आरोग्य

बाळाच्या चेहऱ्यावरील पुरळांवर ८ घरगुती उपाय

    In this Article

नवजात बाळाची त्वचा मऊ आणि नाजूक असते. परंतु बाळाच्या त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते. एक पालक म्हणून, बाळाच्या चेहऱ्यावर पुरळ दिसल्यास तुम्हाला काळजी वाटू शकते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. बाळाच्या त्वचेवरील बहुतेक पुरळ निरुपद्रवी असतात. त्यावर उपचारांची गरज नसते, ते आपोआप नाहीसे होतात. परंतु, जर हे पुरळ आपोआप नाहीसे झाले नाहीत तर तुम्ही काही उपचार करून पाहू शकता. पुरळ दूर करण्यासाठी तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर रसायनांवर आधारित क्रिम्स किंवा लोशन वापरणे हा काही फारसा चांगला उपाय नाही, म्हणून तुम्ही नैसर्गिक घटक वापरून पाहू शकता. हे घटक प्रभावी आणि सुरक्षित आहेत.

बाळाच्या चेहऱ्यावरील पुरळ घरी कसे बरे करावे?

येथे काही घरगुती उपाय आहेत. हे घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेची सुरक्षित पद्धतीने काळजी घेऊ शकता.

1. ओट्स

ओट्स त्वचेवरील खाज कमी करण्यास मदत करतात. कारण ओट्समध्ये एव्हेनथ्रामाइड्स असतात आणि ते दाहक-विरोधी असतात. त्यासाठी एका वाटीत ओट्स घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला. आता हे मिश्रण ब्लेंडरमध्ये घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. त्वचेवर लावा आणि कोरडे झाल्यावर काढून टाका. परंतु, आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावण्यापूर्वी, ऍलर्जी तपासण्यासाठी त्याच्या हातावर एक लहान पॅच लावून पहा. जर तुमच्या बाळाला ओट्सची ऍलर्जी नसेल, तर तुम्ही त्याचा वापर त्याच्या चेहऱ्यावरील त्वचेच्या पुरळांवर उपचार करण्यासाठी करू शकता.

2. कॅमोमाइल चहा

ह्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि ते जखमा निर्जंतुक करण्यासाठी आणि त्वचेवरील पुरळ बरे करण्यासाठी मदत करतात. पुरळांच्या आकारानुसार, तुम्हाला एक किंवा अधिक चहाच्या पिशव्या वापरण्याची आवश्यकता भासू शकते. ह्या चहाच्या पिशव्या गरम पाण्यात ठेवा आणि उकळल्यानंतर त्या  थंड होऊ द्या. पाणी कोमट झाल्यावर पिशव्या पाण्यातून बाहेर काढा आणि तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर ठेवा. चहाच्या पिशव्या जास्त गरम नाहीत ना ते तपासून पहा.

3. दही

रोगप्रतिकारक शक्ती ठीक नसल्यास एक्झिमा होऊन त्वचेवर पुरळ उठतात. दह्यामध्ये आढळणारे बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि तसेच त्वचेला खाज सुटत असेल तर ती कमी होते.

4. केळ्याची साले

त्वचेवर उठणाऱ्या पुरळांवर उपचार करण्यासाठी केळ्याच्या सालींचा उपयोग होतो. सर्वात आधी, केळीची साले सुमारे एक तास किंवा त्याहून अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर, पुरळ उठलेल्या भागावर एखादा छोटासा लहानसा तुकडा लावा. असे केल्याने त्वचा स्वच्छ होते आणि त्वचा योग्यरित्या मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. तसेच ह्यामुळे तुमच्या बाळाला ताजे आणि टवटवीत वाटेल.

5. कडुलिंब

त्वचेसाठी आश्चर्यकारक फायद्यांसाठी भारतात शतकानुशतके कडुनिंबाचा वापर केला जात आहे. त्यात अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील पुरळ बरे होण्यास मदत होते. एक्झिमा ह्या त्वचाविकारावर कडुनिंबाचा उपयोग होतो. तुम्ही कडुलिंबाची पाने विकत घेऊन त्यात पाणी घालून बारीक करून पेस्ट बनवू शकता. तुमच्या बाळाला आराम मिळण्यासाठी प्रभावित भागावर पेस्ट लावा.

6. कोरफड

कोरफड हे त्वचेच्या उपचारांसाठी एक चांगले जेल आहे, म्हणूनच अनेक क्रीममध्ये वापरला जाणारा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यात प्रतिजैविके, दाहक-विरोधी आणि उत्तेजक गुणधर्म आहेत. बाजारात मिळणाऱ्या क्रीम्समध्ये ऍडिटिव्ज आणि कृत्रिम संयुगे देखील असू शकतात आणि ही संयुगे तुमच्या बाळाच्या संवेदनशील त्वचेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. कोरफड जेल थेट पानांमधून काढणे हा एक चांगला पर्याय आहे. ही पाने कोणत्याही चांगल्या सुपरमार्केटमधून तुम्ही खरेदी करू शकता.

7. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल कडे बरेच लोक एक झटपट आणि चांगला उपाय म्हणून पाहतात. ऑलिव्ह ऑइल हे एक नैसर्गिक क्लीन्सर आहे आणि त्वचेतून नको असलेले घटक आणि ऍलर्जीन काढून टाकण्याचे एक मोठे कार्य करते. यात ओलिओकॅन्थल नावाचा घटक असतो, हा घटक त्वचेला आराम देण्यास मदत करतो. याशिवाय, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई देखील असते. हे घटक नवीन त्वचा तयार होण्याच्या प्रक्रियेस तसेच त्वचा बरी करण्यास मदत करतात.

8. काकडी

काकडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. काकडीचे हे गुणधर्म चेहऱ्यावरील त्वचेवरील पुरळ कमी करण्यास मदत करतात. अगदी सर्वात संवेदनशील त्वचेवर सुद्धा काकडीतील घटक सौम्य प्रकारे कार्य करतात. काकडीमध्ये ओट्स मिसळून घट्ट पेस्ट तयार करता येते. ही पेस्ट प्रभावित भागावर लावल्यास पुरळ नाहीशी होण्यास मदत होते. लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते त्यामुळे अनावश्यक रसायने असलेली ओव्हर-द-काउंटर क्रीम टाळणे योग्य ठरेल. परंतु काही वेळा घरगुती उपायांमुळे त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या चेहऱ्यावर कोणताही घरगुती उपाय करून पाहण्यापूर्वी आणि योग्य उपचारांसाठी त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या. तसेच बाळाच्या हातावर आधी लहान पॅच टेस्ट करा. आणखी वाचा: बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत? बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved