गर्भारपण

मोलर गर्भधारणा: कारणे, लक्षणे आणि उपचार

मोलर प्रेग्नन्सी ही गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारी, वारेच्या (प्लॅसेंटा) पेशींची एक दुर्मिळ समस्या आहे. ही समस्या असल्यास फलित अंडे किंवा भ्रूण नीट विकसित होत नाही. आणि त्याऐवजी ते द्राक्षाच्या घडासारखे दिसू लागते.

मोलर प्रेग्नन्सी म्हणजे काय?

मोलर प्रेग्नन्सी मध्ये गर्भधारणेनंतर  भ्रूण असामान्यपणे विकसित होतो आणि द्राक्षाच्या गुच्छासारखा दिसतो, ह्याला इंग्रजीमध्ये 'हायडाटिडिफॉर्म मोल' म्हणतात. प्लॅसेंटा तयार करणाऱ्या पेशींची ही एक दुर्मिळ विकासात्मक समस्या आहे. सामान्यतः सुरुवातीच्या तिमाहीत ही समस्या आढळते आणि बहुतेक केसेसमध्ये, अशी गर्भधारणा पुढे सरकत नाही.

प्रकार

अनुवांशिक आणि जनुकीय नमुन्यावर आधारित, मोलर गर्भधारणा पूर्ण आणि अंशतः मोलर गर्भधारणेमध्ये विभागली गेली आहे.

1. संपूर्ण मोलर गर्भधारणा

गरोदरपणात, आई आणि वडिलांकडून प्रत्येकी 23 गुणसूत्र बाळाला मिळतात  आणि त्यामुळे फलित अंड्यामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. संपूर्ण मोलर गरोदरपणात, 23 मातृ गुणसूत्रे नसतात आणि गर्भामध्ये केवळ 23 गुणसूत्र असतात आणि ते वडिलांकडून आलेले असतात. त्यामुळे  गर्भाची वाढ होत नाही आणि असामान्य गळू तयार होतात, आणि ते द्राक्षांसारखे दिसतात.

2. आंशिक मोलर गर्भधारणा

आंशिक मोलर गर्भधारणेमध्ये, गर्भामध्ये  मातृ गुणसूत्र असतात, परंतु ह्यांची संख्या पितृ गुणसूत्रांच्या दुप्पट असते म्हणजे, 23ऐवजी 46मातृ गुणसूत्रे असतात. यामुळे एकूण 69 गुणसूत्रांची रचना होते. गर्भाची वाढ होते परंतु त्याचा विकास नीट होत नाही. प्रतिकूल अनुवांशिक रचनेमुळे हा गर्भ काही महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकत नाही.

कारणे

अनुवांशिक विकृतींचे कारण मुख्यत्वे अज्ञात आहे. परंतु, खालील घटक मोलर गर्भधारणेच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहेत:

मोलर गर्भधारणेची शक्यता वाढवणारे जोखीम घटक

मोलर गर्भधारणा काही जोखीम घटकांशी संबंधित आहे आणि ते घटक खालीलप्रमाणे

मोलर गर्भधारणा सामान्य आहे  का?

जगभरात, ही स्थिती आशियाई उपखंडातील स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. प्रत्येक १५००  गर्भवती स्त्रियांमागे १ च्या वारंवारतेने ही समस्या उद्भवलेली आढळते. आधी मोलर गर्भधारणा झालेल्या स्त्रियांमध्ये देखील पुन्हा मोलर प्रेग्नन्सी उद्भवणे अधिक सामान्य आहे.

चिन्हे आणि लक्षणे

मोलर गर्भधारणेमध्ये कधी कधी काहीही लक्षणे दिसत नाहीत किंवा सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सामान्य गरोदरपणात जशी लक्षणे दिसतात तशीच दिसतात. गर्भारपणाचे दिवस जसजसे भरत जातात तसे, खालील लक्षणे दिसू लागतात. परंतु, ही सर्व लक्षणे नेहमीच मोलर प्रेग्नन्सीची नसतात कारण ती सामान्य गर्भधारणेमध्ये किंवा गर्भपात झालेला असल्यास सुद्धा दिसू शकतात.

निदान कसे केले जाते?

मोलर गर्भधारणेचे निदान प्रयोगशाळेतील अभ्यास आणि इमेजिंगच्या अभ्यासावर आधारित असते.

1. बीटा एचसीजी (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन) पातळी

हे संप्रेरक गर्भधारणेनंतर बीजांडाच्या फलनानंतर लगेच प्लॅसेंटा तयार करते. ह्या संप्रेरकाची रक्त आणि लघवीतील पातळी मोजली जाऊ शकते. सामान्य गरोदरपणात, ही पातळी शंभर (IU/ml) दरम्यान असते आणि वाढत्या गर्भावस्थेतील वयानुसार हे प्रमाण वाढते. मोलर गर्भधारणेमध्ये, बी-एचसीजी ची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. काही वेळा ही पातळी 100000 IU/ml पेक्षा जास्त असते.

2. मोलर प्रेग्नेंसी अल्ट्रासाऊंड

मोलर प्रेग्नेंसीचे निदान आणि पुष्टी करण्यासाठी ही तपासणी केली जाते. अल्ट्रासाऊंड केल्यानंतर गर्भाशयाच्या पोकळीत खूप सिस्ट दिसतात आणि त्यास 'स्नोस्टॉर्म पॅटर्न' असे म्हणतात. तसेच गर्भाची कुठलीही हालचाल दिसत नाही. मोलर प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी हे सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह साधन आहे. ह्याद्वारे उच्च बीटा एचसीजी पातळीद्वारे केलेल्या निदानाची पुष्टी देखील होते.

जोखीम आणि गुंतागुंत

मोलर गर्भधारणा खालील जोखीम आणि गुंतागुंतांशी संबंधित असू शकते:

उपचार

1. सक्शन रिमूव्हल किंवा डायलेशन आणि क्युरेटेज (डी अँड सी)

जेव्हा लक्षणे, एचसीजी पातळी किंवा अल्ट्रासाऊंड यांच्याद्वारे मोलर प्रेग्नन्सीचा संशय येतो, तेव्हा डायलेशन आणि क्युरेटेज केले जाते. यात फक्त गर्भाशयाचे मुख उघडले जाते आणि निदानाची हिस्टोपॅथॉलॉजिकल रीतीने पुष्टी करण्यासाठी आतील संपूर्ण सामग्री सक्शन द्वारे किंवा स्पुनिंग अथवा क्युरेटिंग करून बाहेर काढली जाते.

2. एचसीजी मॉनिटरिंग

उपचारानंतर काही प्रकरणांमध्ये, डी अँड सी नंतर गर्भाशयाच्या पोकळीत काही उती मागे राहतात. हे बीटा एचसीजी पातळीशी संबंधित आहे, आणि ते आदर्शपणे उपचारानंतर कमी होणे सुरू झाले पाहिजे.  बहुतेक वेळा, अवशिष्ट ऊतकांवर यशस्वीरित्या उपचार केले जातात. परंतु, काही प्रकरणांमध्ये गर्भधारणा ट्रोफोब्लास्टिक निओप्लासियामध्ये विकसित  होते.

3. औषध

मोलर गर्भधारणेच्या वैद्यकीय उपचारांमध्ये औषधांचा समावेश होतो:

4. हिस्टेरेक्टॉमी

प्रगत वय असलेल्या, किंवा पूर्ण कुटुंब किंवा इष्टतम वैद्यकीय उपचार असूनही वारंवार गंभीर आजार असलेल्या स्त्रियांसाठी, हिस्टेरेक्टॉमी हा सर्वोत्तम-सुचवलेला उपचार पर्याय आहे.

