तात्पुरता आराम मिळू शकतो. आयुर्वेदाचा ठाम विश्वास आहे की वात, पित्त आणि कफ दोष यांचे संतुलन आरोग्याच्या परिपूर्ण स्थितीसाठी आवश्यक आहे. पित्त दोषाच्या वाढीमुळे मॉर्निंग सिकनेस होतो. आयुर्वेदाने सांगितलेले काही घरगुती उपाय आपण खातो त्या अन्नामध्ये आढळतात. मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी काही उपाय आहेत ते जाणून घेण्यासाठी वाचा.

. आले

आले

गरोदरपणात होणारी मळमळ कमी करण्यासाठी आहारतज्ञ आले खाण्याचा सल्ला देतात. आल्याचा रस तुमचे पोट शांत करण्यास मदत करतो. एक चमचा आल्याचा रस घेतल्याने अस्वस्थता कमी होते. तसेच, तुम्ही आले घातलेला चहा किंवा आले कँडीज वापरून पाहू शकता.

. पुदिना

पुदिना

पुदिन्याची पानांची चव खूप फ्रेश करणारी आणि थंडावा देणारी असते. गरोदरपणातील मळमळ होण्यावर सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी तो एक उपाय आहे. फक्त त्याचा वास घेतल्याने किंवा काही पाने चघळल्याने मळमळ होण्याची भावना दूर होण्यास मदत होईल.

. लिंबाचा रस

लिंबाचा रस

लिंबाचा रस थोडं मीठ आणि साखर टाकून घेतल्यास तो मॉर्निंग सिकनेसवर उत्तम उपाय आहे. लिंबाच्या आंबटपणामुळे मळमळ होण्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

. नारळ पाणी

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात आणि ते मॉर्निंग सिकनेससाठी प्रभावी उपाय आहेत. एक शक्तिशाली आयुर्वेद उपाय म्हणजे तुम्ही नारळाच्या पाण्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि तुमचे पोट शांत करण्यासाठी दर १५ मिनिटांनी हा रस घ्या.

. गुलाबपाणी आणि दूध

एका ग्लास दुधात गुलाबजलाचे काही थेंब टाकून घेतल्यास मॉर्निंग सिकनेस वर ते परिणामकारक ठरू शकतात. एक ग्लास दुधात एक थेंब गुलाबपाणी टाका, दूध उकळा आणि थोडे कोमट झाले की हे मिश्रण प्या. पित्त दोष दूर करण्यासाठी आणि मॉर्निंग सिकनेस नियंत्रण ठेवण्यासाठी या एक कप दुधात एक चमचा तूप घालून ते घेण्याचे सुचवले जाते.

. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरचे अनेक उपयोग आहेत. आरोग्याच्या फायद्यांपासून ते साफसफाई करण्यासाठी हे एक जादुई पेय आहे आणि प्रत्येक समस्येसाठी ह्यामध्ये अनेक गुणधर्म आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाकल्यास मॉर्निंग सिकनेस दूर होतो.

. स्वतःला सजलीत ठेवा

हे थोडेसे त्रासदायक वाटू शकते, परंतु भरपूर पाणी प्यायल्यास तुमची मळमळ नियंत्रित राहील. दररोज आठ ग्लास पाणी पिणे हे जरा अवघड वाटत असले तरी, तुम्ही अधिक द्रवपदार्थांचे सेवन कसे करू शकता ते पहा. थोडे जास्त मीठ घालून अन्न खाल्ल्यास तहान लागते. जर तुम्हाला निर्जलीकरण टाळायचे असेल तर तुम्ही स्लश किंवा स्मूदीसारखे बर्फाचे थंड पेय देखील घेऊ शकता.

. तुमच्यासाठी योग्य अन्नपदार्थ कुठले ते शोधा

ज्या स्त्रिया मॉर्निंग सिकनेसचा सामना करतात त्यांना स्वतःला सुरुवातीला आवडलेल्या आणि कधीही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची लालसा वाटू शकते. तृणधान्ये, कँडीज, बिस्किटेहे काही कोरडे पदार्थ आहेत आणि ते मळमळ होत असलेल्या मातांना मदत करतात. परंतु कोणते अन्न तुम्हाला सर्वात जास्त अनुकूल आहे हे ठरवणे आणि नंतर ते घेणे हे सर्वस्वी तुमच्यावर आणि तुमच्या शरीरावर अवलंबून आहे.

. कमी प्रमाणात खा

जास्त वेळ उपाशी राहिल्याने तुमच्या पोटातील स्त्राव जास्त वेगाने कार्यरत होतात आणि त्यामुळे मळमळ होऊ शकते. दुसरीकडे, जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. सर्वोत्तम मार्ग म्हणजे थोडे थोडे खाणे. तुमच्या आहाराची योजना तयार करा. न्याहारी आणि दुपारचे जेवण जास्त प्रमाणात घ्या. मध्ये मध्ये सॅलड, फळे, नट्स किंवा भाजलेले पदार्थ ह्यासारखे आरोयदायी पदार्थ निवडा. झोपेतून उठल्यानंतर थोडेसे खाल्ल्यास ने मळमळ दूर होऊ शकते.

१०. तुमच्या मॉर्निंग सिकनेस च्या लक्षणांचे निरीक्षण करा

तुम्हाला मॉर्निंग सिकनेस केव्हा होणार आहे ह्याची साधारणपणे वेळ ओळखा. मग त्यामागील कारण शोधा. तुमच्या शेजाऱ्याच्या स्वयंपाकघरातून किंवा घरामागील अंगणातून येणाऱ्या वासामुळे हा त्रास असू शकतो. एकदा तुम्ही ट्रिगर ओळखल्यानंतर, लक्षणे टाळण्यासाठी योग्य उपाय करा. उदा:- जर तुम्हाला तुमच्या सहकार्‍याच्या दुपारच्या जेवणाच्या वासामुळे मळमळ होत असेल तर तुम्हाला बरे वाटण्यासाठी थोडे चाला .

११. व्यक्त व्हा

तुम्ही गरोदर असताना तुम्हाला अनेक गोष्टी आवडत नाहीत. मॉर्निंग सिकनेसच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या सभोवतालच्या लोकांशी बोला आणि तुमच्या भावनांबद्दल प्रामाणिक रहा, उदा: जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या शेव्हिंग जेलचा वास येत नसेल, तर त्याचा उल्लेख करा. तुमची लक्षणे दूर होईपर्यंत ते काही आठवडे ब्रँड बदलू शकतात.

१२. कामातून वेळ काढा

मॉर्निंग सिकनेसचा त्रास साधारणपणे पहिल्या तिमाहीमध्ये सर्वात जास्त होतो. तुमच्या गरोदरपणाबद्दल तुमच्या ऑफिस मधल्या लोकांना सांगणे चांगले आणि तुम्ही मॉर्निंग सिकनेसचा सामना कसा करावा यावर विचार करत आहात हे त्यांना कळू द्या. तुम्ही प्रसूतीला जाण्यापूर्वी फक्त वर्षभरासाठी शिल्लक राहिलेली रजा तपासा आणि कामातून थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास खूप वाढतो तेव्हा घरी अगदी आरामशीर सुट्टीचे वेळापत्रक तयार करा.

१३. विचलित होणे

वेदना किंवा इतर कोणत्याही अस्वस्थ परिस्थितीपासून स्वतःचे लक्ष विचलित केल्याने त्याचा खूप फायदा होतो. लक्षणांपासून विचलित होण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी एखादे पुस्तक वाचणे, सुडोकू कोडे, थोडे चालणे, कार्टूनिंग किंवा अगदी व्यायाम करा . पण अर्थातच, जर तुम्ही व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या.

१४. सर्व्हायव्हल किट

मळमळ थांबवण्यासाठी तुम्हाला नेहमीच जवळपास दुकान सापडेल असे नाही. टूथब्रश, टूथपेस्ट, माउथवॉशची बाटली यांचा समावेश असलेली एक किट नेहमी सोबत ठेवा त्यामुळे तुम्हाला उलटी केल्यानंतर फ्रेश वाटण्यास मदत होईल. जेव्हा तुम्हाला तुमचे पोट अस्वस्थ वाटत असेल तेव्हा तोंडात टाकण्यासाठी पाचक वटी सोबत ठेवा.

१५. संगीत

असे काही ऍप्लिकेशन्स आहेत जे स्पंदनांनी भरलेल्या संगीतासह विकसित केले गेलेले असतात. हे ऍप्लिकेशन्स आतील कानाच्या सूक्ष्म, संवेदनशील ऐकण्याच्या यंत्रणेचे संतुलन बदलण्यास मदत करतात. हेडफोन्स पेक्षा, इयरफोन्स ह्या स्पंदनांना कानाच्या विरुद्ध रिबाउंड करण्यास मदत करतात, त्यामुळे तुमचे मन विचलित होते आणि तुम्हाला उत्साही वाटते.

मॉर्निंग सिकनेसचा त्रास प्रत्येक दोन स्त्रियांपैकी एकीला होतो. ह्यावर कोणताही जलद इलाज नसला तरी, स्थिती कमी करण्यासाठी बरेच काही केले जाऊ शकते. गरोदरपणाच्या चौथ्या आणि आठव्या आठवड्यात सुरू होणारी लक्षणे पहिल्या तिमाहीनंतर कमी होऊ लागतात. परंतु, आपल्या संपूर्ण गरोदरपणादरम्यान थोडेसे अस्वस्थ वाटणे असामान्य नाही. चव आणि गंध आणि अगदी तुम्हाला आवडणाऱ्या अन्नामुळे सुद्धा तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ शकतो. तुमच्या अंतर्ज्ञानाप्रमाणे तुम्ही परिस्थितीचा अंदाज घ्या आणि तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का ते पहा.

आणखी वाचा: 

गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’
गरोदरपणातील ‘मोशन सिकनेस’: कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article