उपचारानंतर देखरेख

कोणताही रोग टाळण्यासाठी, उपचारानंतर त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उपचारानंतर तुमच्या डॉक्टरांशी नियमित भेट घेणे, शारीरिक तपासण्या आवश्यक आहेत. दर महिन्याला रक्त आणि लघवीच्या चाचण्यांच्या मदतीने उपचारानंतर बीटा एचसीजी पातळी निरीक्षण केले जाते. सामान्यतः, उपचारानंतर अत्यंत उच्च एचसीजी पातळी लक्षणीय घटली पाहिजे. जर ती पातळी  सतत जास्त राहिल्यास, समस्या तशीच राहिल्याचा संशय येऊ शकतो. उपचारानंतर ट्रॉफोब्लास्टिक डिसीजची कोणतीही शक्यता नाकारण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग केले जाऊ शकते.

मोलर प्रेग्नन्सीनंतर पुढील उपचार

मोलर प्रेग्नन्सीसाठी उपचार उपलब्ध असूनही, काही प्रकरणांमध्ये (1% आंशिक आणि सुमारे 15% पूर्ण) एक अवशिष्ट ऊतक असू शकतो आणि याला पर्सिस्टंट ट्रोफोब्लास्टिक रोग (PTD) म्हणून ओळखले जाते. शरीराच्या इतर ऊतींमध्ये पसरून ते घातक ठरू शकते. ह्यामध्ये सामान्यत: फुफ्फुसांचा समावेश होतो. उपचारामध्ये फॉलिक ऍसिड पूरक औषधे दिली जातात. तसेच मेथोट्रेक्झेट सायकलसह केमोथेरपीचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो.

प्रतिबंध

पॅथोफिजियोलॉजी मुख्यत्वे अनुवांशिक असल्याने, कोणतेही निश्चित प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध नाहीत. परंतु खालील गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो.

भविष्यात मोलर गर्भधारणेची शक्यता

मोलर गर्भधारणेमध्ये पुनरावृत्ती होण्याचा धोका 1.5-2% असतो. कोणतेही गंभीर दीर्घकालीन आरोग्यविषयक धोके नोंदवले जात नाहीत. मोलर प्रेग्नन्सीच्या घटनेनंतर एखाद्या स्त्रीला सामान्य गर्भधारणा होऊ शकते. परंतु, पुनरावृत्ती टाळण्यासाठी गर्भधारणेपूर्वी शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांचे अंतर आणि केमोथेरपीनंतर सुमारे एक वर्षाचा सल्ला दिला जातो.

आपण गर्भवती होण्याचा प्रयत्न कधी करू शकता?

सुदैवाने, मोलर प्रेग्नन्सी किंवा त्याच्या उपचारांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. तसेच, त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका कमी (1.5-2%) आहे. जगभरातील डॉक्टर गर्भधारणेपूर्वी 1 वर्ष प्रतीक्षा कालावधीचा सल्ला देतात. त्यामुळे बीटा एचसीजीला सामान्य पातळीवर परत येण्यासाठी वेळ मिळतो. एकदा प्री-पॅथॉलॉजिकल पातळीची नोंद झाल्यानंतर, तुम्ही आता सुरक्षित गर्भधारणेची योजना करू शकता.

भीती आणि नुकसानाचा सामना कसा करावा?

मोलर प्रेग्नन्सी हा त्रासदायक अनुभव असू शकतो आणि गर्भपाताप्रमाणे तुमच्या मुलाचे गंभीर नुकसान होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती आणि तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा अत्यावश्यक आहे. पुनरावृत्ती टाळण्यासाठी खूप जास्त चिंता आणि जास्त उपचार धोकादायक असू शकतात. समुपदेशकाचा सल्ला घेणे आणि दत्तक घेण्याचा विचार करणे योग्य आहे. मोलर प्रेग्नन्सी ही एक दुर्मिळ पॅथॉलॉजिकल स्थिती आहे. आणि त्यामुळे गर्भधारणा संपुष्टात येते.  मोलर प्रेग्नेंसीचा अर्थ समजून घेऊन, वेळेवर तपासणी आणि पूर्ण उपचार  घेऊन ही स्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते आणि पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेता येते. आणखी वाचा: गरोदरपणातील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) घरगुती उपाय नाळ खाली सरकण्याची (प्लॅसेंटा प्रेव्हिया) कारणे, धोके आणि उपचारपद्धती
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved